:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागिरदार, मा.सदस्या. )
(पारीत दिनांक–19 ऑक्टोंबर, 2018)
01. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) जे अनुक्रमे युपीस निर्माता व विक्रेता आहेत यांचे विरुध्द दोषपूर्ण युपीएस पुरविल्या संबधाने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा एक स्त्री रोग तज्ञ असून तो भंडारा येथे नर्सींग होम म्हणून 20 बेडचे सहयोग हॉस्पीटल व टेस्ट टयुब सेंटर चालवितो आणि त्यावरच त्याचा व त्याचे कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) युपीएस निर्माता असून त्याने इंटरनेटवर निर्मित युपीएसची जाहिरात प्रकाशित केली होती. हॉस्पीटलसाठी सतत विज पुरवठा मिळावा तसेच उच्च व कमी दाबा मुळे विजेची उपकरणे सुरक्षीत राहावित म्हणून तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष क्रं-1) निर्मित युपीएस बॅटरीसह विरुध्दपक्ष क्रं 2, जो विरुध्दपक्ष क्रं-1) युपीएस निर्माता कंपनीचा अधिकृत विक्रेता आहे त्याचे कडून दिनांक-20/03/2014 रोजी एकूण रुपये-2,84,625/- एवढया किमतीत विकत घेतला, त्याचे सविस्तर विवरण पुढील प्रमाणे-
Sl.No. | Item | Qty.Unit | Price |
1 | Emersion/Libert Make Super 54100 10 KVA (UPS System | 1.000 Pcs | 2,04,750/- |
2 | Amaraja Make 12V/28 AH SMF Battery | 26.000 Pcs | 73,125/- |
3 | Battery Back & interlinks | 1.000 Pcs | 6,750/- |
| | Total | 2,84,625/- |
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-2) युपीएस विक्रेत्याने बिलाव्दारे युपीएस व बॅटरी यांची दोन वर्षाची वॉरन्टी दिली होती. विरुध्दपक्षांनी युपीएस दिनांक-23/03/2014 रोजी स्थापित करुन दिल्या नंतर वर्ष-2014 व वर्ष-20154 03/2014 erlinkaF Battery0 KVA (8KW) True online Double UPS System खालील नमुद तारखां मध्ये त्यात दोष आढळून आले-
22/05/2014 | 30/05/2014 | 18/06/2014 | 09/07/2014 | 04/08/2014 |
23/12/2014 | 29/12/2014 | | | |
03/01/2015 | 05/01/2015 | 12/01/2015 | 23/03/2015 | 15/04/2015 |
18/04/2015 | 26/05/2015 | 23/07/2015 | 26/09/2015 | 03/10/2015 |
08/10/2015 | 08/10/2015 | 20/10/2015 | 20/10/2015 | 20/10/2015 |
त्यामुळे दिनांक-20/10/2015 रोजी विरुध्दपक्षाचे अधिकृत व्यक्ती हे युपीएस घेऊन गेले तसेच विरुध्दपक्षा तर्फे रुध्दपक्षा 015 दिनांक-12/01/2015 रोजी दिलेल्या अहवाला मध्ये युपीएस स्थापित केल्याचे दिनांका पासून त्यात दोष आहेत असे नमुद केले. उपरोक्त नमुद दिनांकानां युपीएस मध्ये दोष निर्माण होत गेलेत, ते दुर करण्या करण्यासाठी विरुध्दपक्षाचे अधिकृत कर्मचारी येत गेलेत परंतु त्यांना युपीएस मधील दोष दुर करता आले नाहीत, दोष दुर न झाल्याने युपीएस बदलवून देण्या बाबत वेळोवेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना सुचविले. शेवटी विरुध्दपक्षानीं दोषपूर्ण युपीएस दिनांक-20/10/2015 रोजी परत नेला व त्याचे बदल्यात तात्पुरता म्हणून स्टॅन्ड बाय युपीएस बसवून दिला.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, वस्तुतः युपीएसचे कार्य हे विजेचा प्रवाह खंडीत झाल्यास दवाखान्यातील उपकरणे 25 मिनिटे (Back up) सुरु राहतील तसेच विजेचा प्रवाह सुरु असताना प्रवाहाचे स्थिरीकरण (Stabilization) करणे असे आहे परंतु दोषपूर्ण युपीएस मुळे दवाखान्यातील उपकरणे बिघडत असल्याने दवाखान्या मधील रुग्णांना योग्य सेवा देता येत नव्हती. विरुध्दपक्षा कडून नविन युपीएस न मिळाल्याने तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना दिनांक-19/11/2015 रोजी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली, नोटीस मिळूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून पुन्हा दिनांक-15/12/2015 रोजी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस मिळूनही विरुध्दपक्षां तर्फे कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.
तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले की, त्याने यापूर्वी विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित युपीएस विकत घेतले असून त्यामध्ये आज पर्यंत कोणताही बिघाड झालेला नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) युपीएस निर्माता कंपनीचे प्रतिनिधी कु.स्वेता हिने तक्रारकर्त्याला ई मेल पाठवून कनेक्टींग केबल मध्ये लूज कॉन्टॅक्ट होते त्यामुळे युपीएस बरोबर काम करीत नसल्याचे नमुद करुन सदर दोष आता काढून टाकण्यात आल्याचे कळविले. त्यावर तक्रारकर्त्याने प्रतीउत्तरा दाखल ई मेल पाठवून दिनांक-20 मार्च, 2014 ते 22 ऑक्टोंबर, 2015 या कालावधीत युपीएसच्या तपासण्या केल्या नंतर सर्व्हीस रिपोर्ट मध्ये लूज कॉन्टॅक्टची बाब नमुद केली नसल्याचे कळविले. तक्रारकर्त्याने असेही नमुद केले की, दोषपूर्ण युपीएस सोबत पुरविलेल्या 26 बॅटरी तसेच बॅकअप व्यवस्थीत असल्याने त्याबाबत त्याची कोणतीही तक्रार नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं दोषपूर्ण युपीएसची विक्री करुन त्याची फसवणूक केली व दोषपूर्ण सेवा दिलीरण्या तसेच विरुध्दपक्षा तप म्हणून त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील मागण्या केल्यात-
विरुध्दपक्षांनी त्याला नविन लिबर्ट मेक-54100, 10 केव्हीए युपीएस (कोटेशन व बिलात वर्णन केलेला) दोन वर्षाचे वॉरन्टीसह देण्याचे आदेशित व्हावे किंवा असे करणे विरुध्दपक्षानां शक्य नसल्यास युपीएसची किम्मत रुपये-2,04,750/- फीर्याद दाखल केल्या पासून वार्षिक-12% दराने व्याजासह परत करावी तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-30,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावेत. याशिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मिळावी.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) युपीएस निर्माता कंपनीला मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळूनही कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नसल्याने मंचाने विरुध्दपक्ष क्रं-1) विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक-15/12/2016 रोजी पारीत केला. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं-1) तर्फे वकील अश्विनी नंदेश्वर व वकील श्रीमती एम.डी.रंगारी यांचे नावाचा दिनांक-13/02/2017 रोजी वकालतनामा दाखल करुन सोबत विरुध्दपक्ष क्रं 1) युपिएस निर्माता याचे विरुध्द पारीत केलेला एकतर्फी आदेश रद्द करुन त्याचे लेखी उत्तर अभिलेखावर घेण्या बाबत विनंती अर्ज सादर केला, त्यावर मंचाने त्याच दिवशी आदेश पारीत करुन विरुध्दपक्ष क्रं 1 तर्फे वकील श्रीमती रंगारी यांनी दाखल केलेला अर्ज मंचाला स्वतः पारीत केलेला एकतर्फी आदेश रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे कारण नमुद करुन खारीज केला.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) युपीएस विक्रेत्या तर्फे मंचा समक्ष दिनांक-07/10/2016 रोजी समझोता होत असल्याने पुढील तारीख मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला व त्यानंतर दिनांक-15/10/2016 रोजीचे अधिकारपत्रान्वये विरुध्दपक्ष क्रं 2 ची बाजू मांडण्या करीता श्री विशाल भालचंद्र सोनकुसळे, लेखाधिकारी याला नियुक्त केल्या बाबत अधिकारपत्र दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं 2 ने दिनांक-15/11/2016 रोजी त्याने तक्रारकर्त्याला दिलेल्या तडजोडीच्या अटीची प्रत अभिलेखावर दाखल केली. परंतु त्या नंतर कोणताही समझोता झाला नाही वा विरुदपक्ष क्रं 2 विक्रेत्याने त्याला संधी देऊनही लेखी उत्तर मंचा समक्ष दाखल केले नसल्याने त्याचे विरुध्द मंचाने प्रकरणात दिनांक-19 जुन, 2018 रोजी बिना लेखी जबाब आदेश पारीत केला.
05. तक्रारकर्त्याने पान क्रं-12 वरील दस्तऐवज यादी नुसार एकूण 07 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये विरुध्दपक्ष क्रं 2 ने दिलेले बिल, सर्व्हीस रिपोर्ट, तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 2 ला दिलेले पत्र, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या नोटीस व रजि.पोच इत्यादी दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने पान क्रं-43 ते 48 वर स्वतःचा प्रतिज्ञालेखावरील पुरावा दाखल केला तसेच पान क्रं-49 ते 53 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारकर्त्याने पान क्रं-56 वरील यादी नुसार एकूण 03 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये भंडारा नगर परिषदेचे कॉमेन्समेंट सर्टीफीकेट, कराची पावती, हॉस्पीटलचे रजिस्ट्रशन सर्टीफीकेट अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, पुरावा, त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज यांचे मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्त्याचे वकील श्री तलमले यांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष क्रं-1) निर्मित Emersion/Libert Make Super 54100 10 KVA (UPS System) युपीएस बॅटरीसह विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेत्या कडून दिनांक-20/03/2014 रोजी एकूण रुपये-2,84,625/- एवढया किमतीत विकत घेतला ही बाब तक्रारअर्जा सोबत दाखल केलेल्या पृष्ट क्रं 13 वरील पावती वरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याची तक्रार, त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित युपिएस जो विरुध्दपक्ष क्रं-2 विक्रेता याचे कडून विकत घेतला होता तो दिनांक-23/03/2014 रोजी स्थापित करुन दिल्या नंतर त्यामध्ये वारंवार उदभवलेल्या दोषा संबधीची आहे, त्याचे म्हणण्या प्रमाणे युपीएसचे कार्य हे विजेचा प्रवाह खंडीत झाल्यास दवाखान्यातील उपकरणे 25 मिनिटे (Back up) सुरु राहतील तसेच विजेचा प्रवाह सुरु असताना प्रवाहाचे स्थिरीकरण (Stabilization) करणे असे आहे परंतु दोषपूर्ण युपीएस मुळे दवाखान्यातील उपकरणे बिघडत असल्याने दवाखान्या मधील रुग्णांना योग्य सेवा देता येत नव्हती. त्याने या संबधात दिनांक-22 मे, 2014 पासून ते दिनांक-20/10/2015 चे कालावधीत वारंवार विरुध्दपक्षांकडे तक्रारी केल्यात, त्या दुर करण्यासाठी विरुध्दपक्षाचे अधिकृत कर्मचारी येत गेलेत परंतु त्यांना युपीएस मधील दोष दुर करता आले नाहीत, दोष दुर न झाल्याने युपीएस बदलवून देण्या बाबत वेळोवेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना सुचविले. शेवटी विरुध्दपक्षानीं दोषपूर्ण युपीएस दिनांक-20/10/2015 रोजी परत नेला व त्याचे बदल्यात तात्पुरता म्हणून स्टॅन्ड बाय युपीएस बसवून दिला.
08. तक्रारकर्त्याने त्याचे लेखी युक्तीवादात असे नमुद केले आहे की, त्याने दिनांक- 24/02/2016 रोजीचे पत्रान्वये विरुध्दपक्ष क्रं 1 ला असे कळविले होते की, विरुध्दपक्ष त्याला दोन वर्षाच्या वॉरन्टीसह नविन 10 KVA UPS देत असतील तर तो सदर तक्रार मागे घेईल. वि.प. क्रं 1 ने दिनांक-07/11/2016 रोजीचे ई मेल व्दारे, विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 07/11/2016 दोन वर्षाची वॉरन्टी देण्यास तयार आहोत असे कळविले. परंतु प्रत्यक्षात दिनांक-07/11/2016 रोजीचे ई मेलचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, वि.प.क्रं-1 ने, वॉरन्टी बाबतचे पत्र विरुध्दपक्ष क्रं 2 हा तक्रारकर्त्याला देईल असे नमुद आहे. तक्रारकर्त्याचे लेखी युक्तीवादातील दोन वर्षाची वॉरन्टी विरुध्दपक्ष देत असल्याचे म्हणणे हे तक्रारकर्त्याने ई मेल सोबत दाखल केलेल्या समझोत्या अटीच्या नमुना मसुद्यात नोंदविलेले असून सदर समझोत्याचे दस्तऐवजावर कोणाचीही सही नसल्यामुळे तो ग्राहय धरता येणार नाही, असे मंचाचे मत आहे.
09. अभिलेखाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदर तक्रारअर्ज हा मंचात दिनांक-14/01/2016 रोजी दाखल करुन घेण्यात आला. त्यानंतर तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष यांच्यात आपसी तडजोडी बाबत चर्चा सुरु असल्याचे देखील अभिलेखावरील कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 सोबत झालेल्या समझोत्याच्या अटींचे दस्तऐवज अभिलेखावर दाखल केले, त्याचे अवलोकन केले असता उभय पक्षांमध्ये केवळ युपीएसचे वॉरन्टीचे मुद्दावर तडजोड होऊ शकली नाही असे दिसून येते. विरुध्दपक्ष क्रं 2 ने मंचा समक्ष दिनांक-15.11.2016 रोजी त्याच्या समझोत्याच्या अटी मंचा समक्ष दाखल केलेल्या आहेत, त्यानुसार विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेत्याने, विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 व्यवसायिक भागीदार असल्याने नविन युपीएस वर उत्पादकीय कंपनीच्या वॉरन्टी कॉर्ड नुसार वॉरन्टी ही युपीएस स्थापीत केल्याचे दिनांका पासून एक वर्ष अथवा तो पुरविल्या पासून 13 महिने यापैकी जे आधी घडेल त्या प्रमाणे आहे असे नमुद केले. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्रं-1 ने नविन UPS 10 KVA दिनांक-15 मार्च, 2016 रोजी पाठविल्याचे नमुद केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 ने सदर दस्तऐवजात तक्रारकर्त्या कडून दिनांक-15/11/2016 पर्यंत त्याला पुरविण्यात आलेल्या स्टॅन्ड बाय युपीएसचे भाडे न घेण्याचे सुध्दा नमुद केले आहे. सदर तक्रार मंचा समोर प्रलंबित असताना विरुध्दपक्ष क्रं 1 ने तक्रारकर्त्याला दिनांक-15.03.2016 रोजी नविन युपीएस पाठविल्याचे व तो युपीएस तक्रारकतर्याला दिनांक-22 मार्च, 2016 रोजी मिळाल्याची बाब युक्तीवादा दरम्यान तक्रारकर्त्याने मान्य केलेली आहे. परंतु तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्रं 1 ची वॉरन्टीची अट मान्य नसल्यामुळे सदर नविन युपीएस सिलबंद त्याचे दवाखान्यात पडून असल्याचे मंचा समक्ष सांगितले.
10. तक्रारकर्त्याचे म्हणण्या नुसार विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 ने पुरविलेल्या युपीएस मध्ये त्याने घेतल्या पासून वर्षभरात एकूण 21 वेळा दोष निर्माण झालेत. विरुध्दपक्ष क्रं 1 ने मंचा समक्ष उपस्थित होऊन सदर बाब खोडून काढली नाही. या उलट विरुध्दपक्ष क्रं 1 ने तक्रारकर्त्याला नविन युपीएस दिनांक-22 मार्च, 2016 रोजी बिघाड असलेला युपीएस बदलवून नविन युपीएस दिलेला आहे. यावरुन तक्रारकर्त्यास विकलेल्या विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित युपीएस मध्ये निश्चीतपणे उत्पादकीय दोष असल्याची बाब सिध्द होते, त्यामुळे उत्पादकीय दोष असलेला युपीएस विकून विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असून सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार केलेला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
11. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांच्या मध्ये वॉरन्टी बाबत आपसी तडजोड झाली नाही परंतु त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 2 ने त्याचे सविस्तर लेखी उत्तर मंचा समक्ष दाखल केले नाही. तक्रारकर्त्याचे म्हणण्या नुसार विरुध्दपक्ष क्रं 2 ने दिनांक-20 मार्च, 2014 रोजी युपीएस ईनव्हाईस बिलामध्ये तक्रारकर्त्याला युपीएस व बॅटरीची वॉरन्टी दोन वर्षाची लिहून दिलेली आहे, म्हणून त्याला नविन युपीएस वर दोन वर्षाची वॉरन्टी हवी आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 ने मंचा समक्ष दिनांक-05.11.2016 रोजी दाखल केलेल्या त्याचे तडजोडीच्या अटी नुसार निर्माता कंपनीच्या स्टॅन्डर्ड पॉलिसी प्रमाणे वॉरन्टी कॉर्ड नुसार तक्रारकर्त्यास युपीएस स्थापीत केल्याचे दिनांका पासून एक वर्ष अथवा तो पुरविल्या पासून 13 महिने यापैकी जे आधी घडेल त्यानुसार वॉरन्टी नमुद आहे. परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मात्याने कंपनीचे मूळ वॉरन्टी कॉर्ड मंचा समक्ष दाखल केले नाही. वस्तुतः कुठल्याही उत्पादनावर त्याचा निर्माता हा वॉरन्टी देत असतो व त्या नुसार निर्माता कंपनीचे वॉरन्टी कॉर्ड असते किेंवा उत्पादनावरील वेष्टनावर वॉरन्टीची माहिती नमुद केलेली असते, असे असताना सुध्दा विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेत्याने मात्र तक्रारकर्त्याला युपीएस संबधी दिलेल्या बिलावर युपीएसची वॉरन्टी दोन वर्षाची लिहून दिलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता प्रकरणात हजर नसल्याने निर्माता कंपनीची युपीएस वर किती वर्षाची वॉरन्टी आहे याचा खुलासा झालेला नाही. परंतु तक्रारकर्ता हा स्वतः शिक्षीत आणि वैद्दकीय व्यवसाय करणारा व्यक्ती आहे त्यामुळे त्याला सदर बाबींची कल्पना असावयास हवी. युपीएस घेताना विक्रेत्याने त्याला वॉरन्टी कॉर्ड दिले किंवा नाही या बाबत तक्रारकर्त्याने तक्रारीत कुठलाही उल्लेख केलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 ने दिनांक-05.11.2016 रोजी दाखल केलेल्या दस्तऐवजा नुसार जर युपीएसची वॉरन्टी ही पुरविल्याचे दिनांका पासून 13 महिने किंवा तो स्थापित केल्याचे दिनांका पासून एक वर्षाची आहे तर विरुध्दपक्ष क्रं 2 ने युपीएसच्या बिलावर लिहून दिलेली दोन वर्षाची वॉरन्टी ही विरुध्दपक्ष क्रं 1 चे म्हणण्या नुसारच चुकीची ठरते व अशाप्रकारे चुकीची वाढीव कालावधीची वॉरन्टी लिहून देणे ही विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता याने अवलंब केलेली अनुचित व्यापारी पध्दती असून तक्रारकर्त्याला दिलेली दोषपूर्ण सेवा आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 हा तक्रारकर्त्याला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे.
12. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारअर्जात विरुध्दपक्षानीं नविन युपीएस दोन वर्षाचे वॉरन्टीसह द्दावा अशी मागणी केली आहे परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेत्याने त्याचे अखत्यारीत नसताना अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन जुन्या युपीएसचे ईनव्हाईसचे बिलावर दोन वर्षाची वॉरन्टी लिहून दिलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याला सदर बिलाचे आधारावर नविन युपीएस वर दोन वर्षाची वॉरन्टी देणे अनुचित व्यापारी पध्दतीस आळा घालण्याचे दृष्टीने उचित होणार नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास नविन युपीएस स्थापित करुन त्यावर स्थापित केल्याचे दिनांका पासून निर्माता कंपनीच्या स्टॅन्डर्ड पॉलिसी नुसार असेल ती वॉरन्टी द्दावी या निष्कर्षा प्रत मंच येते. परंतु वरील प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेत्याने जुन्या युपीएस वर ojदोन वर्षाची वॉरन्टी देऊन केलेल्या सेवेतील त्रृटी करीता तक्रारकर्त्यास रुपये-20,000/- नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास द्दावे. तसेच तक्रारकर्त्यास दिलेल्या स्टॅन्डबाय युपीएस संबधाने कोणतीही भाडयाची रक्कम विरुध्दपक्षानीं तक्रारकर्त्या कडून आकारु नये. विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता व विरुध्दपक्ष क्रं-2 विक्रेत्याने तक्रारकर्त्यास उत्पादकीय दोष असलेल्या युपीएसची विक्री करुन सेवेत त्रृटी केली असल्यामुळे तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- तक्रारकर्त्यास देण्यास जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे.
13. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: आदेश ::
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) अनुक्रमे युपीएस निर्माता आणि विक्रेता यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास दिलेला नविन UPS 10 KVA त्याचे दवाखान्यात स्थापित करुन द्यावा व सदर युपीसएस वर स्थापित दिनांका पासून विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीच्या स्टॅन्डर्ड पॉलिसी नुसार असलेल्या कालावधीची वॉरन्टी द्दावी व त्याप्रमाणे तक्रारकर्त्याला वॉरन्टी कॉर्ड पुरवावे.
3) तक्रारकर्त्यास दिलेल्या स्टॅन्डबाय युपीएस संबधाने कोणतीही भाडयाची रक्कम विरुध्दपक्षानीं तक्रारकर्त्या कडून आकारु नये.
4) विरुध्दपक्ष क्रं 2 ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने तक्रारकर्त्याला दंडा दाखल रुपये-20,000/- (अक्षरी रुपये विस हजार फक्त) द्यावेत.
5) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्दावेत.
6) सदर आदेशाचे अनुपालन वर नमुद केल्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) अनुक्रमे युपीएस निर्माता आणि विक्रेता यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
7) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
8) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.