निकालपत्र :- (दि.20.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांचेकडे सदनिकेबाबत विचारणा केली असता कोल्हापूर येथील सि.स.नं.2736 या मिळकतीवर बांधण्यात येत असणा-या ‘पोरे संकुल’ अपार्टमेंटमधील दुस-या मजल्यावरील सदनिका नं.202, क्षेत्र 415 चौरस फूट ही सदनिका रुपये 3,50,000/- ला खरेदी घेणेचे ठरले व दि.17.08.2007 रोजी रक्कम रुपये 51,000/- व दि.26.11.1997 रोजी रक्कम रुपये 25,000/- अदा केलेले आहेत व त्याची पावती सामनेवाला यांनी दिलेली आहे. तसेच, करारपत्र, रजिस्ट्रेशन, लाईट मिटर डिपॉझिट, लिगल चार्जेस इत्यादीची रक्कम रुपये 50,000/- मागणी केली. परंतु, त्याची पावती देता येत नाही असे सांगितले. त्यानंतर करारपत्र सामनेवाला यांनी केलेले नाही. परंतु, संचकारपत्र न करता करारपत्र पूर्ण करुन देतो असे सांगितले, त्यावेळी रजिस्ट्रेशन, लाईट मिटर, डिपॉझिट, एसएलसी चार्जेस इत्यादी रक्कम रुपये 30,000/- व रुपये 20,000/- अशी रक्कम रुपये 50,000/- तक्रारदारांना चेकने परत केली. तरी सामनेवाला यांनी तक्रारदारांना मिळकतीचे खरेदीपत्र करुन दिले नाही. सबब, सदनिकेचे खरेदीपत्र करुन देणेचा आदेश व्हावा अथवा खरेदीपत्र पूर्ण करुन देणेस अशक्य असलेस रक्कम रुपये 76,000/- व्याजासह देणेचा आदेश व्हावा. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी रक्कम स्विकारलेबाबत दि.26.11.07 दि.17.08.07 रोजी दिलेल्या पावत्या, सामनेवाला यांना दि.06.04.09 रोजी पाठविलेली नोटीस, सामनेवाला यांचे दि.03.04.09 रोजीचे प्रतिउत्तर इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये सदनिकेची रक्कम रुपये 5,00,000/- इतकी ठरली होती. त्यापैकी तक्रारदारांनी रुपये 50,000/- दिले आहेत. दोघांच्या संम्मतीने एकूण किंमतीच्या 25 टक्के रक्कम जमा न केलेने नोंदणी करारपत्र झालेले नाही व उर्वरित रक्कम 3 महिन्यांत देणेचे तक्रारदाराने मान्य केले होते. तसे न केल्यास संचकार रक्कम बुडित करणेचे तक्रारदारांनी मान्य केले होते. तरीही, तक्रारदारांना दि.27.01.2009 रोजी रक्कम रुपये 30,000/- व दि.10.02.2009 रोजी रुपये 20,000/- चेकने अशी रक्कम रुपये 50,000/- अदा केली आहे. तक्रारदारांनी त्यांना दिलेल्या पावत्या रद्द केलेल्या आहेत. पैसे उकळण्याच्या दृष्टीकोनातून प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी व खर्च रुपये 3,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकले आहेत. तक्रारदारांनी सामनेवाला यांना रक्कम रुपये 25,000/- दिलेले आहेत व तशी दि.26.11.2007 ची पावती सामनेवाला यांनी दिलेली आहे. तसेच, दि.17.08.2007 रोजी रक्कम रुपये 51,000/- सामनेवाला यांनी स्विकारलेली आहे, त्याबाबतची पावती प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये सदनिका खरेदीबाबतचा कोणताही करार झालेला नाही. याउलट तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून दि.27.01.2009 रोजी रक्कम रुपये 30,000/- व त्यानंतर दि.10.02.2009 रोजी रक्कम रुपये 20,000/- अशी एकूण रक्कम रुपये 50,000/- स्विकारलेली आहे व त्यांच्यामध्ये झालेला व्यवहार रद्द केलेला आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीस इस्टॉपलची बाध येते. त्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत केलेली मागणी मिळणेस ते पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| | [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |