जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 363/2008. प्रकरण दाखल तारीख - 18/11/2008 प्रकरण निकाल तारीख - 15/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य गुरुराज पि.रामराव पाटील, अर्जदार. वय वर्षे 36, व्यवसाय शेती व व्यापार, रा.फत्तेपुर ता.जि.नांदेड. विरुध्द. कनिष्ठ अभियंता, गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि, वाजेगांव युनिट ता.जि.नांदेड. अर्जदार यांचे तर्फे - अड.डि.जी.शिंदे. गैरअर्जदार यांचे तर्फे - एकतर्फा. निकालपत्र (द्वारा- श्रीमती सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांनी थोडक्यात तक्रार अशी की, त्यांनी त्यांचे शेत गट क्र.55 क्षेत्रफळ 25 आर मध्ये घराचे बांधकाम पुर्ण केल्यानंतर त्यांचे शेतात बोअर पाडले. त्यानंतर थ्रीफेस एकुण सहा एच.पी.चा विज कनेक्शन घरगुती वापरा करीता देण्या बाबत गैरअर्जदार यांचेकडे दि.10/10/2008 रोजी विनंती केली . परंतु गैरअर्जदार यांनी आजपर्यंत अर्जदारास विज पुरवठा न देवुन विज वापरा पासुन हेतुपुरस्सर वंचीत ठेवले त्यामुळे अर्जदार बोअरच्या पाण्याचा उपभोग घेवु शकला नाही. अर्जदाराने दि.14/11/2008 रोजी बोअरसाठी थ्रिफेसचे विद्युत पुरवठा मिळण्या बाबत अर्ज गैरअर्जदाराकडे दिला. परंतु गैरअर्जदार यांनी विद्युत पुरवठा देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी वेळोवेळी वरीष्ठ अधिकारी यांची भेट घेवुनही त्यांना विज पुरवठा देण्यात आलेला नाही. अर्जदार हे विज पुरवठासाठी लागणारे रक्कम भरण्यास तयार आहेत असे असुन सुध्दा त्यांना विद्युत पुरवठा देण्यात आलेला नाही. गैरअर्जदार यांनी हेतुपुरस्सर अर्जदारास विज पुरवठा न देवुन त्यांचे सेवेत कमतरता केली आहे म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे त्यांचे शेत गट क्र.255 मधील घर क्र.233 या घरास व पाण्याच्या बोअरला सिंगल फेस व थ्रीफेसचा विद्युत पुरवठा करण्यात यावे तसेच त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी व दावा खर्चापोटी रु.50,000/- देण्यात यावे अशी मागणी केली आहे. यात गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली त्यांना नोटी मिळुनही ते या मंचामध्ये हजर न राहील्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरणांत एकतर्फा आदेश परीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र,त्यांनी दाखल केलेली कागदपत्र याचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय? होय. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन विद्युत कनेक्शन घेणेसाठी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज दिलेला आहे. गैरअर्जदार यांना सदरचा अर्ज दि.14/11/2008 रोजी मिळाले बाबत गैरअर्जदार यांनी सदर अर्जावर रिसीव असा शेरा मारलेला आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत नविन विद्युत कनेक्शनसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या मंचामध्ये अर्जासोबत दाखल केलेले आहेत. अर्जदार यांचा अर्ज शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र त्यामधील विद्युत पुरवठा मागणी अर्ज व त्या अनुषंगाने दाखल केलेली सर्व कागदपत्र याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 – अर्जदार यांनी त्यांचे शेत गट क्र. 55 या शेतामध्ये बोअर पाडलेले आहे, सदरच्या बोअरचे पाणी उपसा करण्यासाठी अर्जदार यांना विद्युत पुरवठा आवश्यक असल्याने अर्जदार यांनी विद्युत कनेक्शन मिळणेसाठी गैरअर्जदार यांचेकडे विद्युत पुरवठा मागणी अर्ज दि.14/11/2008 रोजी दिलेला आहे.सदर अर्जावर गैरअर्जदार यांनी रिसीव असा शेरा मारलेले आहे परंतु त्यानंतर आज अखेर अर्जदार यांना विज कनेक्शन दिलेले नाही. गैरअर्जदार यांना सदर अर्जाची नोटीस पाठविलेली होती. सदरच्या मंचाची नोटीस गैरअर्जदार यांना मिळुनही गैरअर्जदार या मंचामध्ये हजर राहीलेले नाही त्यामुळे सदर गैरअर्जदार यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आलेले आहे. अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथने गैरअर्जदार यांनी मंचामध्ये हजर राहुन नाकारलेली नाही तसेच अर्जदार यांनी अर्जासोबत विज कनेक्शन मिळणे बाबत आवश्यक ती सर्व कागदपत्र दाखल केलेली आहे. सदर कोणतेही कागदपत्र गैरअर्जदार यांनी या मंचामध्ये हजर राहुन नाकारलेली नाही. अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अर्जदार यांनी विद्युत कनेक्शन मिळणेसाठी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज केलेला आहे परंतु कोणतेही योग्य व संयुक्तीक कारण नसतांना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विज कनेक्शन देण्याचे नाकारलेले आहे अगर आज अखेर अर्जदार यांना त्यांचे मागणी प्रमाणे विद्युत कनेक्शन दिलेले नाही. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली याचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत 2004 (1) सी.पी.आर. 369 पश्चिम बंगाल राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, कलकत्ता, सी.इ.एस.सी. लि. विरुध्द श्री.मोहीत कुमार बॅनर्जी या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र दाखल केलेले आहे. सदर निकालामध्ये (i) Consumer protection Act, 1986 Section 2 (1) (d) (ii) Consumer Complainant made an application for installation of new meter/connection in his premises –Wheither complainant is a consumer till connection is sanctioned & supplied ? Yes असे नमुद करणेत आलेले आहे. सदर निकालाप्रमाणे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे विज कनेक्शन मागणीसाठी अर्ज दिलेला आहे. परंतु गैरअर्जदार यांनी कोणतेही योग्य व संयुक्तीक कारण नसतांना अर्जदार यांना विज कनेक्शन देणेचे नाकरलेले आहे अगर आज अखेर विद्युत कनेक्शन दिलेले नाही. त्यामुळे अर्जदार यांना या मंचामध्ये अर्ज करावा लागला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागला आहे. त्यामुळे अर्जदार हे अर्जाच्या खर्चापोटी व मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र तसेच अर्जदार यांचे वकीलांनी केलेला युक्तीवाद याचा विचार होता, आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 1. आज पासुन 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना अर्जदार यांनी अर्जात नमुद केलेली मागणी प्रमाणे विज कनेक्शन द्यावे. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-, अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- द्यावे. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावे. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प. निलमवार लघूलेखक. |