जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/58 प्रकरण दाखल तारीख - 18/03/2009 प्रकरण निकाल तारीख – 06/07/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या 1. नारायण पि.दुलाजी जाधव, वय वर्षे 58, व्यवसाय शेती, अर्जदार. रा.पेवा ता.हदगांव जि.नांदेड. 2. नागोरावपि.गंगाराम जाधव, वय वर्षे 70, व्यवसाय शेती, रा.पेवा ता.हदगांव जि.नांदेड. विरुध्द. 1. उप-अभियंता, गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि, कार्यालय,हदगांव ता.हदगांव जि.नांदेड. 2. अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि, कार्यालय,अण्णाभाऊ साठे चौक,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.सुनिल जाधव. गैरअर्जदार क्र 1 व 2 तर्फे - अड.व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपञ (द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) अर्जदार क्र.1 व अर्जदार क्र. 2 हे सख्खे चुलत भाऊ आहेत व दोघेही रा.पेवा ता.हदगांव जि.नांदेड येथील रहीवाशी आहेत. अर्जदार क्र. 1 व 2 हे विज वितरण कंपनीचे ग्राहक आहे त्यांचा ग्राहक क्र.560770396188 असा आहे. अर्जदार क्र. 1 व 2 यांचे शेत गट क्र. 96 मधुन विज वितरण कंपनीच्या 11 के.व्ही. लाईनच्या तारा गेलेल्या आहे व या शेतातील पोल झुकल्याने दोन फेज मधील अंतर कमी होवुन ते एकमेकांना चिटकुन मोठी स्पार्किंग होऊन आगीचे गोळे अर्जदारांच्या शेतामध्ये पडले. त्यामुळे अर्जदार क्र. 1 यांचे गट नं. 96 मधील एक हेक्टर 49 आर ऊस दि.08/11/2007 रोजी जळुन खाक झाला. त्यामुळे त्यांचे रु.3,90,000/- चे नुकसान झाले. अर्जदार क्र. 1 चे गट क.96 मधील एक हेक्टर 20 आर मधील ऊस जळाल्यामुळे त्यांचे रु.1,80,000/- चे नुकसान झाले. अर्जदार क्र. 2 यांचे गट नं.96 मधील एक हेक्टर 61 आर मधील 80 आर जमीनीवर असलेले ऊसाचे जळाल्यामुळे त्यांचे रु.1,20,000/- चे नुकसान झाले. अर्जदार यांनी याबाबत पोलिस स्टेशन हदगांव येथे दि.08/11/2007 रोजी गुन्हा रजिस्टर क्र.7/2007 नोंदवुन दि.09/11/2007 रोजी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्यात आला. महसुल खात्यामार्फत मंडळ अधिकारी यांनी दि.10/11/2007 रोजी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन अर्जदार क्र. 1 व 2 यांचे शेत गट क्र.96 मधील दोन हेक्टर जमीनीवरील जळालेल्या ऊसाचा पंचनामा केला. अर्जदार क्र. 1 व 2 यांनी विद्युत निरीक्षक, नांदेड यांना दि.08/11/2007 रोजी शेत गट क्र.96 मधील ऊसाच्या संदर्भात अर्ज दिला होता व त्यावरुन त्यांनी त्यांचा अभिप्राय दिला आहे. अर्जदार क्र. यांनी ऊसाची लागवड व मजुरीचा खर्च असे एकुण रु.40,000/- खर्च केले आहे. अर्जदार क्र. 2 यांना ऊसाची लागवड व मजुरची खर्च असे एकुण रु.30,000/- खर्च आला आहे. अर्जदार क्र. 1 व 2 यांनी वेळोवेळी गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईची रक्कम मागणी केली असता ती देण्यात आली नाही. म्हणुन ही तक्रार दाखल करुन अर्जदारांनी अशी मागणी केली आहे की, अर्जदार क्र. 1 व 2 यांचे शेत गट क्र.96 मधील एकुण क्षेत्रफळ दोन हेक्टर जमीनीवरील जळालेल्या ऊसाच्या नुकसान भरपाई पोटी अर्जदार क्र. 1 यांना रु.2,30,000/- तसेच अर्जदार क्र. 2 यांना रु.3,90,000/- व्याजासह गैरअर्जदार यांचेकडुन मिळावेत. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे एकत्रितपणे दाखल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, प्रस्तुत प्रकरण दाखल करण्यास कोणतेही कारण उदभवले नसतांना जाणीवपुर्वक सदरील प्रकरण दाखल करण्यात आले आहे ते खोटे व चुकीचे आहे. प्रस्तुत प्रकरणात अर्जदार क्र. 2 यांचा प्रतिवादी यांच्याशी कोणताही कायदेशिर करार झालेला नाही किंवा सदर व्यक्ती ही विज वितरण कंपनीची ग्राहक नाही. त्यामुळे त्यांना ऊस जळीत प्रकरणा बाबत मागणी करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि दाखल कागदपत्रामध्ये अर्जदार क्र. 2 यांच्या नांवाचा उल्लेख नाही, म्हणुन तक्रार खारीज करावा. अर्जदार क्र. 1 व 2 हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत हे म्हणणे चुकीचे आहे. अर्जदार क्र. 1 व 2 यांच्या शेत गट क्र.96 मधुन विज वितरण कंपनीच्या 11 के.व्ही.लाईनच्या तारा गेलेल्या आहेत, हे म्हणणे चुकीचे आहे. अर्जदारांच्या शेतातील पोल झुकल्यामुळे दोन फेज मधील अंतर कमी होवुन ते एकमेकांना चिटकुन मोटी स्पार्किंग होत होती व त्यामुळे आगीचे मोठे गोळे निर्माण होत होते व ते अर्जदारा क्र.1 च्या शेतात पडत होते, हे म्हणणे सर्वस्वी खोटे व चुकीचे आहे. अर्जदार यांनी झुकलेले पोल सरळ करण्याची सुचना दिली होती हे म्हणणे चुकीचे आहे. अर्जदारांचे क्र. 1 व 2 म्हणणे की, त्यांचे गट नं.96 मधील दोन हेक्टर ऊस जळुन खाक झाला त्यामुळे त्यांचे रु.3,90,000/- चे नुकसान झाले हे म्हणणे सर्वस्वी खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराचे हे म्हणणे चुकीचे व खोटे आहे की, दि.08/11/2007 रोजी दुपारी 12.15 वाजता विद्युत वाहीनीतील दोषामुळे व तारांमधे घर्षण होवून आगीचे गोळे अर्जदार क्र. 1 यांचे ऊसामध्ये पडले व ऊस जळुन खाक झाला त्यामुळे त्यांचे रु.1,80,000/- चे नुकसान झाले. अर्जदार यांनी पोलिस स्टेशन हदगांव येथे गुन्हा 7/2007 नोंदविला व प्रत्यक्ष घटनास्थळावर जावुन जळालेल्या ऊसाचा पंचनामा केला हे म्हणणे सर्वस्वी खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराचे म्हणणे की, मंडळ अधिकारी यांनी दि.10/11/2007 रोजी प्रत्यक्ष घटनास्थळावर जावुन अर्जदाराच्या जळालेल्या ऊसाचा पंचनामा केला हे म्हणणे सर्वस्वी खोटे व चुकीचे आहे. अर्जदार क्र. 1 यांचे रु.1,80,000/- चे नुकसान झाले व लागवडी व मजुरीचा खर्च रु.40,000/- आला आणि मानसीक त्रासापोटी रु.10,000/- असे एकुण रु.2,30,000/- नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडुन मिळावेत, हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. अर्जदार क्र. 2 यांचे ऊस जळालेमुळे त्यांचे रु.1,20,000/- व लागवड आणि मजुरीचा खर्च रु.30,000/- आला आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- असे एकुण रु.1,60,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत, हे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांनी केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदारांचा अर्ज वीशेष रु.10,000/- खर्चासह खारीज करावा. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदप तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र याचा विचार होता खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार क्र.1 हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. अर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? नाही. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदार क्र. 1 यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 4. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. मुद्या क्र.1 - अर्जदार यांनी सदरची तक्रार गैरअर्जदार यांचे विद्युत वाहीनीतील दोषामुळे व तारांमध्ये घर्षण होऊन अर्जदार यांचे जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी केलेली आहे. अर्जदार क्र.1 यांनी सदर अर्जासोबत त्यांचे नांवावर असलेले लाईट बिल, 7/12 चा उतारा इ.कागदपत्र या मंचामध्ये दाखल केलेले आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र व त्यांनी दाखल केलेले कागदपत्र याचा विचार होता, अर्जदार क्र. 1 हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र.2 - अर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असलेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा अर्जदार क्र. 2 यांनी या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेले नाही, याचा विचार होता, अर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार यांचे ग्राहक नाहीत असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 3 - दि.08/11/2007 रोजी अर्जदार यांचे शेत गट क्र.96 मधील एक हेक्टर 20 आर एवढया क्षेत्रातील ऊस जळुन अर्जदार यांचे रु.1,80,000/- चे नुकसान झालेले आहे, असे अर्जदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये नमुद केलेले आहे. परंतु अर्जदार यांनी त्यांच्या गट क्र. 96 मधील एक हेक्टर 20 आर एवढया क्षेत्रात मागील वर्षी ऊसाचे अमुक इतके उत्पन्न घेतले होते व त्याचा भाव अमुक इतका असल्याबद्यल कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचामध्ये या अर्जाच्या कामी दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेले कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अर्जदार