अर्जदार हे गैरअर्जदार महावितरण कंपनीचे ग्राहक असून त्यांना देण्यात आलेल्या चुकीच्या वीज बिला विरुध्द मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने त्यांच्या मुला मार्फत मंचात तक्रार दाखल केली असून त्यांनी दाखल केलेंडर तक्रारीनुसार गैरअर्जदार यांच्याकडून जसवंतपूरा, औरंगाबाद येथे घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. दिनांक 6/6/2008 रोजी गैरअर्जदार यांनी त्यांना 18860/- रुपयाचे कंपाउँडींग चार्जेसचे वीज चोरीचे बिल दिले. अर्जदाराने मीटर टेस्टींग अहवाल, इ.ची मागणी केली असता त्यांना ते देण्यात आलेले नाही. अर्जदाराने सदरील बिल चुकीचे असल्याचे सांगून ते रद्द करण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत गैरअर्जदार यांनी चुकीच्या विज बिलापोटी त्यांचा वीज पुरवठा खंडीत करु नये यासाठी अंतरिम अर्ज दाखल केला आहे. गैरअर्जदार यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जवाबानुसार दिनांक 15/11/2008 रोजी अर्जदाराच्या मीटरची तपासणी केली असता मीटरबॉडीचे सील तुटलेले आढळले. अर्जदारास मीटर टेस्टींगसाठी दिनांक 17/11/2008 रोजी उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले. अर्जदाराने केलेंडर विनंतीवरुन त्यांना असेसमेंट चार्जेस व कंपाऊंडींग चार्जेसचे कार्यालयीन सुट्टी असताना देखील वीज बिल तयार करुन देण्यात आले व ते योग्य असल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. वीज कायदा 2003 मधील तरतुदीनुसार वीज चोरीच्या तकारी मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर असल्यामुळे तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेंडर कागदपत्रावरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा त्यांचा ग्राहक क्रमांक 490010696639 असा असून मीटर क्रमांक 521654 असा आहे. दिनांक 15/11/2008 रोजी गैरअर्जदार त्यांच्या तर्फे अर्जदाराच्या मीटरची स्थळपाणी करण्यात आली ज्यामध्ये अर्जदाराचा एकूण वीजभार 800 वॅट असा असून मीटर बॉडीचे सील तुटलेले असल्याचे तसेच वीज वापर वाणिज्य वापरासाठी असल्याचे म्हंटले आहे. दिनांक 17/11/2008 रोजी अर्जदाराचे सदरील मीटर चाचणी विभागात तपासण्यात आले. या तपासणीत अहवालाचे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, अर्जदाराचे मीटर 0.16 टक्के मंदगतीने पिफरत असल्याची नोंद केलेली आहे. त्याचप्रमाणे Meter is not open असा शेराही मीटर टेस्टींग हहवालात देण्यात आलेला आहे. वरील दोन्ही निरीक्षणावरुन मीटर जरी 0.16 टक्के मंद गतीने फीरत असले तरी महाराष्ट्र निद्युत नियामक आयोगाने या बाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार व टक्केवारीनुसार यास मीटर मंदगतीने फीरत असल्याचे मानता येत नाही. याच प्रमाणे मीटरचे सील तुटलेले आढळून आले तरी मीटर चाचणी करताना ते उघडण्यातच आले नसल्याचे मीटर टेस्टींग अहवालत नमुद केलेले आहे. वरील निरीक्षणावरुन सदरील प्रकरण वीज कायदा 2003 मधील 135 कलमा अंतर्गत येत नसल्याचे मंचाचे मत आहे. आदेश 1. गैरअर्जदार यांनी वीज कायदा कलमाअंतर्गत दिलेले बिल रद्द करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चाबद्दल रु 1000/- 30 दिवसात द्यावे.
| [ Rekha Kapadiya] Member[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |