Maharashtra

Amravati

CC/14/222

Veerendra Shankar Jaiswal - Complainant(s)

Versus

Dy.Executive Engineer MSEDC Ltd - Opp.Party(s)

Adv.N.B.Kalantri

18 Feb 2015

ORDER

District Consumer Redressal Forum,Amravati
Ramayan Building,Biyani Chowk,Camp,Amravati
Maharashtra 444602
 
Complaint Case No. CC/14/222
 
1. Veerendra Shankar Jaiswal
Prop,Ramgiri International Hotel Near Bus Stand,Amrvati
Amaravati
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dy.Executive Engineer MSEDC Ltd
MSEDCd Ltd,City Sub Division No.01,Amravati
amravati
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. M.K.WALCHALE PRESIDENT
 HON'ABLE MR. R.K.Patil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

: न्‍यायनिर्णय :

( दिनांक 18/02/2015 )

 

मा.श्री.मा.के.वालचाळे, अध्‍यक्ष यांचे नुसार :-        

 

1..       तक्रारकर्ता याने सदरचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत कलम 12 अन्‍वये दाखल केलेला आहे.    

 

..2..

 

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..2..

 

          तक्रारकर्ता हयाच्‍या कथनाप्रमाणे त्‍याचे अमरावती येथे रामगिरी इंटरनॅशनल या नांवाचे हॉटेल असून तो त्‍याचा व्‍यवसाय करतो.  वर्षे 2010 मधे त्‍याने या हॉटेलसाठी विरुध्‍दपक्षाकडून 48 के.व्‍ही. असलेला विद्युत पुरवठा घेतला होता.  विरुध्‍दपक्ष यांनी 2010 ते ऑगष्‍ट 2014 पर्यत एकूण 48 महिन्‍याचे विज वापराचे देयक तक्रारकर्त्‍यास दिले नव्‍हते.  तक्रारकर्ता याने हॉटेलमधील आर्थीक स्‍वरुपाचे कामे करण्‍याकरीता लेखापालाची नियुक्‍ती केली होती व आलेले विज देयके भरण्‍या संबंधीचे कामे करण्‍यास त्‍याला दिले होते, ज्‍यामुळे तक्रारकर्ता यास 48 महिन्‍यापर्यंत  विज देयके  आले नाही याची माहिती नाही.   विज देयक देण्‍यांत न आल्‍याने 48 महिन्‍यापर्यंत तक्रारकर्ता याने ते भरले नव्‍हते. 

          तक्रारकर्ता हयाच्‍या कथनाप्रमाणे दिनांक 26/08/2014 रोजी विरुध्‍दपक्षाच्‍या भरारी पथकाने तक्रारकर्ता याच्‍या हॉटेलच्‍या  विद्युत पुरवठयाचे निरीक्षण केले तेव्‍हा असे लक्षात आले की, विज पुरवठा घेतल्‍यापासून 48 महिन्‍यापर्यंत तक्रारकर्ता यास विज देयके दिलेले नाही.  भरारी पथकाने विद्युत मिटरचे निरीक्षण केले व त्‍यानंतर तक्रारकर्ता यास एकूण 206082 युनीटचे रु.32,50,810/-

..3..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..3..

 

चे विज देयक देण्‍यांत आले व त्‍या देयकासोबत provisional assessment sheet  दिले.  यानुसार दिनांक 04/12/2010 ते 30/10/2011 पर्यंत 11 महिन्‍याच्‍या कालावधी पर्यंत 50555 युनीट विज वापराकरीता  रु.8.4 प्रती युनीट दर लावण्‍यात आला.  त्‍यानंतर 9 महिन्‍याकरीता 41364 युनीटचा दर प्रति युनीट रु.9.61  व त्‍यानंतर जुलै 2012 ते ऑगष्‍ट 2014 या कालावधीतील 114883 युनीटस करीता प्रति युनीट रु.10.91  दर लावण्‍यांत आला.  त्‍यावर  फिक्‍स चार्जेस  व इतर चार्जेस लावून तक्रारकर्ता यास एकूण रु.32,50,810/-  चे देयक दिले.   या देयकावर ग्राहक क्रमांक सुध्‍दा लिहलेला नव्‍हता.  विरुध्‍दपक्ष यांनी प्रति युनीट रु.15.71 चा दर लावला, जो चुकीचा आहे.  परंतू  त्‍यांनी वापरलेले विजेचे युनीटस त्‍यास मान्‍य होते व आहे.   विरुध्‍दपक्ष यांनी रु.15.71 प्रति युनीट दराने जी आकारणी केली ती चुकीची असल्‍याने तक्रारकर्ता  याने याबद्दल विरुध्‍दपक्ष यांना कळविले होते.  त्‍यामुळे दिनांक 30/08/2014  रोजी  विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्ता यास पत्र देवून केलेली आकारणी ही योग्‍य असल्‍याचे सांगून देयक भरण्‍यास सांगीतले. यानंतर तक्रारकर्ता याने विरुध्‍दपक्षाला

..4..

 

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..4..

 

संगणीकृत देयकाची मागणी केली. यानंतर त्‍याने  विरुध्‍दपक्षासोबत पत्रव्‍यवहार करुन देयकाच्‍या सत्‍यतेबद्द्ल आक्षेप घेतला व नंतर या देयकापैकी रु.20,00,000/-  त्‍याने भरले व देयक दुरुस्‍त करुन देण्‍याची विनंती केली.    असे असतांना  विरुध्‍दपक्ष यांनी सप्‍टेंबर 2014  चे देयक देवून रु.11,35,900/-  विज वापराबद्दल  देयक असल्‍याचे दाखवून  विज देयक दिले. 

          तक्रारकर्ता याच्‍या कथनाप्रमाणे  विज वापर हा 50 के.व्‍ही. च्‍या आत असेल तर प्रति युनीट दर हा रु.8.44 व 50 के.व्‍ही. च्‍या वर प्रति युनीट दर हा रु.10.91  लावण्‍यांत येतो. असे असतांना  विरुध्‍दपक्ष यांनी प्रति युनीट दर हा रु.10.33 असा चुकीचा लावला आहे.   दिलेले रु.11,35,900/- चे देयक हे चुकीचे कसे आहे याबद्दल विस्‍तृत विवेचन तक्रारकर्ता याने तक्रार अर्जात केले, याबद्दल त्‍याने ते दुरुस्‍त करुन देण्‍यासंबंधी  विरुध्‍दपक्षासोबत  पत्रव्‍यवहार  सुध्‍दा केला परंतू त्‍याची कोणतीही दखल विरुध्‍दपक्ष यांनी न घेतल्‍याने त्‍याच्‍या कथनाप्रमाणे विरुध्‍दपक्ष यांनी सेवेत त्रुटी केली आहे व त्‍यामुळे त्‍याने हा तक्रार अर्ज दाखल केला. 

2.        विरुध्‍दपक्ष यांनी निशाणी 18 ला त्‍यांचा लेखी जबाब दाखल केला.  त्‍यात त्‍यांनी तक्रारकर्ता याने त्‍यांच्‍या विरुध्‍द

..5..

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..5..

 

