Maharashtra

Parbhani

CC/11/137

Laxman Nagnath Pathak - Complainant(s)

Versus

Dr.Sham Jethlia(Chilled Specilist) - Opp.Party(s)

04 Jul 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/137
 
1. Laxman Nagnath Pathak
R/o Lokamanya Nagar,Parbhani
Parbhani
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr.Sham Jethlia(Chilled Specilist)
Jethlia Houspital,Shivaji Nagar,Parbhani
Parbhani
Maharashtra
2. Dr.Chaten Mokashe(Chilied Specilist)
Ankur Chilied Specilist Houspital,Old Bustand Road,Parbhani
Parbhani
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. C. B. Pandharpatte PRESIDENT
 HON'ABLE MS. Shrimati Suwarna Deshmukh MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

        निकालपत्र

                        तक्रार दाखल दिनांकः-  14/07/2011

                                    तक्रार नोदणी दिनांकः-  19/07/2011

                        तक्रार निकाल दिनांकः- 04/07/2012

                                                                                    कालावधी 11 महिने 15 दिवस. 

                                                                                                                               

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

अध्‍यक्ष -  श्री.चंद्रकांत बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.

                सदस्‍या.  श्रीमती सुवर्णा देशमुख.                                                                          

 

                                                                                                     

1.  लक्ष्‍मण नागनाथ पाठक.                                                       अर्जदार.

   वय 71 धंदा.वर्षे, धंदा सेवानिवत्‍त कर्मचारी                 अड.कागने आर.के.

   रा.लोकमान्‍य नगर, परभणी, ता.जि.परभणी.                            

            विरुध्‍द

1. डॉ.शाम जेथलिया (बालरोग तज्ञ)                              गैरअर्जदार.  

   जेथलिया हॉस्‍पीटल, शिवाजी नगर,                        अड.आर.जी.सोमाणी

   वसमत रोड, परभणी.

2  डॉ.चेतन मोकाशे (बालरोग तज्ञ)

   अंकुर बाल रूग्‍णालय, जुने बस स्‍टॅंड रोड,

   परभणी.

------------------------------------------------------------------------------------

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

                  2)    श्रीमती.सुवर्णा देशमुख.      सदस्‍या.

 

    (  निकालपत्र पारित व्‍दारा.श्री.सी.बी.पांढरपट्टे अध्‍यक्ष. )

 

वैद्यकीय उपचारातील निष्‍काळजीपणा व सेवाञुटीबद्दलची नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी  प्रस्‍तुतची तक्रार आहे.

 

तक्रार अर्जातील थोडक्‍यात हकीकत

अर्जदाराची नात कु.सायली सुहास पाठक ही गैरअर्जदार क्र.1 याची पेशंट होती. तारीख 23.09.10 रोजी तिला ताप उलट्या व डोकेदुखीचा ञास होत होता म्‍हणुन गैरअर्जदार क्र.1 कडे नेले. त्‍यांनी तपासणी करून तीन दिवसांच्‍या गोळया दिल्‍या. चौथ्‍या दिवशी म्‍हणजे 27.09.10 रोजी तिला पुन्‍हा दवाखान्‍यात नेले. त्‍यावेळी ताप असल्‍याचे निदान करून तीन दिवसांच्‍या गोळया दिल्‍या, परंतु तीन दिवस उलटुनही डोकेदुखी उलट्या ताप कमी झाला नाही म्‍हणुन तारीख 01.10.10 रोजी पुन्‍हा गैरअर्जदारकडे पेशंटला नेले तेंव्‍हा त्‍याने पॅथोलॉजीमधुन रक्‍ताच्‍या चाचण्‍या कराव्‍या लागतात असे सांगितले म्‍हणुन मधुलक्ष्‍मी पॅथालॉजी लॅब शिवाजी नगर येथे रक्‍ताची टेस्‍ट केली व 02.10.10 रोजी पुन्‍हा दुपारी 4.00 वाजता रिपोर्टसह गैरअर्जदार क्र.1 कडे पेशंटला नेले तेंव्‍हा त्‍यांनी तिला अडमीट करून सलाईनव्‍दारे औषधोपचार केले. राञी 8.00 च्‍या दरम्‍यान ती अत्‍यावस्‍थेत आहे म्‍हणुन पुढील उपचारासाठी तिची रवानगी गैरअर्जदार क्र.2 यांच्‍या दवाखान्‍यात केली. गैरअर्जदार क्र.2 ने अडमीट करून औषधोपचार सुरू केले व मुलीची प्रकृती आटोक्‍यात आहे सिटीस्‍कॅन व इतर तपासण्‍या उद्या सकाळी करु असे सांगितले. त्‍यानंतर पेशंटची प्रकृती खालावत गेली व राञी 2.30 वाजता तिची हालचाल बंद झाल्‍याचे दिसले म्‍हणुन डॉक्‍टरला बो‍ल‍विले त्‍यावेळी त्‍यांनी तपासुन पेशंट मुलगी मृत झाल्‍याचे घोषीत केले. अर्जदाराचे म्‍हणणे असे की, गैरअर्जदार क्र.1 कडे पेशंटला सुरवातीला नेले होते त्‍यावेळी त्‍याने चुकीचे निदान केले. आजारानुसार औषधोपचार न करता चुकीची औषधे दिली. निष्‍काळजीपणा करून पेशंटकडे दुर्लक्ष केले त्‍यामुळे ती गंभीर आजाराकडे गेली व त्‍यातच तिचा मृत्‍यु झाला. त्‍याला गैरअर्जदार क्र.1 हा सर्वस्‍वी जबाबदार आहे म्‍हणुन त्‍याची कायदेशीर दाद मागण्‍यासाठी ग्राहक मंचात प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार क्र.1 कडुन रूपये 10,000,00/- व वैद्यकीय निष्‍काळजीपणा व मानसिक ञासाची नुकसान भरपाई म्‍हणुन मिळावेत अशी मागणी केली आहे.

तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदाराचे शपथपञ (नि.2) आणि पुराव्‍यतील कागदपत्रात नि. 4 लगत अर्जदारास मयत मुलीच्‍या पालकाने प्रस्‍तुतची तक्रार, अर्जदार मयताचे आजोबा यांनी चालविण्‍यासाठी दिलेले अधिकार पञ, गैरअर्जदार क्र.1 ने लिहुन दिलेल्‍या औषधी, पॅथालॉजी रिपोर्टस गैरअर्जदार क्र.1 कडील डिस्‍चार्ज कार्ड, गैरअर्जदार क्र.2 यांनी लिहुन दिलेल्‍या औषधांचे पेपर्स, औषध खरेदीची बिले, पेशंटचे म़त्‍यु प्रमाणपञ वगैरे 9 कागदपञे दाखल केले आहेत.

तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तारीख 23.09.11 रोजी आपला लेखी जबाब (नि.14) दाखल केला. गैरअर्जदार क्र.2 यांनी नोटीस स्विकारूनही नेमले तारखेस अगर त्‍यानंतरही संधी देवुनही पुढील तारखेस मंचापुढे हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरूध्‍द तारीख 12.10.11 रोजी एकतर्फी आदेश पारीत करण्‍यात आला.

गैरअर्जदार क्रमांक 1 वकीलातर्फे प्रकरणात हजर झाल्‍यानंतर अड सोमाणी यांनी नि.13 चा अर्ज देवुन असे निवेदन केले की, तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.1 विरूध्‍द जिल्‍हाधिकारी परभणी यांच्‍याकडे लेखी तक्रार केलेली होती. जिल्‍हाधिका-यानी त्‍याबाबतचे केस पेपर्स वगैरे जिल्‍हा शल्‍यचिकीत्‍सक परभणी यांच्‍याकडे मतप्रदर्शनासाठी पाठविले होते. सिव्‍हील सर्जनचा रिपोर्ट मागविणे आवश्‍यक आहे अशी विनंती केली त्‍यानुसार मंचाने सिव्‍हील सर्जन परभणी यांना तारीख 02.11.11 रोजी रिपोर्ट मंचाकडे पाठविण्‍याबाबतचा आदेश पारीत करून तसे पञ पाठविले होते.

गैरअर्जदार क्र.1 तर्फे तारीख 23.09.11 रोजी दाखल केलेल्‍या लेखी जबाबात (नि.14) त्‍याने तक्रार अर्जातुन गैरअर्जदार क्र.1 विरूध्‍द केलेले सर्व आरोप व विधाने साफ नाकारली आहेत. त्‍यांनी असा खुलासा केला आहे की, गैरअर्जदाराने पेशंटला ता.23.09.10, 27.09.10, 01.10.10 व 02.10.10 एवढया दिवशी पेशंट दवाखान्‍यात आला त्‍यावेळी ट्रीटमेंट दिली होती. तक्रार अर्जामध्‍ये पेशंटला गैरअर्जदार क्र.1 ने चुकीची औषधे दिली होती, परंतु ती कशी चुकीची होती याचे स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही. गैरअर्जदार क्र.1 ने काय औषधे दिली त्‍याची यादी अर्जदाराने दाखल केलेलीच आहे. गैरअर्जदार क्र. 1 हा प्रतिष्‍ठीत बालरोगतज्ञ आहे. तो डी.सी.एच. वैद्यकीय पदवीधारक असुन 1999 पासुन प्रॅक्‍टीस करीत आहे. वैद्यकीय सेवेबाबत त्‍याचे विरूध्‍द कसलीही तक्रार आतापर्यन्‍त नाही. अर्जदारची नात कु.सायली तारीख 23.09.10 रोजी गैरअर्जदार क्र.1 च्‍या दवाखान्‍यात ताप, उलट्या व डोकेदुखीच्‍या ञासाबददल आणली त्‍यावेळी गैरअर्जदार क्र.1 ने ‘’व्‍हायरल फिवर विथ गॅस्‍ट्रीटीस’’ म्‍हणजे असिडीटीसह ताप असे निदान करून ताप कमी होण्‍याबददल 1) TUF POD 100 mg Tabs,  2) Syruf Nimek para 3) Syruf Becasoule डोकेदुखीसाठी पॅरासिटीमॉल गोळया व उलटीसाठी Syruf emeset ही औषधी दिली होती. औषधी दिल्‍यानंतर ताप कमी झाला होता, प्रकृती चांगली होती असे पालकांनी सांगितले. ता.01.10.11 रोजी पेशंटला पुन्‍हा आणल्‍यानंतर फक्‍त उलटी होत असल्‍याचे सांगितले. म्‍हणुन त्‍याचे निदान होण्‍यासाठी पॅथॉलॉजीकल तपासणी करून घेण्‍यास सांगितले. मधुलक्ष्‍मी पॅथॉलॉजीमधील तपासणी अहवालासह पेशंटला दोन तारखेला दवाखान्‍यात आणले. अहवालामध्‍ये काविळीची प्राथमिक अवस्‍था असल्‍याचे निदान झाले होते. पुर्ण काविळमध्‍ये पेशंट गेला असेल तर एस.जी.पी. 120 च्‍या वर असते. रिपोर्टमध्‍ये फक्‍त 40.9 एवढेच दाखविले होते म्‍हणुन पेशंटला अडमीट करून एम्‍पीसिलीन इंजक्‍शन उलटीसाठी पॅरासिटीमॉल गोळी व हिस्‍टॉक इंजक्‍शन दिले. काही वेळानंतर पेशंटला झटके यायला सुरवात झाली म्‍हणुन तिला अतिदक्षता विभागात पाठविणे आवश्‍यक वाटल्‍याने गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र.2 कडे घेवुन जाण्‍याचा सल्‍ला दिला व पाठविण्‍यापुर्वी पेशंटला Midazolam इंजक्‍शन दिले होते. गैरअर्जदार क्र.1चे पुढे म्‍हणणे असे की, पेशंट सुरवातीला दवाखान्‍यात आली होती त्‍यावेळी तिचे सांगण्‍यावरून व निदान करून दिलेली औषधे मान्‍यताप्राप्‍त व बरोबर होती. दहा दिवसानंतर काविळीची सुरवात झाली होती त्‍यावेळी पुर्वीची हिस्‍टरी तशी नव्‍हती. ब्रेनमध्‍ये झटक्‍याची सुरवात अचानक केंव्‍हाही उदभवते. मेंदुत ताप घुसला की, असे प्रकार होतात. त्‍या लक्षणाशी गैरअर्जदार क्र.1 ने दिलेली औषधी चुकीची होती असा गैरअर्थ काढता येणार नाही. काविळच्‍या आजाराची लक्षणे अचानक उदभवल्‍यानंतर पेशंटला हायसेंटरवर पाठविले, त्‍याबाबतीत पुरेपुर गैरअर्जदार क्र.1 ने काळजी घेतली होती. त्‍याच्‍याकडुन कोणत्‍याही प्रकारचा निष्‍काळजीपणा झालेला नव्‍हता. अर्जदाराने फक्‍त गैरअर्जदार क्र.1 कडुनच पैसे उकळण्‍याच्‍या हेतुने त्‍याचेवर ठपका ठेवुन प्रस्‍तुतची तक्रार दाखल केलेली आहे ती खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे.   

लेखी जबाबाच्‍या पुष्‍टयर्थ गैरअर्जदार क्र.1 चे सरतपासणीचे शपथपञ नि.27 आणि पुराव्‍यातील कागदपञ नि.16 लगत जिल्‍हाधिकारी यानी सिव्‍हील सर्जन यांना ता.23.11.10 रोजी पाठविलेल्‍या पञाची कॉपी, सिव्‍हील सर्जन परभणी यांनी गैरअर्जदार क्र.1 ला तारीख 05.01.11 रोजी दिलेले पञ, गैरअर्जदार क्र.1 ने सिव्‍हील सर्जनकडे पाठविलेला खुलासा, छावा संघटनेच्‍या पदाधिका-यांनी पेशंटच्‍या मृत्‍युबद्दल जिल्‍हाधिकारी यांना दिलेले पञ, सिव्‍हील सर्जन परभणी यांनी गैरअर्जदार क्र.2 ला ता. 31.03.2011 रोजी दिलेले पञ, गैरअर्जदार क्र.1 ची पदवी प्रमाणपञे वगैरे 8 कागदपञे दाखल केलेली आहेत.

गैरअर्जदार क्र.1 तर्फे दिलेल्‍या नि.13 वरील अर्जातील विनंती प्रमाणे मंचाने जिल्‍हा शल्‍यचिकीत्‍सक परभणी यांना अर्जदारने केलेल्‍या तकारीसंबंधीचा अहवाल मंचाकडे पाठविणेबाबत कळविले होते, परंतु 5-6 महिने होवुन गेले तरी व स्‍मरणपञे पाठवुनही संबंधीत अहवाल मंचाकडे न आल्‍यामुळे दोन्‍ही पक्षकारांच्‍या संमतीनुसार व विनंतीवरून उभयितांचा लेखी युक्‍तीवाद दाखल करून घेवुन प्रकरणात अंतीम निकाल देण्‍यात येत आहे.  

निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

मुद्दे.                                            उत्‍तर.

 

1     गैरअर्जदार क्र.1 कडुन पेशंटला दिलेल्‍या औषधोपचारामध्‍ये

      वैद्यकीय निष्‍काळजीपणा झाल्‍याचे अर्जदाराने शाबीत केले

      आहे काय ?                                         नाही

2     अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पाञ आहे काय ?            नाही

3     निर्णय ?                                        अंतिम आदेशा प्रमाणे.    

                   कारणे

मुद्या क्रमांक‍ 1 ते 3 ः-

अर्जदाराची तक्रार व गैरअर्जदार क्र.1 यांचा लेखी जबाबमधील निवेदन यामधील अडमीटेड फॅक्‍टस खालीलप्रमाणे -

1     पेशंट कु.सायली हिचेवर प्रथम ता.23.09.10 नंतर 27.09.10, 01.10.10 व शेवटी 02.10.10 रोजी गैरअर्जदार क्र.1 ने पेशंटला ताप, उलटी व डोकेदुखी या तक्रारी होत्‍या म्‍हणुन औषधोपचार केले होते.

2     गैरअर्जदार क्र.1 ने तारीख 02.10.10 रोजी पेशंटचा ताप कमी होत नाही म्‍हणुन दवाखान्‍यात अडमीट करून सलाईल लावुन तीन तास औषधोपचार केला त्‍यावेळी पेशंटला झटके सुरू झाले म्‍हणुन गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविले होते.

3     गैरअर्जदार क्र.2 कडे पेशंट गेल्‍यावर त्‍याने राञी इलाज केला व पेशंटची परिस्थिती आटोक्‍यात आहे सकाळी इतर तपासण्‍या करू असे सांगितले. परंतु राञी 3.00 वाजता पेशंट दगावली.

4     गैरअर्जदार क्र.1 ने पेशंटला कोणती औषधे दिली होती व कोणकोणत्‍या दिवशी उपचार केले तसेच मधुलक्ष्‍मी पॅथॉलॉजीकडील रिपोर्ट आणि गैरअर्जदार क्र.1 ने दिलेल्‍या औषधांची यादी जी तक्रार अर्जासोबत दाखल केलेली आहे ती दोन्‍ही पक्षकारांना मान्‍य आहे.

      अर्जदाराने दाखल केलेल्‍या कागदपञातुन गैरअर्जदार क्र.1 ला दोषी ठरविण्‍याच्‍या बाबतीत पेशंटच्‍या बोलण्‍याकडे दुर्लक्ष केले, आजाराचे निदान बरोबर केले नाही व आजारानुसार औषधोपचार न करता चुकीची औषधे दिली, तपासण्‍या योग्‍य वेळी न करता विलंबाने केल्‍या, उर्मट बोलले आणि अचुक आजाराची कल्‍पना पालकांना दिली नाही म्‍हणुन पेशंटला गंभीर आजार होवुन त्‍याचा मत्‍यु झाला असे आरोप केलेले आहेत.

गैरअर्जदार क्र.1 ने याबाबत लेखी जबाबात सविस्‍तर खुलासा केलेला आहे. आजाराचे निदान बरोबर केले नाही व चुकीचा उपचार केला तसेच योग्‍यवेळी तपासण्‍या न करता विलंबाने केल्‍या असे जे अर्जदाराने दोषारोप केलेले आहेत ते सिध्‍द करण्‍यासाठी त्‍याने तोंडी कथनाशिवाय अन्‍य कोणताही ठोस व सबळ लेखी पुरावा व कोणत्‍याही वैद्यकीय ज्ञानावर आधारीत तज्ञ डॉक्‍टरकडुन मान्‍य असलेला सबळ पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही किंवा त्‍यासंबधी वैद्यकीय क्षेञातील तज्ञ डॉक्‍टरचे शपथपञ अथवा अन्‍य पुरावा दिलेला नाही. उलट गैरअर्जदार क्र.1 तर्फे प्रकरणात नि.13 वरील अर्जातील मागणीप्रमाणे न्‍यायमंचाने सिव्‍हील सर्जन परभणी यांचेकडे तक्रार अर्जात दाखल केलेली कागदपञे पाठवुन अर्जदाराने पुर्वी जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे तक्रार केल्‍यानंतर त्‍यांनी सिव्‍हील सर्जनचा रिपोर्ट मागितला होता व त्‍या रिपोर्टची प्रतबाबत मंचाने सिव्‍हील सर्जन यांना कळविले होते, परंतु अर्जदाराने पक्षकारांचे लेखी युक्‍तीवाद दाखल होईपर्यन्‍त तो अहवाल प्रकरणात आलेला नव्‍हता आणि तो अहवाल अर्जदाराच्‍या दृष्‍टीकोनातुन महत्‍वाचा होता असे वादाकरिता मान्‍य केले तरी मंचाला सिव्‍हील सर्जनकडून रिपोर्ट येण्‍यासाठी  5-6 महिने हे प्रकरण युक्तिवादासाठी प्रलंबीत ठेवावे लागले होते.त्‍या दरम्‍यानच्‍या काळात अर्जदारानेच स्‍वतःहून जास्‍तीत जास्‍त धडपड करुन सिव्‍हील सर्जन कडील अहवाल प्रकरणात आणण्‍याचा प्रयत्‍न करायला पाहीजे होता,परंतु तसे न करता लेखी युक्तिवाद दाखल करुन निकाल देण्‍याचा आग्रह अर्जदाराने केल्‍यामुळे युक्तिवादात म्‍हंटल्‍याप्रमाणे गंभीर आजार व चुकीची औषधे गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिल्‍यामुळेच मंचापुढे सिव्‍हील सर्जनचा रिपोर्ट आला नाही त्‍यामुळे दोन्‍ही गैरअर्जदार दोषी ठरतात असे म्‍हंटलेले आहे,परंतु ते मान्‍य करता येणार नाही कारण कदाचित रिपोर्ट न पाठविण्‍यामागे निष्‍काळजीपणाचा अर्जदाराने केलेला आरोप चुकीचा असल्‍यामुळेही कदाचित तो रिपोर्ट पाठ‍वण्‍याची आवश्‍यकता त्‍यांना वाटली नसावी असाही ग्रहीत अर्थ निघतो.या केस मध्‍ये गैरअर्जदार क्रमांक 2 ने मंचाची नोटीस स्‍वीकारुनही नेमले तारखेस हजर झाले नाही व आपले लेखी म्‍हणणे अथवा पुरावा दिला नाही त्‍यामुळे त्‍याचे विरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत केला असला तरी तो हजर होवुन पुरावा न देण्‍याचे कारण अर्जदाराने तक्रारीच्‍या शेवटी विनंती क्‍लॉजमध्‍ये नुकसान भरपाईची मागणी फक्‍त गैरअर्जदार क्रमांक 1 कडूनच मागीतलेली आहे तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 च्‍या अंकुर रुग्‍णालयात पेशंटला दाखल केल्‍यावर त्‍याने काय सेवात्रुटी केली हे तक्रार अर्जात कुठेही नमुद केलेले नाही व त्‍याला दोषी ठरवलेले नाही मात्र अर्जदाराने आपल्‍या लेखी युक्तिवादात त्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 2 वर टाकली आहे.ती गोष्‍ट मान्‍य करता येणार नाही कारण मुळ तक्रारीत  गैरअर्जदार क्रमांक 2 विरुध्‍द क्‍लेम केलेला नसल्‍यामुळे गैरअर्जदार कमांक 2 विरुध्‍द निर्णय देता येणार नाही.      

 पुराव्‍यातील कागदपत्रांचे अवलोकन करता असे दिसून येते की, गैरअर्जदार क्रमांक 1 ने  दिलेली औषधे ही दोघांनाही मान्‍य आहेत मात्र ती चुकीची होती योग्‍य नव्‍हती. औषधामुळे रिअक्‍शन आली मुलगी गंभीर आजाराकडे गेली व निदान चुकीचे केले या सर्व बाबी गैरअर्जदार क्रमांक 2 कडून सिध्‍द करता आले असते कारण त्‍याने स्‍वतः पेशंटला पाहिले उपचार केला पण त्‍याने कुठेही गैरअर्जदार क्रमांक 1 च्‍या उपचारा विषयी आक्षेप घेतलेला दिसून येत नाही.किंवा विलंबाने पॅथॉलॉजी टेस्‍ट झाली असेही म्‍हंटलेले नाही तज्ञाचा रिपोर्ट काय आहे यासाठी मंचातर्फे परभणी सिव्‍हील हॉस्‍पीटलला पत्र पाठविल्‍यावर ही तज्ञाने त्‍यांचे मत मंचाकडे पाठवलेले नाही तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 1 च्‍या उपचाराबाबत कोणताही आक्षेप घेतलेला नाही तरी परंतु अर्जदार दुस-या अन्‍य एखादा अनुभवी बालरोग तज्ञ व त्‍याचे मेडिकल मत पुराव्‍यात दाखल करु शकला असता अर्जदाराने तसाही प्रयत्‍न केलेला नाही किंवा निष्‍काळजीपणा सिध्‍द होणारा ठोस पुरावा आणलेला नाही केवळ जिल्‍हाधिकारी परभणी यांच्‍याकडे चौकशीसाठी अर्ज देणे व छावा संघटनेकडे तक्रार दाखल करणे याबाबतची नोंद कायदेशिर दृष्‍टीकोनातून न्‍यायमंच घेवु शकत नाही व तो कायदेशिर पुरावाही होवु शकत नाही.

         अर्जदार तज्ञाव्‍दारे स्‍वतःची केस सिध्‍द करु शकलेला नाही तरीही गैरअर्जदार क्रमांक 1 ने जी काही पेशंटला ट्रीटमेंट दिली ती खरोखर चुकीची होती का? की योग्‍य होती हे पुराव्‍यातील कागदपत्रातून पाहता गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्‍याच्‍या पुराव्‍यात कोणत्‍या दिवशी कोणती औषध दिली होती हे नमुद केल्‍या प्रमाणे दिनांक 23/09/2010 रोजी ताप व उलटी ही लक्षणे पेशंटला होती म्‍हणून Viral  fever with gastritis म्‍हणजे ताप असिडीटीसह चे निदान केले होते त्‍यासाठी तीन दिवसांची औषधे दिली होती ती

1)TUFPOD 100 mg. 2)Syrup – Nimekpara 3) Syrup – Becasoule  या प्रमाणे होती नंतर तारीख 27/09/2010 रोजी पेशंटला आणले त्‍यावेळी अन्‍न जात नाही ताप वाढतो उलटी व डोके दुखीच्‍या लक्षणासाठी पुन्‍हा गैरअर्जदार क्रमांक 1 ने 1) Paracitemol आणि 2) Syrup-Emesset ही औषधे दिली होती त्‍यानंतर तारीख 01/10/2010 रोजी प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्‍हणून पेशंटच्‍या रक्‍ताचा पॅथॉलॉजी रिपोर्ट आणणेसाठी रेफर केले त्‍या रिपोर्ट मध्‍ये असे निदान केले आहे की, Accute Gastrities with Hypetatis म्‍हणजे काविळीची नुकतीच सुरवात झाली होती रिपोर्ट मध्‍ये SGPT 40 दाखवले आहे पुर्ण काविळ झाली असेल तर SGPT  120 च्‍या वर असते अर्जदाराने तो रिपोर्ट घेवुन गैरअर्जदार क्रमांक 1 कडें तारीख 02/10/2010 रोजी गेला होता त्‍यावेळी गैरअर्जदार क्रमांक 1 ने तीन औषध सलाईन मधून दिली होती त्‍यावेळी टेबलवर पेशंटला झटके सुरु झाल्‍यावर 1) Injection – Ampicillin – I.V. fluid   2) Injection Histac 3) Paracitimol  4) Injection – Midazolam ही औषधे दिली होती.व ताबडतोंब पेशंटला गैरअर्जदार क्रमांक 2 कडे अतिदक्षता विभागासाठी पाठवले होते त्‍यामुळे याबाबतीत गैरअर्जदार क्रमांक 1 कडून रोगनिदान चुकीचे करुन चुकीची औषधे दिली होती का हे ठरवतांना गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्‍याच्‍या शपथपत्रात असे नमुद केले आहे की, Viral  fever with gastritis त्‍यासाठी लागणारी तीन दिवसाची औषधे दिली होती तारीख 01/10/2010 रोजी पेशंटच्‍या लॅबरिपोर्ट  तपासणीमध्‍ये  Accute Gastrities with Hypetatis असे दिसून आले होते याचा अर्थ असिडीटीचे लक्षण त्‍यावेळीस होते पण रक्‍त तपासणीमध्‍ये तापाची लक्षणे व तिव्रता दाखवली जात नाही पण काविळीची सुरवात नुकतीच असल्‍याचे नमुद केलेले आहे त्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 ने केलेले निदान पॅथॉलॉजी रिपोर्टशी सुसंगत आहे असे दिसते.उलट 10-12 दिवसानंतर काविळीची लक्षणे दाखवली आहेत. अर्जदाराने स्‍वतः किंवा तज्ञाव्‍दारे गैरअर्जदार क्रमांक 1 ने केलेले रोग निदान चुकीचे होते हे सिध्‍द केलेले नाही उलटपक्षी अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार ताप उलटी या लक्षणा वरुन पॅथॉलॉजी रिपोर्ट व गैरअर्जदार क्रमांक 1 चे निदान बरोबर होते असाच निष्‍कर्ष निघतो.पेशटला पहिल्‍यांदा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे आणले त्‍यावेळी रक्‍त तपासणी केली असती तर काविळीची लक्षणे समजली असती का व त्‍यावर उपचार झाले असते का याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपल्‍या पुराव्‍यात असे म्‍हंटले आहे की, 8-10 दिवसापर्यंत ताप व उलटीची लक्षणे असतांना पहिल्‍याच दिवशी रक्‍त तपासणी करायची नसते दिवसानंतर हळूहळू जस जशी लक्षणे वाढतात तसे पुढिल निदान करावे लागते सकृतदर्शनी 8-10 दिवसा नंतर SGPT 40 असेल तर पहील्‍या दिवशी काहीही निघाले नसते हे खरे वाटते आणि दुसरी गोष्‍ट ताप व उलटीची लक्षणे हिवताप, निमोनिया, टायफाईड इत्‍यादी मध्‍ये असतात आणि हे सर्व रोग रक्‍ता मधून हळूहळू पसरतात हे गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्‍हणणे चुकीचे आहे असेही अर्जदाराने तज्ञाच्‍या पुराव्‍यातून खोडून काढलेले नाही.गैरअर्जदार क्रमांक 1 ने जी औषधे दिलेली होती ती लक्षणा प्रमाणे दिलेली नव्‍हती चुकीची होती हे ही सिध्‍द झालेले नाही म्‍हणून रक्‍त तपासणी विलंबाने केली व चुकीची औषधे दिली चुकीचे निदान केले ही बाब अर्जदाराकडून सिध्‍द झालेली नसल्‍यामुळे त्‍या विषयीचे गैरअर्जदार क्रमांक 1 वर केलेले आरोप ग्राह्य धरता येणार नाही.रक्‍ताचा पॅथॉलॉजी रिपोर्ट आल्‍यानंतर त्‍यामध्‍ये  पेशंटला काविळीचे लक्षणे नुकतीच सुरु झाल्‍याचे नमुद केले आहे. तारीख 02/10/2010 रोजी मेंदुत ताप घुसून झटके सुरु झाले हे म्‍हणून गैरअर्जदार क्रमांक 1 ने औषधे दिली होती ती चुकीची होती का याचा निर्णय देतांना काविळीसाठी कुठलेही औषध काम करत नाही फक्‍त विश्रांतीची जास्‍त गरज असते मेंदुत कोणत्‍याही क्षणी ताप अचानक उदभवु शकतो असे गैरअर्जदार क्रमांक 1 ने म्‍हंटलेले आहे झटके सुरु असतांना Midazolam हे औषध ताबडतोब दिले होते ते चुकीचे होते असाही पुरावा अर्जदाराने दिलेला नाही.उलट योग्‍य वेळी योग्‍यती औषधे दिली होती त्‍याचा पूर्ण तपशिल गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबात दिला आहे.तसेच  I.C.U.साठी योग्‍यवेळी पाठवले होते हे गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्‍हणणे रास्‍त आहे.

      गैरअर्जदार क्रमांक 2 चा पुरावा अर्जदाराने पहिल्‍यानंदाच लेखी युक्तिवादासोबत दाखल केला आहे त्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्रमांक 2 ने सिव्‍हील सर्जनपुढे साक्ष दिली होती व औषधी कोणती दिली हे सांगितले होते त्‍यामध्‍ये ही गैरअर्जदार क्रमांक 1 ने चुकीची औषधे दिली होती  असे कुठेही सांगितलेले नाही उलट अर्जदाराने म्‍हंटल्‍याप्रमाणे पेशंटला गैरअर्जदार क्रमांक 2 कडे नेल्‍यावर पेशंटची परिस्थिती अटोक्‍यात आहे.दुस-या दिवशी पुढिल तपासण्‍याकरु असे म्‍हंटलेले होते त्‍याअर्थी अर्जदाराने त्‍या विरुध्‍द पुरावा स्‍वतः दाखल न केल्‍यामुळे ग्राह्य मानता येणार नाही.व तो पुरावा पहाता गैरअर्जदार क्रमांक 1 हा दोषी होता असे कुठेही नमुद नसल्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 दोषी ठरु शकत नाही.गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपल्‍या बचावाच्‍या पुष्‍टयर्थ साक्षी पुरावा म्‍हणून डा.बापुराव मोरे परभणी बालरोग तज्ञ हे 30 वर्षांपासून प्रॅक्‍टीस करतात त्‍यांचे शपथपत्र नि.30 वर दाखल केलेले आहे.त्‍यांनीही गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिलेली औषधे व केलेले निदान चुकीचे नव्‍हते व हीच औषधे पेशंटने सांगितलेल्‍या लक्षणावर दिली जातात व पध्‍दती अवलंबीण्‍यात येते. असे शपथपत्रातून शपथेवर सांगितलेले आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 च्‍या युक्तिवादात निष्‍काळजीपणा कशाला म्‍हणतात हे पान क्रमांक 5 परिच्‍छेद 5 मध्‍ये सविस्‍तर कथन केलेले आहे व वैद्यकीय निष्‍काळजीपणाची व्‍याख्‍याही दिलेली आहे त्‍यानुसार जरी विचार केला तरी गैरअर्जदार क्रमांक 1 बालरोग तज्ञ आहे त्‍याचेकडून निष्‍काळजीपणा झाला सेवात्रुटी केली असा कोणताही सबळ पुरावा प्रकरणात आलेला नाही व ते सिध्‍द झालेले नसल्‍यामुळे अर्जदाराने तक्रार अर्जातून मागणी केलेली कोणतीही नुकसान भरपाई मिळणेस तो पात्र नाही.या संदर्भात रिपोर्टेड केस 2000 (1) सी.पी.आर.पान 42 (महाराष्‍ट्र राज्‍य आयोग) आणि रिपोर्टेड केस 2001 (2) सी.पी.आर. पान 45 (राष्‍ट्रीय आयोग) मध्‍ये असे मत व्‍यक्‍त केले आहे की, Whether the Doctor rendered his service with reasonable care under the circumstances he was not expected to guarantee result expected by patient and could note be accused in deficiency in service हे मत प्रस्‍तुत प्रकरणाच्‍या बाबतीतही लागु पडते.सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर नकारार्थी देवुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.

 

        आदेश                          

                       

1          तक्रार अर्ज फेटाळण्‍यात येत आहे.

3     पक्षकारांनी आपला खर्च आपण स्‍वतः सोसावा.

4     आदेशाच्‍या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्‍यात.  

 

 

 

        श्रीमती. सुवर्णा देशमुख.                    श्री. सी.बी. पांढरपट्टे

              सदस्‍या                             अध्‍यक्ष

 

 

 

 
 
[HONABLE MR. C. B. Pandharpatte]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. Shrimati Suwarna Deshmukh]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.