नि. १७
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २८/२०११
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २९/०१/२०११
तक्रार दाखल तारीख : ०२/०२/२०११
निकाल तारीख : १६/०१/२०१२
----------------------------------------------------------------
शहाजी श्रीपती जाधव
व.व.५२, धंदा – शेती,
रा.साळसिंगे, ता.खानापूर
जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. उपअभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.
लेंगरे, ता.खानापूर, जि. सांगली
२. अधिक्षक अभियंता,
ग्रामीण विभाग,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.
एस.टी.कॉलनी रोड, विश्रामबाग, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.डी.एम.धावते, ए.बी.जवळे
जाबदार क्र.१ तर्फे : +ìb÷. श्री यू.जे.चिप्रे
जाबदार क्र.२ तर्फे: एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपले विद्युत कनेक्शनबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी मौजे साळसिंगे येथे त्यांचे शेतातील गोठयासाठी विद्युत कनेक्शन घेतले असून सदर कनेक्शनसाठी येणारी संपूर्ण विद्युत देयके तक्रारदार यांनी अदा केलेली आहेत. तक्रारदार यांना विद्युत पुरवठा करणारी वाहिनी दि.१५/९/२०१० रोजी शॉर्ट होवून जळाली व अर्जदाराच्या गोठयातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला. त्याबाबत तक्रारदार यांनी लागलीच जाबदार यांना फोन करुन कळविले. जाबदार यांनी विद्युत पुरवठा सुरळित करतो असे सांगूनही कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारदार यांनी शेवटी दि.२९/१०/२०१० रोजी जाबदार यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली. सदर नोटीस जाबदार यांनी न स्वीकारल्यामुळे परत आली. गोठयातील विद्युत पुरवठा बंद असल्याने अर्जदार यांना पिण्याच्या पाण्यासाठी असणा-या बोअरमधून पाणी उपसा करता आला नाही व त्यामुळे जनावरांसाठी पाणी विकत घ्यावे लागले. अर्जदार हे वीजपुरवठा पूर्ववत करणेबाबत जाबदार यांच्या कार्यालयात गेले असता जाबदार यांनी अर्जदार यांच्यावर खोटी केस दाखल केली. जाबदार यांनी दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी विद्युत पुरवठा पूर्ववत करणेबाबत व नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.२ ला शपथपत्र व नि.४ चे यादीने ६ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी याकामी नि.१४ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार नं.१ चे अधिकारी सचिन सदामते हे दि.२९/९/२०१० रोजी तक्रारदार यांच्या शेडमधील कनेक्शनची मीटर तपासणी करणेस गेले असता तक्रारदार यांनी हूक टाकून शेडमध्ये विद्युत पुरवठा घेतला होता त्यामुळे तक्रारदार यांना फोनवरुन बोलवून घेवून चोरुन वीज घेतलेसंबंधी चौकशी केली असता तक्रारदार यांनी मारहाण केली, दमदाटी केली, शर्टचा कॉलर धरला व सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून सदामते यांनी भा.दं.वि.कलम ३५३, ३४१, ५०४, ५०६ अन्वये विटा पोलिसांकडे दि.२९/९/२०१० रोजी साय.५.३० वा. रितसर फिर्याद दाखल केली आहे. सदर प्रकरणी तक्रारदार यांना अटकही झाली असून सदर प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. तक्रारदार यांना घरगुती वापरासाठी विज कनेक्शन देण्यात आले आहे. तक्रारदार यांना मंजूर लोड ०.३० KW असून तक्रारदार यांनी सदर वीज कनेक्शनचा वापर बोअरसाठी केला आहे. तक्रारदार यांनी जादा भारासाठी वीज कनेक्शनचा गैरवापर केला असल्याने वायर जळण्याची शक्यता असू शकते. तक्रारदार यांचे कृत्य हे चोरीच्या सदराखाली येत असल्याने तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र नाहीत. तक्रारदार यांना बाहेरुन विकत पाणी घ्यावे लागले ही बाबही जाबदार यांना मान्य व कबूल नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सबब तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१५ ला प्रतिज्ञापत्र व नि.१६ च्या यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
४. जाबदार क्र.२ यांना नोटीस लागूनही ते याकामी हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
