::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/07/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाविरुध्द त्यांच्या वैद्यकीय सेवे संदर्भात दाखल केली आहे.
सदर प्रकरण तक्रारकर्त्याचे वकिलांचे प्राथमिक युक्तिवादाकरिता नेमलेले असतांना, त्यांनी दिनांक 17/07/2017 रोजी पूरसीस दाखल केली की, ‘‘ सदर प्रकरणात काही तांत्रीक चूक झाली आहे. त्यामुळे सदर प्रकरण पुढे चालविण्यात येऊ नये ’’
सबब अर्जदारास / तक्रारदारास आवश्यकता भासल्यास नव्याने प्रकरण दाखल करण्याची मुभा देण्यात येत आहे व पुढील प्रमाणे, अंतिम आदेश, पारीत करण्यात येत आहे.
:::अं ति म आ दे श:::
1) तक्रारकर्ता यांची तक्रार पुरसिसप्रमाणे खारीज करण्यात येत आहे.
2) तक्रारकर्त्यास आवश्यकता भासल्यास विहीत मुदतीत नव्याने प्रकरण दाखल करण्याची मुभा देण्यात येत आहे.
3) या न्यायमंचाचे सदस्यांची प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
4) सदर आदेशाची प्रत तक्रारदारास निःशुल्क दयावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri