निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 15.01.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 27.01.2010 तक्रार निकाल दिनांकः- 02.09.2010 कालावधी 7 महिने 05दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. संजय पिता सखाराम राजूरकर अर्जदार वय 45 वर्षे धंदा व्यापार रा.सेलू, ( अड केकान एस.ए ) ता.सेलू जि.परभणी. विरुध्द 1 डयूली कन्सटीटयूटेड अटर्नी गैरअर्जदार इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, ( अड अजय व्यास ) ब्रॅच ऑफीस दुसरा माळा आकाश टॉवर, राजस्थान बॅकेच्या वर टिळक रोड, आकोला 444001. 2 हिंगोली को-ऑप.बॅक लिमीटेड ( एकतर्फा ) ब्रॅच सेलू जि.परभणी, मार्फत ब्रॅच मॅनेजर ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या ) गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा फेटाळून अर्जदाराला त्रूटीची सेवा दिल्याबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा सराफीचा व्यवसाय करतो व त्याचे राजूरकर सराफ या नावाने सेलूला दुकान आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडून कर्ज घेवून हा व्यवसाय सुरु केला आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 हा अर्जदाराच्या दुकानाच्या विम्याचा हप्ता गैरअर्जदार क्रमांक 1 कडे जमा करतो. अर्जदार हा भगवानदास ज्वेलर्स पुणे यांच्याकडून सोन्या चांदीचे दागीने खरेदी करतो. संप्टेबर 2009 मध्ये अर्जदाराने रुपये 50,000/- पेक्षा जास्त किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी केले. त्यापैकी काही त्याने विक्री केले. दिनांक 09.09.2009 रोजी अर्जदाराच्या दुकानात रुपये 91000/- ची चोरी झाली. अर्जदाराने दिनांक 10.09.2009 रोजी पोलीस स्टेशन सेलू येथे तक्रार दाखल केली जी गुन्हा क्रमांक 160/09 खाली नोंदवली गेली. अर्जदाराने ही घटना गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानाही कळवली. गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराकडून आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी केली व अर्जदाराने त्याची पूर्तता केली. सर्व्हेअर तर्फे ही नुकसानाची असेसमेंट . झाली त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे विमा दाव्याची मागणी केली परंतू आजतगायत अर्जदाराचा विमा दावा मंजूर करण्यात आलेला नाही व त्याला त्रूटीची सेवा दिली आहे. म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व रुपये 91000/- चा विमा दावा मंजूर करण्यात यावा रुपये रुपये 5000/- मानसिक त्रास व सेवा त्रूटीबद्यल व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- देण्यात यावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, पहिली खबर, घटना स्थळ पंचनामा, पॉलीसीची कॉपी, रेप्यूडेशन लेटर, खरेदीच्या पावत्या इत्यादी कागदपत्र दाखल केले आहेत. . गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराचे तक्रारीवरुन चांदीचे दागिने शोकेसमधून तर सोन्याच्या आंगठया तिजोरीतून चोरीला गेल्या तिजोरीच्या किल्या काऊंटरवर होत्या पॉलीसीच्या अटीनुसार दुकानातील सर्व सामान रात्री तिजोरीतच ठेवलेले पाहीजे. तसेच पॉलीसीतील क्रमांक 8 प्रमाणे अर्जदाराच्या ताब्यातील डूपलीकेट किल्ली ने किंवा तिजोरीच्या किल्लीने नुकसान झाले असेल तर ते नुकसान पॉलीसीच्या अंतर्गत येत नाही मात्र त्या किल्या जर दहशतीने किंवा हिंसेने हस्तगत केल्या असतील तर होणारे नुकसान पॉलीसी अंतर्गत व क्रमांक 9 अन्वये दुकान बंद झाल्यावर दुकानाच्या शोकेसमध्ये आहे किंवा तिजोरी बाहेर ठेवलेल्या सामानाचे नुकसान पॉलीसी अंतर्गत येत नाही म्हणून गैरअर्जदाराने योग्य त्या कारणानेच विमा दावा फेटाळलेला आहे. तसेच अर्जदाराने त्याचा रुपये 91000/- चा सोन्या चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या संदर्भात कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही तसेच सर्व्हे रिपोर्टप्रमाणे दुकानासाठी रखवालदार नव्हता व बरर्गल अलाराम ही नव्हता. व चोरीला गेलेल्या सोन्याच्या अंगठया ग्यानोबा कदम यांच्या होत्या अर्जदाराच्या मालकीच्या नव्हत्या परंतू अर्जदाराने क्लेम फॉर्म व तक्रारीत अर्जदाराने अंगठया त्याच्या मालकीच्या आहेत असे म्हटलेले आहे जे पॉलीसी अटीच्या विरुध्द आहे. अर्जदाराला गैरअर्जदाराने कोणतीही त्रूटीची सेवा दिलेली नाही त्यामुळे अर्जदाराची तक्रार रुपये 10000/- च्या नुकसान भरपाईसह फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केली आहे. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबासाह शपथपत्र, सर्व्हे रिपोर्ट, सर्व्हेअरचे शपथपत्र, इन्शुरन्स पॉलीसी, फोटोज इत्यादी कागदपत्रे दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 2 ला न्यायमंचाकडून नोटीस मिळून ही ते तक्रारीत हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्याविरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रे व अड केकाण व अड. व्यास यांच्या युक्तिवादानंतर तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 विमा दावा फेटाळून गैरअर्जदाराने अर्जदारास त्रूटीची सेवा दिली आहे काय ? नाही 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ‘’ ज्वेलर्स ब्लॉक प्रोटेक्टर इन्शुरन्स पॉलीसी ‘’ घेतलेली आहे ज्याचा क्रमांक 48004083 आहे व दिनांक 28.06.2009 ते 25.06.2010 या कालावधीसाठी घेतलेली आहे ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराने ग्राहक मंचात दाखल केलेल्या तक्रारीत सराफा दुकानातून रुपये 91000/- चे सोन्या चांदीचे सामान चोरीला गेले असे म्हटले आहे. पोलीसाना दिलेल्या फीर्याद नि. 5/1 वरील पहिल्या खबरीतही रुपये 91000/- चे चांदी सोन्याचे दागिने चोरीला गेले आहे परंतू असे म्हटले आहे. परंतू नि. 5/2 वरील घटनास्थळ पंचनामा करताना अर्जदाराने पोलीसाना प्रथम रुपये 51000/- चे दागिने चोरीला गेले व नंतर रुपये 53000/- चे दांगिने चोरीला गेले असल्याचे सांगितले आहे याउलट अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेल्या चांदी वस्तू खरेदी पावत्याच्या ( नि.5/5/1 ते नि. 5/5/6 ) किंमतीची बेरीज केली असता ती रुपये 1,11,813/- येते. वर नमूद केलेल्या विसंगत आकडयातून अर्जदाराच्या दुकानातून नेमका किती किंमतीचा माल चोरीस गेला हे ठोस रित्या शाबीत झालेले नाही व ठरविता येणे ही कठीण आहे कारण विमा कंपनीच्या नि. 18/2 वरील सर्व्हेअर रिपोर्ट मध्ये चोरीचे असेसमेंट पॉलीसीच्या अटी व नियमाप्रमाणे “ NIL ” असे लिहीले आहे. अर्जदाराच्या चोरीला गेलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याच्या किंमतीचा ठोस पुरावा तक्रारीत नाही अथवा चोरी झाल्या दिवशीचा दुकानाच्या स्टॉक रजिष्टर ( रोजमेळ ) चा उतारा ही तक्रारीत दाखल केलेला नाही. ज्यावरुन दुकानात चोरी झाली त्यादिवशी दुकानात नेमका किती किंमतीचा माल होता हे समजले असते. तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये वेगवेगळया कागदपत्रात चोरीला गेलेल्या सामानाची वेगवेगळी किंमत असल्यामुळे तक्रारीत सखोल पुराव्याची गरज आहे असे मंचास वाटते कारण ग्राहक मंचा पुढील तक्रारीचे विवरण संक्षिप्त पुराव्यातूनच घेतले जाते त्यामुळे प्रस्तूतची तक्रार योग्य त्या दिवाणी न्यायालयात दाखल करण्यासाठी परत करण्यात येत आहे. तक्रारीत खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार परत करण्यात येत आहे. 2 अर्जदाराने तक्रारीत दाखल मुळ कागदपत्र निकाल समजल्यापासून 30 दिवसाचे आत परत घ्यावेत. 3 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |