Maharashtra

Nagpur

CC/483/2017

SHRI. PARAG VISHRAM MOHRIR - Complainant(s)

Versus

EICHER POLARIS PVT. LTD., THROUGH CHAIRMAN/ MANAGING DIRECTOR - Opp.Party(s)

ADV. MRS. S.K. PAUNIKAR

22 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/483/2017
( Date of Filing : 02 Nov 2017 )
 
1. SHRI. PARAG VISHRAM MOHRIR
R/O. 254, NEAR BASKETBALL GROUND, SHIVAJI NAGAR, DHARAMPETH, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. VISHRAM SADASHIVRAO MOHRIR
R/O. 254, NEAR BASKETBALL GROUND, SHIVAJI NAGAR, DHARAMPETH, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. EICHER POLARIS PVT. LTD., THROUGH CHAIRMAN/ MANAGING DIRECTOR
96, SECTOR 32, GUDGAON, HARYANA-122001
GUDGAON
HARYANA
2. J.S.K. TECHNO TRADERS, DEALER OF EICHER POLARIS PVT. LTD.
PLOT NO. 900, C/O. LOKHANDE ESTATE, GHAT ROAD, OPPOSITE ARUN AUTOMOBILES, NAGPUR-440018
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 22 Apr 2022
Final Order / Judgement

