तक्रारदार यांचे वकील श्री. वानखेडे हजर.
आदेश. एम.वाय.मानकर अध्यक्ष,
वकील श्री. वानखेडे यांना दाखल सुनावणीकामी ऐकण्यात आले. तक्रारदार यांच्या पाल्यानी सा.वाले यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला व त्याकामी रक्कम अदा केली. पुढे चालुन काही वाद निर्माण झाल्यामूळे तक्रारदारानी सा.वाले यांना भरलेली फिस परत मिळण्यासाठी विनंती केली. परंतू सा.वाले यांनी ती मान्य केली नाही. सबब तक्रारदारानी ही तक्रार मंचात दाखल केली. तक्रारदारांनी भरलेली टयुशन फि 10,90,000/-, व रू. 3,00,000/-,सिक्युरीटी म्हणून भरलेल्या दिनांकापासून (05/05/2015) पासून द.सा.द.शे. 21 टक्के व्याजानी मागणी केली तसेच मानसिक त्रासासाठी 2,00,000/-, व तक्रारीचा खर्च रू. 1,00,000/-, अशी मागणी केली. मागणी केलेली रक्कम व व्याजाची रक्कम 20,00,000/-,पेक्षा जास्त आहे हि मंचाच्या पिक्युनरी अधिकार क्षेत्राबाहेर आहे. सबब ही तक्रार या मंचात चालु शकत नाही.सबब खालील आदेश.
आदेश
1 तक्रार क्र 513/2016 ही पिक्युनरी अधिकार क्षेत्राभावी परत करण्यात येते.
2. तक्रारदारानी लिमीटेशनच्या तरतुदींच्या अधीन राहून योग्य त्या मा. आयोगात/मा.न्यायालयात तक्रार दाखल करावी.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावे.
5. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-