Maharashtra

Ahmednagar

CC/13/293

Sandip Ratan Mohite - Complainant(s)

Versus

Dr.Sau Kamini N.Shete - Opp.Party(s)

S.B. Mundada

27 Feb 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/13/293
( Date of Filing : 30 Jul 2013 )
 
1. Sandip Ratan Mohite
Mhalas Pimpalgaon,Tal Newasa,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr.Sau Kamini N.Shete
Shete Hospital,Swami Vivekanand Chowk,Ganeshwadi Road,Sonai,Tal Newasa,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:S.B. Mundada , Advocate
For the Opp. Party: Adv. Deshpande Abhijeet, Advocate
Dated : 27 Feb 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – २७/०२/२०२०

(द्वारा मा. अध्‍यक्ष : श्री. विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत तक्रार दाखल केलेली आहे.

२.  तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की,  तक्रारदाराची धर्मपत्‍नीला दिनांक ११-०५-२०१३ रोजी सामनेवाले हिच्‍या आणि तिचा डॉक्‍टर असलेल्‍या  पतीच्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये पत्‍नीचे पोट दुखत असल्‍याने घेऊन गेले होते. सामनेवाले यांनी तक्रारदाराला सांगितले की, तक्रारदाराचे पत्‍नीला मुतखडा झालेला आहे आणि किडनीमध्‍ये खडे झालेले आहेत. तक्रारदाराने डॉक्‍टर काळे यांच्‍या  सल्‍ल्‍यानुसार अहमदनगर येथील वानखेडे हॉस्‍पीटलमध्‍ये त्‍याच्‍या पत्‍नीला घेऊन गेला होता. दिनांक ११-०५-२०१३ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराला वैद्यकीय सल्‍ला दिला की, तक्रारदाराचे पत्‍नीच्‍या किडनीमध्‍ये खडे झालेले आहे. त्‍यामुळे तिच्‍या पोटात असलेल्‍या बाळाची वाढ होणार नाही आणि सदरचे बाळ हे जन्‍मतःच अपंग होईल त्‍यामुळे तुम्‍ही तुमच्‍या पत्‍नीचा गर्भ पाडुन घ्‍या आणि काढून टाका. जर तुम्‍हाला तुमची बायको जिवंत रहावी असे वाटत असेल तर हा गर्भ माझ्या सल्‍ल्‍याने काढून घ्‍या. तुम्‍हाला तुमची बायको किंवा बाळ दोन्‍हीतले काय पाहिजे. तुमच्‍या पत्‍नीचा गर्भ पाडल्‍यास तिच्‍या पोटात दुखायचे थांबुन जाईल. तरी तुम्‍ही उद्या गर्भ पाडण्‍याच्‍या शस्‍त्रक्रियेसाठी तयारीने या आणि गर्भ माझ्या हॉस्‍पीटलमध्‍ये माझ्या हातुन पाडला हे कोणालाही सांगू नका. दिनांक १२-०५-२०१३ तक्रारदाराने त्‍याची पत्‍नी हिला सामनेवालेकडे घेऊन गेले. सामनेवाले यांनी तक्रारदार हिच्‍या सोनई येथील शेटे हॉस्‍पीटलमध्‍ये क्‍युरेटींग, गर्भ पाडण्‍याची शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी घेऊन आला. तसेच सामनेवाले हिने तक्रारदाराच्‍या पत्‍नीचा गर्भ पाडण्‍यापूर्वी तक्रारदाराचे पत्‍नीचे रक्‍त व लघवी तपासलेले नव्‍हते व नाही. तक्रारदाराचे पत्‍नीला दिनांक १२-०५-२०१३ रोजी दुपारी १२.३० वाजता सोनई येथील शेटे हॉस्‍पीटलमध्‍ये ऑपरेशन थिएटरमध्‍ये नेले आणि सामनेवाले हिने दुपारी ४.३० वाजता फिर्यादीचे पत्‍नीचे क्‍युरेटींग पूर्ण केले आणि याप्रमाणे फिर्यादीच्‍या पत्‍नीचे गर्भाचे अॅबॉर्शन केले. तक्रारदाराचे पत्‍नी दिनांक १२-०५-२०१३ रोजी रात्री ९.३० वाजता शुध्‍दीवर आली आणि त्‍याच दिवशी १२-०५-२०१३ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराचे पत्‍नीला डिस्‍चार्ज दिला. सामनेवालेचे हॉस्‍पीटलमध्‍ये तक्रारदार यांनी त्‍याच्‍या पत्‍नीकरीता औषधोपचार वगैरेकरीता खर्च केला. त्‍यानंतर दिनांक १३-०५-२०१२ रोजी तक्रारदाराचे बायकोची लघवी बंद झाली आणि जेवणही घेत नव्‍हती. त्‍यामुळे तक्रारदाराने त्‍याची बायकोला सामनेवालेकडे घेऊन गेला, पुढे दिनांक १४-०५-२०१३ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराचे बायकोला एक इंजेक्‍शन दिले आणि असे सांगितले की, मुतखड्यामुळे लघवी होत नाही. तुम्‍ही काही काळजी करू नका. याप्रमाणे तारीख दिनांक ११-०५-२०१३ रोजी दिलेल्‍या सल्‍ल्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विश्‍वासघात केला होता. त्‍यानंतर दिनांक १५-०५-२०१३ रोजी तक्रारदाराच्‍या पत्‍नीला त्रास होऊ लागला तेव्‍हा तक्रारदार पुन्‍हा सामनेवालेकडे घेऊन गेला. त्‍यावर सामनेवाले यांनी सांगितले की, माझा भाऊ प्रवरा मेडिकल ट्रस्‍ट लोणी येथे डॉक्‍टर आहे. मी त्‍याला फोन करते. तोदेखिल तज्ञ डॉक्‍टर आहे. तुम्‍ही  ताबडतोब लोणी येथे, प्रवरा मेडिकल ट्रस्‍टच्‍या दवाखाण्‍यात जा. त्‍यावेळेस तक्रारदाराने सामनेवाले हिला तक्रारदाराच्‍या नातेवाईकासमक्ष प्रवरा मेडिकल ट्रस्‍टच्‍या डॉक्‍टरला लेखी पत्र द्या, अशी विनंती केली. त्‍यावेळेस सदर सामनेवालेने असे सांगितले की, तो डॉक्‍टर माझा भाऊच आहे. चिठ्ठीची काही आवश्‍यकता नाही. त्‍यामुळे सामनेवालेच्‍या वैद्यकीय सल्‍ल्‍याप्रमाणे आणि सामनेवाले ही सुशिक्षीत, सूज्ञ आणि चांगली डॉक्‍टर असल्‍यामुळे विश्‍वास ठेऊन  तक्रारदार त्‍याचे बायकोला घेऊन लोणी येथे प्रवरा मेडिकल ट्रस्‍टच्‍या  दवाखान्‍यात गेला. सदर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्‍टच्‍या दवाखान्‍यात गेला. तेथे तक्रारदाराचे बायकोचे रक्‍त व लघवी तपासण्‍यात आले आणि एक्‍स-रे देखील काढण्‍यात आला आणि त्‍याचे सर्व रिपोर्ट संध्‍याकाळी ५ वाजता तक्रारदाराला देण्‍यात आले. त्‍यावेळेस प्रवरा मेडीकल ट्रस्‍टच्‍या संबंधीत डॉक्‍टरांनी तक्रारदाराला असे सांगितले की, तुमच्‍या बायकोचे क्‍युरेटींग करतांना खूप रक्‍त स्‍त्राव झालेला आहे आणि त्‍यामुळे इन्‍फेक्‍शन देखिल झालेले आहे आणि तक्रारदाराचे बायकोची किडनी व त्‍याचे कार्य बंद पडलेले आहे, फेल झालेले आहे आणि आमच्‍या  दवाखान्‍यात किडनीचे तज्ञ डॉक्‍टर नसल्‍याने तुम्‍ही तुमच्‍या बायकोला र्शिर्डीच्‍या  पुढे असलेल्‍या आत्‍म मलिक हॉस्‍पीटलमध्‍ये किंवा विळद घाटातील विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्‍ये घेऊन जा.      

     त्‍यानंतर दिनांक १६-०५-२०१३ रोजी विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी सर्व रिपोर्ट पाहून तक्रारदाराला सांगितले की, क्‍युरेटींगमुळे खूप रक्‍तस्‍त्राव झालेला आहे. तसेच पू देखिल झालेला आहे, गर्भाशय, मुत्राशय आणि आतड्यांनादेखिल रक्‍तस्‍त्राव झाल्‍यामुळे इजा झालेली आहे आणि ते देखील खराब झाले. त्‍यामुळे ऑपरेशन करावे लागेल. त्‍याशिवाय कोणताही मार्ग नाही. त्‍यावेळेस सामनेवाले हिचे डॉक्‍टर पती व त्‍यांचे कम्‍पाउंडर निमसे हे सर्वजण विखे पाटील मेमोरियल हॉस्‍पीटल येथे हजर होते. त्‍याचवेळेस संबंधीत डॉक्‍टरांनी सामनेवाले हिची कानउघाडणी तक्रारदार समक्ष आणि त्‍याचे नातेवाईकासमोर केली. त्‍याच वेळेस सामनेवाले व तिचे पती अत्‍यंत घाबरलेल्‍या  अवस्‍थेत होते. दिनांक १६-०५-२०१३ रोजी तक्रारदाराचे पत्‍नीचे ऑपरेशन करण्‍यात आले व आ.सी.यु. मध्‍ये १० दिवस ठेवण्‍यात आले आणि दिनांक २९-०६-२०१३ रोजी तक्रारदाराचे पत्‍नीला विखे पाटील मोमोरियल हॉस्‍पीटलमधुन डिस्‍चार्ज देण्‍यात आला. तक्रारदाराची पत्‍नी दिनांक १५-०५-२०१३ ते २०-०६-२०१३ पर्यंत विखे पाटील मेमोरियल हॉस्पिीटल विळद घाट येथे एकंदरीत ४४ दिवस अॅडमिट होती व त्‍या दरम्‍यान औषधांचा, राहण्‍याचा व प्रवासाचा एकुण खर्च रक्‍कम रूपये १,३०,०००/- झाला. सामनेवाले हिच्‍याकडे मेडिकल टर्मीनेशन ऑफ प्रेग्‍नन्‍सी सेंटर मंजुर नसतांना देखिल सामनेवाले यांनी स्‍वतः मेडिकल निग्‍लीजन्‍स केला. त्‍यामुळे तक्रारदाराचे पत्‍नीची उजवी किडनी सामनेवाले हिच्‍याकडुन क्‍युरेटींग करतांना डॅमेज झाली आणि सदर किडणी संपूर्णपणे काढून टाकण्‍यात आली आणि हलगर्जीपणे सामनेवाले यांनी क्‍युरेटींग केल्‍यामुळे तक्रारदाराचे पत्‍नीचा फार मोठ्या प्रमाणात त्रास झाला. म्‍हणुन तक्रारदाराने सामनेवालेविरूध्‍द हलगर्जीपणाबाबत वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीसला सामनेवालेने कोणतेही उत्‍तर दिलेले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या बायकोकरीता क्‍युरेटींग करीत असतांना वैद्यकीय शास्‍त्राप्रमाणे आवश्‍यक असणारी काळजी आणि तत्‍परता घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराचे पत्‍नीला खुप त्रास भोगावा लागला. म्‍हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.                  

