निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 15/02/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/02/2010 तक्रार निकाल दिनांकः- 13/09/2010 कालावधी 06 महिने. 28 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. श्रीमती सुमनताई साहेबराव जाधव. अर्जदार वय 50 वर्षे.धंदा. घरकाम. अड.एस.एन.वेलणकर. रा.घर क्रमांक 1/219, प्लॉट क्रमांक 59,आदर्श नगर. बस स्टँड जवळ,सेलू ता.सेलू जि.परभणी. विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार. महा.राज्य विद्युत वितरण कंपनी म.परभणी. अड.एस.एस.देशपांडे. विभाग परभणी. . 2 कनिष्ठ अभियंता. महावितरण शहर कार्यालय,सेलू. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा. सौ.सुजाता जोशी. सदस्या. ) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेमुळे अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी. अर्जदार ही सेलू येथील सर्व्हे क्रमांक 213/1 मधील प्लॉट क्रमांक 59 मधील घर क्रमांक 1/219 येथील गेल्या 25 वर्षांपासून रहीवासी आहे.या मालमत्तेचे मालक वा अर्जदारामधील वाद न्यायालयात चालू आहे. अर्जदाराचे घरास तीचे दीर नारायण नामदेव यांचे नावेच ग्राहक क्रमांक 532530013181 अन्वये विद्युत पुरवठा चालू होता पण त्याची थकबाकी वाढल्याने तो कायमस्वरुपी बंद करण्यात आला.व 2007 मध्ये अर्जदाराने पूर्ण थकबाकी भरण्याची तयारी दाखवल्यावर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदाराचे नावे मीटर घ्यावे असे सुचवले व त्याप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 02/06/2008 पासून ग्राहक क्रमांक 532530073175 व मीटर क्रमांक 9000970196 व्दारा वीज पुरवठा चालू केला.अर्जदाराच्या जागेचे मालक श्री.शिखरचंदकाला यांचा मृत्यू झाल्यानंतर श्री.रोनित काला यांनी सदरील मालमत्तेची विक्री केली व त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास एक नोटीस दिली व त्यात अर्जदाराने खोटे कागदपत्र दाखल करुन विज पुरवठा घेतला आहे. व तो अर्जदाराने कागदपत्रे जमा न केल्यास 3 दिवसात तोडण्यात येईल असे नमुद केले. अर्जदाराने सर्व कागदपत्रे गैरअर्जदारांना दाखवुनही व प्रकरण कोर्टात असल्याचे सांगुनही गैरअर्जदाराने अर्जदाराचा दिनांक 13/05/2009 रोजी विद्युत पुरवठा बंद केला. त्यानंतर अर्जदाराने ग्राहक न्यायालयात दिनांक 21/05/2009 रोजी तक्रार क्रमांक 118/2009 दाखल केली न्यायमंचाने दिनांक 01/08/2009 रोजी अर्जदाराची तक्रार मंजूर केली दिनांक 10/02/2010 पर्यंत अर्जदाराचा विज पुरवठा व्यवस्थित चालू होता त्यानंतर दिनांक 08/02/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारास परत नोटीस दिली की,अर्जदाराने खोटे कागदपत्र दाखल केलेले आहेत व अर्जदाराचा विज पुरवठा दिनांक 11/02/2010 रोजी खंडीत केला गैरअर्जदाराने अर्जदाराचा वीज पुरवठा बेकायदेशिररित्या खंडीत करुन त्रुटीची सेवा दिलेली आहे म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली व विद्युत पुरवठा पुन्हा सुरु करण्यात यावा अशी मागणी केली आहे व मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत तिचे शपथपत्र,दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा, विद्युत देयक, न्यायमंचाच्या आदेशाची प्रत, गैरअर्जदाराशी केलेला पत्रव्यवहार इ.कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदारांना नोटीस मिळाली परंतु त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही म्हणून त्यांच्याविरुध्द विदाऊट से तक्रार चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकीलांचा युक्तीवाद यावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 5325300-73-17-5 अन्वये तो रहात असलेल्या जागेवर विद्युत पुरवठा घेतलेला आहे. हा विजपुरवठा दिनांक 02/06/2008 पासून चालू केलेला आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराला दिनांक 29/04/2009 रोजी एक नोटीस दिली व त्यात असे नमुद केले होते की,श्री.सोनवणे यांनी दाखल केलेल्या आक्षेपावरुन अर्जदाराने खोटे कागदपत्र दाखल करुन वीज पुरवठा घेतला आहे.व तो 3 दिवसात योग्य ती कागदपत्रे जमा न केल्यास तोडण्यात येईल. अर्जदाराने कागदपत्र गैरअर्जदारास दाखवुनही त्यांनी अर्जदाराचा दिनांक 13/05/2009 रोजी वीजपुरवठा बंद केला अर्जदाराने दिनांक 21/05/2009 रोजी तक्रार क्रमांक 118/2009 परभणी ग्राहक न्याय मंचात दाखल केली व या तक्रारीचा दिनांक 01/08/2009 रोजी निर्णय झाला व अर्जदाराची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारानी बेकायदेशिररित्या अर्जदाराचा विज पुरवठा खंडीत करु नये असा कायमस्वरुपी आदेश देण्यात आला.त्यानंतर अर्जदाराचा वीजपुरवठा दिनांक 10/02/2010 पर्यंत व्यवस्थित चालू होता.परंतु नि.6/9 वरील दाखल दिनांक 08/02/2010 च्या पत्रावरुन गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराला असे कळवले की,घर क्रमांक 1/38 हा दामोधर दिगंबरराव रेडे यांच्या नावावर आहे. व अर्जदाराचे नाव त्यावर नाही म्हणजेच अर्जदाराने विजपुरवठा घेण्यासाठी खोटी कागदपत्र गैरअर्जदाराकडे दाखल केली आहेत. अर्जदाराने दिनांक 11/02/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 ला (नि.6/10) पत्राव्दारे उत्तर दिले व सदरील जागेचा वाद हा मा.जिल्हा न्यायालय परभणी येथे चालू आहे असे कळवले तरीसुध्दा गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदाराचा विज पुरवठा नोटीस न देता दिनांक 11/02/2010 रोजी खंडीत केला. गैरअर्जदार हे तक्रार क्रमांक 118/2009 च्या दिनांक 01/08/2009 रोजीच्या निर्णया विरुध्द राज्य आयोगाकडे अपीलात गेलेले नाहीत.व प्रस्तुतच्या तक्रारीत सुध्दा त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही.यावरुन त्यांना तक्रार क्रमांक 118/09चा न्यायमंचाचा आदेश मान्य आहे व प्रस्तूतच्या तक्रारीतील अर्जदाराचे म्हणणे मान्य आहे असे मानावे लागेल. अर्जदाराला ग्राहक क्रमांक 532530073175 अन्वये विद्युत पुरवठा दिलेला आहे व ती त्याचा विद्युत देयकेही नियमित भरत असते हे तक्रारीत दाखल नि.6/7 व नि.6/8 वरील विद्युत देयक व पावतीवरुन सिध्द होते. असे असतानाही अर्जदाराचा विजपुरवठा गैरअर्जदार वारंवार खंडीत करुन अर्जदाराला त्रुटीची सेवा देत आहेत असे आम्हांस वाटते. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुनच गैरअर्जदाराने अर्जदाराला विज जोडणी दिली असणार व त्या विजजोडणीची अर्जदार थकबाकीदार नाही व अर्जदार व जागेचे मालक यांच्यातील वाद परभणी न्यायालयात चालू असतांना गैरअर्जदाराला जागेच्या मालकी संदर्भात परभणी जिल्हा न्यायालयात सदरील जागेबाबतचा निर्णय लागेपर्यंत काहीही आक्षेप घेता येणार नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत करुन त्याला मानसिक त्रास दिला आहे.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदारांनी अर्जदाराचा विज पुरवठा भविष्यात देयके थकल्याच्या कारणास्तव व सक्षम न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय इतर कोणत्याही कारणास्तव खंडीत करु नये. 3 गैरअर्जदाराने निकाल समजल्यापासून 30 दिवसांच्या आत मानसिक त्रासापोटी अर्जदारास रु. 4000/- व तक्रार अर्जाच्या खर्चाबद्दल रु.1000/- द्यावेत. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष. मा.दोन सदस्यानी दिलेल्या निकालपत्रातील आदेशाशी मी सहमत नसल्यामुळे मी माझे निकालपत्र वेगळे देत आहे. ( सौ.अनिता ओस्तवाल.) सदस्या (निकालपत्र पारीत व्दारा श्रीमती अनिता ओस्तवाल. सदस्या.) मुद्दे उत्तर 1 सदरचा वाद अर्जदारास मंचासमोर उपस्थित करता येईल काय नाही. 2 आदेश काय अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 माझ्या मते सदच्या प्रकरणाला Res – Judicate चे तत्व लागु पडते.कारण Res Judicate is another limitation on exercises of jurisdiction by consumer FORA. The rule of Res-Judicate has been enunciated in section 11 of civil procedure code reads thus. No Court shall try any suit or issue in which the matter directly & substantially in issue has been directly & substantially in issue in a former suit between the same parties, of between parties under whom they or any of them claim. Litigating under the same title in a Curt Competent to try such subsequent suit or the suit in which such issue has been subsequinty raised & has been heard & finally decided by such court. याचा अर्थ असा की, एकाच कारणावरुन अर्जदारास दोनदा तक्रार अर्ज मंचासमोर दाखल करता येणार नाही. सदर प्रकरणा पूर्वीही अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द दिनांक 21/05/2009 रोजी तक्रार क्रमांक 118/2009 याच कारणासाठी दाखल केली होती.तक्रार क्रमांक 118/2009 ची सुनावणी होवुन प्रकरणाचा मेरीटवर विचार करण्यात येऊन अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात आला. न्यायमंचाने दिलेल्या निकाला विरुध्द अर्जदार अथवा गैरअर्जदारा पैकी कुणीही अपीलात न गेल्यामुळे न्यायमंचाने दिलेला निकाल सर्वमान्य व अंतिम असल्याचा निष्कर्ष निघतो अशा परिस्थितीत पुन्हा Same Cause of action साठी अर्जदाराने सदरचा तक्रार अर्ज मंचासमोर दाखल केलेला आहे.माझ्या मते सदर प्रकरणास Res-Judicate चे तत्व लागु पडते.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मी खालील प्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2 संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती अनिता ओस्तवा. सदस्या.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |