जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/114 प्रकरण दाखल तारीख - 08/04/2010 प्रकरण निकाल तारीख – 14/09/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. श्रीमती गंगूबाई पि. दत्ताञय देशमूख वय 79 वर्षे, धंदा गृहकाम व शेती अर्जदार रा.अर्धापूर ता.अर्धापूर,जि. नांदेड हा.मूक्काम द्वारा कमलाकरराव रा. वैद्य घर क्र.1-11-388, दत्तस्मृती, संत ज्ञानेश्वर नगर, दिपनगरच्या बाजूला, पूर्णा रोड, नांदेड विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विद्यूत कंपनी लि. गैरअर्जदार मार्फत सहा. अभिंयता,अर्धापूर वीभाग, तामसा रोड, अर्धापूर ता.अर्धापूर जि. नांदेड. 2. महाराष्ट्र राज्य विद्यूत कंपनी लि. कार्यकारी अभिंयता विद्यूत भवन, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट, नांदेड. 3. महाराष्ट्र राज्य विद्यूत कंपनी लि. मार्फत अधिक्षक अभिंयता विद्यूत भवन, अण्णाभाऊ साठे चौक,हिंगोली गेट, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.देशपांडे एम.डी. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार म्हणतात, गैरअर्जदार यांनी अर्जदारास ग्राहक क्र.550020309385 पी.सी.7 ए.जी.7099 नुसार कृषी विज पंपासाठी त्यांचे स्थित शेत गट नंबर 855 अर्धापूर येथील 4 हेक्टर 30 आर जमीनीत बोअरसाठी दिले आहे.यासाठी अर्जदाराने आवश्यक ती कागदपञे व दि.09.06.2008 रोजी कोटेशनही भरले आहे. दि.16.6.2008 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराच्या शेतात येऊन विज जोडणीसाठी केलेल्या सर्व्हेप्रमाणे तिन पोल उभे केले व दि.17.6.2008 रोजी तात्पूरते मिटर बसवून तात्पूरती विज जोडणी केबल वायरने दिली व अर्जदाराच्या शेतात कायमची विज जोडणी देण्याकरिता सामान शेतात ठेवले. यानंतर आजपर्यत लोकांचे सांगणेवरुन कायमची विज जोडणी अर्जदारास देण्यास हेतूपूरस्पर टाळले. गैरअर्जदाराने कोटेशनप्रमाणे अर्जदाराच्या शेतात पाच पोल उभे करावयास पाहिजे होते. तिनच पोल उभे केल्यामूळे लाईनवर जास्त ताण येत आहे. दि.06.11.2008 रोजी गैरअर्जदार यांचे कर्मचारी शेतात लाईन ओढण्यासाठी आले असताना शेजारी अर्जून राऊत यांनी कामात अडथळा आणला. यासंबंधी अर्जदाराने योग्य ती कारवाई करा असे सांगितले. कायमचा विज पूरवठा न मिळाल्याने त्यांचे काय नियम आहेत यासाठी माहीतीच्या अधिकाराखाली गैरअर्जदार यांनी माहीती विचारली. ही माहीती दि.24.12.2009 रोजी गैरअर्जदाराने दिली. अर्जदारास मिळालेले माहे सप्टेंबर 2009 पर्यतचे रु.10,040/- चे दिलेले विज देयक चूकीचे आहे व त्यात दूरुस्ती होणे आवश्यक आहे. गैरअर्जदाराने दिलेले विज देयक हे 24 तास विज पूरवठा गृहीत धरुन दिलेले आहे वास्तविक अर्जदाराने परिसरात रोज 8 ते 10 तास विज पूरवठा नसतो म्हणून हे विज देयक जाचक आहे. अर्जदाराची मागणी आहे की, ए.जी.7099 या कृषी बोअरसाठी दिलले विज जोडणी कायम करण्यात यावी, सप्टेंबर 2009 चे देयक दूरुस्त करुन दयावे, तसेच झालेल्या मानसिक ञासाबददल रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 ते 3 हे वकीलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे एकञितरित्या वकिलामार्फत दाखल केलेले आहे. अर्जदाराच्या विज जोडणी बददल वाद नाही. परंतु विजेच्या जोडणीसाठी तिन खांब रोवले व दि.17.06.2008 रोजी तात्पूरते मिटर बसवून तात्पूरता विज जोडणी दिली हे म्हणणे चूकीचे आहे. तसेच विज जोडणी देण्याचे सामान शेतात ठेवले परंतु आजपर्यत काही लोकांचे सांगण्यावरुन हेतूपूरस्पर विज जोडणी देण्याचे टाळले हे म्हणणे सर्वस्वी चूकीचे आहे. दि.06.11.2008 रोजी शेजारी शेतकरी अर्जून राऊत यांनी लाईन ओढण्याचे काम रोखले ही बाब खरी आहे. अर्जदारास दिलेली विज जोडणी ही कायम असून ती तात्पूरती नाही. अर्जदाराच्या अर्जाप्रमाणे दि.24.12.2009 रोजीच्या माहीती अधिकारास अनूसरुन जी माहीती दिली ती खोटी आहे हे अर्जदाराचे म्हणणे सर्वस्वी खोटे आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास माहे सप्टेंबर 2009 पर्यत रु.10,040/- चे देयक दिले ते दूरुस्त करुन दया असे अर्जदाराच म्हणणे खोटे आहे व चूकीचे आहे. तसेच गैरअर्जदाराने दिलेले देयक हे 24 तास विज पूरवठा गृहीत धरुन दिलेले आहे हे म्हणणे खोटे आहे. तसेच 8 ते 10 तास विज पूरवठा नसतो हे ही म्हणणे खोटे आहे. दिलेले देयक हे फॅल्ट रेट पध्दतीने दिलेले असून प्रचलित पध्दतीनुसार कृषी पंपाना अशा प्रकारचा विज पूरवठा दिला जातो, त्यामूळे बिल योग्य आहे. अर्जदाराने स्वतःच्या मर्जीने विज पूरवठा तात्पूरता आहे हे गृहीत धरलेले आहे. केबल वायर म्हणजे सर्व्हीस वायरने विज जोडणी दिल्या जाते. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार कनिष्ठ अभिंयता अर्धापूर यांनी हेतूपूरस्पर निष्काळजीपणा केला त्यांना वैयक्तीकरित्या दंड करावा ही विनंती मान्य करण्याजोगी नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराचा अर्ज मिळाल्यावर तात्काळ तिन पोल उभे केले पण जेथून विजेचे खांब जातात तेथून अर्जून राऊत यांची झोपडी आहे व जर झोपडीवरुन वायर मूळे होणा-या नूकसान भरपाईस विज वितरण कंपनी जबाबदार राहील असा अर्ज दिला व त्यांने काम रोखले त्यामूळे त्यांने सूचविल्याप्रमाणे बाजूने विज देण्याची तयारी केली व बाजूने विज जोडणी दिली व यानंतर अर्जदाराने विज वापर करण्यास सूरुवात केली. एंकदर अर्जदाराचा अर्ज खोटा असून तो खर्चासह खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदाराने शेतीचा 7/12, बोअरवीषयीचे प्रमाणपञ, विज पूरवठा मागणी अर्ज, कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, कोटेशन भरल्याची पावती इत्यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. विज पूरवठयावीषयी वाद नाहीच, वाद आहे तो गैरअर्जदार यांनी तात्पूरता विज पूरवठा दिला तो कायम करावा, गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्यात विज पूरवठा हा कायमचाच दिला आहे असे म्हटले आहे. अर्जदार यांनी विज पूरवठा देण्यासाठी पाच पोल लागतील असे गैरअर्जदार यांना सांगितले असा उल्लेख केला आहे. यात कोटेशन पाहिले असता किती खांब उभारावेत यांचा उल्लेख नाही फक्त सेक्यूरिटी डिपॉझीट एवढीच काय ती रक्कम कृषी पंपाला विज पूरवठा घेण्यासाठी मागितली आहे. तेव्हा गैरअर्जदार यांनी विज पूरवठा देण्यासाठी किती पोल उभारावे किंवा ती लाईन कशी असावी हा त्यांचा प्रश्न आहे.शेतक-यास विज पूरवठा मिळाला का नाही हे पाहणे महत्वाचे आहे. त्यांना विज पूरवठा हा कायमचाच दिला आहे हे गैरअर्जदाराने वारंवार स्पष्ट केले आहे. गैरअर्जदारांनी जो विज पूरवठा केला तो पोल पासून सर्व्हीस वायरने केलेला आहे. पोलपासून विज पूरवठा हा सर्व्हीस वायरनेच केला जातो. सर्व्हिस वायर थोडेसे बाजूने वळवून घेण्यासाठी जे कारण घडले ते गैरअर्जदाराने सांगितले असून अर्जदाराच्या बाजूस असलेला शेतकरी अर्जून राऊत यांची मध्ये झोपडी येते आहे व त्यांनी आक्षेप घेतलेला आहे व झोपडीवरुन तारा गेल्या असता तर झोपडीस इजा पोहचू शकली असती व ती जबाबदारी गैरअर्जदार यांचेवर येऊ नये म्हणून सर्व्हीस वायर थोडेसे वळवून दिले असेल तर ती चूक किंवा कृत्य बेकायदेशीर आहे असे मूळीच म्हणता येणार नाही. म्हणून गैरअर्जदार यांनी कायम स्वरुपात विज पूरवठा दिला असे म्हटले आहे ते खरे वाटते. कृषी पंपाला जो विज पूरवठा दिला जातो त्यांस मिटर नसते. मोटारीची अश्वशक्ती बघून म्हणजे अर्जदाराचा 5 एच.पी. चा अर्ज असेल तर त्याप्रमाणे प्रत्येक एच.पी. साठीचा फिक्स असे रेट आकारला जातो. विजेचा वापर गृहीत धरुन हे बिल नसते. म्हणजे शेतकरी किती ही विजेचा वापर करो किंवा वापर न करो फिक्स व फलॅट रेट प्रमाणे अश्वशक्तीच्या आधारावर फिक्स बिल दिले जाते हे गैरअर्जदाराचे म्हणणे आम्ही ग्राहय धरतो. यात लाईट किती तास असते किंवा नसते हा संबंध नाही किंवा 24 तास विज पूरवठा असतो असेही नाही. म्हणून गैरअर्जदाराने सप्टेंबर 2009 अखेर रु.10,040/- चे विज देयक दिले ते अर्जदाराने भरलेही आहे. त्यामूळे आता त्या बाबत आक्षेप घेणे किंवा तक्रार करणे हे मान्य करण्याजोगे नाही. गैरअर्जदार यांचे अधिकारी हे कंपनीच्या वतीने काम करतात येथे वैयक्तीकरित्या त्यांचे काही हेवेदावे असण्यचा प्रश्न येत नाही तेव्हा असे आरोप अर्जदाराने करणे हे मान्य करण्याजोगे नाही. अर्जदाराचा विज पूरवठा सूरु आहे ते नियमितपणे बिल भरत आहेत, बिलावर त्यांचे नांव आलेले आहे. त्यांना ग्राहक नंबर देखील देण्यात आलेला आहे. तेव्हा असा विज पूरवठा कायमचाच समजण्यात येईल व अर्जदाराने ते मान्यही केलेले आहे. गैरअर्जदाराने Indian Electricity Rules, 1956 दाखल केलेले आहे यात पान नंबर 13 वर Mode and conditions of supply हे दिलेले असून पान नंबर 93 वर पॅरा नंबर 6 मध्ये सर्व्हीस लाईन बाबत माहीती दिलेली आहे. सर्व्हीस लाईन चार्जेस ऑफ अग्रीकल्चर पंपीग लोड, Supply from Existing Rural Transformer Sub-Stations इत्यादी गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. यानंतर Provisions Relating to Overhead Lines, Electricity Act,. 2003 यांचा उल्लेख केलेला आहे. यासंबंधीचे जास्तीचे कोणतेही चार्जेस गैरअर्जदाराने घेतलेले नाहीत. त्यामूळे त्यावीषयी जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही. सबब वरील सर्व बाबीचा विचार केला असता गैरअर्जदाराने सेवेत कोणतीही ञूटी केली हे निष्पन्न होत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 1. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 2. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER | |