Maharashtra

Pune

cc/2008/109

R.S.Bhosale - Complainant(s)

Versus

Dr.S.S.Athawale - Opp.Party(s)

R.C.Korde

22 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. cc/2008/109
 
1. R.S.Bhosale
fALTAN Satara
...........Complainant(s)
Versus
1. Dr.S.S.Athawale
Deccan Jymkkhan Pune
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

 श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्‍यक्ष यांचेनुसार
                              :- निकालपत्र :-
                         दिनांक 22 नोव्‍हेंबर 2011
 
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
 
1.                     तक्रारदार हे, पुणे येथील सिटी सर्व्‍हे नंबर 786/6 या मिळकतीचे मालक क्रिकेटमहर्षि कै. दि. ब. देवधर यांच्‍या बंगल्‍यामध्‍ये तळ मजल्‍यावरील एका खोलीमध्‍ये सन 1961 पासून भाडेकरु म्‍हणून रहात होते. श्री. दि. ब. देवधर यांच्‍या मृत्‍यूनंतर ही मिळकत मृत्‍यूपत्राद्वारे डॉ. सुमन एस. आठवले यांना मिळालेली आहे. ही मिळकत पाडून तेथे नवीन बांधलेल्‍या इमारतीमध्‍ये तक्रारदारास 300 चौ.फुट जागा - सदनिका क्र.101 सी, एडन गार्डन, पुणे 4, रुपये 2,85,000/- किंमतीस देण्‍याचे जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांनी ठरविले. त्‍याप्रमाणे तक्रारदार, श्री. धनंजय एस. भोसले,  डॉ. सुमन एस. आठवले तर्फे व साठी मिदावी बिल्‍डकॉन – नोंदणीकृत भागिदारी संस्‍था करीता भागिदार श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर यांच्‍यात सामंजस्‍य करार दिनांक 23 मार्च 2002 नुसार ठर‍ले होते. या करारानुसार तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 25/6/2004 रोजी रुपये 2,85,000/- अदा केले. करार झाल्‍यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदारांकडे कुठलाही संपर्क साधला नाही. त्‍यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून रुपये 37,000/- वीज जोडणीसाठी म्‍हणून घेतले. तक्रारदारांचे असे म्‍हणणे आहे की वीज जोडणीसाठी रुपये 20,000/- असतांना जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून रुपये 17,000/- जादा घेतले. वीज जोडणीची रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतरही जागेचा ताबा तक्रारदारांना देण्‍यात आला नव्‍हता. मागणी केल्‍यानंतर सन 2005 मध्‍ये सदनिकेचा ताबा देण्‍यात आला. त्‍यानंतरही जाबदेणार यांनी सदनिकेचे खरेदीखत तक्रारदारांच्‍या नावावर करुन दिलेले नाही. म्‍हणून अनेक वेळा जाबदेणारांकडे फोन करुन, प्रत्‍यक्ष व लेखी स्‍वरुपात मागणी करुनही आजपर्यन्‍त सदनिकेचे खरेदीखत करुन दिलेले नाही म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून सदनिकेचे खरेदीखत करुन मागतात. तसेच वीज जोडणीसाठी जादा घेतलेले रुपये 17,000/- माहे डिसेंबर 2005 पासून 15 टक्‍के व्‍याजासह, नुकसान भरपाईपोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मागतात. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
2.                तक्रारदारांनी तक्रारीमध्‍ये दुरुस्‍तीकरुन डॉ. सुमन एस. आठवले तर्फे व साठी मिदावी बिल्‍डकॉन नोंदणीकृत भागीदारी संस्‍था करिता भागीदार श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर यांना पक्षकार म्‍हणून समाविष्‍ट केलेले आहे. त्‍यातील श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर, मिदावी बिल्‍डकॉन व श्री. धनंजय भोसले यांना मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही गैरहजर, म्‍हणून त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फा सुनावणीचा आदेश मंचाने पारीत केला. 
3.                डॉ. सुमन एस. आठवले यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला आहे. तक्रारदारांनी सदरील तक्रार त्‍यांच्‍याविरुध्‍द केवळ सामंजस्‍य करारानुसार केलेली असल्‍याचे दिसून येते. परंतू हा सामंजस्‍य करार तक्रारदार व मे. मिदावी कन्‍स्‍ट्रक्‍शन्‍स द्वारा भागीदार श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर यांच्‍यात झालेला आहे. या सामंजस्‍य करारामध्‍ये सदरील जाबदेणार हया पक्षकार नव्‍हत्‍या. सामंजस्‍य करारानुसार इतर काही कागदपत्रांवरुन फक्‍त मिदावी बिल्‍डकॉन वा श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर यांच्‍या मध्‍येच करार व पत्र व्‍यवहार झालेला दिसून येतो.  त्‍यामुळे सदरच्‍या जाबदेणार यांनी नोंदणीकृत खरेदीखत करुन देण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. सदरचे जाबदेणार कै. दि. ब. देवधर यांच्‍या कन्‍या आहेत. कै. दि. ब. देवधर यांच्‍या नावे ही मिळकत होती. त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर सदरच्‍या जाबदेणार यांना ही मिळकत प्राप्‍त झाली होती. परंतू तक्रारदारां सारखे अनेक भाडेकरु तेथे रहावयास होते. त्‍यांच्‍याबरोबरही कुठलाही करार सदरच्‍या जाबदेणार यांनी केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे वीज जोडणीसाठी जादा घेतलेली रक्‍कम परत करण्‍याचा व नोदंणीकृत खरेदी खत करुन देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. विकसन करारनाम्‍यातील कलम 8 पान क्र.6 नुसार ही सर्व जबाबदारी ही विकसकाची आहे. त्‍यामुळे सदरील जाबदेणार यांच्‍याविरुध्‍दची तक्रार नामंजुर करण्‍यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4.                सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदार हे सिटी सर्व्‍हे नंबर 786/6 कै. दि. ब. देवधर यांच्‍या बंगल्‍यामध्‍ये भाडेकरु म्‍हणून रहात होते. सदरहू मिळकत मिदावी बिल्‍डकॉन तर्फे भागीदार श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर यांनी विकसीत करण्‍याची तयारी दर्शविली होती. श्री. दि.ब.देवधर यांच्‍या मृत्‍यूनंतर मृत्‍यपत्राद्वारे सदरहू मिळकत डॉ. सुमन एस. आठवले यांना मिळालेली आहे. डॉ. सुमन एस. आठवले तर्फे व साठी मे. मिदावी बिल्‍डकॉन करीता भागीदार श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर व तकारदार यांच्‍यात दिनांक 23 मार्च 2002 रोजी सामंजस्‍य करार झाल्‍याचे करारनाम्‍यावरुन दिसून येते. या सामंजस्‍य करारनाम्‍यावर श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर व तक्रारदार यांच्‍या सहया आहेत परंतू डॉ. सुमन एस. आठवले यांची सही नाही. करारानुसार तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 25/6/2004 रोजी रुपये 2,85,000/- मिदावी बिल्‍डकॉम यांना दिल्‍याचे दाखल पावतीवरुन दिसून येते. ही रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदारांना सन 2005 साली सदनिकेचा ताबा दिला. परंतू खरेदीखत मात्र करुन दिले नाही. तक्रारदार प्रस्‍तूत तक्रारीद्वारे जाबदेणार यांच्‍याकडून खरेदीखत करुन मागतात. कै. दि. ब. देवधर यांच्‍या मृत्‍यूनंतर मृत्‍यूपत्राद्वारे डॉ. सुमन एस. आठवले हया सदरहू मिळकतीच्‍या मालक झालेल्‍या आहेत. सदरहू मिळकत मिदावी बिल्‍डकॉन करीता भागीदार श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर यांनी विकसीत केलेली आहे. सदनिकेची संपुर्ण रक्‍कम जाबदेणार यांना अदा करुनही जाबदेणार यांनी सन 2005 तक्रारदारांना सदनिकेचा ताबा दिला परंतू अदयापपर्यन्‍त खरेदीखत करुन दिलेले नाही, ही जाबदेणार श्री. आळतेकर यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे.  तक्रारदारांच्‍या सदनिकेचे खरेदी खत करुन देणेसाठी मिदावी बिल्‍डकॉन करीता भागीदार श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर व डॉ. सुमन एस. आठवले यांची संमती व सहया असणे गरजेचे आहे. म्‍हणून मंच जाबदेणार मिदावी बिल्‍डकॉन करीता भागीदार श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर व डॉ. सुमन एस. आठवले या दोघांनी तक्रारदारांना नोंदणीकृत खरेदीखत करुन दयावे असा आदेश देतो. जाबदेणार श्री. आळतेकर [विकसक] यांच्‍या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारांना निश्चितच मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. म्‍हणून तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. म्‍हणून नुकसान भरपाईपोटी श्री. श्रीरंग आळतेकर, भागीदार, मिदावी बिल्‍डकॉन यांनी तक्रारदारांना रक्‍कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- दयावा असा मंच आदेश देत आहे.
5.                     जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून वीज जोडणीसाठी रुपये 17,000/- जादा घेतलेले आहेत असे तक्रारदार तक्रारीत नमूद करतात. तक्रारदारांनी ही रक्‍कम श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर यांना अदा केलेली आहे. तक्रारदारांनी सदनिकेचा ताबा सन 2005 मध्‍ये घेतलेला आहे.  तक्रारदारांनी यासदंर्भात प्रस्‍तूतची तक्रार मंचासमोर दिनांक 11/4/2008 रोजी दाखल केलेली आहे. म्‍हणून वीज जोडणीसाठी जादा रक्‍कम घेतली याबाबत तक्रार दाखल करण्‍यास विलंब झालेला आहे. म्‍हणून तक्रारदाराची ही मागणी मंच विचारात घेत नाही. तक्रारदारांची श्री. धनंजय भोसले यांच्‍याविरुध्‍द कुठलीही तक्रार नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द कुठलाही आदेश नाही.
                  वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे-
 
 
 
                                     :- आदेश :-
[1]                तक्रार  अंशत: मान्‍य करण्‍यात येत आहे.
[2]                जाबदेणार मिदावी बिल्‍डकॉन करीता भागीदार श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर व डॉ. सुमन एस. आठवले या दोघांनी तक्रारदारांची सदनिका क्र.101 सी, एडन गार्डन, पुणे 4 चे नोंदणीकृत खरेदीखत आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत करुन दयावे
[3]                जाबदेणार मिदावी बिल्‍डकॉन करीता भागीदार श्री. श्रीरंग दत्‍तात्रय आळतेकर यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत अदा करावा.
[4]          जाबदेणार क्र.2 श्री. धनंजय भोसले यांच्‍याविरुध्‍द कुठलाही आदेश नाही.
[5]                आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.     
 
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.