Maharashtra

Jalna

CC/96/2012

syed gaziali mukarmali - Complainant(s)

Versus

Dy.Ex.Engineer m.s.e.d.Jalna - Opp.Party(s)

vipul Deshpande

05 Dec 2013

ORDER

 
CC NO. 96 Of 2012
 
1. syed gaziali mukarmali
Santoshwadi, Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dy.Ex.Engineer m.s.e.d.Jalna
mastgad, Jalna
Jalna
Maharashtra
2. Jr.Engineer m.s.e.d, Jalna
City Sub Division no. 4, Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:
 
अड.जी.आर.कड
......for the Opp. Party
ORDER

(घोषित दि. 05.12.2013 व्‍दारा श्रीमती नीलिमा संत,अध्‍यक्ष)
प्रस्‍तुत तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार जालना येथील रहीवाशी आहेत. तर गैरअर्जदार ही वीज वितरण कंपनी आहे. तक्रारदार यांनी जुलै 2011 साली त्‍यांच्‍या घरासाठी विद्युत पुरवठा घेतलेला होता. त्‍यांचा ग्राहक क्रमांक 510030629670 असा होता. त्‍यांनी त्‍या घरासाठी विद्युत पुरवठा घेतलेला होता. ते घर अब्‍दुल अजीज यांचेकडून नोंदणीकृत खरेदी दस्‍तानुसार खरेदी केले होते. विद्युत जोडणी घेतल्‍यानंतर तक्रारदार नियमितपणे विज देयके भरत आले आहेत. दिनांक 11.07.2012 रोजी गैरअर्जदार यांनी मीटरची तपासणीकरुन मीटर काढून नेले व त्‍यानंतर दुसरे मीटर बसवले नाही. दिनांक 12.07.2012 रोजी गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना पत्र दिले की, सदरहू घरात पूर्वी राहणा-या लोकांनी वीज भरणा केलेला नाही. म्‍हणून वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्‍या पत्रात तक्रारदारांनी शपथपत्र दिल्‍याचा उल्‍लेख केला पण तक्रारदारांनी असे शपथपत्र दिलेले नाही.
गैरअर्जदारांना पूर्वी येणारी देयके मीटर रिडींग नुसारच आलेली आहेत. त्‍यांचे चालू महिन्‍याचे बिल देखील रिडींग प्रमाणेच आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना सुनावणीची कोणतीही संधी न देता त्‍यांचे मीटर काढून नेले व तक्रारदारांचे नावावर अवाजवी व चुकीची विद्युत देयके थकीत आहेत असे दाखवले. त्‍यामुळे तक्रारदारांना शारिरीक व मानसिक त्रास झाला व त्‍यांना अंधारात रहावे लागले. म्‍हणून तक्रारदार ही तक्रार सेवेतील कमतरतेसाठी गैरअर्जदार यांचे विरुध्‍द करत आहेत. त्‍यांनी आपल्‍या तक्रारी सोबत गैरअर्जदार यांचे दिनांक 11.07.2012 चे पत्र मिळकतीचे खरेदीखत व फेब्रूवारी 2012 चे तक्रारदारांचे बीजबिल अशी कागदपत्रे जोडली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्‍यांच्‍या जबाबानुसार तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडे प्रतिज्ञापत्र दिले की, घर नंबर 1-17-94 मध्‍ये कंपनीची पूर्वीची थकबाकी असेल तर ती भरण्‍यास मी तयार आहे. चौकशीअंती गैरअर्जदार कंपनीला असे समजले की त्‍याच घरात खालील प्रमाणे बाकी होती.
1. PD ग्राहक क्रमांक – 510030050663 थकबाकी रुपये 61,710/-
2. PD ग्राहक क्रमांक – 510030151010 थकबाकी रुपये 1,08,103/-
3. PD ग्राहक क्रमांक – 510030111379 थकबाकी रुपये 1,37,678/-
विद्युत कायद्याप्रमाणे ज्‍या जागेवर नविन कनेक्‍शन घ्‍यावयाचे तेथे बाकी नसेल तरच नविन कनेक्‍शन देता येते. परंतु अर्जदाराने या नियमाचे उल्‍लंघन केले त्‍यामुळे गैरअर्जदार कंपनीने केलेली कारवाई योग्‍य होती. गैरअर्जदार यांच्‍या कृत्‍यामुळे तक्रारदारांचे काहीही नुकसान झालेले नाही. सबब तक्रारदारांची तक्रार फेटाळण्‍यात यावी. त्‍यांनी आपल्‍या जबाबासोबत वरील ग्राहक क्रमांकाचे सी.पी.एल जोडले आहे.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.विपुल देशपांडे गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्‍तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्‍यास केला. त्‍यावरुन खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात.
1. ग्राहक क्रमांक 510030050663 ग्राहक क्रमांक 510030151010 या दोनही विद्युत जोडण्‍या सप्‍टेंबर 2008 लाच कायमस्‍वरुपी खंडित झालेल्‍या आहेत व त्‍यावरील थकबाकीची मागणी गैरअर्जदार सातत्‍याने तक्रारदार यांचेकडे करत असल्‍याचा पुरावा मंचासमोर नाही. त्‍यामुळे विद्युत कायदा कलम 56 (2) नुसार गैरअर्जदार आता तक्रारदारांकडे प्रस्‍तुत मागणी करु शकत नाहीत असे मंचाचे मत आहे.
2. तक्रारदारांनी घर क्रमांक 1-17-94 पेन्‍शनपुरा, संतोषवाडी ही मिळकत नोंदणीकृत दस्‍तऐवजाद्वारे खरेदी केली. त्‍या जागेवर त्‍यांनी मीटर क्रमांक 510030629670 द्वारे वीज जोडणी घेतली. ग्राहक क्रमांक 510030111379 ही वीज जोडणी “नंदलाल ऑईल मिलच्‍या मागे, पेन्‍शनपुरा” या पत्‍यावर जानेवारी 2008 पासून चालूच होती. वरील दोनही जागा (Premises) एक आहे किंवा कसे याचा उलगडा दाखल कागदपत्रांवरुन होत नाही.
3. उपरोक्‍त वीज जोडणी चालू असून त्‍यावर थकबाकी असतानाच पुरेशी चौकशी व शहानिशा न करताच गैरअर्जदार यांनी क्रमांक 5100303629670 अन्‍वये तक्रारदारांना नविन वीज जोडणी दिलेली दिसते.
4. गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या जबाबात तक्रारदारांनी बाकी भरण्‍याबद्दल प्रतिज्ञापत्र लिहून दिले असे म्‍हटले आहे. परंतु त्‍यांनी ते प्रतिज्ञापत्र मंचा समोर दाखल केले नाही अथवा विद्युत कायद्याच्‍या कोणत्‍या तरतूदीखाली असे प्रतिज्ञापत्र घेता येते याचा उल्‍लेख केला नाही.
तक्रारदारांचा वीज पुरवठा सध्‍या चालू नाही. अशी परिस्थिती असताना देखील तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत अर्जदार हे गैरअर्जदार यांना कोणतीही रक्‍कम देणे लागत नाहीत व अर्जदारांचा वीज पुरवठा भविष्‍यात पूर्वीच्‍या थकबाकीच्‍या कारणाने खंडित करण्‍यात येवू नये अशी प्रार्थना केली आहे अशा त-हेची प्रार्थना मंजूर करणे ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कक्षेत येत नाही असे मंचाला वाटते. तक्रारदारांचा वीज पुरवठा खंडित केलेला आहे असे तक्रारीत नमूद केलेले असताना देखील तक्रारीच्‍या प्रार्थनेत तक्रारदारांचा वीज पुरवठा पुन्‍हा चालू करण्‍यात यावा अशी प्रार्थना तक्रारदारांनी केलेली नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणे योग्‍य ठरेल असे मंचाला वाटते. सबब मंच खालील आदेश देत आहे.

आदेश

 

1. तक्रारदारांची तक्रर नामंजूर करण्‍यात येत आहे.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
 

 
 
[HON'ABLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.