जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/179 प्रकरण दाखल तारीख - 07/07/2010 प्रकरण निकाल तारीख – 21/12/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. शिवसांब पि.गोविंदराव बारसे वय 36 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा. बारसगांव ता.अर्धापूर जि. नांदेड विरुध्द. 1. कार्यकारी अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, विद्युत भवन, अण्णाभाऊ साठे चौक, नांदेड. गैरअर्जदार 2. सहायक अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, वीभाग अर्धापूर ता.अर्धापूर जि. नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.एम.पुंड गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा बारसगांव ता. अर्धापूर येथील रहीवासी असून त्यांचे भोकर फाटा ता. अर्धापूर येथे शिवपार्वती एजन्सीज या नांवाचे शेती उपयोगी सामानाचे दूकान हे दि.5.4.2001 पासून चालू आहे. त्या जागेचे मालक शंकरराव टेकाळे यांचे मिटर क्र.7601208678 हे अर्जदार वापरतात. त्यांचे बिल अर्जदार हे वेळोवेळी भरत असत.अर्जदाराच्या शेजारील व्यकंटेशन टायर्सच्या दुकानावरुन गैरअर्जदार यांचे तारा गेलेल्या आहेत. दि.25.11.2008 रोजी सदर तारा वा-यामूळे खाली पडण्याच्या स्थितीत लोंबकळत होत्या म्हणून दि.26.11.2008 रोजी अर्जदार व त्यांचे शेजारी रघुनाथ हे दोघे मिळून गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे तक्रार करुन आले. परंतु गैरअर्जदार यांनी त्यांची दखल घेतली नाही व दूरुस्तीही केली नाही. परंतु नंतर अर्जदार व त्यांचे शेजारी यांनी दि.12.12.2008 रोजी परत दूस-यांदा तक्रार केली पण गैरअर्जदार यांनी 10 ते 12 दिवसांत तारा दूरुस्त करु असे सांगितले पण त्यांनी ते दूरुस्त केल्या नाहीत. दि.12.01.2009 रोजी अर्जदार हे दूकान बंद करुन गेले असता राञी 11 वाजता फोन द्वारे कळाले की, तूमचे दूकान व शेजारील दूकान आग लागून जळत आहे, अर्जदार लगेच गेले व त्यांनी व आजूबाजूच्या लोकांनी मिळून आग विझवली पण आग विझली नाही थोडया वेळाने पोलिस स्टेशन अर्धापूर चे पोलिस तेथे आले व अग्नीशामक दलाची गाडी नांदेड येथून आले व आग विझवली. पण अर्जदाराचे दूकानातील सर्व सामान जळून खाक झाले. इंजिन बेरिंग, ऑईल, ग्रीस, इलेक्ट्रीक सामान, होल्डर, बल्ब, बटने टयूब बोर्ड इत्यादी रक्कम रु.40,000/-, पी.व्ही.सी. पाईट फिटींग यल्बो, बेल्ट एम.टी.ए. टी.एफ.टी.ए.इत्यादी रक्कम रु.35,000/- , जी.आय पाईप, लोंखंडी व फिटींग हल्लरेचे बेल्ट, टयूब, ट्रक्टरचे सामान रु.30,000/- तसेच मशीनरी सामान पॅकींग व चिल्लर कपाट कागदपञे खूर्ची काऊटर पंखे कूलर रु.30,000/- व दूकानाचे शटर व चैन किंमत रु.20,000/- असे एकूण रु.1,55,000/- चे अर्जदाराचे नूकसान झाले. घटनेची तक्रार अपघात क्र.01/2009 पोलिस स्टेशन अर्धापूर यांनी नोंदली आहे.त्यांनी दि.13.1.2009 रोजी येऊन पंचनामा केला. सर्व कागदपञ मंचात दाखल केलेले आहेत. विद्यूत निरिक्षक यांनी दूकान जळाल्याबददलचा अहवाल गैरअर्जदार यांना पाठविले तरी गैरअर्जदार यांनी अर्जदारास नूकसान भरपाई दिली नाही. शेवटी अर्जदाराने दि.1.4.2010 रोजी वकिलामार्फत नोटीसा पाठविल्या व त्या नोटीसा दि.3.4.2010 रोजी गैरअर्जदार यांना मिळाल्या आहेत. अर्जदार हा त्यांच्या दूकानातून कूटूंबाचा उदरनिर्वाह चालविता होता त्यामूळे त्यांचे कूटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, दूकानाचे नूकसानी बददल रु.1,55,000/- व त्यावर 12 टकके व्याज, दावा खर्च रु.5,000/- व मानसिक शारीरिक ञासापोटी रु.50,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदारास तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या अधिका-यांना वैयक्तीकरित्या प्रकरणात समाविष्ट केलेले आहे जे की विज कायदा 2003 अन्वये कलम 168 तरतुदीनुसार करता येत नाही. सदर मिटर हे टेकाळे यांचे नांवे दिलेले आहे त्यामूळे अर्जदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. अर्जदाराचे दूकान शिवपार्वती एजन्सीज हे दि.5.4.2001 पासून चालू होते हे अर्जदाराने सिध्द करायचे आहे. त्याचे शेजारी रघूनाथ वानखेडे यांचे दूकान हे त्यांना मान्य नाही.दि.25.11.2008 रोजी विज वाहीनीच्या तारा वा-यामूळे तूटून खाली पडण्याच्या स्थितीत लोंबकळत होत्या ही बाब खोटी आहे. अर्जदार व त्यांचे शेजारी यांनी कोणतीही तक्रार गैरअर्जदार यांचेकडे केलेली नाही.दि.12.12.2008 रोजी सूध्दा अर्जदार व त्यांचे शेजारी यांनी तक्रार केली हे त्यांना अमान्य आहे. दि.12.01.2009 रोजी रोजी 11 वाजता अर्जदाराचे दूकानास आग लागली व ते जळून खाक झाले हे चूक आहे. हे त्यांना मान्य नाही की, विज कंपनीची एलटी लाईन एक फेज दोन तारा लाईन गेलेली आहे व त्यामूळे सुबाभळीचे झाडाच्या फांदया हालून फेज व न्युट्रल एकमेंकाना स्पश होऊन दूकानाचे टिनशेडवर ठीणग्या पडल्या व त्यामूळे तेथील पालापाचोळयाने आग पकडली. अर्जदाराचे दूकानातील आगीत रु.1,55,000/- चे नूकसान झाले हे त्यांना मान्य नाही. गैरअर्जदार यांनी कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. ग्राहक व सेवा पुरवीणारी व्यक्ती असे नाते नसतानाही मोठी रक्कम मागणे चूक आहे म्हणून सदर तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपञानुसार खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 2. अर्जदार यांनी मागितलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? अंशतः 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी ज्याठीकाणी दूकान चालू केलेले होते ती जागा ज्यांचेकडून करारावर घेतली होती त्यांचे नांवावर सदरील मिटर होते व जागा वापरण्यास मिटरसहीत दिल्यामूळे अर्जदार हा सदर मिटरचा उपभोग घेत होता त्यामूळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- गैरअर्जदार यांची बिले अर्जदार भरीत होते. हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. सदरचे शिवपार्वती नांवाचे दूकान हे दि.5.4.2001 पासून चालू होते. अर्जदाराने दाभड येथील शंकरराव टेकाळे यांचे जमिन पूर्व पश्चिम 40 फूट व दक्षीण उत्तर 40 फूट जागा प्रतीवर्षी रु.18,000/- भाडयाप्रमाणे 11 वर्षाकरिता शेती उपयोगी साहित्य विक्रीचे दूकान चालू करण्याकरिता किरायाने घेतली होती. या जागेमध्ये अर्जदारने लोंखडी टिन व अगंलचे शेडमध्ये शिवपार्वती नांवाचे दूकान सूरु केले. ज्यामध्ये शेती उपयोगी साहित्य, पी.व्ही.सी. पाईप, पी.व्ही.सी.पाईट फिटींग, यल्बे, बेंन्ड, एम.टी.ए., आर.एम.टी. एफ.टी.ए. ,खारे, तिकासी, पीव्हीसी, सरत पी.व्ही.सी. टोपे, हॉलरचे बेल्ट मशीनरी सामान पॅकींग, एम.सी.एल. नट, बोल्ट इत्यादी इलेक्ट्रीक सामान, होल्डर, बल्ब, बटणे, टयूब, बोर्ड, ट्रक्टर इंजिन ऑईल, बेरिग, ग्रीस इत्यादी अनेक प्रकारची शेती उपयोगी सर्व साहित्य विक्रीसाठी उपलब्ध केले होते. दूकान चालून मिळणा-या उत्पन्नावर अर्जदाराच्या कूटूंबाची उपजिवीका चालत होती. अर्जदाराच्या दूकानावरुन गैरअर्जदार यांची विज वाहीनी जात होती. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे दि.26.11.2008 रोजी ते व त्यांचे शेजारी रघूनाथ अर्धापूर येथे गैरअर्जदार यांचे अधिका-यांना भेटून तारा दूरुस्त करण्यासाठी सांगितले होते पण त्यांनी त्या दूरुस्त केल्या नाहीत. दि.12.1.2009 रोजीच्या राञी 11 वाजता अर्जदार दूकान बंद करुन घरी गेल्यानंतर अर्जदाराच्या दूकानास व त्यांचे बाजूचे दूकानास आग लागली. ती आग पसरत जाऊन दोन्ही दूकानातील अर्जदाराचा माल आगीत भस्म झाला. अर्जदाराने दूकानात असलेल्या त्यांचे माला संबंधी किंमती मध्ये एकूण रु.1,55,000/-चे सामान जळून गेले असे लिहीलेले आहे. पण प्रत्यक्षात त्यांचे दूकानात किती माल होता त्यांनी किती खरेदी केलेला होता किती विक्री झालेला होता या बददलच्या कोणत्याही पावत्या किंवा रेकार्ड किंवा सदर माल खरेदी केलेल्या पावत्या अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या नाहीत. सर्व रेकार्ड दूकानातच होते व ते जळून खाक झाले हे अर्जदाराचे म्हणणे योग्य वाटत नाही. तसेच घडलेली घटने संदर्भात अर्जदाराने पोलिस स्टेशन येथे तकार दाखल केली. त्यांच प्रकारे अर्जदार विद्यूत निरिक्षकच्या तर्फे सदरील अपघात कशामूळे झाला याबददलची माहीती मंचासमोर आणू शकले असते पण विद्यूत निरिक्षकचा रिपोर्ट गैरअर्जदार यांनी विद्यूत निरिक्षक यांना सांगितल्यानंतर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आला. त्यामूळे अर्जदाराचे किती नूकसान झाले याबददल कोणताही ठोस पूरावा अर्जदाराने दाखल न केल्यामूळे त्यांचे रु.1,55,000/- चे नूकसान झाले यावर विश्वास ठेवता येत नाही. गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. तसेच अर्जदार हा त्यांचा ग्राहक नाही हे म्हणणे योग्य वाटत नाही. अर्जदार हा त्यांचेकडून घेण्यात आलेल्या मिटरचा उपभोक्ता होता. म्हणून त्यांस ग्राहक संबोधण्यास मंचास कोणतीही अडचण वाटत नाही. अर्जदाराने कोणताही ठोस पूरावा समोर न आणल्यामूळे प्रत्यक्ष घटना कशामूळे घडली आहे, त्यात कोणाची कितपत चूक आहे या नीर्णयावर येणे शक्य नाही. विद्यूत निरिक्षक नांदेड यांनी दाखल केलेला त्यांचा अहवाल हा खूप उशिरा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये त्यांनी अर्जदाराच्या दूकानावरुन एल.टी. लाईन एक फेज दोन तार लाईन गेलेली आहे वा-यामुळे हे सुबाभळीचे झाडाच्या फांदया हलून फेज व न्यूट्रल एकमेकांना स्पर्श होऊन दूकानाचे टीन शेडवर स्पार्कीगंच्या ठीणग्या पडल्या त्यामूळे तेथील पाला पाचोळयाने आग पकडली त्यामूळे दि.13.1.2009 रोजी 11 वाजता दोन्ही दूकाने जळून गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रकारचा अहवाल दिलेला आहे व तो पोलिस निरिक्षक पोलिस स्टेशन अर्धापूर यांचेकडे दाखल केलेला आहे. प्रत्यक्ष घटना ही कोणीही पाहीलेली नाही व ती कशामूळे झालेली आहे या बददल कोणत्याही व्यक्तीची साक्ष नाही, तसेच अर्जदाराचा दूकानातील मालाचा कोणत्याही प्रकारे कागदोपञी पूरावा नाही. म्हणून अर्जदाराने मागितलेली रक्कम देता येत नाही.विद्यूत निरिक्षक यांचा अहवाल पाहून गैरअर्जदार यांनी तातडीची मदत म्हणून कमीत कमी रु.5,000/- नियमाप्रमाणे अर्जदारास देण्यास हरकत नव्हती पण गैरअर्जदार यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही व त्यांस तातडीची मदतही दिली नाही ही छोटीसी ञूटी वाटते. म्हणून गैरअर्जदारांनी अर्जदारास रु.10,000/- तातडीची मदत म्हणून नियमाप्रमाणे दयावेत, दावा खर्च म्हणून रु.1,000/- एक महिन्याचे आंत दयावेत, असे न केलयास संपूर्ण रक्कमेवर रक्कमे फिटे पर्यत 9 टक्के व्याज दयावे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना 30 दिवसांचे आंत तातडीची मदत म्हणून रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु,1,000/- दयावेत, असे न केल्यास संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज संपूर्ण रक्कम मिळेपर्यत दयावे लागेल. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. 3. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |