Maharashtra

Nanded

CC/09/209

Sardar Deepksingh Ratansingh Galliwale - Complainant(s)

Versus

Dy.Engineer,M.S.E.D.Co.Lit - Opp.Party(s)

ADV.P.B.Ayachit

17 Nov 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/209
1. Sardar Deepksingh Ratansingh Galliwale Visnupuri,NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Dy.Engineer,M.S.E.D.Co.Lit M.I.D.C.NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 17 Nov 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/209
 
                    प्रकरण दाखल तारीख -   30/09/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    17/11/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर           - सदस्‍या
        मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
सरदार दिपकसिंग पि.रतनसिंग गल्‍लीवाले,
वय वर्षे 50 धंदा व्‍यापार,                                 अर्जदार.
रा. विष्‍णुपूरी,नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
उपकार्यकारी अभियंता,                                 गैरअर्जदार.
महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्या,
एम.आय.डी.सी.नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील        - अड.पी.बी.आयचित.
गैरअर्जदारा तर्फे वकील       - अड.व्‍ही.व्‍ही.नांदेडकर.
 
निकालपत्र
(द्वारा- मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्‍या)
 
          अर्जदार यांची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार हे गैरअर्जदार विज वितरण कंपनीचे ग्राहक असून अर्जदार यांनी त्‍यांच्‍या राहत्‍या घरी विष्‍णुपूरी येथे ग्राहक क्र.550220211690 च्‍या पी.सी. 3 द्वारे पुरवठा घेतला आहे, तसेच अर्जदार यांनी गैरअर्जदार विज कंपनीद्वारे वेळोवेळी देण्‍यात आलेले विज देयक नियमीतपणे भरणा केलेला आहे. तसेच अर्जदार हे सदरील विज फक्‍त घरगुती वापराकरीताच वापरीत आहे. अर्जदार हे विज वितरण कंपनीचे कधीही कथबाकीदार नव्‍हते वा नाहीत. दि.17/09/2009 रोजी गैरअर्जदार विज वितरण कंपनीचे काही कर्मचारी अर्जदाराच्‍या घरी येवून जुने मिटर बदलून त्‍याऐवजी नवीन मिटर बसवायचे असे कारण सांगुन अर्जदाराच्‍या घरातील विज मिटर बदलण्‍यात आले, त्‍यावेळी अर्जदार यांचे घरी महीला व लहान मुलाशिवाय कोणीही उपस्थित नव्‍हते. तसेच अर्जदार यांच्‍या घरच्‍या मंडळीने गैरअर्जदार यांना जुने विद्युत मिटर बदलण्‍याचे कारण विचारले असता, गैरअर्जदार यांनी उडवाउडवीचे उत्‍तरे देवून त्‍यांच्‍या विनंतीला धुडकावून लावले आणि अर्जदाराचा विज पुरवठा बंद केला. सदरील घटना अर्जदार यांना कळल्‍यावर त्‍यांनी गैरअर्जदाराशी संपर्क साधला आणि विज मिटर बदलण्‍याचे कारणे विचारले व विद्युत पुरवठा तात्‍काळ सुरु करण्‍यण बाबत विनंती केली परंतु त्‍याचे एक न ऐकता त्‍यांनी दुस-या दिवशी येण्‍यास सांगितले त्‍यामुळे अर्जदारास दि.17/09/2009 रोजीची रात्र अंधारात काढावी लागली त्‍यामुळे अर्जदार व अर्जदाराच्‍या घरातील लहान मुले,स्‍त्री, वृध्‍द मानसांना फार त्रास सहन करावा लागला कारण सध्‍या पाऊस कमी असल्‍याने वातावरणात गरमी वाढली आहे. दि.18/09/2009 रोजी अर्जदार हा गैरअर्जदार यांच्‍या कार्यालयात गेले असता, गैरअर्जदार यांनी आश्‍चर्यकारकरित्‍या रु.79,020/- व रु.12,000/- असे एकुण रु.91,020/- चे बिल दिले. अर्जदार यांनी याबाबत विचारणा केली असता, त्‍यांनी सांगीतले की, अर्जदार यांच्‍यावर विद्युत चोरीचा आरोप लावून पोलीस केस पासुन बचाव करण्‍यासाठी आम्‍ही तुम्‍हाला हे बिल देत आहे ते भरा अन्‍यथा तुमचा विद्युत पुरवठा चालु करण्‍यात येणार नाही असे बजावले. अर्जदार यांनी सदरील बिल रद्य करुन न्‍याय देण्‍याची मागणी केली तसेच अर्जदार यांनी कोणत्‍याही प्रकारे विज चोरी केली नाही, अशी विनंती करुन गैरअर्जदार यांना विज पुरवठा चालु करण्‍याबाबत विनंती असता, गैरअर्जदार यांनी रु.30,000/- तात्‍काळ भरण्‍याच्‍या अटीवर खंडीत केलेला विज पुरवठा चालु करण्‍याचे मान्‍य केले व उर्वरित रक्‍कम आठ दिवसांत न भरल्‍यास कायमस्‍वरुपी विद्युत पुरवठा खंडीत करण्‍यात धमकी दिली. त्‍यामुळे अर्जदाराने घरातील दागदागीने विकून प्रतिवादी यांचेकडे रु.30,000/- चा भरणा केला कारण अर्जदार यांचे मुले शिक्षण घेत असून त्‍यांची परीक्षा जवळ आल्‍या आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे विज मिटर त्‍यांचे पश्‍चात बदलले तसेच विद्युत चोरी होते त्‍याबाबत गैरअर्जदार यांनी कोणतेही अहवाल,घटनास्‍थळ पंचनामा, अर्जदार यांचे विद्युत मिटर हाताळलेले होते याबाबतीत विद्युत मिटरची प्रयोग शाळेतुन तपासण्‍यात आलेले तपासणी अहवालाची पुर्तता न करता विज चोरी केल्‍याचा निष्‍कर्ष काढुन अर्जदार यांना बेकायदेशिररित्‍या दिलेले रु.79,020/- व रु.12,000/- असे एकुण रु.91,020/- चे विद्युत बिल रद्य करुन गैरअर्जदारानी खंडीत केलेला विज पुरवठा चालु करावे असे आदेश गैरअर्जदारांना देण्‍यात यावे अशी विनंती केली आहे.
     यात गैरअर्जदार यांना नोटीस देण्‍यात आली त्‍यांनी हजर होवून आपला लेखी जबाब दाखल केला, त्‍यांचे म्‍हणणे असे की, अर्जदार यांना तक्रार करण्‍याचे कोणतेही कारण घडले नसतांना प्रकरण दाखल केले आहे ते खोटे व चुकीचे आहे ते खारीज करण्‍यात यावे. सदरील तक्रार निव्‍वळ गृहितकांच्‍या आधारावर दाखल केले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. सदरील प्रकरण अर्जदारा अधिका-याच्‍या वैयक्तिक पदनामाने दाखल केले आहे हे प्रकरण विज कायदा 2003 च्‍या कलम 168 अन्‍वये दाखल करता येत नाही. सदरील प्रकरणांत अर्जदाराला विज देयक देण्‍यात आले होते ते बिल चोरुन वापरलेल्‍या विजेबद्यल विज कायदा 2003 चे कलम 135 प्रमाणे व त्‍या सोबत तडजोडीचे बिल विज कायदा 2003 चे कलम 152 अन्‍वये दिलेले होते. यापैकी अर्जदाराने त्‍याला दिलेल्‍या कलम 135 विज कायदयान्‍वये जे रु.91,020/- चे विज बिल दिलेले होते त्‍यापैकी रु.30,000/- ही रक्‍कम स्‍वमर्जीने, स्‍वखुशीने उत्‍स्‍फूर्तपणे भरलेली आहे. इतकेच नव्‍हे तर उर्वरित रक्‍कम लवकरात लवकर भरण्‍याचे आश्‍वासन दिलेले आहे. अर्जदाराच्‍या विरुध्‍द केलेल्‍या तपासणी अहवालामध्‍ये विजेचा अनाधिकृत वापर व विज चोरी सापडली होती त्‍यास अनुसरुन हे विजेचे बिल देण्‍यात आलेले असतांना अर्जदारांनी त्‍याची संपुर्ण रक्‍कम भरलेली नाही. सदर बिल विज हे विज चोरीचे बिल असल्‍या कारणाने त्‍यासाठी विज कायदा 2003 अन्‍वये वीशेष न्‍यायालयाची स्‍थापना करण्‍यात आलेली आहे त्‍यामुळे सदरील प्रकरण या मंचा समक्ष चालु शकत नाही. अर्जदाराने विज पुरवठा घेतला ही बाब खरी आहे. अर्जदाराने विज मिटरमध्‍ये अवरोध टाकण्‍यात आलेला होता त्‍यामुळे तेथे विजेची चोरी होत होती. गैरअर्जदाराच्‍या तपासणीमध्‍ये अर्जदाराचे विजेचे मिटर संथ गतीने चालतांना आढळुन आलेले आहे व त्‍यामध्‍ये कृत्रिम पध्‍दतीने नवीन अवरोध मिटरमध्‍ये टाकण्‍यात आलेले आढळुन आले आहेत. त्‍यामुळे जी विज वापरण्‍यात आली त्‍याचे निदर्शन मिटरवर करण्‍यात आलेले नाही. अर्जदारानी विजेचे देयक नियमीतपणे भरणा केला आहे हे म्‍हणणे खोटे व चुकीचे आहे व अर्जदार कधीही थकबाकीदार नव्‍हते हे म्‍हणेन चुकीचे आहे. अर्जदाराच्‍या पश्‍चात विज मिटर बदलले व पंचनमा केला नाही आणि आश्‍चर्यकारक रु.79,020/- चे बिल व रु.12,000/- असे एकुण रु.91,020/- दिलेले बिल रद्य करण्‍याची मागणी खोटी व चुकीचे आहे. अर्जदाराचे मिटरची तपासणी केली असता, तेथे एक विजेची जोडणी देण्‍यात आलेली होती व त्‍यावर मंजुर अधीभार 0.50 किलो वॅट इतका असतांना 2.37 किलो वॅट इतक्‍या क्षमतेची विज जोडणी करुन ठेवलेली होती त्‍यामध्‍ये किती टयुब,फॅन,कुलर कॉम्‍प्‍युटर, रेफ्रीजरेटर,सिएफएल आणि बल्‍ब आहे व इन्‍वटर किती आहे याची नोंदही घेतली असता 2.37 किलो वॅट चे विज वापर होताना आढळुन आले. मिटरची तपासणी अक्‍युचेक यंत्राने तपासणी केली असता सदर मिटर 89.00 टक्‍के संथ गतीने चालतांना आढळले. घटनास्‍थळ अहवाल जायमोक्‍यावर अर्जदारा समक्ष करण्‍यता आला त्‍यावर अर्जदार व संबंधीत अधिकारी यांची स्‍वाक्षरी आहे. अर्जदाराने वर्ष भरात केवळ 837 युनिट वाचन येऊ दिले मिटर 89.00 संथ गतीने चालत असल्‍या कारणाने युनिटची संख्‍या काढली असता ती 6772 इतकी आली. अर्जदाराने विज चोरी कबूलच केलेली नाही व त्‍याचे दायित्‍वही स्विकारुन सदर रक्‍कम भरण्‍यास मान्‍यताही दिलेली आहे. अर्जदाराने विजेचे बिल न भरल्‍या कारणाने त्‍यांचे विरुध्‍द पोलिस स्‍टेशनमध्‍ये फिर्याद क्र.4842/09 कलम 135 व 138 प्रमाणे फिर्याद दाखल करण्‍यात आली. अर्जदाराने त्‍यांच्‍या अर्जातील विफलता माहिती असतांना देखील गैरअर्जदार यांना हे प्रकरण बचाव करण्‍यास भाग पाडले आहे या करीता वीशेष रु.10,000/- खर्चासह अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
     अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र, त्‍यांनी दाखल केलेली कागदप तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपत्र तसेच त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र याचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित होतात.
    मूददे                                                उत्‍तर
 
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?                       होय.
2.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?          नाही.
3.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                        कारणे
मूददा क्र. 1   
                                          
                  अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून विज पूरवठा घेतलेला आहे. त्‍याबाबतची विज बिले अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये अर्जदार हे त्‍यांचे ग्राहक आहेत ही बाब नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले विज बिले यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मते आहे.
 
मूददा क्र.2                    
                   गैरअर्जदार यांच्‍या कर्मचा-यानी अर्जदार यांचे घरास दि.17.09.2009 रोजी भेट दिली असता अर्जदार विज चोरी करत असल्‍याचे सदर लोकांचे निदर्शनास आले वरुन दि.17.09.2009 रोजी गैरअर्जदार यांच्‍या कर्मचा-यांनी अर्जदार यांचे मिटर जप्‍ती पंचनामा करुन जप्‍त केलेले आहे. त्‍यावेळेचा स्‍पॉट इन्‍सपेक्‍शन रिपोर्ट, पंचनामा, मिटर जप्‍ती पंचनामा गैरअर्जदार यांनी या अर्जाचे कामी दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेला स्‍पॉट इन्‍सपेक्‍शन रिपोर्टवर   अर्जदार यांचे घरातील उपस्थित व्‍यक्‍ती म्‍हणजे स्‍वतः अर्जदार श्री.देवेंद्रसिंग गल्‍लीवाले यांची सही आहे. सदरची बाब अर्जदार यांनी गैरअर्जदार यांनी लेखी म्‍हणणे दिल्‍यानंतर कोणत्‍याही प्रकारे नाकारलेली नाही अगर तसे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना महाराष्‍ट्र इलेक्‍ट्रीसिटी अक्‍ट 2003 कलम 135 अन्‍वये विज चोरीचे बिल रक्‍कम रु.91,020/- दिलेले आहे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना अर्ज देऊन दि.17.09.2009 रोजीची घटना मान्‍य असल्‍याबाबत व सदरची तडजोड रक्‍कम भरण्‍यास तयार असल्‍याबाबत गैरअर्जदार यांना लेखी अर्ज देऊन कळविले आहे. सदरच्‍या लेखी अर्जावर अर्जदार यांची सही आहे. सदरचा अर्ज गैरअर्जदार यांनी कागद यादी सोबत या अर्जाचे कामी दाखल केलेला आहे. सदर अर्जामध्‍ये अर्जदार यांनी विज चोरीची घटना मान्‍य करुन गैरअर्जदार यांनी दिलेले असेंसमेंट बिल रु.79,020/- व रु.12000/- कंपाऊडींगचे बिल मान्‍य असल्‍याचे व सदर रक्‍कम भरण्‍यास तयार असले बाबत अर्जामध्‍ये नमूद केलेले आहे. अर्जदार यांनी रक्‍कम रु.30000/- एवढी रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडे भरलेली आहे. म्‍हणजेच अर्जदार यांना विज चोरीची घटना मान्‍यच आहे. गैरअर्जदार यांच्‍या भरारी पथकाने दि.17.09.2009 रोजी अर्जदार यांचे घरास भेट दिली असता अर्जदार हे बेकायदेशीर पणे विज चोरी करीत असल्‍याचे निदर्शनास आले वरुन गैरअर्जदार यांनी महाराष्‍ट्र विज कायदा 2003 कलम 135 प्रमाणे व महाराष्‍ट्र विज कायदा 2003 चे कलम 152 अन्‍वये कारवाई केलेली आहे व गैरअर्जदार यांनी दिलेले तडजोडीचे बिलापैकी काही रक्‍कम अर्जदार यांनी भरलेली आहे. यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
 
              गैरअर्जदार यांनी लेखी म्‍हणणे व शपथपञ दिल्‍यानंतर अर्जदार यांनी त्‍यांचे म्‍हणणेमधील कथन नाकारलेले नाही अगर त्‍यांचे प्रतिउत्‍तर या अर्जाचे कामी दाखल केलेले नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपञे अर्जदार यांनी नाकारलेली नाहीत अगर त्‍याबाबत शपथपञ अगर इतर कागदपञ या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल केलेले नाहीत. स्‍पॉट इन्‍सपेक्‍शन रिपोर्ट वर सही करणारी व्‍यक्‍ती ही श्री. देवेंद्रसिंग हे अर्जदार यांचे घरातील व्‍यक्ति नाही असे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये अर्जदार यांनी दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी विज चोरी बिलापोटी भरलेली रक्‍कम ही अंडरप्रोटेस्‍ट भरली आहे असे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे विरुध्‍द दि.09.10.2009 रोजी भारतीय विद्युत कायदा कलम 135,138 अन्‍वये फिर्याद दाखल केलेली आहे. त्‍यांची झेरॉक्‍स प्रत गैरअर्जदार यांनी या अर्जाचे कामी दाखल केलेली आहे.
 
              Consumer Disputes Redressal Commission Maharashtra State Mumbai, First appeal no.8/2009   Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. Vs. Mr.Umanath Tripathi      या निकाल पञामध्‍ये राज्‍य आयोगाने विज चोरीच्‍या केस बाबत त्‍यांचे मत खालील प्रमाणे नोंदविलेले आहे.
 
              We are finding that the complainant was charged with theft of electric energy. By drawing the panchanama at his house in presence of his wife, the meter which was running slowly was removed and it was taken to the office of MSEDCo.    In the same evening, complainant met MSEDCo. Officials, voluntarily paid charges demanded and also volunteered to deposit the compounding fees to avoid prosecution. After he paid the said charges. The electric energy was restored at the house of complainant. Mr. Jinsiwale Advocate for the appellant brought to our notice at page 68 of appeal paper book the receipt of compounding charages paid by complainant on 30/3/2007. It was paid without any protest, likewise the amount of Rs.12,790/- was also deposited on 30/3/2007 by the complainant in the office of MSEDC. When this is so, complainants allegation that by resorting to deficiency in service MSEDCo. Officials had recovered huge amount by wrongfully charging him is appearing to be false. When  any person pays compounding fees. It necessarily means that the said person accepts the allegation made by MSEDC. This is the view taken by us in First Appeal no. 1535/2007 Maharashtra State Electricity Distrubution Co. Ltd. & ors. Vs. Shri. R.K. Mishra decided on 25/2/2009. In that case we have already observed that respondent had already admitted commission of theft of energy and to avoid prosecution, he had paid compounding fees and then filed consumer complaint making wild allegations against MSEDCo. Officials. We held that MSEDCo. Officials were not guilty of any deficiency in service and in such a case, there cannot be consumer complaint at the instance of consumer, once it is found that he has committed commission ruling that there cannot be a consumer complaint in such case where compounding fee has been paid.
 
                             In the circumstances, we are of the view that in this case when theft of electric energy was established and the meter was legally reconnected by the complainant by paying compounding fees and by paying penalty imposed by the MSEDCo. Officials for reconnection of electric supply, there cannot be a consumer dispute alleging that the penalty recovered, compounding fee recovered was bad in law. In this view of the matter, we are inclined to quash and set aside the order passed by the District Consumer Forum. 
 
1.                 2007 (IV) CPJ page no.71 National Commission
           Bihar State Electricity Board & others. Vs Rajeshwar Thakur  
          (DR) and anothers.
2.                 2007 (IV) CPJ page no.89 National Commission
Vaid Raj Kishan Vs. Hariyana Vidhuyat Prasaran Nigam Ltd. & others.
3.                 2007 (IV) CPJ page no.113 National Commission
Sub Divisional Officer UHBVNL 
 
 
या निकाल पञामध्‍ये राष्‍ट्रीय आयोगाने विज चोरीच्‍या प्रकरणात
सेवेत कमतरता नाही असे नमूद केलेले आहे.
 
                अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेली कागदपञे, व त्‍यांचा यूक्‍तीवाद आणि गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपञ व गैरअर्जदार यांचेतर्फे केलेला यूक्‍तीवाद तसेच वरिष्‍ठ कोर्टाचे निकालपञ व वरील सर्व विवेचनाचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.
 
                        आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
 
 
 
                        श्रीमती सुजाता पाटणकर    
                                       सदस्‍या    
 
 
गो.प.निलमवार.
लघूलेखक