Maharashtra

Sangli

CC/11/330

Bhairu Bapu Mane - Complainant(s)

Versus

Dr.Ravindra M.Joshi & Ors.4 - Opp.Party(s)

D.D.Patil

05 Apr 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/11/330
 
1. Bhairu Bapu Mane
At.Chandur, Tal.Hatkanangale
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr.Ravindra M.Joshi & Ors.4
Siddhivinayak Cancer Hospital Miraj, Tal.Miraj,
Sangli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  A.V. Deshpande PRESIDENT
  K.D. Kubal MEMBER
 
PRESENT:D.D.Patil, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
तक्रार अर्ज क्र.330/2011
 
 
भैरु बापू माने व इतर                               ...                तक्रारदार
 
विरुध्‍द
 
डॉ.रविंद्र एम. जोशी व इतर                         ...                जाबदार
 
 
नि.1 खालील आदेश
 
      तक्रादारातर्फे त्‍यांचे विद्वान वकिल श्री.डी.डी.पाटील यांचा दाखलपूर्व युक्तिवाद ऐकला. फिर्याद व त्‍यासोबत दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचे अवलोकन केले. तक्रारदाराचे मुख्‍य कथन असे दिसते की, त्‍याचा भाऊ बंडू बापू माने हा कॅन्‍सरने आजारी होता. त्‍या रोगावर सिध्‍दीविनायक कॅन्‍सर हॉस्‍पीटल, सांगली यांचेकडे दि.27/08/2010 ते 13/10/2010 हया दरम्‍यान उपचार सुरु होता. त्‍यांचा कॅन्‍सर रोग बळावल्‍याने सिध्‍दीविनायक हॉस्‍पीटलमधील डॉक्‍टरांनी ऑपरेशन करण्‍याच्‍या नावाखाली दि.26/01/2011 रोजी ऍडमीट करुन घेतले. तथापी त्‍याची कोणतीही तपासणी, ऑपरेशन अगर औषधोपचार न करता सदरचा पेशंट अत्‍यव्‍यस्‍थ व उपचार करण्‍यायोग्‍य नसल्‍याचे सांगून (Last Stage) ला दि.29/01/2011 रोजी डिस्‍चार्ज केला. परंतु, त्‍यानंतर दि.21/03/2011 पर्यंत त्‍याचा भाऊ जिवंत होता आणि दि.21/03/2011 रोजी त्‍याचे निधन झाले.  हयाचाच अर्थ सिध्‍दीविनायक कॅन्‍सर हॉस्‍पीटलमधील डॉक्‍टरांनी कोणतीही तपासणी व्‍यवस्‍थीत न करता त्‍याचे भावास अत्‍यव्‍यस्‍थ ठरवून विना औषधोपचार घरी पाठवून दिले आणि त्‍याच्‍या भावासंबंधी केलेले निदान हे पूर्णतः खोटे चुकीचे व निष्‍काळजीपणे केले व त्‍यायोगे त्‍यास सदोष सेवा देवून सेवेत त्रुटी केलेल्‍या आहेत.
      तक्रारीतील हया वर नमूद आरोपांच्‍या अनुषंगाने सदर प्रकरणात दाखल केलेली कागदपत्रे अवलोकली तर आणि मुख्‍यतः सिध्‍दीविनायक गणपती कॅन्‍सर हॉस्‍पीटल मिरज यांचेकडील मयत बंडू बापू माने हयांच्‍यासंबंधीचा केस पेपर जर अवलोकीला तर त्‍यात सदर हॉस्‍पीटलने मयत बंडू बापू माने हयाचेवर उपचार करण्‍याकरीता कोणतीही हयगय केल्‍याचे दिसत नाही. त्‍यास तपासलेच नाही आणि औषधोपचार दिलेच नाहीत असे जे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे ते म्‍हणणे केसपेपरवरुन चुकीचे वाटते. आपल्‍या भावाचे चुकीचे निदान करुन चुकीची औषधोपचार योजना केली असे तक्रारदाराचे म्‍हणणे नाही व त्‍या पार्श्‍वभूमीवर जर केसपेपरमधून तक्रारदाराचे भावास औषधोपचार व इतर उपाययोजना केल्‍याचे दिसत असेल तर त्‍यास सेवेतील काही त्रुटी झाली किंवा काही सदोष सेवा देण्‍यात आली असे प्रथमदर्शनी म्‍हणता येत नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये सकृतदर्शनी कोणतीही सेवेत त्रुटी किंवा सदोष सेवा देण्‍यात आली असे म्‍हणता येत नाही. सबब, प्रस्‍तुतची तक्रार ही चालण्‍यास पात्र नाही. हया कारणास्‍तव प्रस्‍तुतची तक्रार दाखल करुन घेता येत नाही आणि ती दाखलपूर्व पातळीवरच खारीज करावील लागेल असे या मंचाचे मत आहे. सबब आम्‍ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
 
     प्रस्‍तुतची तक्रार नाकारण्‍यात येत आहे. खर्चासंबंधी काहीही आदेश नाही. 
 
 
 
दि.05/04/13.
ठिकाण – सांगली.
 
 
                        (के.डी.कुबल)                      (ए.व्‍ही.देशपांडे)
                           सदस्‍य                         अध्‍यक्ष
 
 
[ A.V. Deshpande]
PRESIDENT
 
[ K.D. Kubal]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.