-ORDER-
(26/06/2013)
(मंचाचा निर्णय : श्री. प्रदीप पाटील – सदस्य यांचे आदेशांन्वये)
1. तक्रारकर्त्याने चार चाकी वाहन HYUNDAI EON ERA BIV, नोंदणी क्र. एमएच 31/डीव्ही 8090, रु.3,21,440/- मध्ये वि.प.कडून 20.01.2012 रोजी विकत घेतले. रु.10,802/- मोबदला देऊन, सदर वाहनाचा विमा दि.18.01.2012 ते 17.01.2013 कालावधीकरीता काढला होता. दि.16.06.2012 रोजी अर्जदार सायंकाळी वाहन चालवित असतांना एक कुत्रा समोर आल्याने वाहनाला किरकोळ अपघात झाला व वाहनाचे कलुटचे पाईप व रेडीएटर क्षतिग्रस्त झाले. अर्जदाराने वाहन टोचन करुन, वि.प.क्र.1 चे अधिकृत सेवा केंद्रात दुरुस्तीकरीता नेले. वि.प.क्र.1 ने रु.26,138/- रकमेचा भरणा करुन वाहन अर्जदाराला ताब्यात घ्यावयाची सुचना केली. परंतू वाहनाचे इंजिन हे नादुरुस्त अवस्थेत होते, त्यामुळे वाहनाचा ताबा अर्जदाराने घेतला नाही. तसेच वि.प.ने इंजिनचे कामाकरीता अतिरिक्त रकमेची मागणी केली व सदर रक्कम ही वाहन विमा कंपनीकडे विमाकृत असल्याने त्या रकमेची भरपाई होणे शक्यत नव्हते, म्हणून अर्जदाराने वाहनाचा ताबा न घेता, वकिलांमार्फत सर्व वि.प.ना कायदेशीर नोटीस बजावली व 10 दिवसाचे आत वाहनाचे इंजिनची दुरुस्ती करण्याची मागणी केली, परंतू नोटीस तामिल होऊनही पूर्तता न झाल्याने तक्रारकर्त्याने सदर किरकोळ अर्ज मंचासमोर दाखल करुन अंतरीम आदेश पारित करण्याची विनंती केलेली आहे.
2. सदर प्रकरणी वि.प.वर नोटीस जारी करण्यात आला व वि.प.ने सदर किरकोळ अर्जाला लेखी उत्तर दाखल करुन अर्जदाराचे संपूर्ण म्हणणे नाकारले व पुढे नमूद केले की, वाहनाचे इंजिन हे वाहन काळजी न घेता चालविल्याने, वाहनाचे इंजिन गरम होऊन व्यवस्थित कार्य करीत नव्हते आणि हे अर्जदाराचे निष्काळजीपणामुळे झाले. वि.प.क्र.3 /त्यांचे कंपनीचे लॉस असेसर आणि सर्व्हेयर श्री. समिर आगरे यांनी वर्कशॉपला भेट देऊन अर्जदाराचे उपस्थितीत वाहनाची पाहणी केली असता सदर बाब पॉलिसीमध्ये समाविष्ट होत नाही असे सांगितले व सदर वाद हा वि.प.क्र.1 व तक्रारकर्ता यांचेमधील असल्याचे त्यांनी नमूद केले.
3. मंचाने सदर प्रकरणी उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, तक्रार व वि.प.यांचे लेखी उत्तराचे अवलोकन केले असता, मंचाचे मते वि.प. व अर्जदार यांचेमधील वादाचा मुद्दा लक्षात घेता व अर्जदाराने केलेला अंतरीम अर्ज विचारात घेता मंच असा आदेश देतो की,अर्जदाराने वि.प.क्र.1 यांना लागणारा इंजिनच्या दुरुस्तीचा खर्च त्यांनी वि.प.क्र.1 यांचेकडे आपले हक्क् अबाधित राखून जमा करावा व वि.प.क्र.1 यांनी संबंधित इंजिन दुरुस्तीची अंदाजित रक्क्म जमा झाल्यानंतर इंजिनची दुरुस्ती करुन तक्रारकर्त्याला वाहनाचा ताबा द्यावा. 4. सदर आदेशांन्वये सदर किरकोळ अर्ज निकाली काढण्यात येतो.