(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य)
अर्जदाराने सिडको, औरंगाबाद येथे जुने घर विकत घेतले. तेथे लावण्यात आलेले मीटर हे जुन्या मालकाच्या नावे आहे. गैरअर्जदार यांनी सदर मीटरची पाहणी करुन अर्जदारास वीज चोरीचे बिल आकारल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी सिडको येथील संभुसिंग अमरसिंग दिक्षित यांच्याकडून एन-9, एम-2-61/3 हे घर विकत घेतले, व ते सिडको कार्यालयामार्फत त्यांच्या नावे हस्तांतरीत करण्यात आले. गैरअर्जदार यांच्यातर्फे लावण्यात
(2) त.क्र.416/09
आलेले वीज मीटर हे जुन्या मालकाच्या नावे आहे. दि.06.04.2009 रोजी गैरअर्जदार यांनी हे मीटर बदलले त्यावेळेस मीटरचे सील व्यवस्थित असून, ते वीज वापराची योग्य नोंद घेत असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदार यांनी दि.09.04.2009 रोजी अर्जदारास मीटर तपासणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले व मीटर त्यांच्यासमोर न तपासता त्यांच्या छापील कागदावर सहया घेतल्या असे अर्जदाराने तक्रारीत म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी त्यानंतर 12,423/- रुपयाचे वीज चोरीचे बिल दिले. अर्जदाराने याबाबतीत तक्रार केली असता, गैरअर्जदार यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. तसेच मागितलेली पंचनामा, तपासणी अहवाल इत्यादी कागदपत्रे दिलेली नाहीत. गैरअर्जदार यांनी दिलेले बिल रदद करण्याची व मानसिक त्रासाबददल नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये असा अंतरिम अर्ज दाखल केला आहे.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार दि.06.04.2009 रोजी त्यांनी अर्जदाराकडे लावण्यात आलेल्या मीटरची तपासणी केली त्यावेळेस मीटरचे सील तुटलेले आढळले. त्यामुळे अर्जदाराचे मीटर जप्त करुन ते तपासणीकरीता पाठविण्यात आले व अर्जदारास दि.09.04.2009 रोजी मीटर तपासणीसाठी उपस्थित राहण्यासाठी कळविण्यात आले. मीटर तपासणी अहवालानुसार अर्जदारास वीज कायदा 2003 अंतर्गत वीजचोरीचे बिल देण्यात आले, जे योग्य असल्याचे गैरअर्जदार यांनी म्हटले आहे. अर्जदारास, त्यांनी मागणी केल्याप्रमाणे योग्य ती कागदपत्रे देण्यात आली असून, त्यांना देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसून, तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराने सिडको येथील एन-9-एम-61/3 हे घर, श्री.संभुसिंग अमरसिंग दिक्षित यांच्याकडून विकत घेतले असून, अर्जदाराच्या नावे सिडको कार्यालयातर्फे दि.24.02.95 रोजी सदरील घर त्यांच्या नावे हस्तांतरीत करण्यात आले आहे. गैरअर्जदार यांच्यातर्फे अर्जदाराकडे बसविण्यात आलेले मीटर हे नामांतर न झाल्यामुळे अजूनही जुन्या मालकाच्याच नावे आहे. दि.06.04.2009 रोजी गैरअर्जदार यांच्यातर्फे अर्जदाराकडे लावण्यात आलेल्या मीटरची स्थळ पाहणी करण्यात आली. या स्थळ पाहणी अहवालात, मीटरचा क्रमांक 1234273 असा नमूद केलेला असून, त्यावरील रिडींग 04957 असे असल्याचे लिहीले आहे. मीटरचे सील ‘ब्रोकन’ असल्याचे अहवालात
(3) त.क्र.416/09
नमूद केले आहे. या अहवालावर ग्राहक प्रतिनिधी म्हणून सौ.आघाव अशी सही करण्यात आलेली आहे. गैरअर्जदार यांनी दि.09.04.2009 रोजी सदरील मीटरची अर्जदारासमोर तपासणी केलेली दिसून येते. या तपासणी अहवालात मीटर हे -001.28% एरर असे नमूद केलेले असून, खालीलप्रमाणे शेरा लिहीलेला दिसून येतो. “Meter found ok, meter opened in presence of consumer’s Reprenstative Joints found in C.T. secondary circuit, shown to consumer, agrees with the same”. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या वरील अहवालाचे निरीक्षण केल्यावर मीटर हे 1.28% मंदगतीने फीरत असून ते within permissible limit असे आहे. त्यामुळेच meter found ok असा शेरा त्यावर नमूद करण्यात आलेला आहे. C.T. secondary circuit यामध्ये joint असल्याचे म्हटले आहे. यावरुन C.T. secondary circuit हे ओपन नसून मीटर हे वीज वापराची योग्य ती नोंद घेत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मीटरचे सील तुटलेले आढळले, यावरुन अर्जदाराने मीटरमध्ये फेरफार केला हे सिध्द होत नाही. एकीकडे वीज मीटर तपासणी नंतर ok आहे असे म्हणणे तसेच वीज मीटर हे within permissible limit मध्ये आहे असे सांगून दुसरीकडे फक्त मीटरचे सील तुटलेले आहे, म्हणून वीज चोरीचा गुन्हा दाखल करणे हे मंचास संयुक्तीक वाटत नाही. गैरअर्जदार यांनी स्वतःच्याच मीटर चाचणी विभागात मीटर तपासले असता, ते वीज वापराचे व्यवस्थित नोंद घेत असल्याचे (ओ के) म्हटलेले आहे. त्यामुळे अर्जदाराने वीज चोरी केलेली नाही हे स्पष्ट होते.
आदेश
1) गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले 12,423/- रुपयाचे बिल रदद
करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांनी अर्जदारास खर्चाबददल रु.1500/- 30 दिवसात द्यावे.
श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख
सदस्य सदस्य अध्यक्ष