::: विरुध्द पक्षाने दाखल केलेला अर्ज निशाणी-16 वरील आदेश :::
( पारित दिनांक : 25/02/2015 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. या प्रकरणात विरुध्द पक्षाने निशाणी-16 नुसार तक्रार खारिज करणेबाबत अर्ज केला व त्यामध्ये नमुद केले की, प्रकरण हे कलम-126 मधील असेसमेंट बाबत आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचा यु.पी.पॉवर X मो. अनिस या निवाडयाप्रमाणे सदर प्रकरण या न्यायालयाच्या क्षेत्राधिकारा बाहेरील असल्यामुळे खारिज करण्यांत यावे.
2. विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला अर्ज व त्यावरील तक्रारकर्तीने दिलेले निवेदन वाचले. तक्रारकर्तीने ही तक्रार तिचे दिनांक 06/12/2010 रोजीचे विद्युत देयक जे विरुध्द पक्षाने विज कायदा 2003 चे कलम 126 अन्वये कार्यवाही करुन, तक्रारकर्तीला दिलेले आहे ते रद्द करावे याकरिता मंचात दाखल केली आहे. परंतु मा. सर्वोच्च न्यायालय यांचे निकालपत्र यु.पी.पॉवर कार्पोरेशन X मो. अनिस, निकाल ता. 01 जुलै 2013 च्या निर्देशानुसार विद्युत कायदा 2003 चे कलम 126 अंतर्गत निर्गमीत केलेल्या देयकाचा वाद हा ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदी अंतर्गत मंचात चालूच शकत नाही, असे नमूद आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांचा निशाणी-16, तक्रार खारिज करण्याबद्दलचा अर्ज मंजूर करण्यांत येतो. म्हणून, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार, अधिकारक्षेत्राअभावी खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
गिरी एस.व्ही.