::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, अधि.वर्षा जामदार मा.सदस्या) (पारीत दिनांक : 19.07.2012) 1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असुन, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
2. अर्जदार हा गै.अ.विज कंपनीचा ग्राहक असुन अर्जदाराचा ग्राहक क्र.450010730525 हा असुन मिटर क्रं.6112081251 हा आहे. अर्जदाराला मार्च 2011 पासुन ते सप्टेंबर 2011 पर्यंत 50 युनिट प्रमाणे ऐव्हरेज बिल येत गेले. अर्जदाराने त्या सर्व बिलाचा भरणा केलेला आहे. परंतु गै.अ.ने सप्टैंबर 2011 पासुन मिटर वाचनाप्रमाणे बिल न पाठवता अधिकचें बिल अर्जदाराला पाठविले. त्यामुळे अर्जदाराने ही बाब गै.अ.च्या लक्षात आणून दिली. व गै.अ.ने नविन मिटर बसवून दिले. त्या मिटरची रिडींग 3885 अशी होती. गै.अ.ने मागील रिडींग 3885 व चालु रिडींग 6522 असे नमुद करुन 2754 युनिटचे बिल अर्जदाराला पाठविले. गै.अ.नी रु.14510/- चे पाठविलेले बिल पूर्णतः चुकीचे होते. गै.अ.ने नविन मिटर बसविल्याचा चाचणी अहवाल अर्जदाराला दिला नाही. तसेच बसविलेले मिटर जुने असुन नादुरुस्त आहे. अर्जदाराने गै.अ.यांना दि.25/10/2011 ला अर्ज देऊन बिलात दुरुस्ती करण्याची विनंती केली. परंतु गै.अ.ने दुरुस्ती करुन दिलेली नाही. त्यामुळे अर्जदारास जुने विज मिटर लावून तपासणी न करता दिलेले असुन एक महिण्याचे बिल रु.14510/- हे चुकीचे दिल्यामुळे न्युनतापुर्ण सेवा दिलेली आहे. त्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार गै.अ.विरुध्द दाखल करुन दि.14/09/2011 व 15/10/2011 चे बिल रद्द करुन मिटर वाचनाप्रमाणे बिल दयावे अशी मागणी केली आहे. तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश गै.अ.विरुध्द व्हावा अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारी बरोबर नि.5 प्रमाणे 8 दस्ताऐवज दाखल केलेले आहे. व नि.6 प्रमाणे अंतरिम अर्ज दाखल केलेला आहे. 3. गै.अ.ने हजर होऊन नि.12 प्रमाणे आपले लेखीउत्तर दाखल केलेले आहे. गै.अ.ने आपल्या लेखीउत्तरात असे म्हटले आहे की, अर्जदाराचा जुना विज मिटर क्रं.2010107255 हा होता व फेब्रुवारी 2011 पासुन विज मिटर क्रं.112081251 हे नविन मिटर बसविण्यात आले हे मिटर लावतांना त्याची रिडींग 3885 होती. नविन मिटर लावल्या बद्दलची नोंद आवश्यक त्या रजिस्टर मध्ये घेतल्यानंतर, त्या संबंधीची नोंद ग्राहकांच्या विज वापराबद्दल आणि मिटर क्रं. संबंधात ठेवत असलेल्या उता-यात घ्यावयाची असते. हे काम गै.अ.कंपनीने खाजगी ऐजन्सीला दिले असुन त्यांनी या नविन मिटर क्रंमांकाची नोंद जवळपास 8 महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोंबर 2010 मध्ये घेतली त्यामुळे ही नोंद कम्प्युटर मध्ये घेई पावेतो जरी नविन मिटर, वापरलेली एकुण विज वापर दाखवित होते तरी सुध्दा ग्राहकांच्या संगणकिय खात्यात नविन मिटरची नोंद झाली नव्हती. म्हणून मार्च 2011 पावेतो चे बिल 50 युनिट प्रति महिन्याप्रमाणे सरासरी देण्यात आले. परंतु ऑक्टोंबर 2011 मध्ये जेव्हा नविन मिटर क्रं.ची नोंद ग्राहकाच्या संगणकिय खात्यात घेण्यात आली, तेव्हा मागील रिडींग 3885 ते चालु रिडींग 6522 यानुसार मार्च 2011 ते ऑक्टोंबर 2011 असे एकूण 8 महिण्याचे विज वापर 2754 युनिट निघाले. त्यामुळे एकूण विज बिलाच्या रक्कमेतुन सरसरी बिलाची रक्कम 1078.65/- (मार्च 2011 ते सप्टेंबर 2011) कमी करुन त्याप्रमाणे वापर केलेल्या 8 महिण्याची बिलाची रक्कम 14510/- चे देयेक अर्जदाराला देण्यात आले. जरी या बिलामध्ये देयक कालावधी दि.03/09/2011 ते दि.03/10/2011 दर्शविलेला असला तरी या बिलामध्ये 8 महिण्याचे देयक समाविष्ट आहे. याची स्पष्ट नोंद आहे. त्यामुळे अर्जदाराकडुन कुठलिही जास्तीची रक्कम गै.अ. कंपनीने वसुल केलेली नसुन वापरलेल्या विजेचे देयकच बिलाव्दारे मागीत आहे. व कुठलिही न्युनतापूर्ण सेवा अर्जदाराला दिली नाही. जर अर्जदारास देयकाची एकमुस्त रक्कम देण्यास कठीण जात असेल तर गै.अ.कंपनी ही रक्कम दोन भागात विभागुन अर्जदारास देयकाची रक्कम भरण्याची मुभा देण्यास तयार आहे. तक्रारकर्त्याची तक्रार मुळात चुकीच्या कथनावर असुन महहत्वाच्या बाबी लपवुन खोटी तक्रार दाखल केली असल्याने ही तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. // कारणे व निष्कर्ष // 4. अर्जदाराने ही बाब मान्य केली आहे की, अर्जदाराला मार्च 2011 ते सप्टेंबर 2011 पर्यंत सरासरी 50 युनिटचे विज देयक देण्यात आले. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्ताऐवजा मध्ये सरासरी देयका बद्दल आक्षेप घेतल्याचा एकही दस्ताऐवज नाही. गै.अ.चे म्हणणे आहे की, अर्जदाराकडे नविन मिटर 20/02/2011 ला लावण्यात आले. दि.20/02/2011 ला नविन मिटर लावले त्यामध्ये मिटर रिडींग 3885 होती ही बाब दोन्ही पक्षांनी मान्य केली आहे. अर्जदाराचे देयके बघता जुन्या मिटर प्रमाणे अर्जदाराचा विजवापर मार्च 2011 पूर्वी 200 चे आसपास किंवा जास्त होता. परंतु मार्च 2011 पासुन फक्त 50 युनिटच्या वापराचे देयक अर्जदाराने भरणा केलेले आहे. अर्जदाराने कुठेही असे म्हटले आहे नाही की, मार्च ते सप्टेंबर 2011 पर्यंत अर्जदाराचा विज वापर 50 युनिटचा होता किंवा त्यापेक्षा जास्त नव्हता. याचा अर्थ अर्जदाराच्या इतर देयकावरुन स्पष्ट होते की, अर्जदाराचा विज वापर 50 युनिट पेक्षा नेहमीच अधिक राहिलेला आहे. परंतु नविन मिटर बसल्यावर गै.अ.च्या तांञिक अडचणीमुळे अर्जदाराने केलेल्या विज वापराची नोंद घेण्यात आलेली नाही. आणि ऑक्टोंबर महिण्यामध्ये ती नोंद घेण्यात आली, त्यानंतर अर्जदाराला नोंदीप्रमाणे देयके देण्यात आलीत. अर्जदाराने 2754 युनिटचा वापर मार्च 2011 ते सप्टेंबर 2011 पर्यंत केलेला आहे. विज वापर केला असला तरी वापरा प्रमाणे देयके अर्जदाराला दिलेले नव्हते. म्हणून अर्जदाराने ती रक्कम गै.अ.कडे भरलेली नाही. त्यामुळे गै.अ.ने मार्च ते सप्टेंबरच्या युनिट मधील थकीत रक्कम नि.5, अ-6 प्रमाणे अर्जदाराला भरणा करण्यासाठी देयक दिले. त्याच देयकातुन अर्जदाराने सरासरी 50 युनिट प्रमाणे भरलेली रक्कम रु.1078/- वळती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गै.अ.ने दिलेले देयक रु.14,510/- हे योग्य असुन फक्त एक महिण्याचे देयक नसुन मार्च 2011 ते सप्टेंबर 2011 मधील थकीत रक्कम सुध्दा त्यामध्ये समाविष्ट आहे. तसे, देयकामध्ये नमुद ही करण्यात आले आहे. अर्जदाराने नि.5 अ-6 प्रमाणे दिलेले देयक देवून कुठलिही न्युनतापूर्ण सेवा अर्जदाराला दिलेली नाही. त्यामुळे अर्जदाराने केलेली मागणी रु.14,510/- चे बिल रद्द करण्यात यावे ही मान्य करण्याजोगी नाही. गै.अ.नी कुठलीही न्युनतापूर्ण सेवा न दिल्यामुळे, गै.अ.मुळे अर्जदाराला शारिरीक व मानसिक ञास सहन करावा लागला असे म्हणता येणार नाही. म्हणुन अर्जदाराची मागणी नामंजुर करण्यात येत आहे. 5. अर्जदाराने नि.6 प्रमाणे अंतरिम अर्ज दाखल केलेला होता. तो मा.मंचानी मंजुर करुन अर्जदाराला वादग्रस्त बिलापोटी रु.5,000/- भरण्यास सांगितले होते. अर्जदाराने दि.30/12/2011 च्या यादीप्रमाणे दाखल केलेल्या रु.5,000/- च्या धनादेशाव्दारे रक्कम भरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अर्जदाराने नि.5 अ-6 मधील देयकाची रक्कम गै.अ.कडे भरावी व ती भरताना पूर्वी भरलेले रु.5,000/- वळते करण्यात यावे. गै.अ.नी आपल्या लेखीउत्तरात अर्जदाराला दोन किस्तीत रककम भरण्याची मुभा देण्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे रु.14,510/- मधून 5,000/- वळते केल्यानंतर उरलेली रक्कम दोन महिण्याच्या किस्तीत अर्जदाराने गै.अ.कडे भरावे. गै.अ.ने अर्जदाराला यापुढील देयके मिटर वाचनाप्रमाणे दयावे. वरील कारणे व निष्कर्ष वरुन खालील आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) दोन्ही पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 19/07/2012. |