३.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवालेकडुन तक्रारदाराला झालेल्‍या खर्चाची रक्‍कम रूपये १३,४७,२००/- मिळण्‍याचा आदेश व्‍हावा व सदरील रक्‍कम तक्रारदाराला देण्‍याचा हुकुम व्‍हावा, अशी विनंती केली आहे.

४.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात  आली. सामनेवाले हे नोटीस मिळाल्‍यानंतर प्रकरणात हजर झाले व निशाणी १५ वर त्‍यांची कैफीयत दाखल केली. सामनेवालेने कैफीयतीत असे कथन केले की, तक्रारदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असुन त्‍यांना नाकबुल आहे. सामनेवालेने पुढे असे कथन केले की, तक्रारदार यांना सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कायद्याप्रमाणे दाखल करण्‍याचा कोणताही अधिकार नाही. तसेच तक्रारदार ही सामनेवालेची ग्राहक नाही. म्‍हणुन सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती करण्‍यात आलेली आहे. सामनेवालेने पुढे असे कथन केले आहे की, तक्रारीत पतीने बायकोवर करण्‍यात आलेल्‍या  उपचाराबाबतची कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. तसेच सदर तक्रार तक्रारदाराने समानेवालेकडुन पैसे काढण्‍याकरीता दाखल केलेली आहे. सामनेवालेने पुढे असे कथन केले आहे की, डॉक्‍टर वानखेडे यांनी दिलेले औषधोपचार व सल्‍ल्‍यावरून तसेच सोनोग्राफी पेपर्स, रिपोर्ट व प्रिस्‍क्रीप्‍शनवरून ती सामनेवाले यांच्‍याकडे आली होती, ही बाब योग्‍य व बरोबर आहे. त्‍याच रिपोर्टप्रमाणे त्‍यांना Multiple renal म्‍हणजेच किडनीमध्‍ये खडे होते आणि सदर बाब तक्रारदाराचे तक्रारदाराचे पत्‍नीला सांगण्‍यात आलेली होती. डॉक्‍टर काळे यांनी पण सदर बाब तक्रारदाराचे पत्‍नीला सांगितली होती व तक्रारदाराचे पत्‍नीचे किडनीमध्‍ये बरेच खडे होते, ही बाब त्‍यांच्‍या तपासणीमध्‍ये आढळली होती. दिनांक ११-०५-२०१३ रोजी सामनेवाले डॉक्‍टरांनी तक्रारदाराचे पत्‍नीला असे सांगितले होते की, किडनीमध्‍ये बरेच खडे असल्‍याने त्‍यात पोटात असलेल्‍या बाळाची वृध्‍दी होऊ शकत नाही आणि त्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रेग्‍न्‍सीमध्‍ये गुंतागुंत होऊ शकते. परंतु सदर बाळ जन्‍मल्‍यानंतर अपंग होईल, हे काढायचे सांगितले नव्‍हते तसेच त्‍याला काढायचे सुचविले नव्‍हते. दिनांक १२-०५-२०१३ रोजी सामनेवालेने तक्रारदाराला गर्भाबाबत असलेला वैद्यकीय योग्‍य सल्‍ला तसेच त्‍याचे परिणाम चांगल्‍या प्रकारे समजावुन दिले होते. तक्रारदाराची पत्‍नी यांना पोटात दुखत असल्‍याने लघवीमध्‍ये रक्‍ताचे मोठे गोळे होते. त्‍यामुळे त्‍यांची प्रकृती खराब झाली, असे ओ.पी.डी. च्‍या पत्रावरून दिसून येते. त्‍याप्रमाणे त्‍यांना योग्‍य उपचार देण्‍यात आले. तसेच तक्रारदाराचे पत्‍नीला औषधपाणी दिले होते. सदर बाब तक्रारदाराला माहित होती, परंतु त्‍याने तक्रारीत जाणुनबूजुन लपवलेली आहे. तक्रारदाराने सामनेवालेला कोणीही रक्‍कम दिलेली नाही. हे म्‍हणणे चुकीचे आहे की, त्‍याने रक्‍कम रूपये ५,०००/- औषधोपचाराचा खर्च केलेला होता. हे म्‍हणणे चुकीचे आहे की, सामनेवालेचे भाऊ प्रवरा मेडिकल ट्रस्‍ट लोणी येथे डॉक्‍टर आहे आणि त्‍यांनी तक्रारदाराचे पत्‍नीला प्रवरा मेडिकल ट्रस्‍ट येथे पाठविले नव्‍हते. हे म्‍हणणे चुकीचे आहे की, दिनांक १५-०५-२०१३ रोजीचा रक्‍त तपासणी अहवालात तक्रारदाराची पत्‍नी यांना किडनीमध्‍ये त्रास झालेला आहे, असा अहवाल आलेला होता. दिनांक १५-०५-२०१३ रोजी प्रवरा इन्‍स्‍टीटयुट ऑफ मेडीकल सायन्‍स यांनी तक्रारदाराला विखे पाटील मेमोरीयल हॉस्‍पीटल मध्‍ये  जाण्‍यासाठी सल्‍ला दिला होता आणि तेथे सोनोग्राफी केली असतांना त्‍याचा आकार योग्‍य होता व उजव्‍या किडनीमध्‍ये  खडे असल्‍याने त्‍याचा आकार वाढला होता. उजव्‍या किडनीमध्‍ये खडे असल्‍याने सामनेवाले यांनी दिलेले उपचार व तक्रारदाराचे पत्‍नीला झालेला रक्‍तस्‍त्राव याचा कुठलाही संबंध नाही. दिनांक १६-०५-२०१३ रोजी तक्रारदाराचे पत्‍नीचे ऑपरेशन करण्‍यात आले व ती हॉस्‍पीटलमध्‍ये उपचार घेत होती, या संदर्भात सामनेवाले यांना कोणतीही माहिती नसल्‍याने सदरची बाब सामनेवालेने नाकारलेली आहे. सामनेवालेने कोणतेही चुकीचे उपचार तक्रारदाराचे पत्‍नीवर केले नाही. तसेच सामनेवाले ही एम.बी.बी.एस. (डी.जी.ओ.) अशी शिक्षीत डॉक्‍टर आहे आणि तक्रारदाराचे पत्‍नीला  खुप रक्‍तस्‍त्राव झाल्‍यामुळे योग्‍य उपचार देण्‍यात आले आहेत. सदर उपचार कोणतेही डॉक्‍टर किंवा गायनालॉजीस्‍ट यांनी दिले असते. त्‍यात कोणतीही कमतरता किंवा निषकाळजीपणा सामनेवाले यांनी केला नाही आणि तसेच डॉक्‍टर विखे पाटील मेमोरीयल हॉस्‍पीटल यांनी दिलेल्‍या  अहवालात त्‍यांनी किडनीमध्‍ये खडे असल्‍याने त्रास असुन तिच्‍या किडनीमधील खडे काढण्‍यात आलेले होते. म्‍हणुन सदर तक्रार खोट्या तथ्‍यावर दाखल करण्‍यात आलेली आहे, म्‍हणुन खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती करण्‍यात आलेली आहे.   

५.    तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र, दस्‍तऐवज, सामनेवाले यांचा खुलासा, शपथपत्र तसेच उभयपक्षांतर्फे केलेला युक्तिवाद यावरून  न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे विचारात घेण्‍यात येतात.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?

नाही

(२)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

मुद्दा क्र.१ -

६.     तक्रारदाराची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, तक्रारदाराचे पत्‍नीने सामनेवालेकडे उपचार घेतले होते व सदर तक्रार तक्रारदाराचे पत्‍नीने दाखल केलेली नाही. सामनेवालेने तक्रारीत प्राथमीक आक्षेप घेतला की, तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २(१) (ड) प्रमाणे सामनेवालेचा ग्राहक नाही, कारण तक्रारदाराने सामनेवालेकडुन कोणतेही उपचार घेतलेले नाही व त्‍याचा संबंध ग्राहक व सेवा देणार मध्‍ये नाही. सदरील मुद्यावर तक्रारदारतर्फे वकिलांनी मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी M/s. Spring Meadows Hospital & Anr. Vs. Harjol Ahluwalia Through K.S. Ahluwalia या न्‍यायनिवाड्याची प्रत दाखल केली आहे व युक्तिवादात असे कथन केले की, सदर न्‍यायनिवाडा हा प्रकरणात लागु पडत आहे, सदर न्‍यायनिवाड्यामध्‍ये ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम २ (१) (ड) प्रमाणे तक्रारदार ही उपचार घेणारी त्‍याची पत्‍नी  आहे व तक्रारदार हे लाभार्थी आहे. तसेच तक्रारदाराने त्‍याच्‍या पत्‍नीचे उपचाराकरीता खर्च केलेला आहे. म्‍हणुन रूग्‍ण व त्‍याचे नातेवाईक हे ग्राहक आहेत. वरील नमुद न्‍यायनिवाड्यामध्‍ये अज्ञान बालकाचे पालक यांनी तक्रार दाखल केली होती व त्‍यांना ग्राहक म्‍हणुन घोषीत करण्‍यात आले होते. त्‍या अनुषंगाने सदर प्रकरणातसुध्‍दा तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत. वरील नमुद न्‍याय‍निवाडा वाचण्‍यात असे दिसुन आले की, त्‍यामध्‍ये दिलेले जे रूग्‍ण होते ते अज्ञान पालक होते व त्‍यामुळे त्‍याला देण्‍यात आलेले सेवा संदर्भात तक्रार त्‍यांच्‍या पालकांनी केलेली होती व त्‍या पालकांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देणेबाबतचे मुद्यावर मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने निर्णय घेतला होता. सदर प्रकरणात तथ्‍य वेगळे आहे. यात रूग्‍ण आणि तक्रारदार हे सज्ञान आहे. तसेच सदर तक्रार रूग्‍णाने का दाखल केली नाही, याविषयी कोणतेही कथन केलेले नाही. तसेच तक्रारदाराने रूग्‍णाच्‍या संदर्भात त्‍यांनी स्‍वतः खर्च केला याचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदार हा कोणत्‍याही प्रमाणे लाभार्थी नाही. म्‍हणुन वर नमुद न्‍यायनिवाडा या तक्रारीत संपुणपणे लागु पडत नाही, असे मंचाचे मत आहे. रूग्‍ण अस्‍वस्‍थ झाला व रूग्‍णाला त्‍याकरीता आलेल्‍या उपचाराकरीता काही तक्रार होती तर त्‍याने ती तक्रार दाखल का नाही केली, हाही मंचासमक्ष प्रश्‍न उद्भवत आहे. म्‍हणुन रूग्‍णाचे पती यांना सदर तक्रार दाखल करण्‍याचे कोणतेही अधिकार नाही. तसेच तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २ (१) (ड) यात दिलेल्‍या ‘ग्राहक’ संज्ञेतील ग्राहक मध्‍ये बसत नाही. सबब तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक नाही, असे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

मुद्दा क्र.२ -

७. मुद्दा क्रमांक १ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

१. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

२. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

४.  तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.