५. तक्रारदार व जाबदार यांनी प्रस्तुत प्रकरणी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला नाही. तसेच तक्रारदार व जाबदार हे गैरहजर राहिलेने प्रस्तुत प्रकरण निकालासाठी ठेवणेत आले. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा दि.१५/९/२०१० रोजी खंडीत झाला आहे. जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सदरचा विद्युत पुरवठा हा अतिरिक्त भारामुळे वायर जळल्याने खंडीत झाला असल्याची शक्यता आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार व जाबदार यांच्या कथनावरुन तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सदरचा विद्युत पुरवठा पूर्ववत करणेची मागणी केली आहे. जाबदार यांनी त्याबाबत आक्षेप घेताना तक्रारदार यांनी विद्युत चोरी केली आहे तसेच मंजूर भार ०.३० KW असताना तक्रारदार यांनी बोअरसाठी सदरचे विद्युत कनेक्शन वापरले असलेमुळे कनेक्शनचा गैरवापर केला आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांची विद्युत चोरी केली हे दर्शविण्यासाठी जाबदार यांनी नि.१६/१ वर पोलिस स्टेशनला दिलेल्या एफ.आय.आर. ची प्रत दाखल केली आहे. सदर एफ.आय.आर. मध्ये नमूद असलेल्या भा.दं.वि. मधील कलमांचे अवलोकन केले असता विद्युत चोरीबाबत कोणतेही कलम असल्याचे दिसून येत नाही, केवळ सरकारी कामात अडथळा केला एवढेच सदर एफ.आय.आर. वरुन स्पष्ट होते. तक्रारदार यांनी मंजूर असलेल्या भारापेक्षा जास्त विद्युत भाराचा वापर केला असाही आक्षेप घेतला आहे. तक्रारदार यांच्या विद्युत देयकावर मंजूर भार ०.३० KW असा नमूद आहे. तक्रारदार यांनी त्यापेक्षा जास्त विद्युत भार वापरला असे जाबदार यांनी नमूद केले आहे. तक्रारदार यांनी नेमका किती विद्युत भार वापरला हे दर्शविणारा कोणताही पुरावा जाबदार यांनी सादर केला नाही. तसेच तक्रारदार यांनी जास्त विद्युत भार वापरला असेल तर त्याबाबत महाराष्ट्र विद्युत कायद्यातील तरतुदींनुसार कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही. यावरुन जाबदार यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांमध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांच्या अधिका-यांबरोबर कोणताही वाद उपस्थित होवून तक्रारदारावर कारवाई करण्यात आली असली व तक्रारदार यांनी जाबदार यांच्या अधिका-यांना मारहाण केली असेल अथवा सरकारी कामात अडथळा आणला असेल तर त्याबाबत योग्य तो निर्णय न्यायालयात होईल. परंतु त्या कारणास्तव तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा बंद ठेवणे समर्थनीय ठरत नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करणेबाबत आदेश करणे संयुक्तिक होईल असे या मंचाचे मत आहे.
६. तक्रारदार यांनी झालेल्या नुकसान भरपाईची मागणी म्हणून रक्कम रु.६६,३००/- ची मागणी केली आहे. सदर मागणी करताना तक्रारदार यांनी टॅंकरने पाणी आणण्याचा खर्च रक्कम रु.५१,३००/- ची मागणी केली आहे. तक्रारदार यांना त्यांच्या बोअरमधून पाणी उपसा करता आला नाही त्यामुळे खाजगी व्यक्तीकडून पाणी विकत घ्यावे लागले असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी सदरचे विद्युत कनेक्शन बोअरसाठी घेतले होते व त्यांच्या शेतामध्ये बोअर आहे असे दर्शविणारा कोणताही पुरावा सादर केलेला नाही तसेच दाखल विद्युत बिलावरुन मंजूर भार हा ०.३० KW इतका आहे त्यामुळे सदर बोअरसाठी किती एच.पी.ची मोटर वापरली व सदरचा विद्युत भार हा ०.३० KW पेक्षा कमी आहे असे दर्शविणारा कोणताही पुरावा तक्रारदार यांनीही दाखल केलेला नाही त्यामुळे तक्रारदार यांची सदरची मागणी अमान्य करण्यात येत आहे. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा गेले कित्येक बंद ठेवून जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे व त्यामुळे तक्रारदार यांना या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
७. तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज हा उपअभियंता व अधिक्षक अभियंता यांचेविरुध्द दाखल केला आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांना त्यांच्या पदनामाने सामील केले आहे. वस्तुत: तक्रारदार यांचे विद्युत कनेक्शन हे जाबदार क्र.१ कार्यालयाच्या अखत्यारित येत असलेने सदरचा आदेश जाबदार क्र.१ उपअभियंता यांचेविरुध्द वैयक्तिक न करता सदरचा आदेश जाबदार क्र.१ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लेंगरे तर्फे उपअभियंता यांचेविरुध्द करण्यात येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी तक्रारदार यांचा
विद्युत पुरवठा पूर्ववत करावा असा आदेश करण्यात येतो.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये ३,०००/- (अक्षरी रुपये तीन हजार माञ) अदा करावेत असा
जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक २८/२/२०१२ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò: १६/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.