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 नुसार प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  त.क.क्रं. 1 हा शेतकरी असून त्‍याचा दुधविक्रीचा व्‍यवसाय आहे.  वि.प. 1 चा मल्‍टीक्‍स मॉडेल वाहन निर्मितीचा आणि चार चाकी वाहन विक्रीचा व्‍यवसाय आहे. वि.प. 2 हे वि.प. 1 यांनी निर्मित केलेल्‍या वाहनाचे अधिकृत विक्रेते आहे.
  2. त.क.ची शेती ही गुमथळा तह.कळमेश्‍वर, जि. नागपूर येथे असून त.क.ने स्वयंरोजगाराकरिता गुमथळा येथून दूध नागपूला वाहून नेण्‍याकरिता एक मल्‍टीक्‍स 14 एक्‍स ज्‍याचा आर.टी.ओ. रजि. नं. एमएच 31 यू 2633 आयचर पोलारीज प्रा.लि.निर्मित वाहन विकत घेतले. सदर वाहन विकत घेतल्‍यावेळी निर्मित कंपनीचे अधिकृत विक्रेता व सर्विस स्‍टेशन नागपूर येथे होते. त्‍यामुळे त.क.ने सदर वाहन विकत घेतले. सदर वाहनाची ऑन रोड किंमत 3,44,011/- होती. त.क.ची वाहन विकत घ्‍यायची आर्थिक परिस्थीती नसल्‍यामुळे त.क.ने त्‍याच्‍या वडिलांच्‍या नांवे धरमपेठ महिला बॅंकेतून कर्ज घेतले.  त्‍यामुळे सदर वाहन त.क.क्रं. 2 च्‍या नांवे आहे. दि.30.10.2015 ला त.क.च्‍या ताब्‍यात वाहन देण्‍यात आले.
  3. त.क.ने वाहन विकत घेतल्‍यानंतर त.क.च्या लक्षात आले की, वाहनाचे हार्ड कार्गो कव्‍हर 19498 /99 हे डिफेक्‍टीव्‍ह (दोष) आहे. त.क.ने जेव्‍हा वि.प. 2 ला तक्रार केली, त्‍यावेळी वि.प. 2 यांनी हार्ड कार्गो कव्‍हर बदलून देण्‍याचे आश्‍वासन दिले. परंतु वि.प. 2 यांनी हार्ड कार्गो कव्‍हर बदलून दिले नाही किंवा रक्‍कम रुपये 19,498.99 परत केले नाही. वाहनामध्‍ये निर्मिती दोष असल्‍यामुळे वाहन चालविण्‍या योग्‍य नव्‍हते. त्‍यामुळे दि.27.03.2016 ला वाहनात आलेल्‍या दोषामुळे अपघात झाला. त्‍यानंतर सदरचे वाहन वि.प. 2 कडे दुरुस्‍तीला आले त्‍यावेळी वि.प. 2 यांच्‍याकडे वाहनाचे स्‍पेअर पार्ट उपल्‍ब्‍ध नसलयामुळे जवळपास सदरचे वाहन 5 महिने दुरुस्‍तीकरिता लावले. वाहन योग्‍यरित्‍या दुरुस्‍त न झाल्‍यामुळे योग्‍य प्रकारे चालत नव्‍हते, त्‍यामुळे त.क.चे वाहन 3 महिने त.क.च्‍या कोर्ट यार्ड मध्‍ये उभे राहिले. वि.प. 2 यांनी त्‍यांचे शोरुम सर्विस स्‍टेशन बंद केले आहे त्‍यामुळे नागपूर शहरात मल्‍टीक्‍स निर्मिती कंपनीचे अधिकृत सर्विस स्‍टेशन नाही आहे. वि.प.ने सदरच्‍या वाहनाची 1 वर्षाची गॅरन्‍टी दिली होती, त्‍यामुळे सदर कंपनी वाहन वॉरन्‍टी कालावधीमध्‍ये वाहनाला फ्री पिरोडीक सेवा देण्‍यास बाध्‍य आहे. परंतु सदर प्रकरणी कोणतीही  फ्री अधिकृत सव्हिस स्‍टेशन नसल्‍यामुळे वि.प. त.क.ला फ्री पिरोडीक सेवा देऊ शकले नाही. मल्‍टीक्‍स वाहन हे पूर्णपणे नविन तंत्रज्ञानावर बनविण्‍यात आले असल्‍यामुळे नागपूर शहरात त्‍याचे अधिकृत सर्विस स्‍टेशन नाही व मल्‍टीक्‍स वाहनाचे सुटे भाग वाहनाचे निर्मिती कंपनीत उपलब्‍ध नाहीत. त्‍यामुळे इतर शोरुम जे नागपूर व्‍यतिरिकत इतर ठिकाणी आहे आणि त्‍याचे विक्रेते त.क.च्‍या वाहनाकडे लक्ष देऊ शकत नाही किंवा मदत करु शकत नाही. सदरची बाब त्‍यांनी त.क.ला दि.23.10.2017 ला मेल पाठवून कबूल केली आहे. त्‍यामुळे सदरचे वि.प. हे त.क.ला सेवा देऊ शकले नाही.
  4. त.क.ने सदर वाहन दूध विक्रीकरिता घेतले होते. परंतु सदर वाहनातील दोषामुळे त.क.ला इतर वाहन प्रतिदिवस एक हजार भाडे देऊन किरायाने घ्‍यावे लागले त्‍यामुळे तक्रारदाराला आजपर्यंत रुपये 10,000/- वाहनाच्‍या किरायापोटी द्यावे लागले.तक.ने सदरचे वाहन बॅंकेतून कर्ज घेऊन विकत घेतले होते. त.क.ने सदरची कर्ज रक्‍कम व्‍याजासह अदा केलेली आहे. वि.प.ने वाहन खरेदी करते वेळी वाहनाच्‍या गुणवत्‍ताबाबत चुकिची माहिती देऊन फसवणूक केलेली आहे. वि.प.ने त.क.ला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा व्‍यापार केलेला आहे.
  5. वि.प.ने नागपूर येथील शोरुम व अधिकृत सर्विस स्‍टेशन बंद केले. त्‍यानंतर अकोला येथील अधिकृत सर्विस स्‍टेशनची टीम नागपूरला येऊन वाहनाला सर्विस देत होती. परंतु मागील 3 महिन्‍यापासून सदर सर्विस स्टेशन ने नागपूरला भेट दिली नाही. वाहनाचे सुटे भाग अकोला सर्विस स्‍टेशनला उपलबध नाही.  कंपनीचे सर्विस इंजिनिअर श्री.जितेंद्र जगदाळे  एरिया सर्विस इंजिनिअर यांनी एस.एम.एस.पाठविला की, नागपूर येथे वाहनाला सर्विस देण्‍याकरिता कोणताही निश्चित कालावधी नाही. त.क.ने वि.प.च्‍या जबाबदार अधिका’याला वारंवांर फोन द्वारे कळविले परंतु प्रत्‍येक वेळी वि.प.ने वाहनाचे सुटे भाग उपलब्‍ध नाही व ते नागपूरला वाहनाचे सव्हिसिगकरिता येऊ शकत नसल्‍याचे कळविले. त्‍यामुळे त.क.ने मंचासमक्ष तक्रार दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे. वि.प.ने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे.  वि.प.ने त.क.च्‍या चारचाकी वाहन मल्‍टीक्‍सचे नि‍र्माते आयचर पोलरीज यांनी वाहनाची किंमत 24 टक्‍के व्‍याजासह परत करावी.  वि.प.ने त.क.ला किरायाच्‍या वाहनाचे भाडे 18 टक्‍क्‍े व्‍याजासह परत करावे तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.
  6. सदर तक्रार दाखल करुन वि.प.क्रं.1 व 2 यांना नोटीस पाठविण्‍यात आले वि.प.कं.1 नोटीस मिळुन तक्रारीत हजर झाले व आपले लेखी उत्तर तक्रारीत दाखल केले व वि.प.क्रं. 2 ची नोटीस सोडुन गेले या शे-यासह परत आल्याने वि.प. 2 यांना स्थानिक वर्तमान पत्रातुन दिनांक 16.6.2019 रोजी नोटीस प्रसिध्‍द करण्‍यात आली परंतु नोटीस मिळुनही ते प्रकरणात हजर झाले नाही म्हणुन तक्रार त्यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि.24.07.2019 रोजी पारित करण्‍यात आला.  
  7. वि.प. 1 ने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, वि.प.क्रं.1 ने वॉरन्‍टीच्‍या शर्ती व अटीनुसार सदर पॅसेंजर वाहनावर विक्री तारीख दि.29.10.2015 पासून फ्री सव्र्हीसबाबत एक वर्षाची फी सव्हीस वॉरन्टी 4 +1 आसनाच्‍या क्षमतेच्‍या अधिन राहून दिली होती. व सदरची वॉरन्‍टी समाप्‍त झाली.  सदर वाहनाचा माल वाहुन नेण्‍याकरिता दुरुपोयाग झाला आणि दिनांक 27.3.2016 ला सदर वाहनाचा अपघात झाला त्याच दिवशी वाहनाची वॉरन्टी समाप्त झाली. तक्रारदाराने पूढे नमुद केले की, त्‍याने वि.प. 1 कडून वाहन स्‍वतःच्‍या उदरनिर्वाहाकरिता व उपयोगाकरिता खरेदी केले आणि वाहनाची नोंदणी त्‍याच प्रकारात केली. त.क..ने वॉरन्‍टीच्‍या शर्तीनुसार सदर वाहनाचा उपयोग माल वाहून नेण्‍याकरिता करुन मोटर वाहन कायदा 1988 चा भंग केला. सदरचे वाहन त.क.क्रं. 2 यांनी त.क. 1 च्‍या धंद्याकरिता विकत घेतले त.क. 2 यांनी विकत घेतलेले वाहन 4 अधिक 1 पॅसेजंर करिता बनविण्‍यात आले होते आणि सदर वाहनाची नोंदणी प्रायव्‍हेट कार म्‍हणून नोंदणी  अधिका-यांनी केली होती आणि सदर वाहनाचा उपयोग माल वाहून नेण्‍याकरिता करण्‍यात आला होता.
  8. वि.प. 2 हे वि.प. 1 यांने निर्मित केलेल्‍या मलटीक्‍स एमएक्‍स वाहनाचे अधिकृत विक्रेता आहे. सदर वाहनाला एक वर्षाची वॉरन्‍टी होती. वि.प. 1 ने सदर वॉरन्‍टी कालावधीमध्‍ये शर्ती व अटीच्‍या अधीन राहून 3 मोफत सर्विसिंग दिली होती.  वि.प. 1 चे नागपूर येथे अधिकृत सर्विस स्‍टेशन नसल्याचे कथन नाकारण्‍यात येत आहे. तसेच वि.प. 2 यांनी त.क.2 ला मोफत सेवा न दिल्‍याचे कथन नाकारले आहे.  त.क. 2 यांनी वॉरन्‍टी कालावधीमध्‍ये मोफत सेवा घेतली आहे आणि पैसे देऊन ही घेतली आहे.

S.NO.

JOB CARD NO.

DATE

JOB TYPE

KMS

1

RJC300004115-4

03/11/2015

1ST FREE SERVICE

980

2

RJC300004115

12/01/2016

2ND FREE SERVICE

4980

3

RJC300004115

08/02/2016

WARRANTY

5000

4

RJC300004115

13/04/2016

PAID

20000

5

RJC300004115

07/07/2016

PAID

 

6

RJC300004115

25/08/2016

WARRANTY

 

7

RJC300004115

22/02/2017

GOODWILL

 

8

RJC300004115

24/02/2017

PAID

50120

9

RJC300004115

16/10/2017

PAID

29100

  1. वि.प. 1 चे शोरुम कधीच नव्‍हते. वि.प. 2 ची वि.प.1 ने त्‍याकरिता नेमणूक केली आहे. वि.प.2 ची वाहनाचे सुटे भागाचे भरपूर साठा ठेवण्‍याची जबाबदारी होती त्‍यामुळे वि.प. 1 ला वि.प. 2 कडे वाहनाच्‍या सुट भागाचे तुटवडा असण्‍याकरिता जबाबदार धरण्‍यात येऊ नये.  दि. 23.10.2007 ला वि.प. 1 ने त.कल.ला केलेल्‍या मेल द्वारे वाहनाचा सुटे भागाचा  तुटवडा असल्‍याचे कबूल केले असल्‍याचे कथन नाकारण्‍यात येते. वि.प. 1 यांच्‍याकडून ग्राहकाला सेवा देण्‍याबाबत काही कमतरता असल्‍याचे कथन नाकारण्‍यात येते.
  2. त.क.च्‍या वाहनाला बसविण्‍यात आलेले हार्ड कार्गो कव्‍हर डिफेक्‍टीव्‍ह असल्‍याचे नाकारण्‍यात येते. वाहन विक्रेत्‍याकडे वाहन पाठविण्‍यापूर्वी वाहनाचे विरुध्‍द पक्ष 1 चे क्‍वालिटी कंट्रोल कडून तपासणी केल्‍यानंतर आणि वाहन तपासणी अहवाल समाधानकारक असल्‍यानंतरच वाहन विक्रेत्‍याकडे/कंपनीच्‍या शोरुम कडे पाठविण्‍यात येते. वि.प. 1 यांनी केलेलया नियमानुसार  विक्रेत्‍याला कडक तपासणी करणे बंधनकारक आहे त्‍यांनतर वाहन ग्राहकाला हस्‍तांतरित केल्या जाते.
  3. वि.प. 1 यांनी विक्री केलेल्‍या वाहनात दोष असल्‍याचे कथन नाकारलेले आहे व वाहनातील दोषामुळे वाहन व्‍यवस्थिती चालत नसल्‍याचे कथन नाकारलेले आहे. वाहनातील दोषामुळे दि. 27.03.2016 ला अपघात झाल्‍याचे कथन नाकारण्‍यात येते. दि. 27.03.2016 ला झालेल्‍या अपघाताची प्रथम दर्शनिय अहवालाची प्रत बघता निदर्शनास येते की, सदर वाहन लेडीज क्‍लब नागपूर येथे दूध वाहून नेत असतांना सदर वाहनाला अति वेगाने आणि अनियंत्रीतपणे एम.एच.31 ई.के-4660 च्‍या वाहनाने जोरदार धडक दिली. वाहन चालकाचे अतिवेगाने वाहन चालविल्‍यामुळे अपघात झाला. तक्रारदाराचे वाहनाला दि. 27.03.2016 ला अपघात झाल्‍यानंतर सदरच्‍या वाहनाची दुरुस्‍ती करण्‍यात आली व त्‍यानंतर वाहन व्‍यवस्थितीत चालत नसल्‍याचे नाकारण्‍यात येते. कारण सदर वाहनाचे पोर्टल हिस्‍ट्री नुसार सदरचे वाहन दि. 26.010.2017 पर्यंत ओडो मीटरनुसर 79100 कि.मी. चालले वि.प. 1 यांनी नियुक्‍ती केलेले विक्रेते यांची सेवा केंद्र व्‍यवस्थितीत सुरु आहे परंतु  वि.प. 1 व 2 यांच्‍यामधील करार संपुष्‍टात आल्‍यामुळे वि.प. 2 चे शोरुम बंद झाले. परंतु इतर शोरुम मधील सेवा केंद्रा द्वारे नागपूर मधील विक्रेत्‍याकडून विकल्‍या गेलेल्‍या ग्राहकांना सेवा त्‍याच्‍या ठिकाणी देणे सुरु आहे. दर महिन्‍याला वि.प. 1 चे अकोला येथील विक्रेता  नागपूर येथे सेवा शिबीर आयोजित करतात. वि.प. 1 चे अकोला येथील विक्रेता यांनी वि.प. 2 यांनी मागील 3 महिन्‍यापासून सेवा दिल्‍याचे नाकारण्‍यात येत आहे. वि.प. 1 यांचे स्‍वतः विक्रेता शोरुम अकोला येथे नाही आहे. त्‍यामुळे अकोल्‍याचे विक्रेत्‍याचे स्‍पेअरबाबतचे ऑर्डर देणे आणि त्‍याची उपलब्‍धता ठेवणे ही वि.प. 1 च्‍या अखत्‍यारित येत नाही.
  4. उभयपक्षाने तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता दाखल  लेखी युक्तीवाद, तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
    •                                                                      उत्तरे
  5. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                            होय
  6. विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्याला दोषपूर्ण सेवा दिल काय ?             होय
  7. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय?        होय
  8. काय आदेश                                                                अंतिम आदेशानुसार

                         कारणमिमासा

  1. तक्रारदाराने वि.प.क्रं.1 यांनी निर्मीत केलेले वि.प.क्रं.2 यांचे कडुन एक मल्‍टीक्‍स 14 एक्‍स ज्‍याचा आर.टी.ओ. रजि. नं. एमएच 31 यू 2633 आयचर पोलारीज प्रा.लि.निर्मित वाहन विकत घेतले याबाबत उभयपक्षात वाद नाही. तक्रारदाराने वि.प.क्रं.2 यांचकडुन वाहन विकत घेतल्यानंतर वि.प.क्रं.2 यांनी तक्रारदाराला वॉरन्टी कालावधीमध्‍ये फ्री सेवा दिली आहे. परंतु वॉरन्टी कालावधीनंतर तक्रारदाराचे वाहनाला दुरुस्तीकरणे व सूटे भाग पूरविण्‍याची जबाबदारी वि.प.क्रं.1ची आहे. वि.प.क्रं.1 व 2 यांचे मधील करारसंपूष्‍टात आला या कारणास्तव वि.प.क्रं.1 ग्राहकाला सेवा देणे नाकारु शकत नाही. तक्रारदाराने नि.क्रं.6 वर दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निर्देशनास येते की, वि.प.क्रं.1 व 2 तक्रारदाराला वाहनाचे सूटे भाग वेळेवर पूरविण्‍यात अपयशी ठरला आहे. तक्रारदाराने नि.क्रं.2 (11,12) वर दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करता असे दिसुन आले की, तक्रारदाराच्या वाहनाचे सूटे भाग वि.प.कडुन वेळेवर उपलब्द होऊ न शकल्याने ते जागीच उभे राहिले व तक्रारदाराला त्याचा उपयोग करता आला नाही सदरची बाब वि.प.नी तक्रारदाराला पाठविलेल्या दिनांक 4.10.2017 चे मोबाईल मॅसेजमध्‍ये नमुद आहे. तसेच तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 23.10.2017 ला ई-मेल व्दारे अवगत केल्याचे स्पष्‍ट होते. वाहनाला लागणारे सूटे भागाचा साठा ठेवण्‍याची जबाबदारी वि.प.क्रं.2 ची असल्याचे नमुद करुन वि.प.क्रं.1 हे आपल्या जबाबदारीतुन मुक्त होऊ शकत नाही त्यामूळे वि.प.क्रं.1 व 2 हे दोघेही तक्रारदाराचे वाहनाचे दोष दूर करण्‍यास व सूटे भाग उपलब्द करुन देण्‍यास जबाबदार आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्या M/s. Honda Siel Cars India Ltd.  Vs.  Rohit Jain and Anr. Dated 3rd March 2016 या न्यायनिवाडयातील वस्तुस्थीती आमच्या समोरील प्रकरणातील तंतोतत लागू पडते. सबब हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहे.
  2.  
  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.
  2. वि.प.क्रं. 1 यांनी तक्रारदाराला वाहनाच्या किंमत 3,44,011/- पैकी 50 टक्के रक्कम रुपये 1,72,005/- अदा करावी व सदर रक्कमेवर आदेश पारित दिनांकपासून द.सा.द.शे 8टक्के दराने रक्कमेच्या प्रत्यक्ष अदागीपावेतो येणारी रक्कम अदा करावी.
  3. वि.प.1 यांनी तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासापोटी व शारिरिक त्रासापोटी 50,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अदा करावे.
  4. वि.प.क्रं. 2 यांनी तक्रारदाराला वाहनाच्या किंमत रुपये 3,44,011/- पैकी 50 टक्के रक्कम रुपये 1,72,005/- अदा करावी व सदर रक्कमेवर आदेश पारित दिनांकपासून द.सा.द.शे 8टक्के दराने रक्कमेच्या प्रत्यक्ष अदागीपावेतो येणारी रक्कम अदा करावी.
  5. वि.प.2 यांनी तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासापोटी व शारिरिक त्रासापोटी 50,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अदा करावे.
  6. वि.प.क्रं.1 व 2 यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची पारित दिनांकापासून 45 दिवसाच्‍या आंत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावी.
  7. वि.प.क्रं.1 व 2 यांनी सदर आदेशाचे पालन 45 दिवसाचे आत न केल्यास सदर रक्कमेवर द.सा.द.शे 12 टक्के दराने व्याज द्यावे.
  8. तक्रारदाराला वि.प.क्रं.2 यांचेकडुन आदेशीत रक्कम प्राप्त झाल्यानंतर वि.प.क्रं.2 यांनी तक्रारदाराचे ताब्यात असलेला ट्रॅक्टर मल्‍टीक्‍स 14 एक्‍स ज्‍याचा आर.टी.ओ. रजि. नं. एमएच 31 यू-2633 स्वखर्चाने ताब्यात घ्‍यावा.
  9. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  10. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.