निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/02/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 08/02/2013
तक्रार निकाल दिनांकः- 04/12/2013
कालावधी 09 महिने. 26 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
कल्पना भ्र. महेंद्रकुमार डोणगावकर. अर्जदार
वय 56 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.जे.एन.घुगे.
रा. घर क्र.22 बस स्टँड रोड,परभणी ता.जि.परभणी.
विरुध्द
1 उप कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण. कंपनी मर्या. अॅड.एस.एस.देशपांडे.
विद्युत भवन जिंतूर रोड,परभणी ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक असून तिचा ग्राहक क्रमांक 530010510294 असा आहे. त्याचा बिलींग युनीट क्रमांक 2313 आहे.
अर्जदाराचे म्हणणे आहे की, तिचा जुना मिटर क्रमांक 0058401 असा असून सदर मिटरव्दारे आलेली विज बिले चुकीच्या पध्दतीने देण्यात आलेली असून अर्जदाराच्या वांरवार पाठपुराव्या नंतर अर्जदारास नवीन मिटर बसवुन दिलेले असून सदर मिटर हे 09/12/2012 रोजी बदलले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार ही नियिमीत विज बिल भरणारी व्यक्ती असून वेळोवेळी बिल भरत आलेली आहे व अर्जदाराचे यापूढे म्हणणे आहे की, गैरअर्जदार अर्जदारास गेल्या 10 ते 12 महिन्या पासून चुकीचे व अवाजवी विज बिले दिले आहेंत अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास मार्च 2012, एप्रिल 2012, मे 2012, जुन 2012, जुलै 2012, ऑगस्ट 2012, सप्टेंबर 2012, ऑक्टोबर 2012, नोव्हेंबर 2012, डिसेंबर 2012 महिन्यात अनुक्रमे 427 युनीट, 1103 युनीट, 2385 युनीट, 2296 युनीट, 1246 युनीट, 758 युनीट, 642 युनीट, 1564 युनीट, 447 युनीट, 581 युनीट, लाईट बिले दिलेली असून ते पूर्णतः चुकीचे व अवाजवी असून ग्राहकावर अन्याय करणारे आहेत व सदरचे बिले हे पूर्णतः चुकीच्या पध्दतीने व फॉल्टी मिटरच्या कारणाने आलेली असून त्याबाबत अर्जदाराच्या पाठपुराव्यानंतर गैरअर्जदाराने 16 जुन 2012 रोजी पॅरलल मिटर बसवण्यात आले, सदर पॅरलल मिटर मध्ये व पूर्वीच्या फॉल्टी मिटर मध्ये विज वापराचे प्रचंड फरक दिसून येत असून त्यामध्ये एकुण 3112 युनीटचा फरक आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदारास चुकीचे बिले येण्यापूर्वी 200 ते 400 युनीट पर्यंत सरासरी वापर होता व त्याप्रमाणे अर्जदार ही विज बिले भरत होती, परंतु पॅरलल मिटर बसवल्यानंतर अर्जदारास स्पष्टपणे कळले की, ज्या मिटरच्या आधारे गैरअर्जदार तिला विज बिले देत होते ते मिटर दोषग्रस्त आहे. देण्यात आलेली विज बिले ही फॉल्टी स्वरुपाची आहेत, त्यामुळे जुन्या मिटरव्दारे आलेली बिले रद्द करण्यात यावीत तसेच त्यावेळी पूर्वी ज्यादा भरलेली रक्कम वापस करणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने गैरअर्जदारास भरपूर विनेदने दिलेली असून त्याची दखल गैरअर्जदाराने घेतलेली नाही याउलट 31 जानेवारी 2012 रोजी अर्जदाराचे विज कनेक्शन तोडण्यात आलेले आहे. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश करावा की, अर्जदाराचा खंडीत केलेला विज पुरवठा पुर्ववत करण्यात यावा व गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले माहे मार्च 2012 ते डिसेंबर 2012 चे लाईट बिल रद्द करण्यात यावे.
तसेच गैरअर्जदाराकडून अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई 90,000/- रु. तक्रार अर्ज खर्चापोटी 10,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्यासाठी नि.क्रमांक 6 वर 10 कागदपत्राच्या यादीसह 10 कागदपत्रे दाखल केली आहेत ज्यामध्ये डिसेंबर 2012 चे लाईट बिल, नोव्हेबर 2012 चे बिल, जुलै 2012 चे बिल, जुन 2012 चे बिल, मे 2012 चे बिल, अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 07/12/2012 रोजी दिलेला तक्रार अर्ज अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 05/12/2012 रोजी दिलेला तक्रार अर्ज, अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेला दिनांक 29/11/2012 चा तक्रार अर्ज, अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 08/10/2012 रोजी दिलेला तक्रार अर्ज, अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 31/08/2012 रोजी दिलेला तक्रार अर्ज इ. कादपत्रें दाखल केली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी निवेदन सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब दाखल केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतेही त्रुटीची सेवा दिलेली नाही व प्रत्यक्ष मिटर रिडींग प्रमाणे योग्य विज बिले दिली आहेत, परंतु अर्जदाराने लाईट बिले वेळोवेळी भरलेली नाहीत, त्यामुळे त्यांचे थकबाकी व थकबाकीवर व्याज वाढले, त्यामुळे विज बिलाची रक्कम जास्त दिसते व दिलेले बिले योग्यच आहेत म्हणून सदरचे तक्रार फेटाळावे. गैरअर्जदाराचे यापूढे म्हणणे आहे की, प्रतीवादीने अर्जदारास अवाजवी बिले दिलेली नाहीत. अर्जदाराचे म्हणणे की, सदरचे मिटर फॉल्टी आहे तर मग अर्जदाराने ते मीटर विज कंपनीच्या लॅब मध्ये फिस भरुन तपासून का घेतले नाही ? गैरअर्जदाराने मान्य केले आहे की, अर्जदाराचे मिटर बदलण्यात आले, परंतु सदरील मिटर हे इतर ग्राहकांचे मिटर बदलताना मिटर बदली मोहीमे अंतर्गत अर्जदाराचे मिटर बदलण्यात आले आहे फॉल्टी म्हणून नाही.
गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदाराचा विज वापर हा 1.00 K.W. इतका जास्त आहे व दिलेली बिले हे योग्य आहेत म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्च लावुन फेटाळण्यात यावा.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास मार्च 2012 ते डिसेंबर 2012
पर्यंतचे चुकीचे व अवाजवी लाईट बिले देवुन अर्जदारास
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे. ही बाब पुराव्यातील नि.क्रमांक 6/1 वरील डिसेंबर 2012 च्या लाईट बिलावरुन सिध्द होते तसेच अर्जदाराचा विजेचा वापर 1.00 K. W. इतका होते हे देखील नि.क्रिमांक 6/1 वरील लाईट बिलावरुन सिध्द होते. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास मार्च 2012 ते डिसेंबर 2012 पर्यंतचे लाईट बिल मार्च 2012 मध्ये 427 युनीट, एप्रिल 2012 मध्ये 1103 युनीट, मे 2012 मध्ये 2385 युनीट, जुन 2012 मध्ये 2296 युनीट, जुलै 2012 मध्ये 1246 युनीट, ऑगस्ट 2012 मध्ये 758 युनीट, सप्टेंबर 2012 मध्ये 642 युनीट, ऑक्टोबर 2012 मध्ये 1564 युनीट, नोव्हेंबर 2012 मध्ये 447 युनीट, डिसेंबर 2012 मध्ये 581 युनीटचे चुकीचे बिले ही फॉल्टी मिटरव्दारे दिले, म्हणून सदरची सर्व बिले रद्द करावेत हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाहीत, कारण अर्जदाराने पुरावा म्हणून फक्त डिसेंबर 2012 चे लाईट बिल, नोव्हेंबर 2012 चे लाईट बिल, जुलै 2012 चे लाईट बिल, जुन 2012 चे लाईट बिल, मे 2012 चे लाईट बिले दाखल केली आहेत.इतर कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडे बिलापोटी किती रक्कम भरली त्या मंचासमोर पुरावा म्हणून सादर केला नाही. तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या पुराव्यातील लाईट बिला मध्ये मिटर फॉल्टी असे कोठेही उल्लेख दिसून येत नही व तसेच सदर मिटर लाईट बिलाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, चालू रिडींग मधील रिडींग व फोटो मधील रिडींग मिळून येते व दिलेले बिले योग्य आहेत असे दिसते. तसेच अर्जदाराचे म्हणणे की, सदरचे मिटर हे फॉल्टी होते या बाबत अर्जदाराने त्याचे मिटर फॉल्टी होते या बाबत कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा मंचा समोर आणला नाही, त्यामुळे अर्जदाराचे सदरचे मिटर फॉल्टी होते हे ग्राहय धरता येणार नाही व गैरअर्जदाराचे म्हणणे योग्य आहे असे मंचास वाटते.
तसेच अर्जदाराचे तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता अर्जदाराने विनंती मध्ये मार्च 2012 ते डिसेंबर 2012 पर्यंतचे सर्व देयके फक्त रद्द करावे असे म्हणले आहे जे की, नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात आहे. अर्जदाराने सदरची बिले चुकीचे होते या बाबत कोणताही पुरावा मंचासमोर आणला नाही यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. असे मंचास वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.