यांच्या नांवावर गट क्र.96 मधील एक हेक्टर 20 आर एवढया क्षेत्रामध्ये ऊस पेरा सन 2007-08 मध्ये दर्शविलेला आहे. अर्जदाराचे लाईट बिल ग्राहक असल्याची बाब निर्दशनास आणुन देते. अर्जदार यांनी सदर अर्जासोबत विद्युत निरीक्षण विभाग यांचा अहवाल दाखल केलेला आहे. सदर अहवालमध्ये शेतातील पोल झुकल्याने दोन फेज मधील अंतर कमी होऊन ते एकमेकांना चिटकुन मोठी स्पार्किंग झाली या जळीत ठिणग्या शेतात उभे असलेले ऊसाचे पिकावर, पाचोटयावर पडले त्यामुळे ऊस जळुन गेले, असे नमुद करण्यात आले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी दि.31/07/2007 रोजी गैरअर्जदार यांना दिलेले अर्ज दाखल केलेले आहे. सदर अर्जामध्ये लाईनचे पोल जमीनीवर टेकत आहेत, वगैरे मजकुर कळविल्याचे सदर अर्जावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत घटनास्थळ पंचनामा दाखल केलेले आहे. तलाठी पंचनामा इ. कागदपत्र दाखल केलेले आहे. सदर दोन्ही पंचनामामध्ये नुकसान भरपाईची रक्कमेमध्ये तफावत दिसुन येत आहे. त्यामुळे अर्जदार यांचे गट क्र.96 मधील एक हेक्टर 20 आर जमीनीमध्ये सरासरी 120 टन इतके अपेक्षित उत्पन्न धरल्यास सन 2007 चे बाजार भावाप्रमाणे रु.600/- प्रती टन इतके दर अपेक्षित धरल्यास 120 x रु.600 = रु.72,000/- इतके अर्जदाराचे उत्पन्न गृहीत धरले. अर्जदार यांनी दाखल केलेल्या फोटोवरुन अर्जदाराचे पुर्ण ऊस जळाल्याचे निष्पन्न होत नाही. अर्जदार यांनी त्यांचा ऊस सन 2007 मध्ये कारखान्याला घातला नाही, असेही त्यांचे अर्जामध्ये नमुद केलेले नाही. अर्जदार यांनी त्यांचा जळालेला ऊस कारखान्याला घातल्यास त्याची रक्कम म्हणजेच 1/3 इतकी रक्कम ( रु.24,000/-) एवढी अर्जदारांना मिळाली असल्याचे गृहीत धरल्यास रु.72,000–रु.24,000/- = रु.48,000/- एवढया रक्कमेचे अर्जदार यांचे नुकसान झालेले आहे, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी या अर्जासोबत ऊस दरा बाबत अगर त्यांचे मागील वर्षी निघालेल्या ऊस उत्पादना बाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नसल्याने सरासरी उत्पादन मे. मंचाने आदेशीत करणे भाग पडले आहे. अर्जदार यांच्या शेतातील ऊस गैरअर्जदार यांचे विद्युत तारांच्या घर्षनमुळे ऊस जळुन अर्जदारा यांचे नुकसान झालेले आहे. अर्जदार यांनी सदर ऊसाच्या नुकसान भरपाईची रक्कम गैरअर्जदार यांचेकडे मागणी करुनही त्यांनी ती अर्जदार यांना दिलेली नाही. याचा विचार होता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांना ऊस नुकसान भरपाईची रक्कम मागण्यासाठी या मंचात अर्ज करावा लागलाआहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागला आहे, याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडुन मानसिक त्रासापोटी व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे. 1986-2004 Consumer 7145 (NS), The Assistant Executive Engineer, Hubli and others. v/s Shri. Neelakanta Goiuda siddanagoouda patil. A) Consumer protection Act, 1986—section 2 (1) (o)—sevices – deficiency – electricity—loose electric wire hanging over the complainants field—sparking from electric wire – loss of sugarcane crops, coconut trees and chikku trees—whether there was deficiency of service on the part of the opposite party in not providing safe electric current through wires—yes- awarded compensation with interest. अर्जदार यांचास अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, अर्जदार यांचे वकीलांचा युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र, गैरअर्जदार यांचे वकीलांचा युक्तीवाद, वरील वरिष्ठ कोर्टाच्या निकालपत्राचा विचार होऊन खाली प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. आज पासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार क्र. 1 यांना खालील प्रमाणे रक्कमा द्याव्यात. 1. ऊस जळाल्याचे नुकसान भरपाई पोटी रु.48,000/- द्यावेत. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारीख 18/03/2009 पासुन प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत 9 टक्केप्रमाणे व्याज द्यावेत. 2. मानसिक त्रासापोटी रु.2,000/- द्यावेत. 3. अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक. |