श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
* निकालपत्र*
दिनांक 19/10/2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी दिनांक 17/10/2010 रोजी त्यांच्या मित्राला राजस्थान येथे पाठविण्यासाठी कुरिअर पार्सल जाबदेणार यांच्याकडे बुक केले. तक्रारदारांकडून रुपये 200/- स्विकारल्यानंतर पावती क्र.13881863 देण्यात आली, दोन दिवसात पार्सल पोहोचेल असे सांगण्यात आले. तक्रारदांनी बुक केलेल्या पार्सल मध्ये पर्सनलाईज्ड थर्मल फोटोकप्स ज्यांची एकूण किंमत रुपये 1000/- होती. बुकींच्या तारखेपासून दोन महिने उलटल्यानंतरही जाबदेणार यांनी पार्सल पोहोचविले नाही. याबाबत तक्रारदारांनी वारंवार जाबदेणार यांच्याकडे स्वत: जाऊन, दुरध्वनीद्वारे चौकशी केली असता जाबदेणार यांनी तक्रारदारांनी बुकींगवर दिलेला पत्ता अस्तित्वात नाही, पार्सल जयपुर येथे पाठविण्यात आले होते, जाबदेणार यांच्या माणसांनी पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला परंतू सापडला नाही, नंतर सदरहू पार्सल नवी दिल्ली येथे मिसप्लेस झाल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले. म्हणून सदरहू तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 50,000/- नुकसान भरपाईपोटी मागतात. तक्रारदारांनी तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. Consignment status, डिलीव्हरी रिपोर्ट ऑन लाईन चेक करता येते. तक्रारदारांनी बुक केलेल्या Consignment ची डिलीव्हरी देतांना लिफाफयावरील पत्ता अपुर्ण होता, सापडला नाही, म्हणून दिनांक 23/10/2010 रोजी ‘No such address’ शे-यासहित परत आले. यासंदर्भात तक्रारदारांनी पत्र पाठविल्यानंतर जाबदेणार यांनी स्वत:च्या खर्चाने परत एकदा Consignment डिलीव्हरी साठी पाठविली होती, परंतू समोरच्या व्यक्तीने डिलीव्हरी घेतली नाही म्हणून ‘Refused’ या शे-यासहित Consignment परत आली. जाबदेणार यांनी तक्रारदारांना Consignment परत घेण्याबाबत कळवूनही तक्रारदारांनी तसे न करता प्रस्तूत तक्रारअर्ज मा. मंचासमोर दाखल केला. जर जाबदेणार यांची काही जबाबदारी असलीच तर अटी व शर्तीनुसार ती रुपये 100/-पर्यन्त मर्यादित आहे. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही, सबब तक्रारअर्ज नामंजुर करण्यात यावा अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी लेखी जबाबासोबत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी बुक केलेली Consignment जाबदेणार डिलीव्हरी साठी गेले असता त्यावर दिलेला पत्ता अस्त्तित्वात नसल्याचे दिनांक 23/10/2010 “Remarks : No such Address” जाबदेणार यांनी दाखल केलेल्या इंटरनेट एक्सप्लोलर च्या दिनांक 3/5/2011 च्या रिपोर्टवरुन दिसून येते. तसेच सदरहू Consignment परत डिलीव्हरी साठी जाबदेणार यांनी पाठविली असता दिनांक 4/1/2011 रोजी “Remarks : Customer Refused to Accept” शे-यासहित परत आल्याचे जाबदेणार यांनी दाखल केलेल्या इंटरनेट एक्सप्लोलर च्या दिनांक 3/5/2011 च्या रिपोर्टवरुन दिसून येते. यावरुन तक्रारदारांनी बुकींग केलेल्या Consignment वर दिलेला पत्ता अपुर्ण असल्याचे व नंतर ज्यांना Consignment पाठविली होती त्यांनीच ती नाकारल्याचे दिसून येते. जाबदेणार यांनी बुकींग केलेली Consignment विलंबाने पोहोचवण्यास गेले हे स्पष्ट होते. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या अटी व शर्तीं मंचाने अवलोकन केले असता अट क्र.5 “Limitation of Liability – The liability of DTDC for any loss or damage to the consignment will be strictly limited to Rs.100/-for each consignment [which items includes all document or parcels consigned through DTDC by the consignor]” जाबदेणार यांची जबाबदारी रुपये 100/-पर्यन्तच मर्यादित असल्याने तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 100/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 100/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावेत.
3. खर्चाबद्यल आदेश नाही.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.