जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/152 प्रकरण दाखल तारीख - 19/05/2010 प्रकरण निकाल तारीख – 15/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य 1. गंगाराम पि. इश्वरा उपलवाड, वय वर्षे व्यवसाय शेती. अर्जदार. रा.आंदेगांव ता.हिमायतनगर जि.नांदेड. विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कं.लि., तर्फे कनिष्ठ अभियंता, गैरअर्जदार विभाग हिमायतनगर ता.हिमायतनगर जि.नांदेड. 2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कं.लि. मार्फत कार्यकारी अभियंता, विभाग,हिमायतनगर, ता.हिमायतनगर जि.नांदेड. 3. महाराष्ट्र राज्य विज वितरण कं.लि. मार्फत अधिक्षक अभियंता, विद्युत भवन, नविन मोंढा, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भुरे. गैरअर्जदारां तर्फे वकील - अड. व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) गैरअर्जदार विद्युत वितरण कंपनीच्या सेवेच्य त्रुटीबद्यल अर्जदार आपल्या तक्रारी म्हणतात, दि.30/04/2008 रोजी पहाटे तीन वाजण्याचे सुमारास विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळटे अर्जदाराचे मौजे आंदेगांव ता. हिमायतनगर स्थित गट न्र. 42 क्षेत्र 1 हेक्टर 10 आर शेतामधील ऊस पुर्णपणे जळाला. यासाठी गैरअर्जदारांना ब-याच वेळा विनंती केली पण त्यांनी नुकसान भरपाई दिली नाही. तक्रार दाखल करण्यास ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे दोन वर्षाचा कालावधी आहे परंतु अर्जदारांना न्युमोनिया आजार असल्या कारणाने 15 दिवसांचा विलंब झाला तो विलंब माफ करावा असे म्हटले आहे. अर्जदार हे आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. पहीला आक्षेप त्यांनी अर्जदाराचा तक्रार ही मुदतबाहय झालेली आहे. अर्जदारास विज जोडणी देतांना गैरअर्जदाराचे कामात कुठलाही दोष नव्हता. अर्जदाराच्या शेताच्या उत्तरेकडील बांधावर विद्युत वितरण कंपनीचे खांब असून पश्चिमेकडील पोलकडे तीन विद्युत वाहीण्या असल्या बाबत कोणताही उजर नाही. दि.30/04/2008 रोजी पहाटे 3.00 वाजण्याच्या सुमारास कोणत्याही वेळेस विद्युत तारेच्या शॉर्ट सर्कीटमुळे जाळ होऊन अर्जदाराचे 1 हेक्टर 10 आर मधील ऊस पुर्णपणे जळाला हे त्यांना मान्य नाही. विजेच्या थांबावरील वायरबद्यल स्पार्कींग होत असल्याबद्यलची सुचना त्यांना कधीही मिळाली नव्हती. अर्जदाराच्या आंदेगांव येथील शेतात त्यांनी 1 हेक्टर 10 आर मध्ये एकरी 40 टन ऊस होत होते. एकरी 40 याप्रमाणे 70 टन ऊस निघाले असते हे त्यांचे म्हणणे खोटे आहे असे म्हटले आहे व याप्रमाणे त्यांचे रु.1,000/- भाव धरले असता, त्यांचे एकुण रु.1,10,000/- चे नुकसान झाले हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. दि.20/03/2010 रोजी नुकसान भरपाईची मागणी केली हे त्यांचे म्हणणे खोटे आहे असे म्हटले आहे. अर्जदाराचे जळालेले ऊसाचा पोलिस स्टेशन हिमायतनगर येथे जळीत क्र.08/2008 या अन्वये घटना स्थळाचा पंचनामा केला व मंडळ अधिका-याने ऊस जळाल्याचा पंचनामा केला या सर्व बाबी चुकीचे आहे. अर्जदाराचे ऊस शॉर्ट सर्कीटमुळे जळालेले नाही व गैरअर्जदार या घटनेस जबाबदार नाही. अर्जदाराचा अर्ज मुदतबाहय आहे हे अर्जदारांच्या विलंब माफीच्या अर्जदारावरुन स्पष्ट होते. ऊस जळाल्यानंतरही पुर्ण कधीही जळत नसतो त्यामुळे पुर्ण नुकसान होत नाही सबब अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकाराने दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार विलंब माफ होण्यास पात्र आहेत काय? होय. 2. गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? होय. 3. अर्जदार किती रक्कम मिळण्यास पात्र आहेत.? आदेशाप्रमाणे. 4. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 यात अर्जदार यांना न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे डॉ. ए.डी.राठोड यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. या त्यांचा पुरावा व सांगण्यावरुन 15 दिवसाचा झालेला विलंब अर्जदारांना क्षमापित करण्यात येतो व त्यांना प्रकरण पुढे चालविण्यासाठी परवानगी देण्यात आली. मुद्या क्र. 2 अर्जदार यांनी ऊस जळाल्याबद्यल पुरावा म्हणुन दि.26/06/2008 चा मंडळ अधिकारी यांनी केलेला पंचनामा दाखल केलेला आहे यात अर्जदाराचे आंदेगांव येथील गट नं.42 मधील 1 हे 10 आर उस दि.30/04/2008 रोजी जळुन गेल्या दिसुन येत असून त्यात त्यांचे रु.55,000/- नुकसान झालेले असा उल्लेल केलेला आहे व पोलिसांच्या घटनास्थळ अहवाल पंचनामा दाखल केलेला आहे पोलिसांनी दि.24/05/2008 रोजी विद्युत निरीक्षक यांना पत्र लिहून आग लागण्याचे कारण सांगण्या विषयी कळविले होते पण त्यांनी उत्तर दिले नाही किंवा स्पॉटवर जाऊन पाहणी केली नाही असे दिसते. ऊस जळाले हे निश्चीतच व शेतक-याचे नुकसान झाले हे खरे आहे व असे असेल तर नुकसानीची रक्कम गैरअर्जदारांनी दिली नाही, म्हणजे सेवेत त्रुटी केली हे सिध्द होते. मुद्या क्र. 3 अर्जदार यांच्या शेतात 1 हेक्टर 10 आर उस लावलेला होता तो तोडणी योग्य होता. या विषयी 7/12 दाखल केलेला आहे, या 7/12 वर 2007-08 या हंगामासाठी 1 हेक्टर 10 आर मध्ये उसाची लागवड केलेली आहे असे म्हटले आहे. उसाची लागवड झाली व त्यासाठी पुरावा आहे, गैरअर्जदार यांचे ग्राहक क्र.560330310354 द्वारे अर्जदाराच्या आंदेगांव येथील शेतात कृषी पंपास विद्युत पुरवठा होता याबद्यल विजेचे बिल दाखल करण्यात आले आहे. उस जळाल्याबद्यल दि.30/04/2008 रोजी तहसिदारांनी कळविले त्या अर्जावर तहसिल कार्यालर्याची नोंद आहे. सर्व पुराव्यावरुन अर्जदाराचे उस जळाला, अर्जदाराच्या युक्तीवादाप्रमाणे एकरी 40 टन उसाचे उत्पन्न त्यांना आले असते 60 आर मध्ये म्हणजे दिड एकर मध्ये त्यांना 60 टन उस झाले असते, उसाचा त्या वेळेसचा भाव रु.1,000/- मान्य केल्यास त्यांचे रु.60,000/- नुकसान झाले असते असे म्हटले आहे. तहसिलदाराचे पंचनामात रु.55,000/- नुकसान झाले असे म्हटले आहे. रु.55,000/- नुकसान गृहीत धरल्यास उस हा पुर्ण जळत नाही व आतुन हिरवा राहतो व असा जळालेला उस कारखाना विकत घेतो. यात जळालेल्या उसाचे काय केले हे अर्जदाराने स्पष्ट केलेले नाही त्यामुळे गैरअर्जदाराचा हा आक्षेप आम्ही मान्य करतो व या रु.55,000/- मधुन 20 टक्के रक्कम कारखान्यात उस टाकल्यानंतर कपात झाले असते म्हणुन तेवढी रक्कम यातुन कमी करुन रु.55,000 - रु.11,000 = रु.44,000/- अर्जदाराचे नुसकसान झाले व तेवढी रक्कम तो मिळण्यास पात्र आहे, असे ठरवितो. अर्जदाराच्या शेतातुन तीन विद्युत पोलातील तारांचा घर्षन होऊन स्पार्कींग झाली व तो उसाच्या पाल्यावर पडुन आग लागली हे कारण आम्ही गृहीत धरुन गैरअर्जदाराकडुन शेतक-याचे नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत असे ठरवितो. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदारांनी अर्जदारास हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत रक्कम रु.44,000/- द्यावे त्यावर प्रकरण दाखल केलेली तारीख दि.19/05/2010 पासुन 9 टक्के व्याजासह पुर्ण रक्कम मिळेपर्यंत द्यावे. 3. गैरअर्जदारांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व दावा खर्चापोटी रु.2,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती पाठविण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |