Maharashtra

Thane

CC/1034/2015

Mrs Mandakini Maruti Hile, 2) Gaury Makrand Hile - Complainant(s)

Versus

Eskay complex building A co op Hsg Society, - Opp.Party(s)

Adv S P Kulkarni

09 Oct 2017

ORDER

THANE DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room No.214, 2nd Floor, Collector Office Building, Thane-400 601
 
Complaint Case No. CC/1034/2015
 
1. Mrs Mandakini Maruti Hile, 2) Gaury Makrand Hile
At Flat no 201, Eskay complex A co op Hsg Society, old Mumbai pune Rd, Kalwa west,Thane 400605
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Eskay complex building A co op Hsg Society,
At Old Mumbai Pune Rd, Kalwa west,Thane 400605
Thane
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 09 Oct 2017
Final Order / Judgement

Dated the 09 Oct 2017

न्‍यायनिर्णय       

           द्वारा- सौ.स्‍नेहा एस.म्‍हात्रे...................मा.अध्यक्षा.       

1.         प्रस्‍तुत तक्रारीत सामनेवाले ही कळवा (पश्चिम) जिल्‍हा-ठाणे येथील गृहनिर्माण संस्‍था आहे.  तक्रारदार नं.1 ही तक्रारदार नं.2 यांच्‍या वडिलांची आई आहे.  तक्रारदार नं.2 अज्ञान असल्‍याने तक्रारदार नं.1 गार्डीयन यांच्‍या मार्फत त्‍यांनी तक्रारदार नं.2 म्‍हणून प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार नं.1 व 2 सामनेवाले संस्‍थेचे सदर सदनिकेबाबत सभासद असल्‍याचे तक्रारदार यांनी नमुद केले आहे. तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे....    

2.    प्रस्‍तुत तक्रारीतील सामनेवाले असलेल्‍या गृहनिर्माण संस्‍थेतील सदनिका क्रमांक-501, Eskay Complex, “A”, CHS Ltd., Old Mumbai Pune Road Kalwa, Thane यांचे तक्रारदार नं.2 चे वडील मकरंद मारुती हिले हे सभासद होते.  त्‍यांचे नांव सदर सदनिकेच्‍या शेअर सर्टिफीकेटवर (सर्टिफीकेट क्रमांक-एफ-17) ता.10.11.2004 रोजी मुळ मालक म्‍हणून नोंदविल्‍याचे दिसुन येते.  तक्रारदार नं.2 चे वडिल मकरंद मारुती हिले यांचे ता.04.02.2008 रोजी निधन झाले, त्‍यांच्‍या पश्‍चात ता.03.09.2011 रोजी तक्रारदार नं.2 ची आई व मकरंद हिले यांची पत्‍नी व सदर सदनिकेबाबतची नॉमिनी श्रीमती रिमा हिले यांचे निधन झाले.  श्रीमती रिमा हिले यांनी त्‍यांच्‍या मृत्‍युपुर्वी सदर सदनिकेबाबत त्‍यांची मुलगी कु.गौरी हिले (अज्ञान) हिला नॉमिनी करण्‍याबाबत सामनेवाले संस्‍थेस ता.22.04.2008 रोजी पत्र दिले, व सदर पत्रात श्रीमती रिमा हिले यांनी तक्रारदार नं.2 यांचे गार्डीयन म्‍हणून श्रीमती रिमा हिले यांच्‍या आई (Complainant’s Maternal Grand Mother) श्रीमती लता चावला यांचे नांव दिले आहे.  परंतु तक्रारदार नं.2 यांच्‍या वडिलांच्‍या आईने म्‍हणजे तक्रारदार नं.1 ने सदर सदनिकेबाबत ऑगस्‍ट-2012 मध्‍ये रोजी सिव्‍हील जज एस.डी., ठाणे यांचेकडून MA-03-12 Letter of Administration प्राप्‍त केले आहे, त्‍यामध्‍ये तक्रारदार नं.2 यांचे गार्डीयन मार्फत नांव नमुद केले आहे, तसेच ता.03.03.2014 रोजी तक्रारदार नं.1 व 2 यांनी उपनिबंधक सहकारी गृहनिर्माण संस्‍था ठाणे यांचेकडून सदर सदनिकेबाबत महाराष्‍ट्र को-ऑप. सोसायटीज अँक्‍ट कलम-22(2) नुसार मानीव सभासदत्‍व प्राप्‍त झाल्‍याबाबतचे आदेश प्राप्‍त केले आहेत. त्‍यानुसार सामनेवाले संस्‍थेच्‍या शेअर सर्टिफी‍केट क्रमांक-एफ-17 वर तक्रारदार नं.1 व 2 यांचे नांव ता.19.01.2015 रोजी नोंदविण्‍यात आले आहे. तक्रारदार नं.1 व 2 यांचे नांव सदर सदनिकेबाबतच्‍या शेअर सर्टिफीकेटमध्‍ये नमुद केल्‍यावरही सदर सदनिकेबाबतच्‍या देखभाल खर्चाच्‍या बिलांवर सामनेवाले संस्‍थेने तक्रारदारांची नांवे नमुद न करता अदयाप पर्यंत मयत मुळ सभासद मकरंद हिले यांचे नांव कायम ठेवले आहे, त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या नांवे सामनेवाले संस्‍थेने देखभाल खर्चाची बीले न दिल्‍याने सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्‍याचे नमुद करुन तक्रारदार नं.1 व 2 यांनी सदर तक्रार दाखल करुन तक्रारीच्‍या प्रार्थना कलम-12 (a) ते 12 (d) मध्‍ये नमुद केल्‍यानुसार मागण्‍या केल्‍या आहेत.

3.    सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे आरोप फेटाळून त्‍यांच्‍या बचावा प्रित्‍यर्थ खालील मुद्दे मांडले आहेत.

      तक्रारदार हिचे वडिल मयत मकरंद हिले सदर सदनिकेचे मुळ मालक आहेत.  त्‍यांचे ता.04.02.2008 रोजी निधन झाले असुन त्‍यांनी तक्रारदार नं.2 यांची आई श्रीमती रिमा हिले यांना सदर सदनिकेबाबत नॉमिनी ठेवले होते. तक्रारदार नं.2 यांची आई श्रीमती रिमा हिले यांचे ता.03.09.2011 रोजी निधन झाले, परंतु तत्‍पुर्वी श्रीमती रिमा हिले यांनी ता.29.04.2008 रोजी सामनेवाले संस्‍थेस पत्र देऊन सदर सदनिकेबाबत 100 टक्‍के शेअरसाठी नॉमिनी म्‍हणून त्‍यांची मुलगी कु.गौरी हिले हिला नॉमिनी केले, तसेच ती अज्ञान असल्‍याने श्रीमती रिमा हिले यांनी त्‍यांच्‍या आई श्रीमती लता चावला या तक्रारदार नं.2 यांच्‍या गार्डीयन असल्‍याचे सामनेवाले संस्‍थेला कळविले आहे. तक्रारदार नं.1 यांनी Letter of Administration सिव्‍हील जज ठाणे यांचेकडून प्राप्‍त केले असले तरी तक्रारदार नं.1 यांची गार्डियन शिप रद्द करण्‍यासाठी श्रीमती लता चावला यांनी सिव्‍हील कोर्टात एम.ए.79/2013 दाखल केला होता, त्‍यामध्‍ये सामनेवाले नं.1 श्रीमती मंदाकिनी हिले हया असुन सामनेवाले नं.2 म्‍हणून सदर प्रकरणातील सामनेवाले असलेली गृहनिर्माण संस्‍था होती, व सदर संस्‍थेने सिव्‍हील जज ठाणे येथे अंडर टेकिंग ता.04.12.2014 रोजी दाखल केली असुन जो पर्यंत तक्रारदार नं.2 (गौरी हिले) हया सज्ञान होत नाहीत, तोपर्यंत सदर सदनिका अन्‍य त्रयस्‍थ व्‍यक्‍तीच्‍या नांवे हस्‍तांतरीत करणार नाही असे नमुद केले असल्‍याने, तसेच तक्रारदार नं.2 च्‍या दोन्‍ही आजींमध्‍ये सदर सदनिकेच्‍या हस्‍तांतरणाबाबत वाद असल्‍याने, व सदर सदनिका तक्रारदार नं.2 यांच्‍या पालकांनी खरेदी केली असुन, ती तक्रारदार नं.2 यांच्‍या पालकांची असतांना ती तक्रारदार नं.2 यांना डावलून अन्‍य व्‍यक्‍तींच्‍या नांवे होऊ नये तसेच सदर सदनिकेचा मालकी हक्‍क तक्रारदार नं.2 यांना मिळावा, व त्‍यांच्‍या पुढील भविष्याच्‍या दृष्‍टीने त्‍यांच्‍या शैक्षणिक अथवा आर्थिक गरजा भागविण्‍यासाठी सदर सदनिका त्‍यांचे नांवे रहावी या हेतुने सामनेवाले गृहनिर्माण संस्‍थेने तक्रारदार नं.1 यांचेकडून सदर सदनिका तक्रारदार नं.2 सज्ञान होईपर्यंत तक्रारदार नं.1 व त्‍यांचे कुटूंबातील इतर व्‍यक्‍ती अन्‍य व्‍यक्‍तीस विकणार नाहीत, तसेच सदर सदनिकेबाबतच्‍या सभासदत्‍वाचे संपुर्ण हक्‍क तक्रारदार नं.2 यांनाच रहातील असे हमीपत्र (Undertaking) तक्रारदार नं.1 यांचेकडून सामनेवाले संस्‍थेस प्राप्‍त झाले तरच, सदर सदनिकेच्‍या देखभाल खर्चाची बीले तक्रारदाराच्‍या नांवाने करण्‍यात येतील असा ठराव सामनेवाले संस्‍थेने ता.05.09.2015 रोजी संस्‍थेच्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत केला होता, त्‍यामुळे तक्रारदार नं.2 यांच्‍या संरक्षणासाठीच संस्‍थेने हा निर्णय घेतला असल्‍याने, व सिव्‍हील कोर्टातील Undertaking चा अवमान होऊ नये म्‍हणून सामनेवाले संस्‍थेने अशी कार्यवाही केली असल्‍याचा युक्‍तीवाद करुन तक्रारदार यांना सिव्‍हील कोर्टात सदर दाव्‍यांबाबत माहित असतांना देखील त्‍यांनी अशी तक्रार दाखल केली असल्‍याने, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली नाही, असे नमुद करुन तक्रारदार नं.2 यांच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने तक्रारीत योग्‍य ते आदेश पारित करावे असे सामनेवाले संस्‍थेने नमुद केले आहे.    

4.    सामनेवाले यांनी कैफीयत, पुरावा शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद त्‍यासोबतच्‍या आवश्‍यक कागदपत्रांसह दाखल केले आहे, व तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र दाखल केले आहे, तसेच तक्रारदार यांची तक्रार व तक्रारीत दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, इत्‍यादि त्‍यांचे लेखी युक्‍तीवाद म्‍हणून ग्राहय धरावे अशी पुरसीस दाखल केली आहे.

5.    उभयपक्षांच्‍या वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, तोंडी युक्‍तीवादाच्‍या दिवशी म्‍हणजे ता.18.09.2017 रोजी सामनेवाले यांच्‍या वकीलांनी, तक्रारदार नं.1 यांनी सदर सदनिका क्रमांक-501, Eskay Complex, “A”, CHS Ltd., Old Mumbai Pune Road Kalwa, Thane ही तक्रारदार नं.2 हया सज्ञान होईपर्यंत विकणार नाही अशी अंडरटेकिंग ता.31.07.2017 रोजी तक्रारदार नं.1 यांनी संस्‍थेस दिल्‍याचे नमुद करुन त्‍याची छायांकित प्रत मंचात दाखल केली, सदर अंडरटेकिंगची प्रत सामनेवाले यांचे वकीलांनी तक्रारदार यांच्‍या वकीलांना मंचासमक्ष दिली. तक्रारदार यांच्‍या वकीलांनी सामनेवाले यांनी जरी आज रोजी तक्रारदार नं.1 ची अंडरटेकिंग सादर केली असली तरी अदयापपर्यंत सदर सदनिकेच्‍या देखभाल खर्चाच्‍या बीलांवर तक्रारदारांची नांवे नमुद न केल्‍याने सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्‍याचा युक्‍तीवाद करुन तक्रारदार यांना सामनेवाले यांनी त्‍याबाबत नुकसानभरपाई दयावी असा युक्‍तीवाद केला आहे.

6.    उभयपक्षांनी दाखल केलेल्‍या आवश्‍यक कागदपत्रांचे अवलोकन करुन तक्रारीच्‍या निराकरणार्थ मंचाने खालील मुदयांचा विचार केला.            

                       मुद्दे                                                                       निष्‍कर्ष

1.सामनेवाले यांचा तक्रारदार नं.2 यांच्‍या भविष्‍याचे

  संरक्षण करण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांनी बचावात मांडलेल्‍या

  मुदयांनुसार स्‍पष्‍ट केलेला हेतु निर्मळ असला तरी

  तक्रारदार यांनी मागणी करुनही तक्रारदार यांना

  देखभाल खर्चाच्‍या बीलांवर त्‍यांची नांवे सामनेवाले यांनी

  अदयाप नमुद करुन न दिल्‍याने ग्राहक संरक्षण

  कायदयानुसार तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली

  आहे का ?......................................................................................होय.

2.तक्रारदार नं.1 व 2 सदर सदोषपुर्ण सेवेबाबत सामनेवाले

  यांचेकडून नुकसानभरपाई व न्‍यायिक खर्च मिळण्‍यास पात्र

  आहेत का ?...................................................................................होय.

3.तक्रारीत काय आदेश ?....................................तक्रार अंतिम आदेशामध्‍ये दिलेल्‍या

                                                                  तपशिलानुसार अंशतः मंजुर करण्‍यात येते.

 

7.कारण मिमांसा-

मुद्दा- क्र.1 व 2. तक्रारदार नं.2 यांचे वडील मकरंद हिले हे सदनिका क्रमांक-501, Eskay Complex, “A”, CHS Ltd., Old Mumbai Pune Road Kalwa, Thane बाबत मुळ सभासद होते, त्‍यांचे ता.04.02.2008 रोजी निधन झाले, त्‍यांनी त्‍यांची पत्‍नी व तक्रारदार नं.2 ची आई श्रीमती रिमा हिले यांना सदर सदनिकेचे नॉमिनी केले होते, श्रीमती रिमा हिले यांनी त्‍यांची मुलगी कु.गौरी हिले म्‍हणजेच प्रस्‍तुत तक्रारीतील तक्रारदार नं.2 यांना सदर सदनिकेबाबत 100 टक्‍के शेअरसाठी नॉमिनी” ठेवले असल्‍याचे, व श्रीमती लता चावला (तक्रारदार नं.2 च्‍या आईची आई) यांना तक्रारदार नं.2 चे गार्डियन म्‍हणून नमुद करुन सामनेवाले यांना दिलेले ता.29.04.2008 रोजीचे पत्र, अभिलेखावर सामनेवाले यांनी सादर केले आहे. तक्रारदार नं.1 यांनी सामनेवाले यांच्‍या मागणीनुसार सदर सदनिकेबाबत Letter of Administration ऑगस्‍ट-2012 मध्‍ये पारित केलेल्‍या आदेशान्‍वये सिव्‍हील जज ठाणे यांचेकडून प्राप्‍त केले आहे, तसेच त्‍यामध्‍ये तक्रारदार नं.2 यांच्‍या नावाचा समावेश आहे. (तक्रार अर्ज पान क्रमांक-9) तक्रारदार नं.1 व 2 यांनी ता.03.03.2014 रोजी उपनिबंधक सहकारी गृहनिर्माण संस्‍था यांचेकडून सदर सदनिकेबाबत महाराष्‍ट्र को-ऑप.सोसायटी अँक्‍टच्‍या कलम-22 (2) नुसार सदर सदनिकेबाबत मानीव सभासदत्‍व प्राप्‍त केले आहे. सदर आदेशामध्‍ये उपनिबंधकांनी तक्रारदाराच्‍या वकीलांचे निवेदनानुसार तक्रारदार नं.2 यांचे वडिल मयत मकरंद हिले यांचे आई वडिल हे अज्ञान गौरी हिले यांचे काळजीवाहू आजी व आजोबा असल्‍याचे नमुद करुन त्‍यांना सदर सदनिकेबाबत पुढील आदेश होईपर्यंत प्रबंधपत्र (Letter of Administration) दिले असल्‍याचा उल्‍लेख केला आहे. तक्रारदार नं.1 यांचे Letter of Administration व गार्डीयन शिपबाबत सिव्‍हील कोर्टातुन प्राप्‍त केलेले अदेश रद्द करणेबाबत तक्रारदार नं.2 च्‍या आईच्‍या आई म्‍हणजे लता चावला यांनी सिव्‍हील कोर्टामध्‍ये दाखल केलेल्‍या दावा क्रमांक-MISC Application No.79/13 IN MA-03-12 मध्‍ये सामनेवाले संस्‍थाही विरुध्‍द पक्षकार नं.2 असुन त्‍यांनी ता.04.12.2014 रोजीची तक्रारदार नं.2 यांच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने, व दोन कुटूंबातील सदर सदनिकेबाबतचा वाद लक्षांत घेऊन सदर सदनिका तक्रारदार नं.2 सज्ञान होईपर्यंत अन्‍य व्‍यक्‍तीच्‍या नांवे हस्‍तांतरीत करणार नाही अशी अंडर टेकिंग” सिव्‍हील कोर्टात दाखल केली होती ती सामनेवाले यांनी अभिलेखावर सादर केली आहे. (OP-AOE सोबत जोडलेले पान क्रमांक-3) त्‍यानंतर ता.04.04.2014 रोजी श्रीमती लता चावला यांनी तक्रारदार नं.2 याचे गार्डियन होण्‍याबाबतचा अर्ज (Civil Application u/s 7, 10, 13 of Guardian & Ward Act 1890 MA-308-2011) सिव्‍हील कोर्टाने नामंजुर केला आहे.  त्‍यामध्‍ये तक्रारदार नं.1 व त्‍यांचे पती मारुती हिले हे विरुध्‍द पक्षकार आहेत, सदर आदेशामध्‍ये देखील सिव्‍हील कोर्टाने तक्रारदार नं.2 यांचे श्रीमती मदाकिनी हिले व श्री.मारुती हिले हे तक्रारदार नं.2 चे काळजीवाहू आजी, आजोबा असुन आदेशाच्‍या परिच्‍छेद क्रमांक-14 मध्‍ये तक्रारदार नं.2 च्‍या शाळेतील Diary /Calendar मध्‍ये लिहिलेल्‍या तक्रारदार नं.2 च्‍या शाळेमधील प्रगती, रजा तसेच इतर महत्‍वाच्‍या नोंदीखाली तक्रारदार नं.1 व त्‍यांचे पती गार्डीयन म्‍हणून स्‍वाक्षरी करत असल्‍याचा उल्‍लेख आहे. (Exh-71 of Civil MISC MA/308/2011) ता.19.01.2015 रोजीच्‍या आदेशानुसार उपनिबंधकांनी नियुक्‍त केलेल्‍या प्राधिकृत अधिका-यांमार्फत तक्रारदार नं.1 व 2 यांचे नांव सदर सदनिकेबाबतच्‍या शेअर सर्टिफीकेटच्‍या मागे नोंदविण्‍यात आले आहे. त्‍यानुसार तक्रारदार यांनी सामनेवाले संस्‍थेस देखभाल खर्चाची रक्‍कम अदा केली आहे, परंतु ता.12.05.2015 रोजी व ता.26.08.2015 रोजी सामनेवाले संस्‍थेस तक्रारदार यांनी सदर सदनिकेबाबतचे बील त्‍यांच्‍या नावावर करुन देणेबाबत पत्र पाठवून, व त्‍याबाबत सामनेवाले यांना विनंती करुनही सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या नांवे ते करुन न दिल्‍याने, जरी सामनेवाले यांचा त्‍यामागील तक्रारदार नं.2 सज्ञान होईपर्यंत सदर सदनिका अन्‍य त्रयस्‍थ व्‍यक्‍तीस विकली जाऊ नये या भितीपोटी व सामनेवाले यांनी ता.05.09.2015 रोजी तक्रारदार नं.1 कडून तक्रारदार नं.2 सज्ञान होईपर्यंत सदर सदनिका विकणार नाही अशी अंडरटेकिंग” मागण्‍याबाबत ठराव पारित केला असला तरी, ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम-2 (1) (जी) नुसार तक्रारदार यांच्‍या नांवे देखभाल खर्चाचे बीलावर नाव नमुद न करुन तक्रारदाराप्रती त्रुटीची सेवा दिली आहे.  सबब सामनेवाले नं.1 व 2 यांना तक्रारदार यांनी अशाप्रकारे त्रुटीची सेवा दिल्‍याने तक्रारदार यांना सदर तक्रार वकीलाकरवी मंचात दाखल करावी लागली, व तक्रारदार नं.2 हे सदर सदनिकेचे (100 टक्‍के शेअर) नॉमिनी असुनही, व तक्रारदार नं.1 हे त्‍यांचे गार्डियन असुनही, त्‍यांची नांवे देखभाल खर्चाच्‍या बिलावर नमुद न केल्‍याने सामनेवाले यांनी तक्रारदार नं.1 व 2 यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून सामनेवाले यांनी तक्रारदार नं.1 व 2 यांना एकत्रितपणे रक्‍कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार), व न्‍यायिक खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) तक्रारदार नं.1 व 2 यांना एकत्रितपणे आदेश पारित तारखेपासुन 30 दिवसांत अदा करावे असे आदेश सामनेवाले यांना देण्‍यात येतात.

मुद्दा- क्र.3. तक्रारदार नं.2 या अज्ञान (At Present 16 Years) असल्‍याने तक्रारदार नं.1 यांनी सिव्‍हील कोर्टातुन वर नमुद तपशिलाप्रमाणे Letter of Administration सदर सदनिकेबाबत प्राप्‍त केले आहे, त्‍यामध्‍ये तक्रारदार नं.2 यांनी गार्डियन मारुती हिले यांचेमार्फत त्‍याकामी अर्ज केला होता, तसेच एमए-308-2011 मध्‍ये सिव्‍हील कोर्टाने ता.04.04.2014 रोजी तक्रारदार यांच्‍या आईच्‍या आईने केलेला गार्डियनशिपचा अर्ज त्‍यांची आर्थिक स्थिती तक्रारदार नं.2 यांना सांभाळण्‍याची नसल्‍याचे नमुद करुन नाकारतांना, तक्रारदार नं.2 यांची, त्‍यांच्‍या वडिलांचे आई, वडिल सदयस्थितीला, तक्रारदार नं.2 च्‍या आई वडिलांच्‍या निधनानंतर काळजी घेत असल्‍याने, ते तक्रारदार नं.2 यांचे काळजीवाहू आजी आजोबा /गार्डियन असल्‍याचे म्‍हटले आहे, तसाच उल्‍लेख उपनिबंधक ठाणे यांच्‍या आदेशामध्‍ये दिसुन येतो.  तक्रारदार नं.2 च्‍या वडिलांची सदर सदनिका असुन ते त्‍याचे मुळ मालक आहेत, व त्‍यांनी मृत्‍युपुर्वी तक्रारदार नं.2 यांच्‍या आईला म्‍हणजे श्रीमती रिमा हिले यांना सदर सदनिकेबाबत नॉमिनी म्‍हणून नियुक्‍त केले होते, व त्‍यानंतर श्रीमती रिमा हिले यांनी तक्रारदार नं.2 यांना (100 टक्‍के शेअरसाठी) नॉमिनी म्‍हणून नियुक्‍त करत असल्‍याचे पत्र सामनेवाले संस्‍थेस ता.29.04.2008 रोजी दिले आहे, म्‍हणजे गौरी हिले या सदर सदनिका म्‍हणजे सदनिका क्रमांक-501, Eskay  Complex, Building “A”, CHS Ltd., Old Mumbai Pune Road Kalwa, Thane याबाबत 100 टक्‍के शेअरसाठी नॉमिनी आहेत, त्‍या आधारे उपनिबंधकाच्‍या आदेशानुसार तक्रारदार यांना महाराष्‍ट्र को-ऑप. सोसायटी 1960 अँक्‍टच्‍या कलम-22 (2) नुसार मानीव सभासदत्‍व देण्‍यात आले असुन, श्रीमती मंदाकिनी हिलेचा हया त्‍यांच्‍या गार्डियन आहेत, तसेच महाराष्‍ट्र को-ऑप.सोसायटी अँक्‍ट-1960 च्‍या कलम-30 नुसार सदनिकेबाबत नॉमिनी नियुक्‍त केला असल्‍यास संबंधीत सदनिकेबाबतचा मालकीहक्‍क नॉमिनीच्‍या नांवे होतो. सेक्‍शन-30 महाराष्‍ट्र को-ऑप.सोसायटी अँक्‍ट-1960 मध्‍ये खालील प्रमाणे नमुद केलेले आहे.

30. Transfer of interest on death of member.- (1) On the death of a member of a society, the society shall transfer the share or interest of the deceased member to a person or persons nominated in accordance with the rules, or, if no person has been so nominated to such person as may appear to the committee to be the heir or legal representative of the deceased member.

Provided that, such nominee, heir or legal representative, as the case may be, is duly admitted as a member of the society:

Provided further that, nothing in this sub-section or in section 22 shall prevent a minor or a person of unsound mind from acquiring by inheritance or otherwise, any share or interest of a deceased member in a society.

तसेच तक्रारदार नं.2 च्‍या शाळेतील कॅलेंडर/डायरी इत्‍यादि वर देखील तिच्‍या आजी आजोबांची गार्डियन म्‍हणून स्‍वाक्षरी असल्‍याचा उल्‍लेख सिव्‍हील कोर्टाच्‍या आदेशात आहे. त्‍यामुळे तक्रारदार नं.2 यांच्‍या सदर सदनिकेबाबत तक्रारदार नं.1 यांनी Letter of Administration प्राप्‍त केले असले तरी ते सदर मालमत्‍तेची तक्रारदार नं.2 सज्ञान होईपर्यंत काळजी घेणे त्‍यांचे संरक्षण व व्‍यवस्‍थापन करणे इत्‍यादि बाबींपुरते मर्यादित आहे. तक्रारदार नं.2 यांच्‍या आई वडिलांबरोबर त्‍यांच्‍या निधनापुर्वी तक्रारदार नं.2 रहात होत्‍या, व मयत मकरंद व रिमा हिले यांनी सदर सदनिका स्‍वतंत्रपणे खरेदी केली असुन ती वडिलोपार्जित मालमत्‍ता नाही, त्‍यामुळे तक्रारदार नं.2 यांचा त्‍यावरील हक्‍क वरील तपशिलाप्रमाणे अबाधित आहे.

      तक्रारदार नं.2 यांच्‍या पुढील भविष्‍यासाठी, तसेच शिक्षणासाठी सदर सदनिका त्‍यांच्‍या नांवे राहिल्‍यास तक्रारदार नं.2 यांना त्‍याचा निश्चितच उपयोग होईल, व त्‍याबाबत तक्रारदार नं.1 व त्‍यांच्‍या कुटूंबियांचे दुमत असण्‍याची शक्‍यता नाही अशी मंचास अपेक्षा आहे, व त्‍यामुळेच तक्रारदार नं.1 यांनी सामनेवाले संस्‍थेस ता.31.07.2017 रोजी सदर सदनिका तक्रारदार नं.2 सज्ञान होईपर्यंत विकणार नाही अशी अंडरटेकिंग दिली आहे, व सदर सदनिकेच्‍या देखभाल खर्चाच्‍या बिलांवर तक्रारदारांची नांवे नमुद करण्‍याची मागणी तक्रारदार यांनी  सामनेवाले संस्‍थेकडे केली आहे, तसेच प्रस्‍तुत तक्रारीच्‍या प्रार्थना कलमाच्‍या कलम-क्रमांक-12 (d) मध्‍ये Any other relief as Hon’ble forum may deem fit in the interest of justice  असे नमुद केले आहे.  त्‍यानुसार सामनेवाले संस्‍थेने तक्रारदार यांना दयावयाच्‍या देखभाल खर्चाच्‍या बीलांवर श्रीमती मंदाकिनी हिले गार्डियन ऑफ कु.गौरी हिले या नांवाने सदर सदनिका क्रमांक-501, Eskay Complex, Building “A”, CHS Ltd., Old Mumbai Pune Road Kalwa, Thane सदनिकेबाबत आकारण्‍यात येणा-या देखभाल खर्चाच्‍या बीलांवर / पावत्‍यांवर नमुद करुन सदर सदनिकेची बीले तक्रारदार नं.2 हया सज्ञान होईपर्यंत,तक्रारदार यांना दयावीत असे आदेश सामनेवाले संस्‍थेस देण्‍यात येतात, व तक्रारदार नं.2 सज्ञान झाल्‍यावर सदर सदनिकेबाबतच्‍या देखभाल खर्चाची बीले तक्रारदार नं.2 यांचे नांवे दयावीत असे आदेश सामनेवाले संस्‍थेस देण्‍यात येतात. वर नमुद केल्‍याप्रमाणे सदर सदनिका क्रमांक-501, Eskay Complex, Building “A”, CHS Ltd., Old Mumbai Pune Road Kalwa, Thane बाबत सामनेवाले संस्‍थेने श्रीमती मंदाकिनी हिले गार्डियन ऑफ गौरी हिले या नांवाने देखभाल खर्चाची बीले तक्रारदार यांना देण्‍याच्‍या आदेशाचे पालन सामनेवाले संस्‍थेने आदेश पारित तारखेपासुन 30 दिवसांत करावे.

      याबाबत मंचाने खालील न्‍याय निवाडयाचा तक्रारदार सज्ञान झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या नांवे देखभाल खर्चाची बीले देण्‍याबाबत दिलेल्‍या आदेशास्‍तव विचार केला.

AIR 1999 KERALA 367, Kerala High Court, C.R.P. No.690 of 1999 E, D/-26.05.1999

G.P. Vijaykumar Petitioner V/s. Punjab and Sind Bank.

A person can act as guardian in respect of the property of the minor so long as he continues to be a minor. A minor on attaining the age of 18 years is no longer a minor as defined in the act.  Therefore he is free to deal with the property.    

      उपरोक्‍त चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही .                

                         - अंतिम आदेश -

1. तक्रार क्रमांक-1034/2015 अंतिम आदेशात खाली दिलेल्‍या तपशिलानुसार अंशतः मंजुर

   करण्‍यात येते. 

2. सामनेवाले संस्‍थेचा सदर प्रकरणांत तक्रारदार नं.2 बाबत असेलेला हेतु स्‍वच्‍छ असला तरी

   सामनेवाले संस्‍थेने देखभाल खर्चाच्‍या बीलांवर तक्रारदारांची वर नमुद कारण मिमांसेमधील

      तपशिलानुसार नांवे नोंदवून तक्रारदार यांना देखभाल खर्चाची बीले/पावत्‍या न दिल्‍याने

      तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.

3. सामनेवाले संस्‍थेने तक्रारदार यांना दयावयाच्‍या देखभाल खर्चाच्‍या बीलांवर श्रीमती

    मंदाकिनी हिले गार्डियन ऑफ कु.गौरी हिले या नांवाने सदर सदनिका क्रमांक-501, Eskay

      Complex, Building “A”, CHS Ltd., Old Mumbai Pune Road Kalwa, Thane बाबत  

      आकारण्‍यात येणा-या देखभाल खर्चाच्‍या बीलांवर / पावत्‍यांवर नमुद करुन सदर सदनिकेची

      बीले तक्रारदार नं.2 हया सज्ञान होईपर्यंत,तक्रारदार यांना दयावीत असे आदेश सामनेवाले

     संस्‍थेस देण्‍यात येतात, व तक्रारदार नं.2 सज्ञान झाल्‍यावर सदर सदनिकेबाबतच्‍या देखभाल

     खर्चाची बीले तक्रारदार नं.2 यांचे नांवे दयावीत असे आदेश सामनेवाले संस्‍थेस देण्‍यात

     येतात. वर नमुद केल्‍याप्रमाणे सामनेवाले संस्‍थेने श्रीमती मंदाकिनी हिले गार्डियन ऑफ

     गौरी हिले या नावाने देखभाल खर्चाची बीले तक्रारदार यांना देण्‍याच्‍या आदेशाचे पालन

     सामनेवाले संस्‍थेने आदेश पारित तारखेपासुन 30 दिवसांत करावे. 

4. सामनेवाले नं.1 व 2 यांना तक्रारदार यांनी अशाप्रकारे त्रुटीची सेवा दिल्‍याने तक्रारदार यांना

     सदर तक्रार वकीलाकरवी मंचात दाखल करावी लागली, व तक्रारदार नं.2 हे सदर सदनिकेचे

    (100 टक्‍के शेअर)  नॉमिनी असुनही, व तक्रारदार नं.1 हे त्‍यांचे गार्डियन असुनही, त्‍यांची

      नांवे देखभाल खर्चाच्‍या बिलावर नमुद न केल्‍याने सामनेवाले यांनी तक्रारदार नं.1 व 2

      यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून, तक्रारदार नं.1 व 2 यांना

     एकत्रितपणे रक्‍कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार), व न्‍यायिक खर्चापोटी तक्रारदार

      नं.1 व 2 यांना एकत्रितपणे रक्‍कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) सामनेवाले यांनी

      तक्रारदार नं.1 व 2 यांना आदेश पारित तारखेपासुन 30 दिवसांत अदा करावे असे आदेश

      सामनेवाले यांना देण्‍यात येतात.

5. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्‍य व विनाविलंब पोस्‍टाने पाठविण्‍यात याव्‍यात.

6. तक्रारीचे अतिरिक्‍त संच असल्‍यास तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे.

ता.09.10.2017

जरवा/

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.