1. तक्रारकर्त्यानी विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन असे आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 कडून आयबेरी मोबाईल रु.12,990/- ला विकत घेतला. विरुध्द पक्ष क्र. 1 व 3 हे मोबाईलचे अधिकृत सेवा केंद्र नागपूर येथे असल्याने व तक्रारकर्त्याने नागपूर येथून क्रेडिट कार्डव्दारे मोबाईलची रक्कम विरुध्द पक्ष क्र. 1 ला दिली म्हणून सदर तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र मंचास आहे. तक्रारकर्त्याने पुढे असे कथन केले आहे की, इंटरनेटवरुन असे प्रसिध्द करण्यांत आले की, वरील मोबाईलवर नवीन एनरॉईड व्हर्जन देता येईल म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 2 ला प्रसिध्दी प्रमाणे नवीन एनरॉईट व्हर्जन करीता संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जेव्हा नवीन इनरॉईड व्हर्जन उपलब्ध होईल तेव्हा तक्रारकर्त्याला कळविण्यांत येईल. तक्रारकर्त्याने दि.09.06.2014 ला विरुध्द पक्षाकडे मोबाईलचे स्क्रिनचा ग्लॉस हलत होता त्याकरीता तक्रार केली. विरुध्द पक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याला सदर तक्रार विरुध्द पक्ष क्र. 3 कडे नोंदविण्याचे शिफारीश केली. विरुध्द पक्ष क्र. 3 ने मोबाईलचे उपकरण उपलब्ध नव्हते म्हणून मोबाईल विरुध्द पक्ष क्र. 2 कडे पाठविण्याचे सुचविले. तक्रारकत्र्याने दि.18.05.2015 रोजी कुरियर मार्फत विरुध्द पक्ष क्र. 2 ला मोबाईल दुरुस्ती करीता पाठविले. विरुध्द पक्ष क्र. 2 ने दि.20.05.2015 ला सदर मोबाईल मिळण्याबाबत माहिती दिली तसेच स्क्रीनशॉट व मोबाईल चालू स्थितीत आहे अशी माहीती दिली. परत दोन तासांनंतर विरुध्द पक्ष क्र. 2 ने सदर मोबाईलचे दुरुस्ती करीता रु.8,000/- मागणी केली. सदर मोबाईल वारंटी कालावधीत असल्याने व सदर मोबाईलचा ग्लॉस बदलविण्याकरीता पाठविला असुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन विरुध्द पक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याकडून रु.8,000/- मागणी केली. तक्रारकर्त्याने ब-याच ई-मेलव्दारे पत्र पाठवुन विरुध्द पक्ष क्र. 2 ला मोबाईल दुरुस्त करुन किंवा मोबाईलचे पैसे परत करण्यांस मागणी केली परंतु विरुध्द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही. या कारणा करीता सबब तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यांत आलेली आहे. 2. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मोबाईलची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश व्हावा तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्याचा आदेश व्हावा. 3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरुध्द पक्षांना नोटीस पाठविण्यांत आला. विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहीले म्हणून निशाणी क्र.1 वर दि. 18.11.2015 रोजी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 ला नोटीसची बजावणी होऊन सुध्दा ते गैरहजर राहीले म्हणून त्यांचे विरुध्द दि.16.02.2016 रोजी निशाणी क्र. 1 वर विरुध्द पक्ष क्र. 1 चे विरुध्द एकतर्फी प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला. 4. तक्रारकर्त्यातर्फे दाखल तक्रार, दस्तावेज, तसेच तोंडी युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल करणमिमांसेवरुन अंतिम आदेश पारित करण्यांत येते. - // कारणमिमांसा // - 5. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 कडून आयबेरी मोबाईल रु.12,990/- ला विकत घेतला. विरुध्द पक्ष क्र. 1 व 3 हे मोबाईलचे अधिकृत सेवा केंद्र नागपूर येथे असल्याने व तक्रारकर्त्याने नागपूर येथून क्रेडिट कार्डव्दारे मोबाईलची रक्कम विरुध्द पक्ष क्र. 1 ला दिली. तक्रारकर्त्याने दि.09.06.2014 ला विरुध्द पक्षाकडे मोबाईलचे स्क्रिनचा ग्लॉस हलत होता त्याकरीता तक्रार केली. विरुध्द पक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याला सदर तक्रार विरुध्द पक्ष क्र. 3 कडे नोंदविण्याचे शिफारीश केली. विरुध्द पक्ष क्र. 3 ने मोबाईलचे उपकरण उपलब्ध नव्हते परत मोबाईल विरुध्द पक्ष क्र. 2 कडे पाठविण्याचे सुचविले. तक्रारकर्त्याने दि.18.05.2015 रोजी कुरियर मार्फत विरुध्द पक्ष क्र. 2 ला मोबाईल दुरुस्ती करीता पाठविले. विरुध्द पक्ष क्र. 2 ने दि.20.05.2015 ला सदर मोबाईल मिळण्याबाबत माहिती दिली तसेच स्क्रीनशॉट व मोबाईल चालू स्थितीत आहे अशी माहीती दिली. परत दोन तासांनंतर विरुध्द पक्ष क्र. 2 ने सदर मोबाईलचे दुरुस्ती करीता रु.8,000/- मागणी केली ही बाब तक्रारकर्त्याव्दारे दाखल निशाणी क्र. 4 व दस्त क्र. 1 ते 4 वरुन सिध्द होते. सदर मोबाईल वारंटी कालावधीत असल्याने व सदर मोबाईलचा ग्लॉस बदलविण्याकरीता पाठविला असुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन विरुध्द पक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याकडून रु.8,000/- मागणी केली. तक्रारकर्त्याने ब-याच ई-मेलव्दारे पत्र पाठवुन विरुध्द पक्ष क्र. 2 ला मोबाईल दुरुस्त करुन किंवा मोबाईलचे पैसे परत करण्यांस मागणी केली परंतु विरुध्द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही. ही बाब सुध्दा तक्राकर्त्याने निशाणी क्र.4 वर दाखल दस्त क्र.4 वरुन सिध्द होते. सबब तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक असुन विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याप्रति अनुचित व्यवहार प्रथेचा अवलंब केला आहे हे सिध्द होत. सबब मंच खालिलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे. - // अंतिम आदेश // - 1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल तक्रार विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचे विरुध्द संयुक्तिक किंवा वैयक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याला मोबाईलची किंमत रु.12,990/- दि.20.05.2015 पासुन ते अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 8% व्याजासह अदा करावी. 3. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,500/- अदा करावे. 4. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावी. 5. उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी. 6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. |