Complaint Case No. CC/22/70 | ( Date of Filing : 13 Apr 2022 ) |
| | 1. Shri.Ashish Vasantrao Chavre | R/o Chatrapani Nagar, Ward no-02 Near Tukum Amar kirana store,Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Edens Bachat Nidhi Ltd Through Chandrapur Main Branch,Branch manager Shaul Anand Shimon | Tukodji Bhavan,nagpur Road,3rd floor,Bapat Nagar,Chandrapur-442401 | Chandrapur | Maharshtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्या) (पारित दिनांक १२/०९/२०२२) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ सह ३८ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ता हा चंद्रपूर येथे राहत असून कंञाटी नोकरी करुन उदरनिर्वाह करतो. विरुध्द पक्ष हे सुपरिचीत एन.बी.एफ.सी. संस्था असून जनतेकडून ठेवी स्वीकारुन त्यावर व्याज देण्याचा व्यवसाय करतात. जनतेकडून स्वीकारलेल्या ठेवीच्या रकमा विरुध्द पक्ष भांडवल बाजारात गुंतवून त्यातून भरघोश नफा कमवितात व त्या कमाईतून ठेवीदारांना व्याज देतात. विरुध्द पक्ष ह्यांचे मुख्य कार्यालय नागपूर येथे असून चंद्रपूर मुख्य शाखा वरील पत्यावर बापट नगर येथे आहे. विरुध्द पक्ष हे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापक असून चंद्रपूर मुख्य शाखा येथून होणा-या सर्व व्यवहाराकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापक व्यक्ती आहेत. तक्रारकर्ता यांनी मासीक पेन्शन योजनेअंतर्गत एकूण मुदत ठेवी अंतर्गत रुपये ५,५०,०००/- जमा केले असून मासीक पेन्शन १०,५७५/- दरमहा मिळणे अपेक्षीत होते परंतु २ वर्षापासून कधीही वेळेत मिळत नव्हते. त्यामुळे मुद्दल रक्कम व बचतीवरील व्याज विरुध्द पक्ष कडून घेणे बाकी आहे. तक्रारकर्ता यांनी त्याच्या कुटुंबाचा गाडा चालविण्याकरिता त्याच्या आयुष्यातील संपूर्ण मिळकत विरुध्द पक्ष संस्थेत मासीक पेन्शन योजनेत गुंतविले होते परंतु विरुध्द पक्ष यांच्याकडून तक्रारकर्ता यांना कधीच वेळेत पेन्शन मिळाले नाही म्हणून तक्रारकर्त्याने संपूर्ण मुदत ठेव व व्याज मिळण्यासाठी वेळोवेळी विरुध्द पक्ष यांच्याकडे विनंती केली. लेखी विनंती करुनही विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची दखल घेतली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने डाकव्दारे विरुध्द पक्ष यांना बचत खत्यातील रक्कम व्याजासहीत मिळण्याकरिता पञ पाठविले परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची दखल घेतली नसल्यामुळे शेवटी तक्रारकर्त्याने ग्राहक आयोगाकडे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष यांनी सेवा न्युनतापूर्ण व अनुचीत व्यापार पध्दती ठरविण्यात येऊन विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे सहा मुदत ठेवीची परिपूर्ण रक्कम रुपये ५,५०,०००/- व त्यावर तक्रारकर्त्याचे पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. १८ टक्के दराने व्याजासह रक्कम द्यावी तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये २,००,०००/- तक्रारकर्त्यास द्यावे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्यात आली. आयोगातर्फे दिनांक २२/४/२०२२ रोजी विरुध्द पक्षाला नोटीस प्राप्त होऊनही आयोगासमोर उपस्थित न झाल्यामुळे विरुध्द पक्ष यांचे विरुध्द प्रकरण दिनांक २/८/२०२२ रोजी एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज तसेच तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्याकरिता खालील कारणमीमांसा व त्यावरील निष्कर्ष कायम करण्यात आले.
कारणमीमांसा - तक्रारकर्ता यांनी तक्रारीत कथन केल्याप्रमाणे तसेच दाखल दस्तऐवजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येत आहे की, तक्रारकर्ता यांनी त्यांचे भविष्य सुरक्षीत व्हावे यासाठी तसेच वर्तमानातही त्यांना थोडा आर्थिक आधार मिळावा यासाठी विरुध्द पक्ष संस्थेत मासीक पेन्शन योजनेत गुंतवणूक केली ती याप्रमाणे की दिनांक १/१०/२०२० रोजी रक्कम रुपये ५०,०००/- वर मासीक व्याज रुपये ७५०/- प्रमाणे, दिनांक २/९/२०२० रोजी रुपये १,००,०००/- वर मासीक व्याज रुपये १,५००/-, दिनांक ३/११/२०२० रोजी रुपये ७५,०००/- वर रुपये १,१२५/- मासीक व्याज, दिनांक २/१२/२०२० रोजी रुपये १,२५,०००/- वर मासीक व्याज रुपये १,८७५/-, दिनांक १/१/२०२१ रोजी रुपये १,००,०००/- वर मासीक व्याज रुपये १,५००/- व दिनांक ३१/०५/२०२१ रोजी रुपये १,००,०००/- वर मासीक व्याज रुपये २,०००/- विरुध्द पक्ष हे योजनेप्रमाणे तक्रारकर्त्याला देणार होते. तक्रारकर्त्याने सदर पावत्या निशानी क्रमांक २ च्या यादीसह तक्रारीत दाखल केलेल्या आहेत परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला वेळेत मासीक पेन्शन चालू केले नाही त्याबद्दल दाखल दस्तऐवजाप्रमाणे विरुध्द पक्ष यांना दिनांक ८/३/२०२२ रोजी मागणी केली परंतु वेळोवेळी पेन्शनची मागणी करुनही विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची पेन्शनही चालू केली नाही तसेच तक्रारकर्त्याच्या मागणीप्रमाणे गुंतविलेली रक्कमही परत केली नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजाप्रमाणे दिनांक ७/४/२०२२ रोजी तक्रारकर्त्याने गुंतविलेली रक्कम परत मिळविण्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचेकडे तक्रार दाखल केलेली दिसून येत आहे. आयोगाच्या मते तक्रारकर्त्याने त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता उपरोक्त गुंतवणूक मासीक पेन्शन योजनेत गुंतविलेली रक्कम वेळेत मासीक पेन्शन न देऊन तसेच वेळोवेळी गुंतविलेली मुद्दल रकमेची मागणी वारंवार करुनही त्याकडे दुर्लक्ष करुन तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता दिली आहे, या निष्कर्षाप्रत आयोग पोहचले आहे तसेच विरुध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष हे आयोगासमोर हजर राहून तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढलेले नसल्यामुळे तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन तसेच दस्तऐवजावरुन आयोगाच्या मते विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता दिली आहे या निष्कर्षाप्रत आलेले असून खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. ७०/२०२२ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला मुदत ठेवीची रक्कम रुपये ५,५०,०००/-तसेच तक्रारकर्त्याच्या सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजेच दिनांक २०/०४/२०२२ पासून द.सा.द.शे. ७ टक्के दराने रक्कम तक्रारकर्त्याच्या हातात पडेपर्यंत द्यावी.
- विरुध्द पक्ष यांना निर्देश देण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
| |