निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 17/05/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 07/06/2010 तक्रार निकाल दिनांकः- 07/03/2011 कालावधी 07 महिने 22 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सना उल हक़ पिता तुराबुल हक़ सिद्दीकी. अर्जदार वय 40 वर्षे.धंदा.स्वंयरोजगार. अड.डि.यु.दराडे. रा.फेरोज टॉकिज जवळ.परभणी ता.जि.परभणी. विरुध्द 1 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. गैरअर्जदार. व्दारा- डेप्युटी एक्झीक्युटिव्ह इंजिनियर. अड.एस.एस.देशपांडे. अर्बन सब-डिव्हीजन.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) विज बिलाबाबत प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदाराच्या मालकीचे फेरोज टॉकिज जवळ स्वयंरोजगार म्हणून सुरु केलेले इलेक्ट्रीक रिपेअरचे छोटेशे दुकान आहे.दुकानासाठी विज कनेक्शन तारीख 18/07/2009 रोजी घेतलेले आहे.दुकानात फक्त एकच विजेचा बल्ब वापरला जातो.परंतु विज कनेक्शन घेतल्यानंतर गैरअर्जदारांनी सुरवातीला बरेच दिवस रिडींग न घेता अंदाजे सरासरीची बिले दिली.बिलावर देखील रिडींग कॉलमखाली RNA असा उल्लेख केलेला आहे.एवढेच नव्हेतर अर्जदाराला जुलै 2009 मध्ये विज कनेक्शन दिले असतांना गैरअर्जदारांनी विज बिलमात्र 22/07/2008 चे बेकायदेशिर विज घेतल्या नसल्याच्या काळातील दिले आहे.त्यामध्ये समायोजित रक्कम रु.3,422/- दाखविले.या संदर्भात अर्जदाराने 19/01/2010 रोजी रिडींग प्रमाणे बिले मिळावी म्हणून मागणी केली होती परंतु गैरअर्जदाराने त्याची दखल घेतली नव्हती उलट विज कनेक्शन बंद करण्याची धमकी दिली.त्यानंतरही तारीख 06/05/2010 चे अवास्तव रक्कमेचे बील दिले.अशा रितीने चुकीची बीले देवुन मानसिक त्रास दिला म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुंतची तक्रार दाखल करुन तारीख 06/05/2010 चे बेकायदेशिर असल्याचे रद्द व्हावे व मानसिकत्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) पुराव्यातील कागदपत्रात नि.6 लगत एकुण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर तारीख 08/09/2010 रोजी लेखी जबाब ( नि.13 ) सादर केला.तक्रार अर्जामध्ये त्यांचे विरुध्द केलेली सर्व विधाने साफ नाकारली आहेत. त्यांचे विरुध्द खोटी तक्रार केली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.दिलेली बिले योग्य असून त्या बाबतीत कोणतीही सेवात्रुटी झालेली नाही असे नमुद करुन पुढे असा खुलासा केला आहे की, विज कनेक्शन दिल्या पासून अर्जदाराने तारीख 16/03/2010 रोजी रु.1500/- गैरअर्जदाराकडे डिपॉझिट केलेल्या रक्कमे खेरीज एकदाही बिलाची रक्कम भरलेली नाही.एप्रिल 2009 मध्ये रिडींग न मिळाल्यामुळे फक्त सरासरी 15 युनिटचे बिल दिले.अर्जदाराने घेतलेले विज कनेक्शन हे व्यापारी कारणासाठी घेतलेले आहे त्यामुळे प्रस्तुतची तक्रार ग्राहक मंचात चालणेस पात्र नाही तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र ( नि.15) दाखल केले आहे. प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड.ताठे आणि गैरअर्जदार तर्फे अड.एस.एस.देशपांडे यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 अर्जदाराची तक्रार ग्रा.सं.कायद्याखाली चालणेस पात्र आहे काय ? होय. 2 गैरअर्जदारांने अर्जदारास चुकीचे बील देवुन सेवात्रुटी केली आहे काय ? नाही. 3 निर्णय ? अंतिम आदेशा पमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदारने स्वयंरोजगाराचा इलेक्ट्रीक रिपेअरींगच्या व्यवसायासाठी गैरअर्जदाराकडून कर्मशियल कॅटेगिरीतील विज कनेक्शन तारीख 18/07/2009 रोजी घेतलेले असल्याचे पुराव्यात दाखल केलेल्या विज बिलावरुन दिसत असले तरी अर्जदाराने स्वयंरोजगाराच्या व्यवसायासाठी ते घेतलेले असल्यामुळे ग्रा.सं.कायद्याच्या कलम 2 (1) (डी) स्पष्टीकरण क्लॉज प्रमाणे अर्जदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याखाली गैरअर्जदाराचा ग्राहक म्हणून निश्चित चालु शकते. पुराव्यात नि.6/1 वर तारीख 07/07/2009 रोजी गैरअर्जदारांनी दिलेले कोटेशन तथा डिमांडनोटची छायाप्रत दाखल केलेली आहे.अर्जदाराचे म्हणणे असे की, जुलै 2009 मध्ये गैरअर्जदाराकडून त्याला विज कनेक्शन मिळाले असतांना विज बिल मात्र त्या पूर्वीच्या एक वर्षाच्या तारखेचे म्हणजे 22/07/2008 चे बेकायदेशिररित्या दिले.तसेच 03/01/2010 चे देखील चुकीचे व अवास्तव रक्कमेचे दिले त्यानंतर पुन्हा 06/05/2010 तारखेचे ही वरील प्रमाणे चुकीचे बिल दिले.मात्र अर्जदाराने पुराव्यात 22/07/2008 चे विज कनेक्शन घेतल्या अगोदरचे तथाकथीत बिल दाखल केलेले दिसत नाही.त्यामुळे त्यासंबधीची तक्रार ग्राहय धरता येणे कठीण आहे.तारीख 03/01/2010 चे वादग्रस्त बिल पुराव्यात ( नि.6/4) दाखल केलेले आहे सदरचे बिल सरासरी 15 युनिटचे आहे.त्यामध्ये मागील थकबाकी 3462.79 दाखवलेली असली तरी ते वादग्रस्त आहे असे नमुद करुन दुरुस्तीचे रु.155/- चे बिल दिल्याचे त्यावर नोंद आहे.त्यानंतरचे दुसरे वादग्रस्त तारीख 06/05/2010 चे बिल (नि.6/5) दाखल केली आहे.ते पाहता ते बिल ही सरासरी 15 युनिटचे असून बिलाची आकारणी 294.48 अधिक थकबाकी 3161.94 मिळून 3460/- चे बिल दिले आहे.अर्जदाराने त्या बिला बाबत गैरअर्जदाराकडे तक्रार केली होती किंवा ते अवास्तव व चुकीचे बिल आहे असा लेखी अर्ज दिल्याचाही ठोस पुरावा प्रकरणात सादर केलेला नाही.विज कनेक्शन घेतल्यानंतर तारीख 16/03/2010 रोजी रु.1500/- एवढीच रक्कम गैरअर्जदाराकडे त्याने जमा केली होती हे गैरअर्जदारांनी लेखी जबाबात मान्य करुन विज कनेक्शन घेतल्यापासून वरील रक्कमे खेरीज एकपैसाही अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जमा केलेला नव्हता असे लेखी जबाबात व शपथपत्रात ठामपणे सांगितले त्यामुळे वरील रक्कमे खेरीज गैरअर्जदाराकडे अर्जदाराने विज कनेक्शन घेतल्यापासून आलेल्या विज बिलापोटी वेळोवेळी गैरअर्जदाराकडे बिलाच्या रक्कमा भरलेलया होत्या या संबंधीचा कसलाही ठोस पुरावा प्रकरणात सादर केलेला नाही त्यामुळे गैरअर्जदारांच्या म्हणण्यात निश्चित तथ्य आहे.अर्जदाराने तक्रार अर्जात नमुद केलेल्या जी दोन वादग्रस्त बिले रद्द करुन मागण्याची विनंती केली आहे ती बिले मुळातच थकबाकीसह असल्यामुळे व तारीख 03/01/2010 चे बिल ( नि.6/4) कमी करुन दिलेले पुराव्यातून दिसून येत असल्यामुळे याबाबतीत गैरअर्जदाराकडून मुळीच सेवात्रुटी झालेली नाही.अर्जदाराने ग्राहक मंचात केलेली प्रस्तुतची तक्रारी संबंधी कोणताही ठोस पुरावा प्रकरणात सादर केलेला नसल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी व 2 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |