संयुक्त निकालपत्र :- (दि.23.02.2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत चारही तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच चारही प्रकरणांमध्ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी कोल्हापूर महानगरपालिका यांचे हद्दीतील रि.स.नं.209/ए/11 (सि.टी.एस्.नं.36/ए/22) ही मिळकत विकसित करुन दुर्गा बिल्डिंगमधील रो-बंगला खरेदी केलेला आहे. त्याचा ग्राहक तक्रार क्रमांक निहास तपशील पुढीलप्रमाणे :- ग्राहक तक्रार केस नं.510/2010 :- यातील तक्रारदारांनी रो-बंगला नं.1, क्षेत्र 155 चौरस मिटर म्हणजेच 1660 चौरस फूट, रक्कम रुपये 3 लाख इतक्या किंमतीस घेणेबाबत दि.25.01.1993 रोजी नोंद करारपत्र केले व कराराप्रमाणे खरेदीची संपूर्ण रक्कम भागविलेली आहे व तक्रारदारांना करारानुसार दि.25.01.1993 रोजी कब्जा दिलेला आहे व तसे पत्र दिले आहे. ग्राहक तक्रार केस नं.511/2010 :- यातील तक्रारदारांनी रो-बंगला नं.8, क्षेत्र 94.5 चौरस मिटर म्हणजेच 1012 चौरस फूट, रक्कम रुपये 3,50,000/- इतक्या किंमतीस घेणेबाबत दि.01.11.1996 रोजी नोंद करारपत्र केले व कराराप्रमाणे खरेदीची संपूर्ण रक्कम भागविलेली आहे व तक्रारदारांना करारानुसार दि.01.01.1996 रोजी कब्जा दिलेला आहे व तसे पत्र दिले आहे. ग्राहक तक्रार केस नं.512/2010 :- यातील तक्रारदारांनी रो-बंगला नं.4, क्षेत्र 93.80 चौरस मिटर म्हणजेच 1009 चौरस फूट, रक्कम रुपये 3,50,000/- इतक्या किंमतीस घेणेबाबत दि.17.03.1994 रोजी नोंद करारपत्र केले व कराराप्रमाणे खरेदीची संपूर्ण रक्कम भागविलेली आहे व तक्रारदारांना करारानुसार दि.05.01.1995 रोजी कब्जा दिलेला आहे व तसे पत्र दिले आहे. ग्राहक तक्रार केस नं.513/2010 :- यातील तक्रारदारांनी रो-बंगला नं.5, क्षेत्र 94.00 चौरस मिटर म्हणजेच 1012 चौरस फूट, रक्कम रुपये 3,50,000/- इतक्या किंमतीस घेणेबाबत दि.29.06.1995 रोजी नोंद करारपत्र केले व कराराप्रमाणे खरेदीची संपूर्ण रक्कम भागविलेली आहे व तक्रारदारांना करारानुसार दि.29.06.1995 रोजी कब्जा दिलेला आहे व तसे पत्र दिले आहे. (4) तक्रारदार त्यांच्या तक्रारी पुढे सांगतात, सामनेवाला यांना वारंवार विनंती करुनही नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही. तसेच, सामनेवाला यांना त्यांनी कब्जा दिला असल्याने कालमर्यादेच्या मुद्दयावर कब्जा पार्ट परफॉरमन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असताना करारपूर्ती करुन देणेस नाकारता येणार नाही. सबब, तक्रारीत उल्लेख केलेल्या रो-बंगल्याचे सामनेवाला यांनी खुष-खरेदीपत्र करुन देणेचा आदेश व्हावेत. मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 500/- देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत करारपत्र, ग्राहक तक्रार केस नं.698/99 व 700 ते 703/99 मधील निकाल इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत तक्रारीस मुदतीचा बाध येत आहे. सामनेवाले हे साई नागरी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर या संस्थेचे संस्थापक-चेअरमन होते. सदर संस्थेमार्फत श्री शाहू को-ऑप.बँक लि., शाखा उमा टॉकिज, कोल्हापूर मार्फत डिव्हीडंड वॉरंट रक्कमेचा अपहार केला म्हणून शाहू को-ऑप. बँक लि. कोल्हापूर विलीनीकरणानंतर एन्.के.जी.एस्.बी., शाखा कोल्हापूर यांनी सामनेवाला यांना व संस्थेच्या संचालक मंडळाविरुध्द व सदर बँकेच्या शाखेकडील संबंधित ऑफिसरविरुध्द रक्कम रुपये 25,37,655/- चा सहकार न्यायालयात सि.सी.नं.852/95 वसुली दावा दाखल केला. त्या कारणे अव्वल जप्ती अर्जाने सि.स.नं.36/22 रो-बंगल्यासहित स्थावर मिळकत जप्त केली. जप्ती अर्ज गुण-दोषावर चालून कोर्टाने सामनेवाला यांच्या प्रॉपर्टी दाव्याच्या निकालापावेतो जप्ती हुकूमान्वये जप्त केलेबाबत दि.12.12.1995 रोजी हुकूम केलेला आहे. सदर हुकूमावर नाराज होवून सामनेवाला यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी अपेलेट कोर्ट, पुणे येथे अपील नं.71/75 ने अपील दाखल केले. सदर अपिलाचा दि.23.06.1997 रोजी गुणदोषावर निकाल होवून सदर मिळकत रो-बंगल्यासहीत कोणत्याही मार्गे तबदील करु नये, बोजा निर्माण करु नये असे हुकूम झाले. सदर हुकूमावर नाराज होवून सामनेवाला यांनी मा.ना.उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडे रिट पिटीशन नं.5007/98 दाखल केली. सदर कामी दि.23.03.2005 रोजी रिट निकाली काढून दि.12.07.2009 रोजी रिट कामी केलेली ऑर्डर चालू ठेवणेबाबत व सहकार न्यायालयातील वसुली दावा निकाली काढणेबाबत आदेश केला. सदरचे आदेश झाले असल्याने तक्रारदारांना खरेदी पत्र करुन देता आले नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 5,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ तक्रारदार व वटमुखत्यार यांनी दावा नं.852/95 चे कामी थर्ड पार्टी अर्जदार म्हणून केलेल्या अर्ज व त्यावरील हुकूम, ना.हायकोर्ट, मुंबई यांनी रिट पिटीशन नं.5007/98 चे दिवाणी अर्ज नं.3045/04 मध्ये केलेला हुकूम इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (8) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तसेच, दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद सविस्तर ऐकून घेतलेला आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे रो-हाऊस खरेदी करणेचा करार तक्रारदारांनी सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांचेबरोबर केलेला आहे व कराराप्रमाणे संपूर्ण रक्कम सामनेवाला यांनी स्विकारलेली आहे व रो-हाऊसचा ताबा तक्रारदारांना दिलेला आहे, ही वस्तुस्थिती दोन्ही बाजूंस मान्य आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये प्रस्तुत तक्रारीस मुदतीचा बाध येत असलेबाबत कथन केले आहे. परंतु, उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे कराराप्रमाणे मोबदला स्विकारुन रो-बंगल्याचा ताबा दिलेला आहे व पार्ट परफॉरमन्स झालेला आहे. अशी वस्तुस्थिती असलेस, नोंद खरेदीपत्र करुन देईपर्यन्त प्रस्तुत तक्रारीस सातत्याने कारण घडत आले आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीस मुदतीचा बाध येत नाही असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. (9) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये त्यांच्याविरुध्द दावा दाखल केलेला आहे व सदर दाव्यामध्ये तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत रो-हाऊस जप्त केली असून न्यायालयाचे आदेशानुसार त्यावर कोणताही बोजा अगर हस्तांतरण करता येणार नाही. या मुद्याकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. परंतु, वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाला यांचेविरुध्द दाखल केलेल्या दाव्यामध्ये तक्रारदार हे पक्षकार नाहीत. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्याबरोबर रो-हाऊस खरेदी देणेबाबत करार केले आहेत व सदरचे करारपत्राबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान निर्माण केलेले नाही. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदीचा विचार करता सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी सेवा त्रुटी केली आहे. त्या अनुषंगाने विचार करता सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना तक्रारीत उल्लेख केलेल्या रो-बंगल्याचे नोंद खरेदीखत करुन द्यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासपोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब, आदेश. आदेश ग्राहक तक्रार केस नं.510/10 :- 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी करारात उल्लेख केलेला रो-बंगला नं.1 चे नोंद खरेदीपत्र तक्रारदारांना करुन द्यावे. 3. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) ग्राहक तक्रार केस नं.511/10 :- 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी करारात उल्लेख केलेला रो-बंगला नं.8 चे नोंद खरेदीपत्र तक्रारदारांना करुन द्यावे. 3. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) ग्राहक तक्रार केस नं.512/10 :- 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी करारात उल्लेख केलेला रो-बंगला नं.4 चे नोंद खरेदीपत्र तक्रारदारांना करुन द्यावे. 3. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) ग्राहक तक्रार केस नं.513/10 :- 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी करारात उल्लेख केलेला रो-बंगला नं.5 चे नोंद खरेदीपत्र तक्रारदारांना करुन द्यावे. 3. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त)
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |