Complaint Case No. CC/614/2022 | ( Date of Filing : 05 Sep 2022 ) |
| | 1. SHRI. NAGESH RAMESH GHODKE | R/O. PLOT NO.23, SUJATA NAGAR, RANAPRATAP NAGAR, TRIMURTI NAGAR, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. DREAM DESIGN COMPANY THROUGH PROP. HARSHVARDHAN AANANDRAO INGOLE | OFF.AT, PLOT NO.C75, MIDC BUTIBORI, NAGPUR R/O. FLAT NO.102, WING B EMERALD GREEN CITY 1, GOTAD PANJRI, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. बाळकृष्ण चौधरी यांच्या आदेशान्वये- - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-2019 कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, तक्रारकर्ता हे नागेश इव्हेंट्स या नावाने मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करतात. दिनांक 28.02.2020 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द कंपनी यांचेकडे भेट देऊन 9 विविध प्रकारच्या मूर्ती (प्रत्येकी 2 नग)ची ऑर्डर दिली व त्याची एकूण किंमत रु.1,30,000/- ठरली होती व तक्रारकर्त्याने वि.प. यांना ऍडव्हान्स म्हणून रु.5,000/- दिले. त्यानंतर तक्रारकर्त्याने वि.प. यांना नोव्हेबर-2020 पर्यंत बँक खात्यातून एकूण रु.61,000/- वि.प. यांचे खात्यात वळते केले व त्यानंतर पुन्हा वि.प. यांचे मागणी नुसार तक्रारकर्त्याने रुपये 26,000/- वि.प.चे बँक खात्यात जमा केले, अशाप्रकारे वि.प. यांनी एकूण रु.87,000/-प्राप्त झाल्याबाबत दि. 01.12.2020 रोजी पावती दिली. त्यानंतर वि.प.यांनी वॉट्सअप वर दि. 03.12.2020 रोजी कळविले कि, फक्त 9 मूर्तीचे ऑर्डर आहे असा वाद निर्माण केला, म्हणून तक्रारकर्त्याने पोलिसांत धाव घेतल्यावर दोन्ही पक्षातील वाद पोलीस स्टेशन बेलतरोडी येथे अपसात मिटला होता व वि.प. यांनी दि. 15.12.2020 रोजी 18 मुर्त्या देण्याचे कबुल केले. तक्रारकर्त्याने दिनांक 15.12.2020 रोजी फोन केला तेव्हा वि.प. यांनी फोन उचलला नाही व अमरावती येथे आहे असा व्हाट्सअप वर मॅसेज टाकला, त्यावरून वि.प. यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्ष्यात आल्यावर दि.19.12.2020 रोजी तक्रारकर्त्याने वि.प. यांचे विरुध्द पोलीस स्टेशन राणाप्रताप नगर येथे तक्रार दिली, परंतु वि.प. यांनी 18 मूर्ती तक्रारकर्त्यास देण्यास टाळाटाळ केली. पोलीस स्टेशन प्रताप नगर यांनी दि. 29.07.2021 रोजी वि.प. विरुध्द गुन्हयाची नोंद केली. तक्रारकर्त्यांने दि.07.01.2022 रोजी नोटीस दिला त्यानंतर वि.प.ने सुद्धा ऑर्डर प्रामणे मूर्ती पाठविल्या नाहीत म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन ऑर्डर प्रमाणे 18 मुर्त्याचे हस्तांतरण करावे किंवा तक्रारकर्त्यांने दिलेली रक्कम रुपये 87,000/- परत करावी, तसेच तक्रारदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई म्हणुन रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणुन रुपये 15,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
- तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प. यांना नोटीस बजावण्यात आली असता नोटीस मिळुनही वि.प. आयोगासमोर हजर न झाल्याने आयोगाने वि.प. विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 03.01.2024 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्ते यांनी तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले व तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता यांना दोषपूर्ण सेवा देऊन
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय? होय - काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
का र ण मी मां सा - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबतः- दिनांक 28.02.2020 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष कंपनी यांचेकडे भेट देऊन 9 विविध प्रकारच्या मूर्ती (प्रत्येकी 2 नग) ची ऑर्डर दिली व त्याची एकूण किंमत रु.1,30,000/- ठरली होती व तक्रारकर्त्याने वि.प. याना ऍडव्हान्स म्हणून रु.5,000/- दिले. त्यानंतर तक्रारकर्त्याने वि.प. यांना नोव्हेबर-2020 पर्यंत बँक खात्यातून एकूण रुपये 61,000/- यांचे खात्यात वळते केले व त्यानंतर पुन्हा वि.प. यांचे मागणी नुसार तक्रारकर्त्यास रु.26,000/- बँक खात्यात जमा केले, अशाप्रकारे वि.प. यांना एकूण रुपये 87,000/- प्राप्त झाल्या बाबत पावती दि. 01.12.2020 रोजी वि.प.ने दिली. सदर रक्कम वि.प. ला दिली ही बाब अभिलेखावर दाखल दस्त क्रं.2 वरुन सिध्द होते. यावरून तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
- वि.प. यांनी वॉट्सअप वर दि. 03.12.2020 रोजी कळविले की, फक्त 9 मूर्तीचे ऑर्डर आहे असा वाद निर्माण केला, म्हणून तक्रारकर्त्याने पोलिसात धाव घेतल्यावर दोन्ही पक्षात वाद पोलीस स्टेशन बेलतरोडी येथे आपसी मिटला होता व वि.प. यांनी दि.15.12.2020 रोजी 18 मुर्त्या देण्याचे कबुल केले. तक्रारकर्त्याने दिनांक 15.12.2020 रोजी वि.प.यांना फोन केला तेव्हा वि.प. यांनी फोन उचलला नाही व अमरावती येथे आहे असा व्हाट्सअप वर मॅसेज टाकला, त्यावरून वि.प. यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्ष्यात आल्यावर दि. 19.12.2020 रोजी तक्रारकर्त्याने वि.प. यांचे विरुध्द पोलीस स्टेशन राणाप्रतापनगर येथे तक्रार दिली, परंतु वि.प. यांनी 18 मूर्ती तक्रारकर्त्यास देण्यास टाळाटाळ केली. पोलीस स्टेशन प्रताप नगर यांनी दि. 29.07.2021 रोजी वि.प. विरुध्द गुन्हा नोंद केला. तक्रारकर्त्यांने दि. 07.01.2022 रोजी नोटीस दिला तरीसुद्धा ऑर्डर प्रमाणे वि.प.ने मूर्ती पाठविल्या नाही. यावरून विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते म्हणून मुद्दा क्रं. 1 ते 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्ता यांची तक्रार अंशत: मंजूर.
- विरुध्द पक्ष यांनी तकारकर्ता यांना ऑर्डर प्रमाणे 18 मुर्त्याचे हस्तांतरण करावे अथवा तक्रारकर्त्याकडून स्विकारलेली रक्कम रुपये 87,000/- परत करावे. तसेच सदर रक्कम द.सा.द.शे.9टक्के व्याजदराने दिनांक 01.12.2020 पासून रक्कमेच्या प्रत्यक्ष अदागयी पावेतो येणारी रक्कम तक्रारकर्त्यास अदा करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता यांना झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- अदा करावे.
- विरुध्द पक्षाने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश पारित दिनांकापासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत निशुल्क द्यावी.
फाइल ब व क तक्रारकर्तायांना परत करावी. | |