Maharashtra

Chandrapur

CC/11/16

Ajay Vikram Punekar - Complainant(s)

Versus

Eakvira Developer, Through Rohit Bhute, - Opp.Party(s)

Representative - Dr. N.R. Khobragade

04 May 2011

ORDER


Arange sequence number in year 2009 confo-ch-mh@nic.in
Complaint Case No. CC/11/16
1. Ajay Vikram PunekarAge 40 years, Occ. Service, Ashok Nager, Ward No.3, Visapur, BallarpurChandrapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Eakvira Developer, Through Rohit Bhute,C/o. Eakvira Papermart, Near Eakvira Mandir, Eakori Ward, Chandrapur, Ta. ChandrapurChandrapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE Shri Anil. N.Kamble ,PRESIDENTHONABLE MR. Sadik M. Zaveri ,MEMBERHONABLE MRS. Adv. Varsha Jamdar ,MEMBER
PRESENT :

Dated : 04 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये तक्रार दाखल केली असून तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.           अर्जदार यांनी, चंद्रपूर येथे गै.अ. यांचेकडून फ्लॅट खरेदी केला म्‍हणून अर्जदार हे  गै.अ.चे ग्राहक आहे.  अर्जदार यांनी दि.5.8.09 ला गै.अ. यांचेकडून फ्लॅट खरेदी केला.  गै.अ. यांनी फ्लॅट नवीन दिसावा यासाठी रंगरंगोटी केली होती, त्‍यामुळे फ्लॅट योग्‍य स्थितीमध्‍ये दिसले, ही बाब खरी आहे.  त्‍यानंतर, पावसाचे पाणी स्‍लॅब मधून गळू लागले, भिंती ओल्‍या होऊ लागल्‍या, भिंतीला क्रॅक आले, भिंतीला तडा गेल्‍या आहेत.  अर्जदार यांनी गै.अ. यांना बरेचदा वेळोवेळी याबाबतची तक्रार सांगीतली.  गै.अ. यांनी फ्लॅटमध्‍ये असलेले दोष दुर करुन देतो असे आश्‍वासन दिले, परंतु फ्लॅट मधील दोष दुर केले नाही.  अर्जदार यांनी दि.5.9.10 रोजी फोटो ग्राफरव्‍दारा फ्लॅटमध्‍ये आलेल्‍या दोषासंबंधी फोटो घेतले व हे फोटो गै.अ. यांना दाखविले.  परंतू, गै.अ. यांनी दोष दुर केले नाही.

 

2.          अर्जदार यांनी, गै.अ. यांना यासंबंधी दि.29.11.10 व 10.12.10 ला पञ दिले. परंतु, गै.अ.यांनी लेखी तक्रार करुनही फ्लॅट मधील दोष वेळेवर दुरुस्‍त केले नाही.  त्‍यामुळे, अर्जदारास फ्लॅट खरेदी करुन सुध्‍दा फ्लॅटचा उपभोग घेता आला नाही, त्‍यामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले.  अर्जदाराने, गै.अ. यांना लेखी पञ पाठवून सुध्‍दा फ्लॅट मधील असलेले दोष दूर न केल्‍याने, अर्जदारास शारीरीक व मानसिक ञास झाला. त्‍यामुळे, अर्जदारास शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रार खर्च रुपये 5,000/- आणि आर्थिक नुकसान म्‍हणून रुपये 40,000/- असे एकूण रुपये 95,000/- गै.अ. ने देण्‍याचा आदेश व्‍हावा, अशी मागणी केली आहे.

 

3.          अर्जदाराने नि.5 नुसार 13 दस्‍ताऐवज दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ. नोटीस काढण्‍यात आला.  गै.अ. हजर होऊन नि.12 नुसार लेखी उत्‍तर व नि.13 नुसार बांधकाम कराराची प्रत दाखल केले. 

 

4.          गै.अ.ने लेखी उत्‍तरात नमूद केले की, यात वाद नाही की, अर्जदार यांनी चंद्रपूर येथे गै.अ. यांचेकडून फ्लॅट खरेदी केला. गै.अ. ने हे नाकबूल केले की, अर्जदार हे गै.अ.चे ग्राहक आहे.  यात वाद नाही की, अर्जदार यांनी दि.5.4.09 ला गै.अ. यांचेकडून फ्लॅट खरेदी केला व सदर फ्लॅटची अर्जदार यांनी पाहणी केली व पसंत केला.  गै.अ. यांनी तक्रारीतील उर्वरीत बहूतांश मजकूर नाकबूल केला आहे. 

 

5.          गै.अ.ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार यांनी, गै.अ. याचे उषका अपार्टमेंट मध्‍ये फ्लॅट क्र.एस-2(बी) दूस-या मजल्‍यावरील फ्लॅट बुक केला.  सदर फ्लॅट अर्जदार यांनी रुपये 7,25,000/- मध्‍ये बुक  केला, त्‍याप्रमाणे फ्लॅटच्‍या बांधकामाचा करारनामा दि.9.6.09 रोजी केले.  अर्जदार यांनी, गै.अ. सोबत रुपये 100/- च्‍या स्‍टॅम्‍पवर बांधकामाचा करारनामा तयार केला.  त्‍यावर अर्जदार व गै.अ. यांनी सही असून करारनामा अर्जदार यांचेवर कायदेशीर बंधनकारक आहे.

 

6.          गै.अ.यांनी करारनाम्‍याप्रमाणे फ्लॅटचे बांधकाम योग्‍य व उत्‍तम पध्‍दतीने करुन अर्जदाराला सदर फ्लॅटचा ताबा व अविभाजीत हिस्‍साचे विक्रीपञ दि.10.11.09 रोजी दुय्यम निंबंधक, चंद्रपूर यांचे समक्ष नोंदणी करुन दिले.  फ्लॅटचा ताबा घेतेवेळी अर्जदार यांनी बांधकामाचे योग्‍य निरिक्षण केले व बांधकामाबाबत समाधान व्‍यक्‍त करुन फ्लॅटचा ताबा घेतला. सदर फ्लॅटचा कब्‍जा अर्जदाराला दिल्‍यानंतर त्‍याचा रखरखाव करण्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी अर्जदाराची आहे.

7.          अर्जदाराने, फ्लॅटचा कब्‍जा दिल्‍यानंतर तब्‍बल एक ते दिड वर्षाच्‍या कालावधीनंतर फ्लॅटचे बांधकाम योग्‍य दर्जाचे नसल्‍यामुळे खोटे व बनावटी आरोप अर्जदार हे गै.अ.वर करीत आहे.  फ्लॅटचे बांधकाम योग्‍य दर्जाचे नसल्‍याबाबत अर्जदार सबळ पुरावा सादर न करता बिनबुडाचे आरोप करीत आहेत.  अर्जदाराने, फ्लॅटचे बांधकाम योग्‍य रितीने न झाल्‍याने फ्लॅटला क्राक/तडा गेल्‍याचे म्‍हटले आहे. वास्‍तविक, अर्जदारास फ्लॅटचा कब्‍जा देऊन एक ते दिड वर्षाचा कालावधी झाला आहे, त्‍यामुळे सदर फ्लॅटला इतरही अनेक कारणांमुळे तडे जाऊ शकतात.  अर्जदारास फ्लॅटचा ताबा दिल्‍यानंतर अर्जदार हे गै.अ.चे कायदेशीर दृष्‍ट्या ग्राहक राहिलेले नाही. त्‍यामुळे तक्रार गै.अ.चे विरुध्‍द दाखल करण्‍याचा नैतीक व कायदे‍शीर अधिकार अर्जदाराला नाही.  तक्रार ही पुरावाहीन, तथ्‍यहीन, बेकायदेशीर, खोटी व बनावटी असल्‍याने खारीज करण्‍यात यावी व अर्जदाराने केलेली मागणी खारीज करण्‍यात यावी, अशी मागणी केली आहे.

 

8.          अर्जदाराने नि.15 नुसार शपथपञ व नि.17 नुसार साक्षदाराचे शपथपञ दाखल केले.  गै.अ. ने नि.19 नुसार शपथपञ दाखल केले. अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले शपथपञ, दस्‍ताऐवज, व उभय पक्षाच्‍या वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

 

                        @@  कारणे व निष्‍कर्ष  @@

 

9.          अर्जदाराने, गै.अ.कडून उषका अपार्टमेंट मधील एस-2(बी) दुस-या माळ्यावरील फ्लॅट रुपये 7,25,000/- मध्‍ये बुक केला.  अर्जदाराचे नावाने दुय्यम निंबधक, चंद्रपूर यांचे समक्ष अविभाजीत हिस्‍याचे विक्रीपञ गै.अ. यांनी दि.10.11.09 रोजी करुन दिले.  अर्जदाराला एस-2(बी) फ्लॅटचा ताबा दिला, याबद्दल वाद नाही.   

 

10.         अर्जदाराने, तक्रारीत फ्लॅट मधील भिंतीला क्रॅक/तडा गेले असून, मास्‍टर बेडरुम मध्‍ये एका बाजूस स्‍लॅब मधून पाणी गळते, हॉल मधील खिडकीच्‍या वर भिंतीला पूर्ण ओल येते, किचनमधील स्‍लॅबला ओल येते, बेडरुम मधील भिंतीला ओल, तसेच स्‍लॅबला ओल येतो, याबाबत अर्जदाराने गै.अ.स लेखी तक्रार दि.29.11.10 व 20.12.10 ला केली. तरी, गै.अ.ने कोणतीही दखल घेतली नाही म्‍हणून ही तक्रार दाखल केली आहे.  अर्जदाराने तक्रारीत कोणता फ्लॅट घेतला हे नमूद केले नाही व तो कोणत्‍या माळ्यावरील आहे हे ही दाखविलेले नाही. गै.अ.चे कथनानुसार अर्जदारास दुस-या माळ्यावरील एस-2(बी) हा फ्लॅट दिला असून योग्‍य दर्जाचा आहे.  अर्जदाराने दुस-या माळ्यावरील फ्लॅट बुक केला, त्‍या फ्लॅटचे वर पुन्‍हा दुसरे फ्लॅट आहेत किंवा नाही याचा काही उल्‍लेख तक्रारीत नाही.  अर्जदाराचा फ्लॅट हा वरच्‍या माळ्यावरील असेल तर त्‍यातील स्‍लॅब गळून भिंतीला ओल येतो, या बद्दलचा कोणत्‍याही तज्ञाचा पुरावा दाखल नाही.  अर्जदाराने फोटो दाखल केले आहेत, त्‍या फोटो पुरावा म्‍हणून ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही. अर्जदाराने अ-9, अ-10 वर 4 फोटो दाखल केल्‍या, त्‍या फोटो कुठल्‍या घेतलेल्‍या आहेत याचा काहीही उल्‍लेख नाही.  पुरावा कायद्यानुसार अ-9, अ-10 वर दाखल केलेल्‍या फोटो बांधकामातील दोष सिध्‍द करण्‍यास ठोस पुरावा म्‍हणून ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  गै.अ.चे वकीलांनी युक्‍तीवादात सांगीतले की, फोटो झूम करुन लहान क्रॅक मोठी दाखविता येतो. फोटो ह्या अर्जदाराच्‍या फ्लॅटच्‍याच आहे हे सिध्‍द होत नाही.  गै.अ.चे  वकीलांनी घेतलेला आक्षेप संयुक्‍तीक आहे.  अर्जदाराने, दि.5.9.10 ला फोटो काढल्‍याबाबत विलास आर्ट फोटो स्‍टुडिओ, उर्जानगर नेरी यांचा बिल दाखल केला.  तसेच, त्‍यासंदर्भात विलास हरी आवळे फोटोग्राफर याचा नि.18 नुसार शपथपञ दाखल केला.  परंतू, त्‍या शपथपञावरुन आणि फोटोवरुन अर्जदाराच्‍या फ्लॅट मध्‍ये निर्मीती दोष आहे, हे तज्ञाच्‍या अहवालाशिवाय सिध्‍द होऊ शकत नाही.  अर्जदाराने, बांधकामाचे निर्मीती दोष असल्‍याचा सबळ पुरावा सादर केलेला नाही.  त्‍यामुळे, गै.अ. यांनी सेवा देण्‍यात न्‍युनता करुन बांधकाम दोषयुक्‍त केले हे सिध्‍द होऊ शकत नाही, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे. 

 

11.          गै.अ.चे वकीलाने असा युक्‍तीवाद केला की, उषका अपार्टमेंट मधील बाकी लोकांचे फ्लॅट आहेत व त्‍यांनी कोणतीही तक्रार बांधकामातील दोषाबाबत केली नाही.  अर्जदाराचे तक्रारीवरुन फ्लॅट खरेदी करुनही त्‍याचा उपभोग घेता आले नाही, त्‍यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, त्‍याबद्दल रुपये 40,000/- ची नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.  तक्रारीतील मजकुरानुसार अर्जदार हा विसापूर बल्‍लारपूर येथे राहात असून फ्लॅट हा चंद्रपूर मधील देवई गोंविदपूर चंद्रपूर येथील आहे.  यावरुन, अर्जदार तिथे राहण्‍याचा उपभोग घेऊ शकला नाही, हे अर्जदाराचे म्‍हणणे संयुक्‍तीक वाटत नाही.  अर्जदाराने अ-11 नुसार मास्‍टर बेडरुमच्‍या स्‍लॅब मधून पाणी गळते व दुस-या बेडरुमच्‍या स्‍लॅबला ओल येते ही बाब तेंव्‍हाच सिध्‍द होऊ शकतो जेंव्‍हा अर्जदाराचा फ्लॅट हा एकदम वरच्‍या मजल्‍यावर असेल तर, अन्‍यथा अर्जदाराचा फ्लॅटचे वर दुस-या फ्लॅटचे बांधकाम असल्‍यास स्‍लॅब मधून पाणी गळते, असे अर्जदाराचे कथन ग्राह्य धरता येणार नाही.  अर्जदाराने तक्रारीत कुठल्‍या मजल्‍यावरील फ्लॅट आहे व त्‍याचे फ्लॅटचे वर दुसरे कोणतेही बांधकाम, फ्लॅट नाही असे कुठलाही पुरावा दाखल केला किंवा तक्रारीतही कथन केले नाही. याबाबत, आपले कथन मोघम ठेवले आहे.  त्‍यामुळे, फ्लॅटच्‍या स्‍लॅब मधून पाणी गळते हे अर्जदाराचे म्‍हणणे ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे. 

 

12.         अर्जदाराने, दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजावरुन, तक्रारीतील कथन व  शपथपञावरुन, गै.अ.ने बांधकाम केलेल्‍या फ्लॅट मध्‍ये निर्मीती दोष आहे ही बाब सिध्‍द होत नाही. अर्जदाराने बांधकाम निरिक्षण केल्‍याबाबत तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही, अशास्थितीत गै.अ.स फ्लॅट मधील दोष दुरुस्‍त करुन देण्‍याचा आदेश देणे न्‍यायसंगत होणार नाही.  एकंदरीत, उपलब्‍ध रेकॉर्डवरुन आणि अर्जदार व गै.अ.च्‍या कथनावरुन गै.अ.ने सेवेत न्‍युनता केली ही बाब सिध्‍द होत नाही, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.

 

13.         वरील कारणे व निष्‍कर्षावरुन अर्जदाराची तक्रार मंजूर करण्‍यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍याने तक्रार नामंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                        // अंतिम आदेश //

            (1)   अर्जदाराची तक्रार खारीज.

(2)   अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपआपला खर्च सहन करावा.

(3)   अर्जदार व गैरअर्जदास आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 

चंद्रपूर,

‌दिनांक :04/05/2011.

 


[HONABLE MR. Sadik M. Zaveri] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER