जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/122 प्रकरण दाखल दिनांक – 20/05/2009. प्रकरण निकाल दिनांक –02/09/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. शंकर उर्फ संतोष लक्ष्मणराव पाटील वय, 27 वर्षे, धंदा शेती रा. मरतोळी ता. देगलूर जि. नांदेड. अर्जदार विरुध्द 1. उपअभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, देगलूर ता. देगलूर जि. नांदेड. गैरअर्जदार 2. कनिष्ठ अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, करडखेड ता. देगलूर जि. नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड. अरुण जगताप गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.विवेक नांदेडकर निकालपत्र (द्वारा,मा.श्री. बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे मरतोळी ता. देगलूर येथील सर्व्हे नंबर 101/3 मधील शिवारात त्यांनी चार एकर ऊसाची लागवड केली आहे, 7/12 हा संगणकावर असल्यामूळे त्यात दोन एकर ऊसाची नोंद आहे व दोन एकराची नोंद तलाठयाने केलेली नाही. गैरअर्जदार यांच्याकडून 20 वर्षापूर्वी विज पूरवठा घेतलेला आहे. अर्जदाराच्या शेतीवरुन गेलेल्या विज खांबावरील तारा लूज होत्या. त्याबददल गैरअर्जदार यांचेकडे तक्रार ही केलेली आहे. दि.13.4.2008 रोजी दूपारी 1 ते 1.30 वाजताच्या सूमारास अर्जदाराच्या शेतातील विज तारा एकमेंकास घर्षन होऊन ठीणग्या पडल्या त्यामूळे शेतातील ऊसाने पेट घेतला व अर्जदाराचा चार एकर ऊस जळून गेला. यानंतर अर्जदाराने पोलिस स्टेशन मरखेल, जिल्हाधिकारी, नांदेड, तहसीलदार देगलूर व विद्यूत निरिक्षक नांदेड यांचेकडे तक्रार केल्या. त्यानुसार पोलिस स्टेशन मरखेल यांनी दि.13.04.2008 रोजी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच तहसिल, देगलूर तर्फे मंडळ अधिकारी यांनी दि.15.4.2008 रोजी शेताचा पंचनामा केला. विद्यूत निरीक्षक नांदेड यांनी शेतास भेट देऊन विज तारेच्या घर्षनामूळे ऊस जळालयाचा अहवाल दिलेला आहे. विद्यूत निरीक्षकाने प्रथम जो अहवाल दिला त्यांची पूर्नचौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथे तक्रार केली असता पून्हा विद्यूत निरीक्षक यांनी शेतक-याचे जवाब घेतले असता विज पूरवठा त्यावेळेस चालू असल्याचे सांगितले. विज तारा लूज असल्यामूळै एकमेकास स्पर्श होऊन ऊस जळाला असल्याचा सूधारित अहवाल दिला. अर्जदारास 50 टन एकराप्रमाणे एकूण 200 टन ऊस झाला असता. अर्जदाराने 46 टन ऊस जळीत ऊस कारखान्यास घातला त्यामूळै झालेले नूकसान हे रु.13,560/- चे झालेले आहे. अर्जदाराचा उर्वरित ऊस 154 टन ला रु.860/- टनाप्रमाणे भाव होता असे गृहीत धरल्यास रु.1,32,440/- चे नूकसान झाले असे एकूण रु.1,46,000/- चे नूकसान झाले. खर्चाबददल रु.10,000/- अर्जदाराने मागितले आहेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे अर्जदार यांनी सर्व्हे नंबर 101/3 या त्यांचे शेतात चार एकर ऊसाची लागवड केली हे म्हणणे खोटे आहे असे म्हटले आहे. तलाठयाने दोन एकर ऊसाची नोंद घेतली व दोन एकर ऊसाची नोंद घेतली नाही असे म्हणणे ही खोटे आहे. अर्जदार यांनी मागणी केलेले क्षेञ व 7/12 च्या उता-यामध्ये दर्शविलेले क्षेञ हे परस्पर विसंगत आहे. दि.13.4.2008 रोजी अर्जदाराच्या शेतातील ऊस दूपारी 1 ते 1.30 वाजण्याच्या सूमारास विजेच्या ताराच्या स्पर्श होऊन ठीणग्या ऊसावर पडल्या व चार एकर ऊस जळाला हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. तसेच 33 के. व्ही. उपकेंद्राची तपासणी केली असता त्यादिवशी सकाळी 9 ते 15 वाजेपर्यत सिंगल फेज लाईन चालू होती व थ्री फेज लाईन बंद होती म्हणजे जेथे घटना घडली तेथे दूपारी 3 वाजेपर्यत विज पूरवठा बंद होता. या कारणास्तव दूपारी स्पार्कीग होणे हे कदापी शक्य नव्हते. अर्जदाराच्या शेतामध्ये प्रति एकरी 50 टन ऊस होत होता हे ही म्हणणे खोटे आहे. त्यामूळै त्यांचे 154 टन ऊस जळून गेला व रु.1,32,000/- चे नूकसान झाले हे ही म्हणणे गैरअर्जदार यांना मान्य नाही. विद्यूत निरीक्षक यांनी आपल्या अहवालामध्ये गैरअर्जदाराचा दोष आहे असे कूठेही म्हटलेले नाही. त्यामूळे अर्जदार यांची तक्रार खोटी असून ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदाराच्या मरखेल येथील सर्व्हे नंबर 101/3 या शेतातील ऊसास आग लागल्याबददलचा एफ.आय. आर., दि.13.4.2008 रोजी पोलिस स्टेशन मरखेल यांना देण्यात आला त्यांची प्रत दाखल आहे. तसेच त्या दिवशी तहसीलदार देगलूर यांना कळविण्यात आले आहे. यानुसार मरखेल पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा दि.13.4.2008 रोजीला केला. यात गट नंबर 101/3 मध्ये अर्जदाराच्या शेतात विज वाहीनीचे दोन पोल असून सदर पोलवरुन गेलेले इलेक्ट्रीक वायर तूटून शेतातील ऊसावर पडून आग लागली यात चार एकर ऊस जळून गेला असे म्हटले आहे. दि.15.4.2008 रोजी मंडळ अधिकारी हनेगांव यांनी जायमोक्यावर जाऊन पाहणी करुन पंचनामा केला. त्यात दि.13.4.2008 रोजी दूपारी 1 वाजतेचे सूमारास शॉर्टसर्किटने आग लागल्यामूळे गट नंबर 101/3 मधील अंदाजे चार एकर ऊस म्हणजे 250 टन ऊस जळाला. अर्जदाराने जो 7/12 दाखल केलेला आहे त्यात अर्जदाराचे नांवावर 40 आर एवढीच जमिन आहे व व्यंकटराव लक्ष्मण व शंकर लक्ष्मण यांचे समाईक जमिन 5.01 एकर आहे. यात सन 2007-08 या हंगामात अर्जदाराचे नांवे 40 आर मध्ये ऊसाची लागवड केल्याचे 7/12 वर नोंद आहे. यासाठी अर्जदाराने तक्रारीमध्ये सूरुवातीला तलाठयाने नोंद घेण्यात चूक केल्याचे म्हटले आहे व यांची दूरुस्तीसाठी तहसीलदार यांना दि.21.6.2008 रोजी पे-याच्या दूरुस्तीसाठी अर्ज दिलेला आहे. हा अर्ज तहसीलदार यांना मिळाला काय यावीषयी पोहच पावती म्हणून दि.21.10.2008 चीच नोंद जरी असली तरी हा अर्ज तहसीलदार कार्यालयाचा शिक्का नसल्यामूळे कोणास प्राप्त झाला यावीषयी नक्की काय ते कळत नाही. अर्जदाराने ऊस जळाल्याबददलचे फोटोग्राफस दाखल केलेले आहेत. फोटोवरील तारीख बघितली असता दि.13.4.2008 रोजी 15.34 मिनिटांनी म्हणजे दूपारी 3.34 मिनिटांनी उभा हिरवा आंत जळालेला ऊस दिसत आहे. इलेक्ट्रीक किंवा विज वाहीनीवरील तारा हया सरळ गळून पडलेल्या दिसत नाहीत. शिवाय दि.13.4.2008 रोजी 15.47 मिनिटांनी म्हणजे 3.47 मिनिटांनी पूर्ण ऊस जळून खाली पडल्याचा फोटो दिसत आहे. यावरील तारा या खांबावर आहेत व त्या खाली पूर्णतः पडलेल्या दिसत नाहीत. दि.15.10.2008 रोजी म्हणजे घटनेच्या सहा महिन्यानंतर त्यांनी विद्यूत निरिक्षकाच्या अहवालावीषयी फेरचौकशी करण्यासाठी अधिक्षक अभिंयता औरंगाबाद यांना अर्ज लिहीला त्यानुसार त्यांनी परत जाऊन दि.22.1.2009 रोजी अहवाल दिला. त्यानुसार संबंधीत रोहीञावरील काही शेतक-याच्या जवाबानुसार जळीत घटनेच्या वेळी दुपारी 1.30 च्या दरम्यान काही काळासाठी विज वितरण कंपनीच्या तिन फेजचा विज पूरवठा चालू केला होता व त्यांच्या शेतीच्या मोटारी चालू होत्या. त्यामूळे विज कंपनीच्या धोकादायक सदोष विज संचमांडणीमूळे म्हणजेच लाईन लूज असल्याने फेज तार एकमेकांना स्पर्श झाले. त्यामूळे शॉर्ट सर्किट होऊन ऊसाचे पिकास आग लागली असल्याची शक्यता नाकारता येत नाही असा अभिप्राय दिला आहे. यांत शंकेचा फायदा अर्जदार यांना मिळाला पाहिजे. सदर शेतक-याने आपल्या शेतात 200 टन ऊस होऊ शकतो असे म्हटले आहे व भाव रु.860/- सांगितला होता पण जे गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याचे सन 2007-08 चे बिल दाखल केलेले आहे त्यात रु.560/- चा भाव दिला गेला असा उल्लेख आहे व या हंगामात रु.19,240/- व रु.6358/- ऊसाबददल अर्जदाराला मिळाल्याची नोंद आहे. या परिसरातील ऊसाचा सरासरी अंदाज घेतला असता 35 ते 40 टना पर्यत ऊसाचे उत्पन्न होऊ शकते. अर्जदार यांचे नांवावर 7/12 प्रमाणे एक एकर ऊसाची नोंद आहे. पेरा जरी 80 आर असला तरी एक एकर (40आर) पेरा हा समाईक आहे. याप्रमाणे उत्पन्न जर 40 टन जर गृहीत धरले तर 40 टन 560 रु.22400/- एवढे उत्पन्न अर्जदारास होऊ शकते. यात जळालेलया ऊसाचे नूकसान रु.13,560/- अर्जदाराने मागितलेले आहे. हे जरी असले तरी जळालेल्या ऊसाचे रु.22400/- या रक्कमेतून 25 टक्के रक्कम कपात करुन म्हणजे रु.5600/- येणारे उत्पन्न रु.16800/- एवढी रक्कम देण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत. ही रक्कम न देऊन सेवेत ञूटी केली आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसाचे आंत अर्जदार यांना रु.16800/- व यावर प्रकरण दाखल केलेल्या तारखेपासून म्हणजे दि.30.05.2009 पासून 9 टक्के व्याजासह रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यू. पारवेकर लघूलेखक |