Dated the 10 Sep 2015
तक्रार दाखल कामी आदेश.
द्वारा- श्री.म.य.मानकर...................मा.अध्यक्ष.
1. तक्रारदारांचे वकील श्री.नेपोलियन तुस्कानो यांना ऐकण्यात आले.
2. तक्रार व तक्रारी सोबत दाखल केलेली कागदपत्रे पाहण्यात आली. तक्रारदार ही एक भागिदारी संस्था आहे व जाहिरात होर्डिंगचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या होर्डिंग्स करीता
सामनेवाले विदयुत पुरवठा करणारी कंपनीव्दारे विदयुत पुरवठा करण्यात येतो. विदयुत देयकाबाबत वाद निर्माण झाल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदार यांना ही भिती आहे की, सामनेवाले त्यांचा विदयुत पुरवठा खंडित करु शकतात त्यामुळे त्यांनी अंतरीम मनाई हुकूमासाठी एमए-111/2015 दाखल केला.
3. श्री.नेपोलियन तुस्कानो यांनी निवेदन केले की, सामनेवाले यांनी त्यांना ग्राहक क्रमांक दिलेला आहे त्यामुळे ते सामनेवाले यांचे ग्राहक होतात व ही तक्रार दाखल करुन घेण्यात यावी व तुर्तास मनाई हुकूम देण्यात यावा.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ग्राहक क्रमांक दिलेला आहे याबाबत वाद नाही. परंतु आमच्या मते हा ग्राहक क्रमांक सामनेवाले यांनी त्यांच्या प्रशासकीय कार्यासाठी व दैनंदिन व्यवहारासाठी दिलेला आहे. परंतु सदरील तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयाच्या ग्राहक या संज्ञेमध्ये अंतर्भुत येतात का ? पाहणे आवश्यक आहे. तक्रारीमध्ये परिच्छेद 1 मध्ये नमुद केल्याप्रमाणे तक्रारदार यांचा जाहिरात होर्डिंगचा व्यवसाय आहे व विदयुत पुरवठा त्या व्यवसायासाठी करण्यात येतो. यावरुन सामनेवाले यांची ही सेवा वाणिज्य स्वरुपासाठी वापरण्यात येते हे सिध्द होते. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेल्या विदयुत देयकावरुन सुध्दा हे स्पष्ट होते की, विदयुत पुरवठा हा वाणिज्य उद्देशाकरीता वापरण्यात येतो. सबब आमच्या मते ही तक्रार या मंचात चालु शकत नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा अंतरीम अर्ज सुध्दा दाखल करुन घेता येणार नाही.
सबब,आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-956/2015 ही ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-12(3) प्रमाणे फेटाळण्यात
येते.
2. एमए क्रमांक-111/2015 हा नस्ती करण्यात येतो.
3. खर्चाबाबत आदेश नाहीत.
4. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
5. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.10.09.2015
जरवा/