(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 02.12.2014)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 सह 14 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडून दि.15.3.2000 रोजी ग्राहक क्र. 450010421271 अन्वये घरगुती विज कनेक्शन साई दर्पण अपार्टमेंट मधील फ्लॅट क्र.एस 2 मध्ये घेतले. अर्जदाराने त्याचा फ्लॅट क्र.एस 2 अंकुर ञिलोक संधी यांना विक्री केले तेंव्हापासून ञिलोक गोपीचंद्र संधी हे विज मिटरचा वापर करीत आहे. या मामल्यात खास मुखत्यारहा विज मिटरचा लाभधारी आहे. अर्जदाराने विज देयकांचा नियमितपणे भरणा केलेला आहे. गैरअर्जदाराने दस्त क्र.5 ते 10 चे सरासरी देयक पाठवून सरासरी देयक प्रमाणेरुपये 1037/- ची रक्कम वसूल केली. देयक दि.27.5.2013 ते 23.10.2013 चे देयक पर्यंत अर्जदाराचा विज रिडींग 1745 चा वापर झाला व अर्जदाराने दस्त क्र.5 ते 10 चे देयकापर्यंत 1036 युनीटचे सरासरी देयकांचा भरणा केलेला आहे. दस्त क्र.10 देयकावर चालु रिडींग174 मधून सरासरी देयकाचे युनीट 1036 वळती केल्यावर गैरअर्जदाराने 709 युनीटची रक्कम कोणतेही व्याज न आकारता व्यावयास पाहिजे होती. अर्जदाराने दि.17.10.2013 चे पञ देवून बिल दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली. परंतु, गैरअर्जदाराने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली सेवा न्युनतापूर्ण सेवा ठरविण्यात यावी. गैरअर्जदाराने दि.23.10.2013 चे मीटर रिडींग 1745 मधून सरासरी देयक दि.27.5.2013 ते 23.10.2013 चे सरासरी युनीट 1036 वळतीकरुन 709 युनिटची रक्कम अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जमा केलेले रुपये 12,810/- मधून वळती करुन उर्वरीत रक्कम 18 टक्के व्याजासहीत अर्जदारास परत करावे. गैरअर्जदाराने 709 युनीटची 5 महिन्याचे भाग करुन प्रतिमाहा प्रमाणे आकारणी करावी. अर्जदारास झालेल्या मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 10,000/- व केसचा खर्च रुपये 5000/- देण्याची मागणी केली.
2. अर्जदाराने नि.क्र.5 नुसार 13 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.9 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.9 नुसार दाखल केलेल्या लेखी बयाणातील विशेष कथनात नमूद केले आहे की, अर्जदाराच्या अर्जावरुन अर्जदार आनंद पी.कोंडावार यांनी सदर फ्लॅट ञिलोक गोपीनाथ संधी यांना विकलेला आहे. त्यामुळे अर्जदार आनंद पी.कोंडावार हे या विज जोडणीबाबतचे ग्राहक होवू शकत नाही. तसेच खास मुखत्यारधारक ञिलोक गोपीनाथ संधी हे सुध्दा गैरअर्जदार कंपनीचे ग्राहक होऊ शकत नाही, कारण नियमाप्रमाणे आवश्यक तो अर्ज करुन सोबत विक्रीपञाची प्रत जोडून स्वतःचे नांवे अर्ज जोडणे अपेक्षित आहे. परंतु, ञिलोक गोपीनाथ संधी यांनी नियमानुसार मीटर स्वतःचे नावे करुन घेतलेले नाही. गैरअर्जदाराने पुढे असे नमूद केले की, मीटर क्र.9000041159 या विज मिटर व्दारे होणरा विज पुरवठा व त्याचा वापर बघता दि.8.3.2013 ते 8.4.2013 पर्यंत एप्रिल 2013 चे देयक तपासले असता एकूणविजवापर 403 युनीटअसे दिसते. तसेच मागील बिलावरुन तपासणी केली अतसा, मे 2012 मध्ये 625 युनिट, जुन 2012 मध्ये 250 युनिट, जुलै 2012 मध्ये 1191 असा वापर दिसून येतो. त्यामुळे, सदर मिटर व्दारे दि.8.4.2013 ते 8.5.2013 पर्यंत विज वापर बघता त्यावेळेचे रिडींग 257 युनिट असे पाहिजे. परंतु, ते रिडींग 9999 हा अंक पूर्ण करुन पूर्ववत 1 अंकापासून रिडींग घेतलेली आहे. गैरअर्जदाराचे संगणक प्रणालीमध्ये मे 2013 चे बिल “In access” असे दर्शवून मे 2013 चे सरासरी युनिट 172 चे देयक देण्यात आले. येणारा विज रिडींगचा फरक हा 347 युनिट हा 1397 या रिडींगमध्ये जोडून एकूण विज वापर 1744 युनिट देण्यात आले. देयक देतांना अर्जदाराचे सरासरी देयकाची भरलेली रक्कम रुपये 3528.70 वजा केली असून रही रक्कम बिलामध्ये वळती करुनच अर्जदारास 9900/- रुपयाचे देयक देण्यात आले. गैरअर्जदाराने अर्जदारास कुठलिही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नसून कोणतेही चुकीचे बिल दिलेले नाही. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
4. अर्जदाराने नि.क्र.10 नुसार शपथपञ, नि.क्र.17 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.12 सोबत दस्ताऐवज व नि.क्र.16 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : नाही.
2) आदेश काय ? :अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने दाखल नि.क्र.4 वर मुखत्यार पञाची पडताळणी करतांना असे दिसले की, अर्जदार श्री आनंद पी.कोंडावार यांनी श्री ञिलोक गोपीचंद संधी यांना मुखत्यारपञ लिहून सदर तक्रार दाखल करण्याबाबत नियुक्त केलेले आहे. सदर मुखत्यार पञामध्ये पान क्र.2 मध्ये असे नमूद आहे की, ‘’मी लिहून घेणार यांनी सन 2008 मध्ये साई दर्पण अपार्टमेंट फ्लॅट नं.एस-2, पंजीबध्द दस्ताऐवजाने विकत घेतला असून सन 2008 पासून आजपोवेतो सदर अपार्टमेंट वास्तव्यास राहात आहे.’’ यावरुन असे सिध्द होते की, वास्तविक विज देयकावरुन वाद अर्जदार व श्री ञिलोक गोपीचंद संधी यांचेमध्ये आहे. सदर विज वाद सन 2013 चा असून व अर्जदार श्री आनंद पी.कोंडावार यांनी वादातील विज देयकात नमूद असलेला विज वापर अर्जदाराने केली नसून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे या संज्ञेत मोडत नाही. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन अंतिम आदेश पारीत करण्ण्यात येत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 2.12.2014