जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/22 प्रकरण दाखल दिनांक – 23/01/2009. प्रकरण निकाल दिनांक – 20/08/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. बाबु मोहनराव डोईफोडे वय, 40 वर्षे, धंदा शेती व मजूरी रा.इज्जतगांव ता. नायगांव खै.जि.नांदेड. अर्जदार विरुध्द 1. ईगल अटो, अधिकृत वितरक, पॅगोवहेईकल प्रा.लि. शिवाजी नगर, नांदेड (डिलर कोड21/एई-101) 2. मुख्य व्यवस्थापक, पॅगोव्हेईकल प्रा.लि. शिवाजी नगर, नांदेड 101/बी/102, फोनिक्स बन्ड गार्डन रोड, गैरअर्जदार पूणे -411 011. 3. व्यवस्थापक (फायनान्सर) इन्डस इन्ड बँक लि., व्हेईकल फायनान्स डिव्हीजन शाखा नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.बी.एस.शिंदे. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - अड.महंमद ताहेर बिलाल. गैरअर्जदार क्र.2 तर्फे - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.3 तर्फे - अड.गजानन खनगूंडे निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या) गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी दि.24.2.2006 रोजी गैरअर्जदार यांचेकडून अटो 1.3 तिन चाकी खरेदी केला. ज्यांचा नोंदणी नंबर एम.एच.26-एच-2023 असा असून इंजिन नंबर बीए-05-एल-900994 असा आहे.अर्जदाराने सदर गाडीसाठी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे कर्ज घेतले होते. अटोच्या इंजिनची एक वर्षाची गॅरंटी होती. अटो खरेदीकेल्यापासून इंजिन मध्ये येत होता. त्यासाठी अर्जदारास रु.10,000/- खर्च आला. गैरअर्जदार यांनी दि.11.6.2008 रोजी अटोचे इंजिन फेल आहे म्हणून इंजिन बदलून देतो म्हणून अटो ताब्यात घेतला. अटो बंद असल्यामूळे अर्जदाराचे रु.50,000/- चे नूकसान झाले. सदर अटोसाठी गैरअर्जदार क्र.3 बँकेकडून कर्ज घेतले होते त्यामूळे कर्जाचे हप्ते थकल्यामूळे गैरअर्जदार क्र.3 यांनी गैरअर्जदार क्र.1 कडून अटो ताब्यात घेतला. अर्जदार यांनी बॅकेचे सर्व हप्ते भरलेले होते पण दोन हप्ते राहीले त्यामूळे गैरअर्जदार क्र.3 यांनी कोणतीही सूचना न देता परस्पर अटो ताब्यात घेऊन परस्पर विकला. त्यामूळे अर्जदाराचा उदरनिर्वाह बंद पडला. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, इंजिन दूरुस्तीसाठी लागलेला खर्च रु.10,000/- व अटो बंद असल्यामूळे बूडालेले उत्पन्न रु.50,000/- व मानसिक, शारीरिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- देण्यात यावेत. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. ही तक्रार काल्पनिक घटनेच्या आधारे दाखल केलेली आहे त्यामूळे खारीज करण्यात यावी. अर्जदाराने इंजिन नंबर बीए-05-एल-900994 असा दाखविलेला आहे पण हा इंजिन नंबर त्यांनी विकलेला नाही. त्यामूळे ही तक्रार चालू शकत नाही. अर्जदाराने कंपनीच्या निर्देशानुसार वेळेवर वाहनांची सर्व्हीस करुन घेतली नाही व मर्यादेपेक्षा जास्त वजन टाकून वाहनाचा वापर करुन वाहन जाणीवपूर्वक खराब केले आहे. सदर इंजिनमध्ये बीघाड नव्हता व सदरचे वाहन कधीही एंजसीला बंद ठेवण्यात आले नव्हते. अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा थकीत कर्जदार होता त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 च्या ताब्यात वाहन असताना ते ताबडतोब दूरुस्त झाल्याची सूचना करुन त्यांनी बँकेच्या जप्तीच्या भितीपोटी अर्जदार वाहन घेऊन गेला नाही. गैरअर्जदार क्र.3 यांनी दि.30.10.2008 रोजी अर्जदाराचे वाहन पोलिस संरक्षणात घेऊन गेले. अर्जदाराने सदर वाहनाचे वेळोवेळी केलेल्या कामाबददल गैरअर्जदार क्र.1 च्या हक्कात समाधानपञक लिहून दिलेले आहे. अर्जदार यांस इंजिन बाबत कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही त्यामूळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस पाठविण्यात आली, नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाही त्यामूळे प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जात गैरअर्जदार क्र.3 यांनी सेवेत ञूटी केली असे कूठेही म्हटलेले नाही. कलम 2 (डी) व (एफ) ग्राहक संरक्षण कायदा प्रमाणे अर्जदाराने गेरअर्जदारांच्या विरोधात ञूटी दर्शवलेली नाही म्हणून सदर तक्रार त्यांचे विरुध्द खारीज करण्यात यावी. गैरअर्जदार क्र.3 ने कर्ज देऊन त्यांचे मध्ये व अर्जदार यांचे करार केला होता. सदर करारांचे भंग केल्यामूळे अर्जदार यांचे वाहन जप्त करण्यात आले असे करुन त्यांनी सेवेत ञूटी केलेली नाही. वाहनातील इंजिन खराब झाले याबाबत गैरअर्जदार क्र.3 चा काहीही संबधं नाही. कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यामूळे त्यांना नोटीसीद्वारे हप्त्याची मागणी केली होती. त्यांनी कर्जाची हप्ते वेळेवर कधीही भरले नाही व असे कधीही कळविले नाही अटोचे इंजिन बीघाड असल्यामूळे ते वेळेवर हप्ते भरु शकत नाहीत. याउलट अर्जदाराने दि.7.5.2008 रोजी लेखी पञाद्वारे जर थकीत हप्ते न भरल्यास वाहन स्वतहून बँकेच्या ताब्यात देईल असे म्हटले होते. कर्जाचे हप्ते न भरल्यामूळे गैरअर्जदार क्र.3 यांनी करारातील अट क्र.15.2 प्रमाणे सदर वाहन दि.30.10.2008 रोजी कायदेशीररित्या ताब्यात घेतले. तसेच दि.2.11.2008 रोजी अर्जदारास कायदेशीर नोटीस देऊन बँकेचे थकीत हप्ते सात दिवसांचे आंत भरणा करावेत व वाहन सोडवून न्यावे अन्यथा वाहन विकून कर्जाची रक्कम फेडण्यात येईल. अर्जदाराने नोटीसीस उत्तर दिले नाही व कर्ज रक्कमेचा भरणा देखील केला नाही. त्यामूळे वाहन विक्री करुन कर्जाची परतफेड करुन घ्यावी लागली असे करुन गैरअर्जदार क्र. 3 यांनी सेवेत ञूटी केलेली नाही. सदर वाहनाची दि.14.1.2009रोजी कोटेशन पध्दतीने वर्तमानपञात जाहीरात देऊन जाहीर लिलावात वाहनाची जास्तीत जास्त किंमत रु.27500/- आली त्यानुसार त्या किंमतीस वाहन विक्री केले व ती रक्कम गैरअर्जदाराच्या बॅकेच्या अर्जदाराच्या खात्यामध्ये जमा केली. व आगाऊ रक्कम रु.12,442/- अर्जदाराच्या खात्यात जमा केली आहे व ती रक्कम बँकेने अर्जदारास दि.20.3.2009 रोजी परत केली आहे.गैरअर्जदारांनी आपली कार्यवाही कायदेशीररित्या व नैसर्गीक न्याय तत्वाद्वारे केली आहे. त्यामूळे असे करुनही त्यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही म्हणून त्यांची विरुध्दची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेत ञूटी आहे काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी वाहन खरेदीसाठी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून कर्ज घेतलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून कर्ज घेऊन अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून तिन चाकी अटो दि.24.2.2006 रोजी खरेदी केले आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये नाकारलेले नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व तयांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून वाहन खरेदी केल्यानंतर सदरच्या वाहनाच्या इंजिन मध्ये वारंवार बीघाड होत असल्याने अर्जदार यांनी त्यांचे वाहन वेळावेळी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दूरुस्त करुन घेतलेले आहे. त्या बाबतच्या पावत्या अर्जदार यांनी अर्जासोबत या अर्जाचे कामी दाखल केलेल्या आहेत. दि..11.6.2008 रोजी अटोचे इंजिन बदलण्यासाठी अर्जदार यांनी त्यांचा अटो गैरअर्जदार क्र.1 यांचे ताब्यात दिलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदार यांचे वाहन गैरअर्जदार क्र.1 यांचे ताब्यातून दि.30.10.2008 रोजी घेतले आहे. सदरचे वाहन ताब्यात घेण्यापूर्वी गैरअर्जदार क्र.3 यांनी दि.29.10.2008 रोजी गेरअर्जदार क्र.1 यांना वाहन ताब्यात घेण्याबाबतची नोटीस दिली आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी वाहन ताब्यात घेण्यापूर्वी दि.30.10.2008 रोजी पोलिस स्टेशन, शिवाजी नगर, नांदेड यांना लेखी पञ दिलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून सदर वाहन खरेदीसाठी दि.6.3.2006 रोजी कर्ज घेतले आहे. सदर कर्जाची मूदत दि.7.6.2008 रोजी संपलेली आहे. त्यामूळे अर्जदार व गैरअर्जदार यांचे मध्ये झालेला करार एकाअर्थी दि.8.6.2008 रोजी संपूष्टात आला आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदार यांचे वाहन दि.30.10.2008 रोजी ताब्यात घेतल्यानंतर अर्जदार यांना वेळावेळी नोटीस देऊन दोन हप्त्याची उर्वरित थकीत रक्कम भरुन वाहन परत नेणे बाबत कळवलेले आहे. अर्जदार यांचे वाहन गैरअर्जदार बँकेने दि.30.10.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचे ताब्यातून घेतलेले आहे. सदर अर्जदार यांचे वाहनाची विक्री जाहीर प्रगटनाद्वारे गैरअर्जदार बँकेने दि.14.01.2009 रोजी केल्याचे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी वाहन गैरअर्जदार क्र.1 यांचे ताब्यातून नेल्यापासून म्हणजे दि.30.10.2008 ते वाहन विक्री होईपर्यत म्हणजे दि.14.01.2009 पर्यत थकीत रक्कमेची रक्कम भरणे बाबत कोणतीही कारवाई केली नाही अगर बँकेमध्ये जाऊन प्रत्यक्ष रक्कम भरण्याची तयारीही दर्शविली नाही. गैरअर्जदार यांनी दि.02.11.2008 रोजी अर्जदार यांना कायदेशीर नोटीस देऊन थकीत कर्जाची रक्कम सात दिवसांचे आंत भरणा करुन वाहन सोडवून घ्यावे अन्यथा सदर वाहनाची विक्री करुन कर्जाची रक्कम फेडण्यात येईल असे सूचित केलेले आहे. त्यानंतर दि.14.1.2009 रोजी दैनिक प्रजावाणी वृत्तपञामध्ये वाहन विक्री संदर्भात जाहीर प्रगटनही दिलेले आहे. अर्जदार यांचे वाहनाची विक्री करुन रक्कम रु.27,500/- गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे जमा झाल्यानंतर गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदार यांचे थकीत कर्जाची रक्कम जमा करुन उर्वरित रक्कम रु.12442/- एवढी रक्कम अर्जदार यांना डि.डि. नंबर 697017 दि.20.3.2009रोजी परत केलेली आहे. अर्जदार या मंचामध्ये दि.14.01.2009 रोजी प्रस्तूतची तक्रार घेऊन आलेले आहेत. गैरअरर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपञानुसार अकर्जदार यांचे वाहनाची विक्री दि.14.01.2009 रोजी झाल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु अर्जदार यांनी अर्ज दाखल करतेवेळेस स्वतःचे वाहन विक्री झाल्या बाबत कोणतेही कथन अर्जामध्ये नमूद केलेले नाही. परंतु त्यानंतर प्रस्तूत अर्जाचे कामी दि.22.07.2009 रोजी अर्जदार यांनी तक्रार दूरुस्तीचा अर्ज देऊन विनंती कलमामध्ये दूरुस्ती करुन घेतलेली आहे. त्यांचा प्रस्तूतचा अर्ज मंजूरही करण्यात आलेला आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ तसेच गैरअर्जदार क्र.1 व 3 यांचे लेखी म्हणणे व शपथपपञ तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपञे व वरील सर्व विवेचनाचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व दाखल कागदपञ तसेच वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे शपथपञ व दाखल कागदपञ तसेच वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा अर्ज खारीज करण्यात येत आहे. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर, लघूलेखक. |