(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.जव्हेरी, मा.सदस्य) (पारीत दिनांक : 25.11.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदाराकडे घरगुती वापराकरीता गैरअर्जदार वीज वितरण कं.लि.कडून विज पुरवठा होत आहे. अर्जदाराकडे, गैरअर्जदार यांचेकडून दि.15.12.2008 ला विजपुरवठा देण्यात आला असून, मीटर क्र.6107946567 हा आहे. अर्जदारास, गैरअर्जदार यांचेकडून बील देयक दि.7.7.2010 पासून मीटर फाल्टी दर्शवून मागील रिडींग 3087 नमूद करुन चालु रिडींग मीटर फाल्टी असे नमूद करुन, रक्कम 690/-, तसेच दि.5.8.2010 चे बील मागील रिडींग 3087 नमूद करुन चालू रिडींग मीटर फाल्टी नमूद करुन रक्कम 720/-, दि.7.9.2010 चे विज बीलात मागील रिडींग 3087 नमूद करुन चालु रिडींग मीटर फाल्टी नमूद करुन रक्कम 760/-, दि.4.12.2010 चे विज बीलात मागील रिडींग 3087 नमूद करुन चालु रिडींग मीटर फाल्टी नमूद करुन रक्कम 760/-, दि.2.2.2011 चे विज बीलात मागील रिडींग 3087 नमूद करुन चालु रिडींग मीटर फाल्टी नमूद करुन रक्कम 1500/-, दि.5.3.2011 चे विज बीलात मागील रिडींग 3087 नमूद करुन चालु रिडींग मीटर फाल्टी नमूद करुन रक्कम 780/- असे सर्व बीले ही एवरेज स्वरुपाचे अर्जदाराकडून गैरअर्जदाराने वसूल केले आहे. अर्जदार यांनी, माहे जुलै 2010 पासून तर माहे मार्च 2011 पावेतो एवरेज स्वरुपाच्या बिलाचा भरणा केला आहे. 2. गैरअर्जदार यांनी, अर्जदारास दि.1.2.2011 ते 1.3.2011 या कालावधीचे मागील रिडींग 3087 नमूद करुन चालु रिडींग 4203 दर्शवून युनीट 1116 युनीटचे रक्कम रुपये 8170/- चे चुकीचे व बेकायदेशीर बील जास्त रकमेचे पाठविले. अर्जदार यांनी या बिला बाबत दि.18.4.2011 व 30.4.2011 रोजी गैरअर्जदाराकडे तक्रार दिली व बिलाची दुरुस्ती करुन दुरुस्तीचे तपशिलवार माहिती सुध्दा देण्याची मागणी केली आहे. तसेच, फाल्टी मीटर बदलून देण्याची मागणी अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे केली आहे. गैरअर्जदार यांनी, दि.8.6.2011 चे बील सुध्दा 336 युनीट एवजेर स्वरुपाचे रुपये 900/- चे पाठविले. परंतु, गैरअर्जदार यांनी ही दुरुस्ती योग्यप्रकारे केली नाही व बिलाचे दुरुस्ती संबंधी तपशिलवार महिती अर्जदारास दिली नाही. तसे ही अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे 441 युनीटचे अतिरिक्त रक्कम भरली आहे. गैरअर्जदार यांनी दि.8.6.2011 चे देयक कशाप्रकारे दुरुस्त केले, यासंबंधीचा तपशिल देणे आवश्यक आहे व अर्जदारास सुधारीत बील तपशिलवार माहितीसह देणे आवश्यक आहे. 3. गैरअर्जदार यांनी, अर्जदाराकडे नवीन मीटर बदलवले आहे. याचा मासीक वापर लक्षात घेवून, वादातील बिले गैरअर्जदार यांनी दुरुस्त करुन, त्यावर कसालाही व्याज व इतर अतिरिक्त रक्कम न लावता, अर्जदारास वादग्रस्त कालावधीचे बील सुधारीत व तपशिलवार माहितीसह अर्जदारास देणे आवश्यक आहे. गैरअर्जदार यांनी बिलाची दुरुस्ती करण्यास अतिशय विलंब लावला व गैरअर्जदाराकडे बरेचदा चकरा मारावा लागल्या व अर्जदाराचे आर्थिक नुकसानही झाले, व अर्जदारास मानसिक व शारीरीक ञास झाला आहे. त्यामुळे, गैरअर्जदाराने, अर्जदाराकडे पाठविलेले चुकीचे बील देयक दि.7.7.2010 पासून 8.6.2011 पावेतोचे एवरेज स्वरुपाचे बील असल्याने रक्कम रुपये 8,170/- चे रद्द होण्याचा आदेश व्हावा. त्याचप्रमाणे, दि.8.6.2011 या बिलातील रक्कम 900/- ही सुध्दा रद्द होण्याचे आदेश व्हावे. अर्जदाराकडील नवीन मीटरचा मासीक वापर लक्षात घेऊन वादग्रस्त देयक हे दुरुस्त करुन देण्याचे आदेश व्हावे. वादग्रस्त देयक दुरुस्ती केल्याचे तपशिलवार माहिती अर्जदारास देण्याचे आदेश व्हावे. अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- गैरअर्जदार यांनी देण्याचे आदेश व्हावे, अशी मागणी केली आहे. 4. अर्जदार यांनी निशाणी क्र.5 नुसार 13 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन निशाणी क्र.9 नुसार लेखी बयान व निशाणी क्र.10 नुसार 5 दस्ताऐवज दाखल केले. 5. गैरअर्जदाराने लेखी बयानात नमूद केले की, संबंधीत ग्राहकाची या कार्यालयास चुकीच्या विज देयकाची तक्रार दि.18.4.2011 ला प्राप्त झाला. त्यानुसर, कार्यालयाने दि.25.4.2011 ला देयकात सुधारणा करण्यात आली व सुधारीत देयक ग्राहकाने तक्रार दिली त्याचदिवशी संबंधती सुधारीत देयक पाच-सहा दिवसांनी घेऊन जावे, असे मौखीक सांगण्यात आले. परंतु, ग्राहकाने कार्यालयात सुधारीत देयकाबाबत कोणतीही विचारणा न करता वरीष्ठ कार्यालयास दि.30.4.2011 ला पुनश्च तक्रार केली. वरीष्ठ कार्यालयाने तक्रारीची दखल घेऊन दि.16.5.2011 ला देयकात सुधारणा करण्यास कळविले. त्यानंतर, माहे एप्रिल 2011 व मे 2011 चे देयक मीटर मध्ये आकडे योग्य दिसत नसल्यामुळे पुन्हा 336 युनीट प्रती माह प्रमाणे अंदाजे संगणकाव्दारे बनविण्यात आले. सदर बाब, मीटर बदविण्याकरीता संबंधीत कनिष्ठ अभियंता यांना कळविण्यात आले. त्यांनी दि.21.6.2011 मीटर बदली केले. त्यानंतर, दि.18.7.2011 ला माहे एप्रिल 2011 ते जुन 2011 चे देयक सुधारीत करण्यात आले त्याचा फरक माहे जुलै 2011 च्या देयकात रुपये 3,981.34 पैसे एवढे समायोजीत करण्यात आले. सदर ग्राहकाने दि.18.4.2011 च्या तक्रारीपासून नंतर कार्यालयास भेट किंवा तक्रार दाखल केलेली नाही. परंतु, पहिल्याच तक्रारीच्या आधारावरती मार्च 2011 ते जुन 2011 च्या देयकापर्यंत कार्यालयाने स्वतः जातीने जक्ष ठेवून संबंधीत देयकात सुधारणा केलेली आहे. त्यामुळे, ग्राहकाने नोंदविलेली तक्रार ही संयुक्तीक वाटत नाही.
6. अर्जदाराने निशाणी क्र.11 नुसार शपथपञ दाखल केले. गैरअर्जदाराने निशाणी क्र.15 नुसार पुरावा शपथपञ दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व उभय पक्षाच्या प्रतिनिधी व वकीलानी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 7. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही गैरअर्जदार व्दारे चुकीचे देयक देऊन जास्त रक्कम लावण्यात आल्याबाबत आहे. अर्जदार व गैरअर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज व युक्तीवादावरुन स्पष्ट होते की, गैरअर्जदाराने, अर्जदाराची या न्यायमंचामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर सदर वादग्रस्त देयकात दुरुस्ती केलेली आहे.
8. गैरअर्जदाराने आपले लेखी उत्तरात व शपथपञात म्हटले आहे की, दि.18.4.2011 ला अर्जदाराची लेखी तक्रार वरुन गैरअर्जदाराने मौखीक म्हटले की, दुरुस्ती केलेले देयक 5-6 दिवसांनी घेऊन जावे, परंतु, जेंवहा दि.30.4.2011 अर्जदाराने पुन्हा लेखी तक्रार केली, तेंव्हा गैरअर्जदाराचे वरीष्ठ अधिका-यांनी दि.16.5.2011 नुसार गैरअर्जदाराचे कार्यालयास देयकात सुधारणा करण्याचे कळविले म्हणजे गैरअर्जदाराचे हे म्हणणे की, आंम्ही दि.18.4.2011 रोजी अर्जदाराची लेखी तक्रार मिळाल्या बरोबर देयक दुरुस्तीची कार्यवाही सुरु केली, हे संयुक्तीक नाही.
9. गैरअर्जदाराने नविन मीटर लावले त्याच्यातही वाचन फरक असल्यामुळे, गैरअर्जदाराने अर्जदारास आणखी चुकीची आकारणी केली व नंतर पुन्हा सुधारीत देयक दिले. मार्च-2011 ते जुन-2011, तसेच सप्टेंबर- 2011 चे देयक सुधारीत केले. परंतु, सप्टेंबर 2011 चे रुपये 128.50 फरकाचे देयक गैरअर्जदाराने, अर्जदारास दिलेले नाही, किंवा मंचात सुध्दा दाखल केलेले नाही. 10. एकंदरीत, गैरअर्जदाराच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे, अर्जदारास मानसिक, शारिरीक ञास झाला आहे. तसेच, गैरअर्जदाराने चुकीचे जास्तीचे देयक दिल्यामुळे व सदर देयकामध्ये झालेली विद्युत खपत आकारणी, व्याज इत्यादी जास्त लावण्यात आलेला आहे व तो गैरअर्जदाराने कसा कमी केला, कशी दुरुस्ती केली. याबाबतचा तपशिल सुध्दा अर्जदारास वेळेवर न देऊन, गैरअर्जदाराने न्युनतापूर्ण सेवा दिली असल्याचे सिध्द होते, असे या न्यायमंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन, या तक्रारीत खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर. (2) गैरअर्जदाराने, अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 1000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांत द्यावे. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक :25/11/2011. |