Maharashtra

Ahmednagar

CC/15/438

Kavita Ramdas Kanade - Complainant(s)

Versus

Dy.Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd. - Opp.Party(s)

Garje/Kakade

01 Jan 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/15/438
( Date of Filing : 19 Oct 2015 )
 
1. Kavita Ramdas Kanade
Flat No.B-204,Shrikrishna Vrindawan Complex,Survey No.277/5-Plot No.1,Lendkar Mala,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dy.Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
Savedi,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Executive Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
Station Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Garje/Kakade, Advocate
For the Opp. Party: Adv.Arvind Kakani, Advocate
Dated : 01 Jan 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०१/०१/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारकर्त्‍यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.  तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारकर्तांनी सर्व्‍हे  क्रमांक २७७/५ मधील प्‍लॉट नं.१ वरील श्रीकृष्‍ण वृंदावन कॉम्‍प्‍लेक्‍स बिल्डिंग, अहमदनगर येथे विकलेली सदनीका घेतली होती. सदरील सदनीका खरेदी केल्‍यानंतर सामनेवाले क्र.१ कडुन नवीन वीज पुरवठा/ नवीन विद्युत मिटर कनेक्‍शन लावण्‍यासाठी कोटेशन घेतले व त्‍या कोटेशननुसार किंमत चार्जेस भरून घेण्‍याची विनंती केली. सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारकर्त्‍यांना आश्‍वासन दिले की, सदर वीज कनेक्‍शनची रक्‍कम भरल्‍यानंतर वीज पुरवठा/ कनेक्‍शन तक्रारकर्त्‍यांना देण्‍यात येईल. परंतु तसे न करता सामनेवाले यांनी तक्रारदारांना लेखी माहिती दिली की, तुम्‍ही ज्‍या ठिकाणी वीज कनेक्‍शनची मागणी करत आहात त्‍या ठिकाणी ग्राहक क्रमांक १६२०१८८९४५८१ या ग्राहकाची थकबाकी आहे, ती थकबाकी भरपेर्यंत आपले कनेक्‍शन स्‍थगित ठेवण्‍यात आलेले आहे. सदर बाब सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंबनाची होती. म्‍हणुन तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.        

३.   तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, तक्रारकर्त्‍यांची मालकीची सदनिकांना नविन विद्युत कनेक्‍शन देण्‍याचा आदेश व्‍हावा. तक्रारकर्त्‍यांना झालेल्‍या शारीरिक व मा‍नसिक त्रासापोटी भरपाई सामनेवालेकडुन देण्‍याचा आदेश व्‍हावा. 

४.   सदर प्रकरणाची पडताळणी करता असे दिसुन आले की, सदर प्रकरण दाखल करून घेणेबाबत सदर मंचातर्फे कोणताही आदेश नव्‍हता. परंतु सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली होती व सामनेवाले हे प्रकरणात हजर झाले व निशाणी १६ वर त्‍यांची कैफीयत दाखल केली. सामनेवालेने कैफीयतीत असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी सामनेवाले यांच्‍याविरुध्‍द लावलेले आरोप खोटे असुन त्‍यांना नाकबुल आहे. सामनेवालेकडे तक्रारकर्त्‍यांनी विजेचे कनेक्‍शन करीता कोणतेही कोटेशन भरलेले नाही, ते सामनेवालेचे ग्राहक नाहीत.  सामनेवाले यांनी पुढे असे कथन केले आहे की, नियमांप्रमाणे मुळ मालकाची संपुर्ण थकबाकीची रक्‍कम भरल्‍यानंतर नवीन वीजेचा पुरवठा देता येतो. सदरहु प्रकरणामध्‍ये पुर्वी दिलेला वीज पुरवठ्याची थकबाकी होती व ती भरण्‍यात आलेली नसुन विद्युत कायदा नियमांखाली नवीन वीज पुरवठा देता येत नाही. म्‍हणुन तक्रारकर्त्‍यांचे नवीन विद्युत पुरवठा करता नियमाप्रमाणे दिलेल्‍या  उत्‍तरात कोणतीही चुक नाही व कोणतहीही सेवेत त्रुटी किंवा अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब सामनेवालेतर्फे करण्‍यात आलेला नाही. सदर तक्रार विनाकारण दाखल करण्‍यात आली असुन ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती करण्‍यात आली आहे.

५.   सदर प्रकरणाची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, तक्रारदाराने अंतरीम आदेश मिळणेबाबत अर्ज निशाणी १० वर दाखल केलेला होता. सदर अर्जावर दिनांक ०६-११-२०१५ रोजी आदेश पारीत करण्‍यात आला होता. त्‍यात तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत काय, हा मुद्दा काढण्‍यात आला होता व सदर मुद्दयाचे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात आले होते. निशाणी १० वरील आदेशावर मंचाने तक्रारकर्त्‍यांना असे निर्देश देण्‍यात आले होते की, तक्रारकर्त्‍यांनी सामनेवालेकडुन पुरवठा असलेल्‍या वीज पुरवठ्याची थकीत रक्‍कम रूपये ५५,६८०/- भरावी तसेच सदर रक्‍कम भरल्‍यानंतर सामनेवालेने तक्रारकर्त्‍यांचे विद्युत नवीन कनेक्‍शन करीता पाठपूरावा करावा. त्‍यानंतर निशाणी ३० वर मंचाने सदर आदेशाची पुर्तता व त्‍याचा अहवाल सामनेवालेने सादर करण्‍याकरीता आदेश पारीत केला व त्‍या अनुशंगाने सामनेवालेने निशाणी ३३ वर नवीन वीज पुरवठाबाबत/ कनेक्‍शनबाबत, नवीन मिटरसंदर्भात देण्‍यात आलेला अहवाल सादर केला.

६.   तक्रारदाराने निशाणी ३४ वर सामनेवाले क्र.१ व २ यांनी निशाणी ३० वर झालेल्‍या आदेशाची पुर्तता केलेली नसल्‍याने त्‍यावर कोर्टाचा अवमान संबंधी कार्यवाही करण्‍यात यावी, असा विनंती अर्ज सादर करण्‍यात आला. सदर अर्जावर सामनेवालेंना नोटीस काढण्‍यात आली होती. त्‍यावर सामनेवालेने कोणतेही उत्‍तर दाखल केले नाही. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम २५ आणि २७ यात जरी कोणतत्‍याही पक्षकारांनी आदेशाची पुर्तता केली नाही तरी त्‍यावर कार्यवाहीची तरतुद आहे. सदर तरतुदीप्रमाणे तक्रारकर्त्‍यांनी अर्ज दिलेला नसल्‍याने निशाणी ३४ चा अर्ज फेटाळण्‍यात येतो.

७.   तक्रारकर्त्‍यांनी दाखल केलेली तक्रार, दस्‍तऐवज सामनेवालेने दाखल केलेला अर्ज, शपथपत्र, दस्‍तऐवज व उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकला असता मंचासमक्ष खालीलप्रमाणे कारणमिमंसेवरून आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

कारणमिमांसा

८.   तक्रारीची पडताळणी करतांना असे दिसुन येते की, तक्रारकर्त्‍यांना ज्‍या  बिल्‍डींगमध्‍ये पुरावा देण्‍यात आलेला होता त्‍या विद्युत पुरवठ्याची थकबाकी होती व ती नियमांप्रमाणे सामनेवालेने त्‍याच ठिकाणी नविन वीज कनेक्‍शन देऊ शकत नव्‍हते, ही बाब दाखल दस्‍त, शपथपत्र व निशाणी १० वर पारीत केलेल्‍या  आदेशाप्रमाणे आदेश होऊन सिध्‍द झालेली आहे. सबब सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारकर्त्‍यांना त्‍यावेळी नवीन वीज कनेक्‍शन देणेकरीता नाकारून कोणतही सेवेत त्रुटी किंवा तक्रारदाराप्रती कोणतीही अनुचीत व्‍यापारी प्रथा अवलंबीली नाही, असे सिध्‍द झालेले आहे. सबब सदर तक्रारीमध्‍ये कोणताही वाद शिल्‍लक राहीलेला नाही, असे दिसुन येते. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

१. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

२. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.