जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.210/2008. प्रकरण दाखल दिनांक – 29/05/2008. प्रकरण निकाल दिनांक – 07/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. शब्बीर अहमद पि.शेख नबी अर्जदार. रा.मिलाप पानशॉपच्या बाजूला, गल्ली क्र. 14, पिरबु-हाणनगर,नांदेड. विरुध्द. ई स्पेस कम्युनिकेशन 111/112, गैरअर्जदार. राज मोहम्मद कॉम्पलेक्स,श्रीनगर,नांदेड. अर्जदारा तर्फे. - स्वतः. गैरअर्जदार क्र.1 - एकतर्फा. निकालपत्र (द्वारा मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे,अध्यक्ष) यातील अर्जदार शब्बीर अहमद शेख नबी यांची थोडक्यात तक्रार अशी की, दि.10/01/2008 रोजी त्यांनी गैरअर्जदारांच्या दुकानातुन नोकीया एन-72 हा भ्रमणध्वनी रु.8,000/- किंमतीस विकत घेतला. यासंबंधात गैरअर्जदार यांनी, हेडफोन एच.एस 31, जे कंपनीकडुन दिले जाते, हे देण्याचे ऐवजी धोक्याने एस.एस.3 हा हेडफोन दिला व फसवणुक केली. त्यांनी गैरअर्जदाराकडे जावुन एच.एस.3 हेडफोन बदलुन द्यावी अशी विनंती केली तसे करण्यास त्यांनी नकार दिला व उध्दटपणे वागणुक केली. तुम्ही नोकिया कंपनीकडुन तसे लिहुन आणा असे सांगितले. अर्जदार यांनी नोकीया कष्टमर केअरला संपर्क केला असता, त्यांनी नांदेड येथे त्यांचा कोणताही अधिकृत वितरक नाही असे सांगितले. त्यांना निष्कारण चकरा माराव्या लागल्या, त्यांना खर्चही आला आणि म्हणुन त्यांनी ही तक्रार केली ती द्वारे त्यांना नोकीया कंपनीचा एस.एस.31 गैरअर्जदारांनी द्यावे. त्यांना झालेले नुकसान व खर्च म्हणुन रुद्य2,600/- द्यावे आणि तक्रार अर्जाचा खर्च द्यावा अशा मागण्या केल्या आहेत. यात गैरअर्जदाराला नोटीस देण्यात आली मात्र ते गैरहजर राहीले म्हणुन त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि.18/07/2008 रोजी पारीत केला. अर्जदाराने या प्रकरणांत त्यांचा प्रतिज्ञालेख दाखल केला आहे आणि त्यांनी मोबाईल विकत घेतल्या बाबतची गैरअर्जदाराची पावती दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी या प्रकरणांत येऊन आपला बचाव केला नाही, उत्तर दाखल केलेले नाही, प्रतिज्ञालेख दाखल केला नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीतील व प्रतिज्ञालेखावर विश्वास ठेवण आवश्यक आहे. त्यांनी असेही नमुद केलेले आहे की, गैरअर्जदारांनी चुकीचा हेडफोन देऊन फसवणुक केलेली आहे, ही अनुचित व्यापारी प्रथा आहे हे स्पष्ट होते. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर. 2. गैरअर्जदारांनी अर्जदारास नोकीया कंपनीकडुन दिला जात असलेला एच.एस.31 हा हेडफोन स्वतः नवीन उपलब्ध करुन द्यावा आणि अर्जदाराकडुन एच.एस.3 हा हेडफोन परत घ्यावा. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या त्रासाबद्यल रु.1,000/- आणि तक्रारी खर्चाबद्यल रु.500/- द्यावे. 4. आदेशाचे पालन एक महिन्यात करावे. 5. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |