तक्रारदारातर्फे :- वकील- एस. एस.नन्नवरे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराने सदरची तक्रार ही वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत दाखल केलेली आहे. सदर तक्रारीत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तज्ञांच्या अहवालासाठी ‘अधिष्ठता / अधिक्षक, सर ज. जी. समुह रुग्णालये व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांचेकडे तक्रार दाखल करण्यापूर्वी तक्रारदाराच्या अर्जावरुन पाठविण्यात आलेली होती. त्यानुसार सर जे. जे. हॉस्पीटल मुंबई यांच्या निष्कर्ष निशाणी- 10 तारीख 28/06/2010 रोजी न्याय मंचात प्राप्त झाला. सदर निष्कर्षानुसार सदर तक्रारीत वैद्यकीय निष्काळजीपणा दिसून येत नाही, असे संबंधित समितीचे मत त्यांनी कळविलेले आहे. त्यानंतर तक्रारदाराने सदर निष्कर्षावर आक्षेप घेवून अधिष्ठाता/ अधिक्षक, पोलीस हॉस्पीटल, भायखळा मुंबई येथे सदर बाबत तज्ञाचे मत मागविण्यासाठी अर्ज सादर केला. त्यानुसार प्रकरण संबंधित हॉस्पीटलला पाठविण्यात आले. सदर हॉस्पीटलचा अहवाल तारीख 01/09/2010 रोजी न्याय मंचात प्राप्त झाला व त्यांनी त्यांचा काहीही अभिप्राय सदर तक्रारीच्या संदर्भात नमुद केलेला नाही. तसेच शासन परिपत्रकानुसार प्रस्तुत प्रकरण जिल्हा शल्य चिकित्सक किंवा कोणत्याही शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांचा अभिप्राय घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होते. यास्तव त्यांनी शासनाचे परिपत्राची प्रत जोडून सदरचा अहवाल दिलेला आहे.
यानंतर तक्रारदाराने तारीख 05/10/10, 7/10/10, 26/10/10, 29/10/10 व 03/11/2010 या तारखांना काहीही तजविज केलेली नाही. ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार तक्रार दाखल करुन घेण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी नमूद आहे. परंतू सदरची तक्रार ही वैद्यकीय निष्काळजीपणबाबतची असल्याने व त्यात वरील प्रमाणे तज्ञाच्या अहवालासाठी प्रकरण पाठवलेले होते. सदर प्रकरणात आलेला तज्ञाचा अहवाल विचारात घेता, तसेच सदरची तक्रार ही वरील वैद्यकीय तज्ञाच्या अहवालानुसार निकाली करणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. सदरची तक्रार ही निकाली करण्यात येत आहे.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(सौ. एम. एस. विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बीड.
चुनडे, लघुलेखक :/-