Maharashtra

Amravati

CC/14/255

V.S.M.International Hotel - Complainant(s)

Versus

Dy Executive Engineer,MSEDC Ltd - Opp.Party(s)

Adv.N.B.Kalantri

04 Mar 2015

ORDER

District Consumer Redressal Forum,Amravati
Behind,Govt,PWD,Circuit House,(Rest House) Jailroad,Camp Area,Amravati
Maharashtra 444602
 
Complaint Case No. CC/14/255
 
1. V.S.M.International Hotel
Through Partner Bus Stand,Road,Amravati
Amravati
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dy Executive Engineer,MSEDC Ltd
Urban Sub Division No.01,Amravati
Amravati
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. M.K.WALCHALE PRESIDENT
 HON'ABLE MR. R.K.Patil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, अमरावती

 

ग्राहक तक्रार क्र.255/2014   

                         दाखल दिनांक : 28/11/2014

                         निर्णय दिनांक : 04/03/2015

व्‍ही.एस.एम. इंटरनॅशनल हॉटेल,              :

     तर्फे  भागीदार                       :

  1. विरेंद्र गिरीजाशंकर जयस्‍वाल              :

वय 54 वर्षे, धंदा  व्‍यापार,           :

 

  1. श्रीनिवास उर्फ सुनिल गिरजाशंकर      :
  2. ,वय 43 वर्षे, धंदा व्‍यापार         :

 

  1. मनोज गिरजाशंकर जयस्‍वाल              :

वय 39 वर्षे, धंदा  व्‍यापार,               :

सर्व रा. व्‍ही.एस.एम. इंटरनॅशनल हॉटेल, :

बस स्‍टॅन्‍ड रोड, अमरावती,            :

  • , ता. जि. अमरावती.        : .. तक्रारकर्ते..

 

  

          .. विरुध्‍द ..   

 

महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी मर्या.:

तर्फे उप कार्यकारी अभियंता, शहर उपविभाग :

क्रमांक 1, अमरावती, जि.अमरावती.        : ..विरुध्‍दपक्ष...

 

                  गणपूर्ती :  1) मा.श्री.मा.के.वालचाळे, अध्‍यक्ष

               2) मा.श्री.रा.कि.पाटील, सदस्‍य  

 

                 तकतर्फे : अॅड.श्री.एन.बी.कलंत्री 

                 विपतर्फे : अॅड.श्री.अळसपूरकर                                   

 

..2..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.255/2014

..2..

: न्‍यायनिर्णय :

( दिनांक 04/03/2015 )

 

 

मा.श्री.मा.के.वालचाळे, अध्‍यक्ष यांचे नुसार :       

 

1..       तक्रारकर्ता याने सदरचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत कलम 12 अन्‍वये दाखल केलेला आहे.   

          तक्रारकर्ता हयाच्‍या कथनाप्रमाणे  ते हॉटेल व्‍यवसाय करतात व त्‍यातून मिळणारे उत्‍पन्‍न हे त्‍याच्‍या उपजिविकेचे साधन आहे.  तक्रारकर्ता याने 2009 मधे सुभाश्री छाबडा यांचेकडून व्‍ही.एस.एम. इंटरनॅशनल हॉटेल खरेदी केले व तेंव्‍हा पासून या हॉटेलसाठी जो विज पुरवठा घेण्‍यांत आलेला आहे त्‍याचे देयके ते विरुध्‍दपक्ष यांचेकडे नियमितपणे भरत आहे.  या हॉटेलसाठी 13KW चा विज पुरवठा मंजूर करण्‍यांत आलेला आहे.

          दिनांक 26/08/2014 रोजी नागपूर येथील भरारी पथकाने हॉटेल मधील विज मिटरची तपासणी केली व तपासणी अहवाल तयार केला, ज्‍यावर तक्रारकर्ता याचे कर्मचारी श्री.ढोळे यांची सही घेण्‍यांत आली व अहवालाची प्रत देण्‍यांत आली.  त्‍या  अहवालात असे नमूद आहे की, मंजूर विज पुरवठा  हा 13KW असून हॉटेलमधे वापरण्‍यांत येत असलेला विज पुरवठा हा

..3..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.255/2014

..3..

 

11.70KW आहे त्‍यात असेही नमूद केले आहे की, हॉटेलसाठी 20KW चा जास्‍त दाबाचा विज वापर करण्‍यांत येत असल्‍याचे निदर्शनास आले व त्‍यामुळे LT II हे विचारात घेवून देयक देण्‍यांत यावे.

          तक्रारकर्ता याच्‍या कथनाप्रमाणे दिनांक 08/11/2014 रोजी विरुध्‍दपक्ष यांनी दिलेले रु.1,65,563/-  चे विज देयक त्‍यांना प्राप्‍त झाले, जे देयक भरारी पथकाच्‍या अहवाला नुसार देण्‍यांत आले,  याबद्दल तक्रारकर्ता याने विरुध्‍दपक्ष यांना पत्र लिहून बिल दुरुस्‍त करुन देण्‍याबाबत विनंती  केली परंतू विरुध्‍दपक्ष यांनी तसे केले नाही.    तसेच  विरुध्‍दपक्ष यांनी सप्‍टेंबर 2012 ते जानेवारी 2014 या कालावधीत रु.31,912/- अतिरिक्‍त आकार या सदरा खाली तक्रारकर्त्‍याकडून जास्‍तीचे घेतले  आहे, जे चुकीचे आहे.  20KW पेक्षा कमी दाबाचा विज पुरवठा असल्‍यास प्रति युनीट 6.77 चा दर व त्‍यापेक्षा जास्‍तीचा विज पुरवठा असल्‍यास रु.8.44 चा दर लागू होतो.  विरुध्‍दपक्ष यांनी केलेली आकारणी ही चुकीची असून दिलेले रु.1,65,563/- चे विज देयक हे चुकीचे असल्‍याने तक्रारकर्ता याने हा तक्रार अर्ज दाखल करुन  विरुध्‍दपक्ष यांनी

..4..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.255/2014

..4..

 

सेवेत त्रुटी केली असल्‍याने हे देयक रद्द  करण्‍यांत यावे तसेच रु.31,912/-  विरुध्‍दपक्ष यांनी व्‍याजासह परत करावी व तक्रारकर्ता यांना जो मानसिक त्रास झाला त्‍याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशा विनंतीसह हा तक्रार अर्ज दाखल केला.

2.        विरुध्‍दपक्ष यांनी निशाणी 12 ला लेखी जबाब दाखल करुन त्‍यात दिनांक 26/08/2014 रोजी भरारी पथकाने तक्रारकर्ता याच्‍या हॉटेलला भेट देवून मिटरची तपासणी केल्‍याचे कबूल केले.    तक्रारीतील इतर मजकूर त्‍यांनी नाकारला.  विरुध्‍दपक्ष यांनी हे नाकारले की, तक्रारकर्ता यांना 13KW चा विज पुरवठा मंजूर करण्‍यांत आला होता व त्‍यांचा विज वापर हा 11.70KW आहे.  तक्रारकर्ता यांना वादातीत देयक देण्‍यांत आले तसेच रु.31,912/- अतिरिक्‍त त्‍याच्‍याकडून घेण्‍यांत आले हया बाबी नाकारल्‍या.    त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे त्‍यांनी या हॉटेलमधे ज्‍या ग्राहकास विज पुरवठा करण्‍यांत आलेला त्‍या नावाने ते देयक देण्‍यांत आले.  तक्रारकर्ता यांनी केलेली मागणी विरुध्‍दपक्ष यांनी नाकारली.

          विरुध्‍दपक्ष यांनी त्‍यांच्‍या अधिकच्‍या जबाबात असे नमूद केले की, तक्रारकर्ता हे त्‍यांचे ग्राहक नाही. व्‍ही.एस.एम.

..5..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.255/2014

..5..

 

इंटरनॅशनल हॉटेल या ठिकाणी जो विज पुरवठा देण्‍यांत आला तो सुभाषरानी छाबडा  यांच्‍या नांवाने देण्‍यांत आला कारण ते या  हॉटेलच्‍या मालक होते, मिटर हे त्‍यांच्‍या नांवाने आहे.     तक्रारकर्ता यांनी विज मिटर त्‍याच्‍या नांवाने हस्‍तांतरीत करुन घेण्‍याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही.   भरारी पथकाने तपासणी केल्‍यानंतर सुध्‍दा तक्रारकर्ता याने मिटर त्‍याच्‍या नांवाने हस्‍तांतरीत  करण्‍याबाबतचा अर्ज दिलेला नाही.  त्‍यांनी असे कथन केले की, ग्राहकास या हॉटेलच्‍या विज वापरावरुन जी देयक देण्‍यांत आली त्‍यात हे स्‍पष्‍ट नमूद आहे की, मंजूर विज भार हा 11.70KW असून वापरण्‍यांत येणारा विज भार हा 13KW  चा आहे.   भरारी पथकाने तपासणी केल्‍यानंतर जो अहवाल दिला त्‍यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, व्हि.एस.एम. इंटरनॅशनल हॅाटेल येथे मंजूर विज भारा पेक्षा जास्‍त विज भाराचा वापर करण्‍यांत येत आहे.  एकूण विज भार हा 27.37KW  असल्‍याचे दिनांक 10/12/2014 च्‍या अहवालावरुन स्‍पष्‍ट होते.  वरील सर्व कारणावरुन तक्रार अर्ज रद्द करावा अशी विनंती विरुध्‍दपक्ष यांनी केली.

..6..

 

 

 

 

ग्रा.त.क्र.255/2014

..6..

 

3.        तक्रारकर्ता याने निशाणी 14  ला प्रतिउत्‍तर दाखल करुन अहवालात विज भाराबद्दल जो उल्‍लेख केला आहे त्‍याबद्दलचा खुलासा  केला.  तसेच विरुध्‍दपक्ष यांनी लेखी जबाबात त्‍यांचे विरुध्‍द केलेले कथन हे नाकारले. 

4.        तक्रार अर्ज, लेखी जबाब दोन्‍ही पक्षांनी दाखल केलेले दस्‍त तसेच तक्रारकर्त्‍यातर्फे अॅड.कलंत्री, विरुध्‍दपक्षातर्फे अॅड.अळसपूरकर यांचा युक्‍तीवाद विचारात घेवून खालील मुद्दे  विचारात घेतले. 

मुद्दे                                     उत्‍तर  

 

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष यांचा ग्राहक        

आहे का ?                              ... नाही

 

  1. हा तक्रार अर्ज या मंचापुढे चालू शकतो

का ?                                 ... नाही

 

  1. आदेश काय ?             ... अंतीम आदेशाप्रमाणे

 

कारणे  व निष्‍कर्ष 

5.मुद्दा क्र.1 ते 2 :-  तक्रारकर्ता यांचे स्‍वतःचे कथन असे आहे की, त्‍यांनी 2009 मधे व्हि.एस.एम. इंटरनॅशनल हॉटेल सुभाषरानी

 

..7..

 

 

 

ग्रा.त.क्र.255/2014

..7..

 

छाबडा  व राजेश छाबडा यांचेकडून  खरेदी केले.  विरुध्‍दपक्षातर्फे अॅड.अळसपूरकर यांनी असा युक्‍तीवाद केला की, या हॉटेलमधे जे विज मिटर आहे ते सुभाषरानी छाबडा यांच्‍या नांवाचे असून विज देयक हे त्‍यांच्‍याच नांवाने देण्‍यांत येतात.   तक्रारकर्ता यांनी हॉटेल 2009 मधे खरेदी केल्‍यापासून ते मिटर त्‍यांच्‍या नांवाने हस्‍तांतरीत करण्‍याबाबत कोणताही अर्ज दिलेला नाही त्‍यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्‍दपक्ष यांचे ग्राहक होत नाही.  यासाठी त्‍यांनी [1] Neelam Chhabra  ..Versus.. Uttar Haryana Bijli Vitran Nigam Ltd., III (2012) CPJ  65 (NC), [2] Keshav Babu Tare ..Versus.. Executive Engineer, M.S.E.B. & Anr., I (2004) CPJ 262  या निकालांचा आधार घेतला.

6.        तक्रारकर्त्‍यातर्फे  अॅड.कलंत्री  यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारकर्ता याने हे हॉटेल छाबडा यांच्‍याकडून  खरेदी केल्‍यानंतर 2009 पासून ते या हॉटेलला पुरविण्‍यांत आलेल्‍या  विजेचा उपयोग हॉटेलसाठी करीत आहे.  या हॉटेलचे उत्‍पन्‍न हे त्‍यांच्‍या उपजिविकेचे साधन आहे.  सदर विज पुरवठयाचा उपयोग हा तक्रारकर्ता करीत असल्‍याने ते लाभार्थी होतात व त्‍यामुळे ते

 

..8..

 

 

 

ग्रा.त.क्र.255/2014

..8..

 

विरुध्‍दपक्ष यांचे ग्राहक ठरतात.   अॅड.कलंत्री यांनी Surendra Kumar Modi ..Versus.. Mukhya Sachiv & Ors.,  2000 (1) CPR 455 या निकालाचा आधार घेतला.

7.        अॅड.कलंत्री यांनी ज्‍या निकालाचा आधार घेतला आहे त्‍या प्रकरणातील तक्रारकर्ता हा त्‍यांच्‍या आजोबांच्‍या नांवावर असलेल्‍या विज मिटरचा उपयोग घेत होता व त्‍यामुळे तो लाभार्थी आहे असा निष्‍कर्ष काढण्‍यांत आला.   या तक्रार अर्जात तक्रारकर्ता याने असे नमूद केलेले नाही की, छाबडा हे त्‍यांचे नातेवाईक आहे.   वरील न्‍यायनिर्णया नंतर निलम छाबरा व केशव बापू तारे हे न्‍यायनिर्णय आलेत.  ज्‍यात असे नमूद आहे की,  विज पुरवठा हा तक्रारकर्ता यांच्‍या नांवाने नसल्‍याने तो विज कंपनीचा ग्राहक होत नाही. हे दोन्‍ही निकाल अॅड.अळसपूरकर यांनी केलेल्‍या  युक्‍तीवादास पृष्‍टी देतात त्‍यामुळे असा निष्‍कर्ष काढण्‍यांत येतो की, तक्रारकर्ता हे विरुध्‍दपक्ष यांचे ग्राहक होत नाही यावरुन मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्‍तर देण्‍यांत येते.

8.        तक्रारकर्ता याने भरारी पथक नागपूर यांनी हॉटेलला दिनांक 26/08/2014 रोजी भेट देवून त्‍यातील विज मिटरची जी

..9..

 

 

ग्रा.त.क्र.255/2014

..9..

तपासणी केली त्‍याबद्दलच्‍या तपासणी अहवालाची प्रत दाखल केली.  त्‍यावरुन असे दिसते की, हॉटेलमधे 20KW पेक्षा जास्‍त विज वापर करण्‍यांत येतो.   या अहवालात Sr.No.6 मधे असे नमूद आहे की, मंजूर लोड 13KW आहे.  परंतू एकूण विज वापर हा 20KW पेक्षा जास्‍त असल्‍याचे  Sr.No.17 ला नमूद आहे.  तक्रारकर्ता याने दाखल केलेल्‍या निशाणी 2 सोबत विज देयकाच्‍या प्रतीत असे नमूद आहे की, मंजूर भार 11.70KW  व वापरण्‍यांत येणारा संलग्‍न भार हा 13KW आहे.  तक्रारकर्ता याने आजपर्यंत याबाबत आक्षेप घेतल्‍याचे दिसत नाही. त्‍यामुळे भरारी पथकाने दिनांक 26/08/2014 रोजी त्‍यांच्‍या अहवालात मंजूर भार 13KW असे जे लिहले आहे ते योग्‍य नाही.  मंजूर भार 13KW आहे असे जरी गृहीत धरले तरी तक्रारकर्ता यांचा विज वापर हा 20KW पेक्षा जास्‍त असल्‍याचे निदर्शनास आल्‍याचे या अहवालात नमूद आहे.   अशा परिस्थितीत हा तक्रार अर्ज या मंचास चालविण्‍याचा अधिकार येत नाही हा निष्‍कर्ष  काढतांना मा.राष्‍ट्रीय आयोग, नवी दिल्‍ली  यांनी Ramnath Panjiyar …versus... Urban Electric Supply Division & Ors., IV (2014) CPJ 143 (NC) या निकालाचा आधार घेण्‍यांत आला.  या निकालात असे नमूद आहे की, जर ग्राहक हा

..10..

 

 

 

ग्रा.त.क्र.255/2014

..10..

मंजूर भारापेक्षा जास्‍त विज भाराचा उपयोग करीत असेल तर तो वापर हा विद्युत अधिनियमाच्‍या कलम 126 अंतर्गत विजेचा बेकायदेशीर वापर ठरतो व त्‍या परिस्थितीत  ग्राहक मंचास तक्रार चालविण्‍याचा अधिकार येत नाही.

9.        वरील विवेचनावरुन असा निष्‍कर्ष काढण्‍यांत येतो की, हा तक्रार या मंचासमक्ष  चालू शकत नाही व त्‍यावरुन मुद्दा क्र. 2 ला नकारार्थी उत्‍तर देण्‍यांत येते.

10.       मुद्दा क्र. 1 व 2 याला नकारार्थी उत्‍तर देण्‍यांत आल्‍याने  तक्रार अर्ज रद्द होतो.  सबब खालील आदेश.    

अंतीम  आदेश

  1. तक्रार अर्ज रद्द करण्‍यांत येतो.
  2. विद्युत कायदयात नमूद केलेल्‍या योग्‍य       अधिका-यापुढे वादातीत बिलाबद्दल तक्रार करण्‍याची मुभा तक्रारकर्ता यांना देण्‍यांत येते.
  3. उभय पक्ष यांनी स्‍वतःचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  4. उभय पक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यांत याव्‍यात.

 

 

दि.04/03/2015      (रा.कि.पाटील )                 (मा.के.वालचाळे)

          सदस्‍य                         अध्‍यक्ष

 
 
[HON'ABLE MR. M.K.WALCHALE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.K.Patil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.