केलेल्‍या तक्रार हया जरी नाकारल्‍या असल्‍या तरी हे कबूल केले की, तक्रारकर्ता हा रामगिरी इंटरनॅशनल या नांवाने हॉटेलचा व्‍यवसाय करतो व त्‍यासाठी त्‍याला 48 KW चा विज पुरवठा मंजूर करण्‍यांत आला होता.  दिनांक 26/08/2014  रोजी भरारी पथकाने या हॉटेलचे निरीक्षण केले व याबद्दलचा अहवाल तयार केला.  त्‍यांनी हे कबूल केले की, तक्रारकर्ता यास 2010 मधे विज पुरवठा सुरु करुन देण्‍यांत आला होता, याबद्दलची नोंद ही कार्यालयाने न घेतल्‍याने भरारी पथकाने तपासणी केल्‍यानंतर ही बाब लक्षात आली व त्‍यानंतर तक्रारकर्ता यास रु.32,50,810/-  चे देयक  देण्‍यांत आले हे देयक 206802 युनीटस विज वापराबद्दलचे होते यापैकी रु.20,00,000/-  तक्रारकर्ता याने भरले.  त्‍यानंतर सप्‍टेबर 2014 मधे तक्रारकर्ता यास रु.11,35,900/-  चे विज देयक देण्‍यांत आले, जे त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे बरोबर आहे.  नंतर ज्‍या कालावधीचे  देयक देण्‍यांत आले त्‍या कालावधीत तो विज दर होता त्‍याप्रमाणे 206802 युनीटसचा विज वापर विचारात घेवून आकारणी करण्‍यांत आला.

 

..6..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..6..

 

          विरुध्‍दपक्ष यांच्‍या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता याला     48KW चा  विज पुरवठा मंजूर करण्‍यांत आला होता तरी तो      60KW चा वापर करीत असल्‍याचे  भरारी पथकाच्‍या निदर्शनास आले.  तक्रारकर्ता याने या हॉटेलसाठी  दोन विज कनेक्‍शन घेतले होते, तसेच रामप्‍यारीबाई गिरीजाशंकर जयस्‍वाल हिच्‍या नांवाने विज कनेक्‍शन  व इतर तीन कनेक्‍शन  घेतले होते.  वास्‍तविक  या सर्व मिटरचा उपयोग हा एकाच हॉटेलसाठी करण्‍यांत येत होता.  विज वापर जो या मिटरमधून करण्‍यांत येत होता तो केवळ विज वापराचे जे युनीट दर असते त्‍याचा फायदा घेण्‍यासाठी तक्रारकर्ता करीत होता.  परंतू विज वापर हा या मिटरमधून एकाच व्‍यवसायासाठी तक्रारकर्ता हा करीत होता.  तक्रारकर्ता याचा एकूण विज वापर हा 74.7 KW चा असल्‍याचे आढळून आले. 

          विरुध्‍दपक्ष यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबात असे नमूद केले की,  तक्रारकर्ता याने रु.32,50,810/-  च्‍या देयकाबद्दल हा तक्रार अर्ज दाखल केल्‍याने  या मंचाला तो चालविण्‍याचा अधिकार नाही तसेच  तक्रारकर्ता याने विरुध्‍दपक्ष यांनी आकारलेल्‍या विज देयकाबाबत वाद उपस्थित केला असल्‍याने याबद्दल तोंडी पुरावा देणे

..7..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..7..

 

आवश्‍यक आहे व या कारणावरुन हा तक्रार अर्ज या मंचापुढे चालू शकत नाही.  निशाणी 18 मधे  जे अधिकचे कथन विरुध्‍दपक्ष यांनी केले त्‍यात वरील बाबींचा उल्‍लेख करुन त्‍यांनी तक्रार अर्ज रद्द करावा अशी विनंती केली. 

3.        तक्रारकर्ता याने निशाणी 20 ला प्रतिउत्‍तर दाखल केले. त्‍यात त्‍यांनी हे कबूल केले की, त्‍यांनी रामप्‍यारीबाई गिरीजाशंकर जयस्‍वाल हिच्‍या नांवाने एक विज कनेक्‍शन व लेखी जबाबात नमूद केल्‍याप्रमाणे इतर कनेक्‍शन घेवून याबद्दल वेगवेगळे मिटर्स घेतलेले आहे परंतू त्‍यांनी हे नाकारले की, त्‍यांनी मंजूर विज पुरवठया पेक्षा जास्‍त दाबाचा पुरवठयाचा उपयोग तो करीत आहे.

4.        तक्रार अर्ज, लेखी जवाब, दोन्‍ही पक्षांनी दाखल केलेले  दस्‍त तसेच तक्रारकर्त्‍यातर्फे अॅड.श्री.कलंत्री व विरुध्‍दपक्षातर्फे  अॅड.श्री.अळसपूरकर यांचा युक्‍तीवाद ऐकला व खालील मुद्दे  उपस्थित करण्‍यांत आले.  

मुद्दे                                     उत्‍तर   

 

  1. हा तक्रार अर्ज या मंचासमोर चालू शकतो          

का ?                                  नाही

 

  1. आदेश काय ?              अंतीम आदेशाप्रमाणे

..8..

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..8..

 

कारणे  व निष्‍कर्ष 

5.मुद्दा क्र.1 :-  तक्रारकर्त्‍यातर्फे अॅड.श्री.कलंत्री यांनी युक्‍तीवादा दरम्‍यान हे शाबीत करण्‍याचा प्रयत्‍न केला की, विरुध्‍दपक्ष यांनी जी विज आकारणी प्रती युनीट केलेली आहे ती चुकीची आहे.  त्‍यांनी असा युकतीवाद केला की, तक्रारकर्ता याने रु.32,50,810/- च्‍या विज देयकापैकी रु.20,00,000/- हे विरुध्‍दपक्ष यांच्‍याकडे भरले आहे व त्‍यानंतर सप्‍टेंबर 2014 मधे तक्रारकर्ता यास विरुध्‍दपक्ष यांनी रु.11,35,900/-  चे विज देयक दिले ते चुकीचे आहे.  या विज देयकाबाबतचा वाद तक्रारकर्ता याने या तक्रार अर्जात उपस्थित केलेला आहे व त्‍यामुळे या मंचापुढे हा तक्रार अर्ज चालू शकतो.

6.        विरुध्‍दपक्षातर्फे अॅड.श्री.अळसपूरकर यांनी लेखी जबाबात नमूद बाबींचा पुर्नउच्‍चार केला.

7.        तक्रारकर्ता याने सप्‍टेंबर 2014 मधे विरुध्‍दपक्ष यांनी दिलेले रु.11,35,900/- च्‍या विज देयकाबाबत या तक्रार अर्जामधे वाद उपस्थित केलेला असल्‍याने तो अर्ज या मंचापुढे चालू शकतो.   असे जरी असले तरी रेकॉर्डवर आलेल्‍या इतर बाबींचा विचार करणे

..9..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..9..

 

आवश्‍यक आहे. तक्रारकर्ता याने रामप्‍यारीबाई गिरीजाशंकर जयस्‍वाल हिच्‍या नांवाने तसेच इतर तीन मिटर हॉटेल रामगिरीसाठी घेतल्‍याचे दस्‍तावरुन दिसते.  या‍ मिटरमधून जो विज पुरवठा घेण्‍यांत येतो तो एकाच हॉटेलसाठी वापरण्‍यांत येत असल्‍याचे विरुध्‍दपक्ष यांनी दाखल केलेल्‍या फोटोवरुन  लक्षात येते.   तक्रारकर्ता याने असे का केले याचा खुलासा त्‍याने प्रतिउत्‍तरात केलेला नाही.  त्‍यामुळे स्‍लॅपचा फायदा मिळावा यासाठी तक्रारकर्ता याने तसे केले हे विरुध्‍दपक्ष यांचे कथन स्विकारणे योग्‍य होईल.

8.        दिनांक 26/08/2014 रोजी भरारी पथकाने तक्रारकर्ता याच्‍या हॉटेलचे तसेच त्‍यात बसविलेल्‍या विज मिटरची  तपासणी केली व त्‍याचा अहवाल तयार केला.  तसेच दिनांक 15/11/2014 रोजी पाहणी करुन अहवाल देण्‍यांत आला.  दिनांक 26/08/2014 च्‍या स्‍थळ निरीक्षण अहवालावर सुनिल गिरीजाशंकर जयस्‍वाल यांची सही आहे, ती असल्‍याची बाब तक्रारकर्ता याने नाकारलेले नाही.  यामुळे असे गृहीत धरावे लागेल की, त्‍याच्‍या समक्ष हा स्‍थळ निरीक्षण अहवाल तयार करण्‍यांत आला.  तक्रारकर्ता यास हे कबूल आहे की, त्‍याला 48KW चा विज पुरवठा हा मंजूर करण्‍यांत

..10..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..10..

 

आला होता.  भरारी पथकाने निरीक्षण केले त्‍यावेळी तक्रारकर्ता याचा विज वापर हा 74.07KVA असल्‍याचे निदर्शनास आला.  विरुध्‍दपक्ष यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबात असे स्‍पष्‍ट नमूद केले आहे की, भरारी पथकाने तपासणी केली असता तक्रारकर्ता हा    60KW चा विज वापर करीत असल्‍याचे आढळले यावरुन हे शाबीत होते की, 48KW चा विज पुरवठा मंजूर असतांना तक्रारकर्ता हा जास्‍तीच्‍या दाबाचा विज वापर करीत आहे. रेकॉर्डवर दाखल असलेल्‍या दस्‍तावरुन ही बाब लक्षात येते. अशा परिस्थितीत मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी Ramnath Panjiyar V/s Urban Electric supply Division & ors. IV (2014) CPJ 143 (NC) या प्रकरणी दिलेल्‍या निकालाचा आधार घ्‍यावा लागेल. या निकालातील परिच्‍छेद क्र. 4 मधे  असे नमूद केले आहे की,   

Petitioner submitted in the complaint that he was using load of 6.25 HP for running the welding machine, etc. but opposite party in its written statement submitted that machine installed was of the capacity of 8.95 HP  and there was no plate in the welding set and it was treated as 15HP. Thus, it

 

..11..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..11..

 

becomes clear that opposite party treated the case as using excess load.  Hon’ble Apex Court in Civil Appeal No.8859 of 2011, The Executive Engineer & Anr. V. M/s Sri Seetaram Rice Mill, held as under :

“The expression ‘unauthorised use of electricity means’ as appearing in Section 126 of the 2003  Act is an expression of wider connotation and has to be construed purposively in contrast to contextual interpretation while keeping in mind the object and purpose of the Act.  The cases of excess load consumption than the connected load inter alia would fall under Explanation (b)(iv) of Section 126 of the 2003 Act, besides it being in violation of Regulations 82 of 106 of the Regulations and terms of the Agreement.”

 

          तसेच परिच्‍छेद क्र. 5 मधे  असे नमूद केले आहे की,

In the light of aforesaid judgment, it becomes clear that whenever there is consumption of electricity in excess of the sanctioned load, it would amount to unauthorized use of electricity under Section 126 of Electricity Act.

 

..12..

 

 

 

ग्रा.त.क्र.222/2014

..12..

   

9.        त्‍यामुळे ग्राहक मंचाला अशा प्रकरणात तक्रार अर्ज चालविण्‍याचा अधिकार राहत नाही.  वरील निकालातील बाबी हया तक्रार अर्जातील बाबीशी  या जुळणा-या आहेत व त्‍यामुळे असा निष्‍कर्ष काढण्‍यांत येतो की, हा तक्रार अर्ज या मंचापुढे चालू शकत नाही.  यावरुन मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्‍तर देण्‍यांत येते व त्‍यामुळे  तक्रार अर्ज हा खालील आदेशाप्रमाणे रद्द करण्‍यांत येतो.

अंतीम  आदेश

  1. तक्रार अर्ज रद्द करण्‍यांत येतो.
  2. उभय पक्ष यांनी स्‍वतःचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. उभय पक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यांत याव्‍यात.

 

 

 

दि.18/02/20            (रा.कि.पाटील )                 (मा.के.वालचाळे)

          सदस्‍य                         अध्‍यक्ष

 
 
[HON'ABLE MR. M.K.WALCHALE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.K.Patil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.