Maharashtra

Beed

CC/12/168

Mahakali Stone kreshar,Prop.Dattrayara Satappa Chillagare, - Complainant(s)

Versus

Dy Exe.Engineer,M.S.E.D.C. - Opp.Party(s)

Arvind Kale

06 Jan 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/12/168
 
1. Mahakali Stone kreshar,Prop.Dattrayara Satappa Chillagare,
R/o Dadahari Wadgaon,Ta Parali
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dy Exe.Engineer,M.S.E.D.C.
Parali Ta Parali
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                     निकाल
                      दिनांक- 06.01.2014
                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)
            तक्रारदार दत्‍तात्रय साताप्‍पा चिल्‍लगरे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदार हे मौजे दादाहरी वडगांव ता.परळी वैजनाथ येथे महाकाली स्‍टोन क्रेशर   या नांवाने खडी तयार करण्‍याचा व्‍यवसाय करतात. सदरील स्‍टोन क्रेशर करता तक्रारदार यांनी सामनेवाले कडून विज पुरवठा घेतलेला आहे. त्‍यांचा ग्राहक क्र.590020204682 व मिटर क्र.6001102194 असा आहे. तक्रारदार यांनी सन 1999 मध्‍ये विज पुरवठा घेतलेला आहे. सदरील विज पुरवठा स्‍वंतत्र लाईनवरुन 1999 ते 2001 पर्यत औद्योगिक डी.पी. वरुन चालू होता. सन 2001 ते 2009 या कालावधीत तक्रारदार यांचा विज पुरवठा कृषी पंपाच्‍या लाईनवरुन जोडण्‍यात आला होता. तक्रारदार यांना त्‍या बाबत सुचना अगर माहीती देण्‍यात आलेली नाही. तक्रारदार यांचे इंडस्‍ट्रीयल यूनिट असतानाही कृषी पंपावरुन तक्रारदार यांचा विज जोडणी देऊन सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. कृषी पंपासाठी 14 तासची लोड शेडींग असते, इंडस्‍ट्रीयल वापराकरिता 7 तासांचे लोड शेंडीग असते. तक्रारदार यांनी औद्योगिक वापरासाठी विज पुरवठा मंजूर केलेला असताना कृषी पंपाचे लाईन विज पुरवठा देण्‍यात आला. तक्रारदार यांचे खडी कारखाना 14 तास बंद राहिल्‍यामुळे तक्रारदार यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तक्रारदार यांची कामावरील मजूर बसून राहिले. तक्रारदार यांना त्‍यांचा पगार दयावा लागला. तसेच अति‍रिक्‍त भार नियमन सोसावे लागले. तक्रारदार यांनी कर्मचा-यांना रु.4,72,000/- अतिरीक्‍त पगार दयावा लागला. खडी केंद्र बंद राहिल्‍यामुळे तक्रारदार यांचे रु.15,00,000/- चे नुकसान झाले. सबब, सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे तक्रारदार यांचे एकूण रु.19,97,000/- चे नुकसान झाले. ती रक्‍कम सामनेवाले यांचेकडून मिळावे अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
            सामनेवाले हे मंचासमोर हजर झाले त्‍यांनी लेखी म्‍हणणे नि.10 अन्‍वये दाखल केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारीत कथन केलेल्‍या बाबी नाकारलेल्‍या आहेत. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांना नियमाप्रमाणे विज पुरवठा करण्‍यात आलेला आहे. तक्रारदार यांचा विज पुरवठा ब-याच वेळा तक्रारदार यांचे चुकीमुळे खंडीत करण्‍यात आलेला आहे. त्‍यासंबंधी तक्रारदार यांना वेगवेगळे दावे व तक्रारी दाखल केलेल्‍या आहेत. तक्रारदार यांना ज्‍या लाईनवरुन विज पुरवठा करण्‍यात आलेला होता त्‍या लाईनवर काही कृषी पंपांना विज जोडणी दिली म्‍हणजे तक्रारदाराचा पुरवठा हा कृषी पंपासाठीचा होता असे म्‍हणता येणार नाही.तक्रारदार यांनी सदरील तक्रार मुदतीत दाखल केली नाही. तक्रारदार यांना महाकाली स्‍टोन क्रेशर साठी विज पुरवठा घेतलेला आहे. तक्रारदार यांना विज पुरवठा औद्योगिक कारणासाठी दिलेला असल्‍यामुळे तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. तक्रारदार यांना दिलेला विज पुरवठा व्‍यापारी कारणासाठी दिलेला आहे.तक्रारदार यांनी यापूर्वी सामनेवाले यांचे विरुध्‍द दाखल केलेली तक्रार मा. मंचाने रदद केलेली आहे. सदरील तक्रार सामनेवाले यांना त्रास देण्‍याचे उददेशाने दाखल केलेली आहे. सबब, तक्रार रदद करण्‍यात यावे.
            तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 अन्‍वये सामनेवाले यांचे माहीती अधिकारी यांनी दिलेल्‍या अर्जाची झेरॉक्‍स प्रत, विज बिल, सामनेवाले यांनी दिलेले उत्‍तर, तसेच मंजूराचे वेतना बाबत झेराक्‍स पावती दाखल केल्‍या आहेत. तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र नि.6 अन्‍वये दाखल केले आहे. सामनेवाले यांनी सक्षम अधिका-याचे शपथपत्र नि.11 अन्‍वये दाखल केले आहे. तसेच सामनेवाले यांनी नि.12 सोबत दस्‍त हजर केले आहे. त्‍यासोबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेले पत्रे, तसेच सामनेवाले यांचे अधिका-याने तक्रारीसोबत दिलेला रिपोर्ट, तक्रार क्र.168/2007 चे निकालपत्र हजर केले आहे.
            तक्रारदार यांचे वकील श्री.काळे यांचा युक्‍तीवाद ऐकला, सामनेवाले यांचे वकील श्री.पाटील यांचा यूक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
            मुददे                                            उत्‍तर
1.     तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत बसतात काय                    नाही.
2.    सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी मुळे तक्रारदार यांचे
      नुकसान झाले आहे ही बाब तक्रारदार
      शाबीत करतात काय ?                                    नाही.
3.    तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत काय ?       नाही.
4.    काय आदेश ?                               अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                        कारणमिंमासा
 
मुददा क्र.1 ते 3 ः-
            तक्रारदार यांचे वकीलांनी यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी औद्योगिक वापरासाठी विज जोडणी घेतली होती. ती विज जोडणी औद्योगिक डी.पी. वरुन 2001 पर्यत चालू होती. सामनेवाले हयांनी 2001-09 या कालावधीत तक्रारदार यांची विज जोडणी कृषी पंपावरुन होती. त्‍यामुळे 14 तासाची लोड शेंडीग सुरु झाली. औद्योगिक कारणासाठी सात तासांची लोंड शेडींग असते. सदरील लोड शेडींगमुळे तक्रारदार यांनी नेमणूक केलेले मजूराना विना कामाचे बसावे लागले. तक्रारदार यांना त्‍यांचा पगार दयावा लागला. त्‍यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांचे नुकसान केले आहे ही बाब सेवेत त्रुटी ठेवणारी आहे म्‍हणून तक्रारदार यांचे वकिलांनी यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेली नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे.
 
            सामनेवाले यांचे वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून औद्योगिक कारणासाठी विज पुरवठा घेतलेला आहे. सदरील खडी कारखाना हा तक्रारदार हे व्‍यापारी कारणासाठी चालवत होते. त्‍यामुळे तक्रारदार हे ग्राहक संज्ञेत बसत नाहीत. तसेच सामनेवाले यांचे वकीलानी या मंचाचे लक्ष सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रावर वेधले व तक्रारदार यांचे निष्‍काळजीपणामुळे वेळोवेळी विज पुरवठा खंडीत केलेला आहे. तसेच ज्‍यावेळी तक्रारदार यांनी विज पुरवठयाची मागणी केली आहे त्‍यावेळी त्‍यांना तो जोडून देण्‍यात आलेला आहे. तसेच सामनेवाले यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांना कोणते नुकसान झाले आहे यासंबंधी कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही अगर कागदपत्र दाखल केलेले नाहीत. सबब, तक्रारदार यांचे तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.
            सामनेवाले यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी दिलेल्‍या न्‍यायनिवाडयाकडे वेधले.
Westlaw India
 
Supreme Court of India
1 July 2013
 
Uttar Pradesh Power Corporation Limited and others
V
Anis Ahmad
 
                        In this reported case, the Lordship of Supreme Court in para no.24 of the Judgement has held that, the complainant had electrical connection for industrial/commercial purpose and, therefore, they do not come within the meaning of “Consumer ” as defined under section 2 (1)(d) of the Consumer Protection Act, 1986, they can not be treated as “Complainant ” nor they are entitled to file any “Complaint” before the Cosumer Forum. 
 
                   तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेले कथन व सोबत दाखल केलेले कागदपत्र तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र यावरुन तक्रारदार यांना विज पुरवठा हा औद्योगिक वापरासाठी घेतलेला आहे ही बाब सिध्‍द होते.   तक्रारदार यांनी या अगोदरच या मंचासमोर तक्रार क्र.168/2007 सामनेवाले विरुध्‍द दाखल केली होती. त्‍या तक्रारीमध्‍ये या मंचाने तक्रारदार ग्राहक नाही असा निर्णय दिलेला आहे. सदरील न्‍याय निर्णय लक्षात घेता व तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन लक्षात घेता या मंचाचे मत की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत अगर ते ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. म्‍हणून सदरील तक्रार चालविण्‍याचा या मंचास अधिकार नाही या कारणास्‍तव तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.
            तक्रारदार यांचे कथन की, सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेऊन तक्रारदार यांचे नुकसानीस कारणीभूत झालेले आहेत. तक्रारदार यांनी नुकसानी बाबत कोणतेही दस्‍ताऐवज हजर केलेले नाहीत. सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र पाहिले असता तक्रारदार यांचे चूकीमूळे वेळोवेळी त्‍यांचा विज पुरवठा खंडीत केलेला आहे ही बाब निदर्शनास येते व तक्रारदार यांनी ज्‍या वेळेस विज पुरवठयाची मागणी केली आहे. त्‍यावेळी त्‍यांचेकडून योग्‍य ते चार्जेस भरुन विज पुरवठा पुर्ववत केलेला दिसतो. सबब, सामनेवाले यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही.
                  मुददा क्र.1 ते 3 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.
                  सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                     आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2.    खर्चाबददल आदेश नाही.
      3.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघुलेखक    
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.