निकालपत्र
तक्रार क्र.91/2014
तक्रार दाखल दिनांक - 29/09/2014. तक्रार नोंदणी दिनांक - 07/11/2014
तक्रार निकाल दिनांक - 17/05/2016
कालावधी ०1 वर्ष ४ महिने १६ दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
नामदेव पि. दगडोबा दहे, अर्जदार
वय ३२ वर्ष धंदा मजुरी, अॅड.एम.आर.बोरबने.
रा.लाड गल्ली,क्रांती चौक, मानवत
ता.मानवत जि.परभणी.
विरुध्द
1. इपसोन इंडिया प्रा.लि. गैरअर्जदार
तर्फे व्यवस्थापक. अॅड.बी.आर.पेकम.
बेंगलोर 560008.
2. प्रोप्रायटर/मालक,
लोटस कॉम्प्युटर अॅन्ड प्रिव्हेरप्लस,
मालपाणी कॉम्पलेक्स, सुभाष रोड, परभणी.
कोरम – श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
निशानी क्रमांक 1 खालील आदेश
दिनांक 17/05/2016.
(आदेश पारीत श्रीमती.ए.जी.सातपुते,अध्यक्षा) अर्जदार हा दि.11/12/2015,12/01/2016, दि.19/12/2015, दि.19/01/2016, दि.22/01/2016, 15/03/2016, 29/02/2016 पासुन सतत गैरहजर व आज दि.17/05/2016 रोजी गैरहजर. सदरचे प्रकरण दि.29/02/2016 पासुन अर्जदाराच्या साक्षीच्या शपथपत्रासाठी आहे. अर्जदार यांना सदर केसमध्ये अनेक संधी देण्यात आले तरी सुध्दा आज गैरहजर आहेत. म्हणुन सदरचे प्रकरण अर्जदारांच्या सततच्या गैरहजेरीमुळे व अर्जदाराच्या हलगर्जीपणामुळे अर्जदाराला सदरचे प्रकरण चालवायचे नाही असे रोजनाम्यावरुन स्पष्ट होते. म्हणुन अर्जदाराचा अर्ज अर्जदाराच्या हजेरी अभावी काढुण टाकण्यात येतो.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा