::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, अधि.वर्षा जामदार मा.सदस्या) (पारीत दिनांक : 19.07.2012) 1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असुन, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
2. अर्जदार हा गै.अ.कंपनीचा ग्राहक असुन त्याचा ग्राहक क्रं. 45001486306 असुन मिटर क्रं.1602862507 असा आहे. अर्जदाराला दि.14/09/2011 चे विजदेयक मागील रिडींग 8535 व चालु रिडींग 8818 असे दाखवुन 283 युनिट दाखवुन बिलाची रक्कम 1500/- देण्यात आली. अर्जदाराने बिलावर दि.03/10/2011 रोजी गै.अ.च्या कार्यालयात जावून तोंडी स्वरुपात बिल दुरुस्त करुन देण्याची मागणी केली. त्यावर गै.अ.ने चौकशी करुन पुढील बिल दुरुस्तीचे पाठवू असे सांगितले. परंतु त्यानंतर दि.15/10/2011 चे विज बिल सुध्दा चुकीचे पाठविण्यात आले. या बिलामध्ये मागील रिडींग 8818 व चालु रिडींग 8717 असे दाखविण्यात आले. गै.अ.ने या बिलाची रक्कम रु.479/- लावून मागील थकबाकी रु.2000/- दाखविले. वास्तविक दि.14/09/2011 च्या बिलामध्ये मागील रिडींग 8535 वजा जाता अर्जदारास दोन महिण्याचे बिल 182 युनिटचे होते. त्यासंदर्भात अर्जदाराने दुरुस्ती करुन बिलाची मागणी दि.25/10/2011 रोजी गै.अ.स केली, परंतु गै.अ.यांनी सुधारित बिल दिले नाही. त्यामुळे अर्जदाराला ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याशिवाय पर्याय नव्हता. गै.अ.यांनी दिलेल्या न्युनतापूर्ण सेवेसाठी अर्जदाराने तक्रार दाखल केली असून अर्जदाराला शारिरीक व मानसिक ञासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- अर्जदाराला देण्याचा आदेश गै.अ.विरुध्द व्हावा अशी मागणी केली आहे. तसेच दि.14/09/2011 व दि.15/10/2011 या दोन्ही बिलाची रक्कम रु. 2000/- रद्द करण्यात यावी व अर्जदाराला मिटर वाचना प्रमाणे बिलाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी अर्जदाराने केली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीसोबत 8 दस्ताऐवज दाखल केलेले आहे. तसेच आपल्या तक्रारीसोबत नि. 6 प्रमाणे अंतरिम अर्ज सादर केला आहे. 3. गै.अ.ने हजर होवून नि.13 प्रमाणे आपले लेखीउत्तर सादर केले. गै.अ.च्या म्हणण्याप्रमाणे मिटरचे रिडींग घेणा-या कर्मचा-याकडून चुकीची रिडींग घेण्यात आल्यामुळे चूकीचे बिल देण्यात आले. अर्जदाराने पहिल्यांदा दि.25/10/2011 रोजी अर्ज गै.अ.स दिला, त्यावेळी अर्जदाराला सदर तक्रार ग्राहक सुविधा केंद्रात दाखल करावयास सांगितली होती. जर ती तक्रार ग्राहक सुविधा केंद्रात दाखल केली असती तर तक्रार कनिष्ठ अभियंता यांच्याकडे वर्ग करुन त्यावर ताबडतोब कार्यवाही करुन अर्जदारास सुधारीत बिल प्रदान केले असते. परंतु अर्जदार यांनी सदरील तक्रार गै.अ.यांचे कार्यालयात दाखल केल्यामुळे // कारणे व निष्कर्ष // 4. अर्जदाराने नि. 5,अ-6 संदर्भात घेतलेल्या आक्षेपावर गै.अ.यांनी आपल्या लेखीउत्तरात खुलासा केलेला आहे. तसेच सुधारीत बिल देण्यास तयार असल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने नि.20 वर दाखल केलेल्या आपल्या शपथपञामध्ये सुधारित बिल दिल्याचे मान्य केले आहे. तसेच सुधारित बिलाप्रमाणे रक्कम भरुन बिलाची प्रत शपथपञासोबत दाखल केली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीमध्ये नि.5,अ-6 हे रद्द करण्याची मागणी केली आहे. परंतु अर्जदाराने तक्रार दाखल केल्यावर ती चुक दुरुस्त करुन देण्यात आली. व त्याप्रमाणे अर्जदाराने बिलाचे भुगतान केलेले आहे. त्यामुळे अर्जदाराची बिल रद्द करण्याची मागणी संपुष्टात आलेली आहे. अर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदाराला चुकीचे बिल दिल्यामुळे नाहक ञास झाला व सदर तक्रार दाखल करावी लागली. याउलट गै.अ.चे म्हणणे आहे की, अर्जदारांनी दि.25/10/2011 रोजी दिलेला अर्ज योग्य त्या अधिका-यांकडे न दिल्यामुळे कार्यवाहीस विलंब झाला. तसेच अर्जदाराने दि.01/11/2011 रोजी अर्जदाराला नि.5, अ-8 प्रमाणे अर्ज दिला व लगेचच ही तक्रार दाखल केली. त्यामुळे गै.अ.ने अर्जदाराच्या बिलात सुधारणा करुन देण्यापूर्वीच तक्रार दाखल केली असुन पुरेसा वेळ गै.अ.ला मिळालेला नाही. दाखल दस्ताऐवज नि.5,अ-8 व तक्रारीचा दि.01/11/2011 हा असल्यामुळे असे दिसुन येते की, गै.अ.च्या म्हणण्यात तथ्य आहे. तसेही अर्जदाराला दिलेल्या देयकामधली चूक ही नजर चूकीने झाली असुन ती मुद्दाम केलेली नाही किंवा तसा उद्देश ही गै.अ.चा नव्हता. म्हणून गै.अ.ने लगेच बिलात दुरुस्ती करुन दिल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे अर्जदाराची शारिरीक, मानसिक ञासापोटी रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश गै.अ.विरुध्द व्हावा ही मागणी ग्राहय धरण्याजोगी नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खारीज करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) दोन्ही पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 19/07/2012. |