जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 290/2008. प्रकरण दाखल तारीख - 27/08/2008 प्रकरण निकाल तारीख - 27/11/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य वैजनाथ तोलाजी भालेराव वय, 45 वर्षे, धंदा शेती, रा. मराठा गल्ली, मुदखेड जि. नांदेड. ..अर्जदार विरुध्द. 1. सहायक अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. ग्रामीण वीभाग नांदेड. कार्यालय, आनंद नगर नांदेड. 2. कनिष्ठ अभिंयता गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. मुदखेड केंद्र, मुदखेड ता. मुदखेड जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एम.व्ही.पाचलिंग गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्य ) विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार आपलया तक्रारीत म्हणतात की, अर्जदार हे मूदखेड येथील रहीवाशी असून ते शेती करतात. पाणी देण्यासाठी मोटार पंपाला त्यांने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्र.550050016731 द्वारे विज पूरवठा घेतला आहे. अर्जदार हे नियमितपणे बिल भरीत असताना नंतर दि.1.1.2007 रोजी ते 31.03.2007 रोजीच्या विज बिलामध्ये दि.1.1.2007 ते 31.3.2007 रोजीच्या बिलात रु.1440/- वाढवून थकबाकी दाखवली. हे बिल पूर्वी भरलेले आहे. दि.1.1.2007 ते 31.3.2007 या बिलात परत थकबाकी दाखवून रु.2740/- विज बिल आकारले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे तक्रार केल्यावर मागील बिलाच्या पावतीची पडताळणी करुन त्या बिलातून रु.1440/- वजा करुन रु.1300/-भरण्यास सांगितले. ते अर्जदाराने दि.4.5.2006 रोजी भरणा केले. दि.31.3.2007 ते 30.6.2007 या कालावधीतील बिलात पून्हा रु.3900/- चे बिल दिले त्यात थकबाकी रु.2349/- दाखवलेली आहे परत अर्जदाराने तक्रार केली तेव्हा त्यांस नांदेड येथे जाण्यास सांगण्यात आले. त्यांने परत विज बिलाच्या पावत्या पडताळून बिल दूरुस्त करुन दिले व रु.1140/- भरण्यास सांगितले. यानंतर परत गैरअर्जदाराने पूढील बिल दि.1.7.2007 ते 30.9.2007 दिले त्यात थकबाकी रु.1140/-व ती वाढवून रु.3902/- अशी दाखवून एकूण रु.4940/- चे बिल दिले. परत गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 नांदेड येथे जाण्यास सांगितले व त्यांनी परत पावत्याची पडताळणी करुन बिल दिले ते बिल दोन दिवसांनी दूरुस्त करुन दिले व त्यावेळेस रु.2200/- भरण्यास सांगितले ते अर्जदाराने दि.12.11.2007 रोजी भरले आहे. यानंतर परत गैरअर्जदाराने दि.31.10.2007 ते 31.12.2007 या कालावधीतील बिलात दि.1.1.2008 ते 31.3.2008 या दरम्यानच्रूा बिलात रु.5020/- आकारले. त्यात थकबाकी रु.3851/- दाखवलेली आहे. सारखे सांगून देखील दरवेळेस गैरअर्जदार हे परत परत चूकीचे बिल देत राहीले यानंतर परत शेवटी दि.31.3.2008 ते 30.6.2008 या बिलात रु.3637/- थकबाकीसह रु.5540/- चे बिल दिले. यात गैरअर्जदार यांचा निष्काळजीपणा व ञूटी स्पष्ट होते व सारखे बिल दूरुस्त करण्यासाठी अर्जदारास नांदेड येथे चकरा माराव्या लागलया त्यामूळे आर्थिक व मानसिक ञास झाला यासाठी गैरअर्जदार यांचेकडून रु.10,000/- व मानसिक ञासासाठी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- देण्यात यावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदार यांनी जी तक्रार केलेली आहे ती खोटी आहे. गैरअर्जदार यांचे मते खरी घटना अशी आहे की, दि.6.2.2007 रोजीचे देयक रु.1440/- चे होते, ती रक्कम अर्जदाराने भरली होती ती पंच करायची राहील्याने दि.25.7.2007 रोजीच्या बिलामध्ये ती रक्कम आली. अर्थात ते बिल तात्काळ दूरुस्त करुन देण्यात आले व एकूण बिल रु.2740/- च्या बिलामध्ये भरलेली रक्कम रु.1440/- कमी करुन रु.1300/- चे बिल अर्जदारास देण्यात आले. ती रक्कम अर्जदाराने दि.4.5.2007 रोजी भरली. दि.31.3.2007 ते 30.6.2007 या कालवधीच्या बिलात रु.3900/- होते यात थकबाकी रु.2639/- ची होती सदर बिल देखील तात्काळ दूरुस्त करुन देऊन त्यातील परत भरलेली रक्कम रु.1140/- कमी करण्यात आली, ती रक्कम अर्जदाराने भरली. दि.1.7.2007 ते 30.9.2007 रोजीच्या बिलामध्ये रु.1140/- वाढवून रु.3902/- ची थकबाकी दाखवली व एकूण रु.4940/- चे बिल दिले यात गैरअर्जदाराने दूरुस्त करुन दिलेले रु.1140/- चे बिल भरले नाही. म्हणून थकबाकीची रक्कम आली. गैरअर्जदार नमूद करतात की, अर्जदाराच्या वारंवार होणा-या चकरामूळे ते ञस्त झाले व त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचे कार्यालयात दि.1.10.2006 ते 30.9.2007 रोजीच्या बिलाच्या पावत्या जोडल्या. गैरअर्जदार यांचेकडे विज बिल तयार करण्याची संगणकीय प्रणाली बसविण्यात आलेली आहे. जर एखादया बिलात कमी करावयाचे असेल तर त्यास (-) बी. 80 फॉर्म भरुन सदर बिल कमी करावे लागते. अर्थात ही पध्दत संगणकाला त्यांच्या प्रचलित आज्ञावलीच्या विरुध्द असल्यामूळे एखादा वेळेस ती न स्विकारताही बिल दिले जाते. परंतु त्यांची दूरुस्तीही तात्काळ केली जाते. गैरअर्जदार यांनी निष्काळजीपणा करुन अर्जदाराला बिल दिले हे म्हणणे चूक आहे. त्यामूळे अर्जदाराने मागणी केलेली मानसिक ञास, नूकसान भरपाई ही मागणी अवास्तव आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे दि.31.3.2008 ते 30.6.2008 चे बिल योग्य व नियमित करुन दयावे हे त्यांचे म्हणण्याचे आधी गैरअर्जदार यांनी दूरुस्त करुन पूर्तता केलेली आहे. सप्टेंबर 2008 च्या शेवटचे बिल अर्जदारास दिले आहे. अर्जदाराने भरलेल्या सर्व बिलाची नोंदणी करण्यात येऊन नंतर बिल तयार करण्यात आलेले आहे. त्यामूळे अर्जदाराने हे विनाकारण प्रकरण दाखल केलेले आहे. अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात यावा अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदारांनी वादग्रस्त सर्व बिले दाखल केलेली आहेत. यात सूरुवातीचे बिल दि.1.10.2006 ते 31.12.2008 चे आहे त्यात रु.1410/- चे बिल अर्जदाराने दि.22.2.2007 रोजी भरले आहे. यानंतर दि.1.1.2007 ते 31.3.2007 या कालावधीचे रु.1275/- चे बिल आहे व यात थकबाकी रु.1446/- दाखवलेली आहे. ती रक्कम नंतर अर्जदार यांनी तक्रार केल्यावर गैरअर्जदारानी ती रु.1440/- कमी करुन दिले व उर्वरीत रु.1300/- चे बिल अर्जदाराने दि.4.5.2007 रोजी भरले आहे. परत पूढील बिलात दि.31.3.2007 ते 30.6.2007 या कालावधीत रु.1143/- बिल असताना रु.2726/- ची थकबाकी दाखवलेली आहे हे चूक आहे. अर्जदाराने तक्रार केल्यावर परत रु.1300/- कमी केलेले आहे. रु.1140/- अर्जदाराने भरले आहे. दि.1.7.2007 ते 30.9.2007 या कालावधीचे रु.1028/- चे बिल असताना यात परत रु.3902/- थकबाकी दाखवलेली आहे. यातील रु.2200/- अर्जदाराने भरले आहे. दि.1.1.2008 ते 31.3.2008 या कालावधीचे रु.1134/- बिल असताना यात रु.3891/- ची थकबाकी दाखवलेली आहे. यापैकी रु.3500/- अर्जदाराने भरलेले आहेत. दि.31.3.2008 ते 30.6.2008 हे रु.909/- चे बिल असताना यात देखील रु.1410/- कमी करुन रु.3637/- ची थकबाकी दाखवलेली आहे. यात एकूण थकबाकी रु.4594/- दाखवलेली आहे. एकंदरीत सर्व बिला पाहता व अर्जदाराने दि.16.5.2008 रोजी गैरअर्जदार यांचेकडे दिलेला तक्रार अर्ज पाहता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदारानी सारखी तक्रार करुन देखील गैरअर्जदाराने ब-याच वेळेस चूकीची बिले दिलेली आहेत. नंतर त्यांनी नांदेड येथील कार्यालयाशी संपर्क साधून ती बिले त्यांने दूरुस्त करुन दिलेली आहेत. यांचा अर्थ चुक बिल देणे व दर वेळेस अर्जदाराने नांदेड येथे येऊन ते दूरुस्त करुन घेणे यात अर्जदाराला शारीरिक, मानसिक व आर्थिक ञास नक्कीच झालेला आहे व गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदाराने सिध्द केलेली आहे. चुक बिले दिली हे सिध्द होत असले तरी त्यामुळे नुकसान झाले नाही, म्हणुन नुकसान भरपाई देणे नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2 गैरअर्जदार यांनी शेवटी दिलेले बिल रु.2350/- देयक दि.28.7.2008 हे रदद करण्यात येते, यातील रु.909.14 चे बिल कायम ठेऊन दाखवलेली थकबाकीची पूर्ण शहानीशा करुन दूरुस्त बिल अर्जदारास दयावे व ते बिल अर्जदाराने ताबडतोब् भरावे. 3. मानसिक ञासाबददल रु.5000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |