Maharashtra

Nanded

CC/08/375

Devendra Wallabhdas Sampat - Complainant(s)

Versus

Engineer,MSED Co. - Opp.Party(s)

ADV.M.D.Deshpande

25 Feb 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/375
1. Devendra Wallabhdas Sampat R/o.Deepam plot no. 20 Gujrnti colony near Purna Road NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Engineer,MSED Co. NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 25 Feb 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :-  375/2008.
                          प्रकरण दाखल तारीख - 02/12/2008
                          प्रकरण निकाल तारीख 25/02/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर          -  सदस्‍या
 
देवेंद्र पि. वल्‍लभदास संपत
वय, 70 वर्षे, धंदा पेन्‍शनर
रा.दिपम , प्‍लॉट नंबर20, गुजराती कॉलनी
वामननगर जवळ पूर्णा रोड, नांदेड जि. नांदेड.                  अर्जदार
 
विरुध्‍द.
 
1.   महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी लि.
     मार्फत कार्यकारी अभिंयता,
     विद्यूत भवन, नवा मोंढा, नांदेड.
2.   महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी लि.                गैरअर्जदार  मार्फत उप कार्यकारी अभिंयता,
     व्‍ही.आय.पी रोड, यु.एस.डी.II नांदेड
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.एम.डी.देंशपांडे
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर.
 
                              निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्‍यक्ष )
 
              गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांनी सेवेत ञूटी केल्‍याबददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हे पेन्‍शनर असून ते नांदेड येथे राहतात. त्‍यांनी गैरअर्जदाराकडून ग्राहक क्र.550010300479 द्वारे विज पूरवठा घेतला आहे. गैरअर्जदारांनी दिलेली सर्व देयके त्‍यांनी वेळच्‍या वेळी भरलेली आहेत. दि.4.9.2008 रोजी राञी गैरअर्जदार यांनी अर्जदार राहत असलेल्‍या भागात निष्‍काळजीपणामूळे व अचानक विज पूरवठा अतिदाबाने केला. त्‍यामूळे अर्जदाराचे टि.व्‍ही., इन्‍र्व्‍हटर, लॅपटॉप इत्‍यादी उपकरण नादूरुस्‍त होऊन बंद पडली.  दि.5.9.2008 रोजी गैरअर्जदाराकडे प्रत्‍यक्ष जाऊन सदर घटनेची तोंडी तक्रार करुन नूकसान भरपाई देण्‍याची मागणी केली. दि.06.09.2008 रोजी एक्‍सपर्ट पॉवर सर्व्‍हीसेस, नांदेड येथून, दि.7.9.2008 रोजी सुधीर इलेक्‍ट्रानिक्‍स वामननगर नांदेड येथून व दि.10.09.2008 रोजी कॅलीबर कॉम्‍प्‍यूटरर्स श्रीनगर नांदेड येथून लॅपटॉप दूरुस्‍त करुन घेतले व त्‍यापोटी अनुक्रमे रु.2080/-, रु.800/- व रु.2200/- असे एकूण रु.4680/- विनाकारण अर्जदाराची काहीही चूक नसताना खर्च करावे लागले. ती सर्वस्‍वी जबाबदारी गैरअर्जदाराची आहे. वरील पावत्‍याचे निरीक्षण केले असता विज पूरवठा अतिदाबाने केल्‍यामूळे वरील उपकरणे हे नादूरुस्‍त झालेले आहेत. दि.11.09.2008 रोजी अर्जदाराने परत गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार केली, पण आजपर्यत गैरअर्जदारांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही व रक्‍कम ही दिली नाही. त्‍यामूळे अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, झालेल्‍या नूकसानी बददल रु.4680/- दि.11.09.2008 पासून 18 टक्‍के व्‍याजासह  व अर्जदाराचे वय लक्षात घेता त्‍यास झालेल्‍या मानसिक ञासाबददल रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.5,000/- मिळावेत.
              गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. अर्जदाराचे कोणतेही नूकसान झालेले नसताना केवळ गैरअर्जदारांना ञास देण्‍याच्‍या हेतूने सदर तक्रार दाखल केली आहे म्‍हणून सदर तक्रार फेटाळावी.  हे म्‍हणणे खोटे आहे की, अर्जदार राहत असलेल्‍या भागात अतिदाबाने विज पूरवठा केला. अर्जदारांचे झालेले नूकसान त्‍यांना मान्‍य नाही. सदर घटना तथाकथित व खोटी बनावट आहे. वरील उपकरणे दूरुस्‍त करुन घेतल्‍या व त्‍यासाठी रु.4680/- खर्च आला हे खोटे व चूकीचे आहे. अर्जदाराने दि.11.9.2008 रोजी दिलेला अर्जच मूळात चूकीचा आहे त्‍यामूळे नूकसान भरपाई देण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. अर्जदार हे मान्‍य करतात की, अर्जदारा व्‍यक्‍तीरिक्‍त इतर त्‍यांचे भागातील कोणत्‍याही ग्राहकाने तक्रार केलेली नाही. गैरअर्जदार यांनी विज पूरवठया मध्‍ये कोणताही दोष नसताना जाणीवपूर्वक व काल्‍पनिक मूददयावर आधारीत तक्रार दाखल केली आहे त्‍यामूळे मानसिक ञास व दावा खर्च देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही.  गैरअर्जदाराने सेवेत कोणतीही कमतरता व निष्‍काळजीपणा केलेला नाही म्‍हणून सदर तक्रार ही खर्चासहीत फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे.
 
                 अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                        उत्‍तर
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?             होय.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     ञूटी केली आहे काय ?                               नाही.
3.   काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                                                          कारणे
मूददा क्र.1 ः-
                             अर्जदार यांनी अर्जासोबत लाईट बिल, विज बिल भरल्‍या बाबतची पावती दाखल केलेली आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी आपल्‍या लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ, त्‍यांनी दाखल केलेले कागदपञे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
मूददा क्र. 2 ः-
              अर्जदार यांनी त्‍यांचे अर्जामध्‍ये गैरअर्जदार यांचे निष्‍काळजीपणामूळे आणि सेवेतील कमतरतेमूळे अर्जदार यांचे विवीध उपकरणाचा (टी.व्‍ही., इन्‍व्‍हरटर व लॅपटॅप) दूरुस्‍तीचा खर्च रु.4680/- एवढया रक्‍कमेची व्‍याजासह मागणी केलेली आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथनानुसार दि.4.9.2008रोजी राञी 9.30 ते 9.45 या दरम्‍यान अर्जदार राहत असलेल्‍या भागास गैरअर्जदार यांचे निष्‍काळजीपणामूळे अचानक विज पूरवठा अतिदाबाने केल्‍यामूळे अर्जदार यांचे टी.व्‍ही., इन्‍व्‍हरटर, लॅपटॅप इत्‍यादी उपकरणे नादूरुस्‍त होऊन बंद पडली आहेत. अर्जदार यांनी नादूरुस्‍त झालेल्‍या उपकरणाची दूरुस्‍ती केल्‍या बाबतच्‍या पावत्‍याही या मंचामध्‍ये दाखल केलेल्‍या आहेत.
              गैरअज्रदार यांनी त्‍यांची लेखी म्‍हणण्‍यामध्‍हये व शपथपञामध्‍ये अर्जदार यांनी त्‍यांचे अर्जातील सर्व कथने नाकारलेली आहेत. अर्जदार ज्‍या भागामध्‍ये राहतात त्‍या भागामध्‍ये अर्जदार यांचे व्‍यक्‍‍तीरिक्‍त इतर कोणीही तक्रार केलेली नाही. यांचा अर्थ सगळीकडे विजेचा पूरवठा सूरळित दाबाने झालेला होता असे गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये नमूद केलेले आहे.
              अर्जदार यांनी सदरचा अर्ज गैरअर्जदार यांचा निष्‍काळजीपणामूळे व सेवेतील कमतरतेमूळे झालेल्‍या विवीध उपकरणाचा दूरुस्‍तीसाठी आलेल्‍या खर्चाची रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडून वसूल होऊन मिळण्‍यासाठी दाखल केलेला आहे. परंतु अर्जदार यांनी अर्जदार यांचे अर्जात नमूद केलेल्‍या विवीध उपकरणे हे गैरअर्जदार यांचे सेवेतील कमतरतेमूळेच नादूरुस्‍त झालेली आहे ही बाब अर्जदार हे पूराव्‍यानीशी सिध्‍द करु शकलेले नाहीत. दि.4.9.2008रोजी  गैरअर्जदार यांचेकडून झालेला विज पूरवठा हा अर्जदार राहत असलेल्‍या भागामध्‍ये जास्‍त दाबाचा झालेला होता हे अर्जदार पूराव्‍यानीशी सिध्‍द करु शकलेले नाहीत. अर्जदार यांनी या सोबत तज्ञ व्‍यक्‍तीचा अहवाल अगर इलेक्‍ट्रीक इन्‍स्‍पेक्‍टर यांचा तपासणी अहवाल याकामी दाखल करणे गरजेचे व आवश्‍यक होते. परंतु अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून दि.4.9.2009  रोजी विज पूरवठा अतिदाबाने झाला ही बाब सिध्‍द करु शकलेले नाहीत.
 
              अर्जदार यांनी पूराव्‍याचे कामी मनोज बाबुराव पाटील व प्रदिप धोंडोपंत पाटील यांचे शपथपञ दाखल केलेले आहे. सदर शपथपञामध्‍ये शपथपञधारकांनी स्‍वतःचे कॉम्‍प्‍यूटर, टी.व्‍ही इत्‍यादी विद्यूत उपकरणे नादूरुस्‍त झाली. सदरची उपकरणे दूरुस्‍त करुन घेतलेले आहेत व विज कंपनी कडे तोंडी तक्रार केली परंतु काही उपयोग झाला नाही असे नमूद केले परंतु त्‍यांचे पूष्‍ठयर्थ कोणताही पूरावा याकामी दाखल केलेला नाही. तसेच अर्जदार यांनी सूधीर कीशनराव खराटे यांचे शपथपञ दाखल केलेले आहे. त्‍यांनी अर्जदार यांचे विद्यूत उपकरणे नादूरुस्‍त झालेली दूरुस्‍त करुन दिल्‍या बाबतचे नमूद केलेले आहे. सदर श्री. खराटे हे तज्ञ व्‍यक्‍ती नसल्‍याने त्‍यांचे शपथपञ याकामी विचारात घेता येत नाही.
 
              अर्जदार यांनी या अर्जासोबत वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालपञ दाखल केलेले आहे. सदर निकालपञाचे अवलोकन केले असता सदर केसमध्‍ये लाईट संबंधीचा मिटरही जळालेला आहे. अर्जदार यांचे अर्जामध्‍ये व प्रस्‍तूत केसमध्‍ये तफावत दिसून येते आहे. त्‍यामूळे सदर निकालपञ याकामी विचारात घेता येत नाही असे या मंचाचे मत आहे.
              अर्जदाराचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद आणि गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला लेखी जवाब, शपथपञ तसेच दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद यांचा सर्वाचा विचार होता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
                        आदेश
1.                 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येतो.
 
2.                 पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                 पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                           श्रीमती सुजाता पाटणकर     
   अध्‍यक्ष                                                             सदस्‍या                  
 
 
 
जे.यु.पारवेकर
लघूलेखक.