जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/221 प्रकरण दाखल तारीख - 07/09/2010 प्रकरण निकाल तारीख – 12/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. अरविंद पि.विजयकुमार उत्तरवार वय 38 वर्षे, धंदा व्यापार अर्जदार. रा.घर क्र.30, मेन रोड,उमरी ता.उमरी जि.नांदेड विरुध्द. सहायक कनिष्ठ अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. गैरअर्जदार उमरी ता.उमरी जि. नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.बी.अयाचित. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.व्ही.व्ही.नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हे उमरी येथील रहीवासी असून आपल्या कूटूंबासह राहतात.अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून ग्राहक क्र.55060096362 व 5506001043 घेतला असून अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. मोठा परिवार असल्यामुळे घरातील विज भार वाढलेला आहे. दि.17.4.2006 मध्ये अर्जदाराचे नांवे नविन ग्राहक क्र.55060023093 व त्याचे भाऊ अच्युत यांचे नांवे ग्राहक क्र.55060023093 घरगूती वापरासाठी स्वतंञ मिटर घेण्यात आले. त्यांचा वेळोवेळी विज बिल भरणा केलेला आहे. दि.12.8.1961 पासून वरील मिटर 550600096362 घेतलेले आहे. तसेच जून 2010 मध्ये कोणतेही कायदेशीर कारण नसताना मिटर काढून नेले. तसेच सन 2006 मध्ये बसविलेले मिटर क्र.550600253093 हे घरगूती मिटर सूध्दा काढून नेले. त्यामूळे अर्जदार व त्यांचे कूटूंबियाना मिटर क्र.550600253085 यावर अवलंबून रहावे लागते. त्यावर भार वाढल्यामूळे ते मिटर जळण्याची शक्यता वाढली आहे. मिटर काढून नेण्या बाबत गैरअर्जदार यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही कायदेशीर उत्तर दिले नाही. अर्जदार यांना मिटर क्र.550600253085 चे रु.33,390/- हे दि.10.08.2010 रोजी बिल दिले तसेच व्यावसायीक मिटर क्र.550600104306 चे रु.14550/- चे दि.10.08.2010 रोजी दिलेले आहे ते दोन्ही बिलाचा स्लॅब रेट कमी करण्याचा आदेश गैरअर्जदार यांना दयावा. तसेच दोन्ही मिटरचा विज पूरवठा खंडीत करु नये तसेच जे मिटर काढून नेले आहेत ते पूर्ववत जागेवर बसविण्याचे आदेश दयावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदार यांनी ग्राहक क्र.55060069362 हा क्रमांक अर्जदाराचा नाही. ग्राहक या नात्याने अर्जदाराचा या विज जोडणीशी कोणताही संबंध नाही.रेकार्ड नुसार अच्यूत यांचे ग्राहक क्रमांकाबददल अर्जदार यांना प्रकरण दाखल करण्याचा अधिकार नाही. ग्राहक क्र.55060096362 हे विज जोडणी विठठल उत्तरवार यांच्या नांवे आहे व ती जोडणी घरगूती नसून ती व्यावसायीक आहे. तसेच विज जोडणी क्र.550600104306 या क्रमांकाचा विज पुरवठा व्यावसायीक वापरासाठी पंढरीनाथ उत्तरवार यांना दिलेला होता. दूस-याच्या नांवाच्या विज जोडणी बददल अर्जदार मागणी करु शकत नाही. मार्च 2009 पासून अर्जदाराने विजेचा वापर करुन त्यांची रक्कम भरलेली नाही.परिपञक क्र.110 नुसार एका इमारतीमध्ये एकच व्यावसायीक आणि एकच रहिवाशी जोडणी देता येते.अर्जदाराच्या नांवे फक्त 550600253085 ही जोडणी आहे इतर जोडण्या दूस-याच्या नांवावर आहेत त्यामूळे त्यांच्या नांवावर असलेल्या जोडणी बददल त्यांना तक्रार करता येते दूस-याच्या नांवावर असलेल्या जोडणीबददल त्यांना तक्रार करता येणार नाही.अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांना विज भार वाढला असेल तर तसा अर्ज केल्यास त्यांना गैरअर्जदार हे तिन फेजचे मिटर देऊ शकतील. विजेचा अंखडीत वापर असताना तक्रार दाखल केली व यांचा गैरफायदा घेऊन अर्जदाराने रक्कम न भरल्याने गैरअर्जदार यांचे नूकसान होत आहे. अर्जदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे व दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकूण खालील मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय होय. 2. अर्जदाराने केलेली मागणी पूर्ण करण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- 1. गैरअर्जदार यांचेकडून अर्जदार यांनी विज जोडणी घेतलेली आहे. याबददल उभय पक्षात वाद नाही त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. 2. अर्जदार यांचे घरात व दुकानात मिळून चार विज मिटर आहेत असे आपल्या तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. त्यापैकी मिटर नंबर 55060096362 हे मिटर 1961 पासून अर्जदार वापर करीत होते ते मिटर जून 2010 मध्ये गैरअर्जदार यांनी कारण नसताना काढून नेले. तसेच अर्जदार यांहचे भाऊ अच्यूत यांचे नांवे असलेले मिटर ज्याचा क्रमांक 550600253093 असून हे मिटर 2006 मध्ये बसवलेले होते. ते काढून नेले व त्यामुळे अर्जदाराच्या मिटरवर सर्व भार आल्यामुळे त्यांस बिल जास्त आले अशी तक्रार अर्जदार यांनी मांडलेली आहे. अर्जदार यांचे तक्रारीतील विनंती पाहता त्यांने जे दोन मिटर त्यांचेच घरातील पण त्यांचे भांवाचे नावावर आहेत. अर्जदार यांनी अर्ज दाखल करताना एक तर हया दोन्ही मिटर मालकांची नांवे अर्जदार म्हणून तक्रार अर्जात लिहीणे आवश्यक होते किंवा अर्जदार हे दोन्ही भावातर्फे केस चालवत आहेत असे त्यांच्या दोन्ही भावाच्या सहीचे अधिकारपञ तक्रार अर्जासोबत दाखल करावयास पाहिजे होते. या दोन्हीही गोष्टी अर्जदाराने केलेल्या नसल्यामुळे अर्जदाराने केलेली मागणी ही चुक आहे. अर्जदार त्यांचे हक्कातील त्यांचे नावावरील मिटरच्या संदर्भातच मागणी करु शकतो. त्यामुळे दुस-यांचे नांवावर असलेले मिटर हे काढून नेले तरी ते जागेवर बसवण्याची मागणी अर्जदार करु शकत नाहीत. ज्यांचे नांवावर मिटर आहेत त्यांनाच स्वतःहा अर्ज करण्याची व मागणी मांडण्याची परवानगी कायदयानुसार आहे. अर्जदाराने त्यांचे नांवे असलेल्या मिटरचे शेवटचे बिल भरल्याची पावती तक्रार अर्जात कूठेही दाखल न केल्यामूळे त्यांचे बिल जास्त आले की बरोबर आहे याबाबत चर्चा करता येत नाही. अर्जदाराने अजून एका मिटरचे बिल मिटर क्रमांक 550600104306 हे रु.14550/- आहे ते कमी करण्यात यावे अशी विनंत केली आहे. पण सदरील मिटर हे पंढरीनाथ उत्तरवार यांचे नावांवर असल्यामुळे त्यांचा अर्ज त्यांनी स्वतःहा मिटर मालकाने करणे आवश्यक असल्यामुळे अर्जदाराची ही मागणी देखील मान्य करण्यासारखी नाही. अर्जदाराचे ग्राहक क.550600253085 वर आलेले रु.33,390/- चे बील हे अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे शेवटचे बिल केव्हा भरलेले आहे हे तपासून त्या संदर्भात कार्यवाही करावी. अर्जदार यांची दुस-या ग्राहकांची मागणी स्वतःच्या तक्रार अर्जात घेतल्यामुळे त्यांच्या मागणीचा विचार करता येत नाही या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 1. 2. खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 2. 3. निर्णय उभयपक्षांना कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |