जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/109 प्रकरण दाखल दिनांक – 05/05/2009. प्रकरण निकाल दिनांक –15/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. 1. श्रीमती गंगाबाई भ्र. शेषराव चौरे वय, 60 वर्षे, धंदा घरकाम, रा.शिवनगर, नांदेड , जि.नांदेड. अर्जदार 2. सौ.लक्ष्मीबाई भ्र. माधव चौरे वय 30 वर्षे, धंदा घरकाम रा.शिवनगर, नांदेड विरुध्द 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी म. नांदेड मार्फत मुख्य कार्यकारी अभिंयता, विदयुत भवन, नांदेड. गैरअर्जदार 2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी म. नांदेड मार्फत, कनिष्ठ अभिंयता, अर्बन-2, एस.डी.एन.,विदयुत भवन, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.सजंय लाठकर गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - कोणीही हजर नाही. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार क्र.1 या अर्जदार क्र.2 ची नात्याने सासू असून दोघीही शिवनगर येथील रहीवासी असून सर्व्हे नं.13, मौजे असदूल्लाबाद मधील प्लॉट नंबर 16 वर कच्चे बांधकाम करुन राहतात. दि.17.11.1990 रोजी मूळ मालक संतोष राखेवार यांचेकडून हा प्लॉट खरेदी खत नंबर 7789/90 अन्वये विकत घेतला व त्यावर कच्चे बांधकाम करुन ते राहतात. गैरअर्जदारांनी ग्राहक क्र.550011064159 याअन्वये त्यांना विज पूरवठा दिला होता. ते नियमितपणे विज बिल भरतात. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराला कोणतीही पूर्व सूचना न देता व चौकशी न करता अर्जदार यांचे नांव कमी केले व विज पूरवठा खंडीत केला हे कृत्य बेकायदेशीर आहे. अर्जदार क्र.2 ने गैरअर्जदाराचे कार्यालयात जाऊन विज पूरवठा पूर्ववत सूरु करण्याची विनंती केली व विज पूरवठा खंडीत होण्याचे कारणही विचारले परंतु गैरअर्जदार यांनी त्यांची दखल घेतली नाही. ग्राहक क्रमांक व मिटर दूस-याच्या नांवे परिवर्तन करावयाचे असेल तर अर्जदार यांना नोटीस देणे हे बंधनकारक असताना त्यांनी विनाकारण फेरफार केला व विज पूरवठा खंडीत केला असे करुन त्यांनी सेवेत ञूटी केली आहे. त्यामूळे अर्जदारास झालेलया शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.25,000/- व खर्चापोटी रु.10,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्यात आली, नोटीस प्राप्त होऊनही गैरअर्जदार क्र.1 व 2 हे हजर झाले नाही. त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी असताना त्यांनी ती घेतली नाही. म्हणून प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा करुन पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी विदयूत देयक क्र.4855 दाखल केलेले आहे. त्यावर स्पष्टपणे चौरे गंगाबाई शेषराव असे अर्जदार क्र.1 चे नांव आहे व अर्जदार क्र.2 ही त्यांची सून असल्यामूळे हिंदू एकञित कूटूंबाप्रमाणे ती लाभार्थी आहे. गैरअर्जदारांनी विज पूरवठा खंडीत केल्यानंतर तो चालू करावा म्हणून अर्जदार यांनी वारंवार विनंती केली. यानंतर दि.12.1.2009 रोजी गैरअर्जदार कंपनीस लेखी पञ लिहीले ते पञ या प्रकरणात दाखल आहे. अर्जदार हे नियमितपणे बिल भरत आहेत व अर्जदारास गैरअर्जदार यांनी विज पूरवठा खंडीत करण्याचे कोणतेही कारण स्पष्टपणे सांगितलेले नाही. परंतु अर्जदाराच्या हाती एक पञ दि.23.10.2008 चे लागलेले आहे त्यात अर्जदार ग्राहक यास्मीन बेगम शिवनगर नांदेड यांनी गैरअर्जदार यांना एक पञ लिहीलेले आहे व तात्पूरता विज पूरवठा खंडीत करणे बददल म्हटले आहे व त्यात असा उल्लेख केलेला आहे की, जोपर्यत ते म्हणत नाहीत तोपर्यत विज पूरवठा सूरु करु नये. यावर पोल नंबर 202 असे लिहीलेले असून ग्राहक क्र.550011064159 असे लिहीलेले आहे व या दोन पञाचे आधारे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विज पूरवठा खंडीत केलेलो आहे. विज पूरवठा बंद करण्याचा अर्ज ते ग्राहक नसताना व विज देयकावर अर्जदार क्र.1 यांचे नांव असताना गैरअर्जदार यांनी कोणतीही चौकशी न करता विज पूरवठा खंडीत का केला ? हा प्रश्न उपस्थित होतात. यास्मीन यांनी हा अर्ज देण्याचा हा त्यांचे घराशी काय संबंध आहे व कोणत्या हक्काने त्यांनी असा अर्ज दिला यांचा कोणताही पूरावा या प्रकरणात संधी असताना गैरअर्जदार यांनी दाखल केलेला नाही. यांचा अर्थ गैरअर्जदार यांनी यास्मीन यांचेशी हातमिळवणी करुन अर्जदार यांचा विज पूरवठा खंडीत केलेला आहे असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेतील अनूचित प्रकार व सेवेतील ञूटी केली आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदारांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार कंपनीने हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार क्र.1 यांना नवीन मिटर बसवून विज पूरवठा पूर्ववत सूरु करुन दयावा व यांचा खर्चही स्वतः सोसावा. 3. अर्जदार यांना झालेल्या मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्चा बददल रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |